कडीपत्ता चट्णी

किर्ति's picture
किर्ति in पाककृती
11 Sep 2008 - 12:40 pm

हा माझा प्रयोग माझ्या नवरया ला आवडला
म्हणुन लिहित आहे
साहित्य:- एक जुडी कडीपत्याची पाने,थोडी कोथबिर्,थोडेसे शेगदाणे,मिरच्याचे तुकडे, मीठ,एक चमचा तेल

क्रुति:-तेलात आधी कडीपत्याची पाने तळून घेणे नन्तर कोथबिर तळुन घेणे त्यानन्तर मिरच्या आणि शेगदाणे वेगवेगळे तळुन घेणे
हे सर्व खलबत्यात जाडसर वाटून घेणे मीठ घालायला विसरु नये

झक्कास कुरकुरित होते हि चटणी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 1:10 pm | विसोबा खेचर

वा! ही आमची अत्यंत आवडती चटणी! :)

किर्ती, अजूनही अश्याच चांगल्या पाकृ येऊ द्यात प्लीज..

आपला,
(चटणीप्रेमी) तात्या.

स्वाती राजेश's picture

11 Sep 2008 - 6:23 pm | स्वाती राजेश

मी अशी दोडक्याच्या शिरांची करते..
ही एकदा करून पाहते...

शितल's picture

11 Sep 2008 - 6:32 pm | शितल

अग किती सोपी आहे मी नुसती ही चटणी खाल्ली आहे पण करून नाही पाहिली.
आता नक्की करून पहाते :)

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2008 - 6:59 pm | स्वाती दिनेश

चटणी आवडली,आणखी काही चटण्या इथे पहा.
स्वाती

चकली's picture

11 Sep 2008 - 10:10 pm | चकली

मला हि चटणी खूप आवडते. गरम उत्तप्यावर किंवा आंबोळी वर तुप आणि ही चटणी झकास लागते !
चकली
http://chakali.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2008 - 10:13 pm | प्रभाकर पेठकर

कढीपत्याची चटणी स्वादिष्ट लागतेच, त्याच बरोबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते असे वाचले आहे.