१ वाटी - तूरडाळ,
१/२ वाटी साडंगे ( हे बहुधा उन्हाळकामात बनवले जातात्...सगळी कडधान्ये असतात)
चिंच, गूळ,
तेल,जीरं, मोहरी,हिंग्,हळद ( फोड्णी साठी)
कृति -
नेहमी आमटी साठी घेतो तशी डाळ शिजवुन घेणे.
शिजताना थोडेसे तेल आणि हळद टाकावी . ( आयुर्वेदानुसार यामुळे डाळीचा वातुळ पणा कमी होतो.)
तेल तापवुन मोहरी, जीरं,हिंग आणि हळद टाकावी. कढिपात्ता टाकावा.
फोडाणीत साडंगे परतुन घ्यावे. झाकण ठेवुन जरा वाफ आणावी.
वरून शिजलेलि डाळ घालावी.
उकळी आल्यावर चिंच , गुळ घालावा आणि गोडा मसाला टाकावा....
सांडगे शिजु द्यावे....
चविपुरते मीठ आणी लाल ति़खट टाकायला विसरु नये.
मस्त गरम भाताबरोबर आस्वाद घ्यावा.
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 8:00 pm | रेवती
आजचा स्वयंपाक झाला. उद्या करून बघावी म्हणते. कळवीन कशी झाली ते.
रेवती
10 Sep 2008 - 9:01 pm | प्राजु
पटेल मधून घेउन येते आता आणि करते.
(आवांतर : परवा चतुरंग च्या घरि केले आहेत ते सांडगे .. आणायला हवे होते थोडे.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2008 - 11:48 am | विसोबा खेचर
सांडग्यांची आमटी उत्तम!
सोबत फोटूही जोडला असतात तर बरे झाले असते!
तात्या.
14 Sep 2008 - 7:31 am | रेवती
नीताताई,
आत्ताच सांडग्यांची आमटी केली होती. मस्त झाली बरं का!
सांडगे अजून थोडे घालायला हवे होते. माझ्याकडूनच प्रमाण थोडे कमीजास्त झाले. बाकी कृती झकास!
रेवती