माहिति हवी आहे - हरिहरेश्वर श्रिवर्धन दिवे आगार

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
16 Dec 2015 - 4:07 pm

पुण्याहून हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवेआगर , शिव्थर्घळ इत्यादी ठिकाणी २५ तारखेच्या आसपास भेट देण्याचा विचार आहे.
दोन रात्री आणि तीन दिवस सहलिचा प्लान आहे. सहलिचा क्रम कसा असावा , या भागातील राहण्याची सोय
याबद्द्दल माहिति असल्यास क्रुपया मार्गदर्शन करावे. या सहलित अलिबाग सुद्धा करता येइल काय?

आगाउ.... मनापासुन आभार.

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

16 Dec 2015 - 5:26 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद नरेन्द्रजी.

सतिश गावडे's picture

16 Dec 2015 - 5:31 pm | सतिश गावडे

दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक रस्ता शेखाडी या गावावरून अक्षरशः समुद्र किनार्‍याला चिकटून जातो.
डोळ्याचे पारणे फिटते या रस्त्याने गेले तर. दिवेआगरवरून हरीहरेश्वरला जानार असाल तर आवर्जून या रस्त्याने जा.

बाबा योगिराज's picture

16 Dec 2015 - 6:03 pm | बाबा योगिराज

एक नंबर रास्ता आहे तो. आवर्जून जाणे. अक्षरशः वेड लागेल. कोंकणा बद्दल प्रेम द्विगुणित होईल.
काही ठिकाणी इतकं मस्त वाटेल की, आपण कोकणात आहोत हेच विसरायला होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2015 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक रस्ता शेखाडी या गावावरून अक्षरशः समुद्र किनार्‍याला चिकटून जातो.
डोळ्याचे पारणे फिटते या रस्त्याने गेले तर.

>> फक्त पौर्णिमेच्या रात्री कॅमेर्‍यासह जाऊ नका.. तो सागरचकवा..पहाट होईपर्यंत हरेश्वरला पोहोचूच देत नाही मेला!

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Dec 2015 - 8:05 pm | अनिरुद्ध.वैद्य

गुर्जी,

ही सागरचकवा काय भानगड आहे?

कपिलमुनी's picture

18 Dec 2015 - 2:37 pm | कपिलमुनी

त्या रस्त्यावर आरावी गाव फार सुंदर आहे

Maharani's picture

20 Dec 2015 - 9:59 am | Maharani

Yach aarvi gavat beach la lagun Pratima beach resort aahe.thithe rahanyachi,jevanachi sundar soy hote.tithala samudra kinara apratim aahe.

यावर बरेच धागे आले असतीलही आणि माहिती इथेही मिळेलच परंतू एक विचारतो अशा झुंबड गर्दी होणाय्रा तारखांना सहली का ठरवतात ?

शान्तिप्रिय's picture

16 Dec 2015 - 6:28 pm | शान्तिप्रिय

बरोबर आहे तुमचे म्हणणे सुट्ट्या बघुनच प्लानिन्ग करावे लागते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Dec 2015 - 7:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

अर्जुन मोहिते---९७६३ ५१०० ७९ राहायला मस्त आहे.

आवळस्कर--०२१४७ २२४ १६४ राहायला आणि जेवायल

अजुन एक---गरम गरम उकडीचे मोदक हवे असतील तर श्री. सुहास बापट यांची खाणावळ मस्ट आहे. बूकिंग आधी करावे लागेल. रोज फक्त १५० पाने घेतात.

http://www.misalpav.com/node/31589 हे वाचा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Dec 2015 - 8:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

अळूस्कर म्हणजेच आवळस्कर का?

आणि हो, बहुधा बापट खानावळ बंद झालीये. मागच्या व्हिजीटमध्ये बंद झाली अस गावातल्या मंडळींनी सांगितलं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Dec 2015 - 1:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

अळूस्कर म्हणजेच आवळस्कर का?>>>>> नो आयडिया

बापटांकडे ऑगस्ट्मध्ये जेवलोय. आता बंद झाली म्हणता? पुन्हा नो आयडिया!!

अग्यावेताळ's picture

17 Dec 2015 - 1:25 pm | अग्यावेताळ

बापटांची खाणावळ चालू आहे. मी आता मागच्या आठवड्यातच तिथे जेवलोय. मात्र तिथे आधी ऑर्डर द्यावी लागते. मोदकांचे वेगळे सांगायला लागते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Dec 2015 - 10:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

छानच की! गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये गेलो तेव्हा त्यांनी बंद केली होती. नंतर एप्रिलमध्ये गेलो, तेव्हाही बंदच सांगण्यात आलं.

आता तुम्ही म्हणतात उघडली, तर जानेवारीच्या ट्रीपमध्ये नक्की जाऊन येईल :)

धन्यवाद!

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Dec 2015 - 8:30 pm | अनिरुद्ध.वैद्य

शिवथरघळीसाठी महाडहून वरंध्याकडे वळावे लागेल. हे तसा दिवेआगर, हरिहरेश्वर श्रीवर्धन रूटवर नाही, म्हणून विचारले.

कुठे रहाल:
मी मुक्कामी दिवेआगर सजेस्ट करेल, पण लवकर बुकिंग करा. लिमये केळकर, अळूस्कर ह्यांचे घरघुती निवासस्थाने उत्तम आहेत.

हॉटेल्स पैकी Ambience बरे आहे. Exotica खूप महाग आहे. बाकी हॉटेले आहेत. पण वेळेवर मिळेल ह्याची खात्री देता येत नाही.

कुठे खाल?

व्हेज: लिमये, केळकर ह्यांच्या शाकाहारी थाळी उत्तम आहेत असे ऐकले आहे. कारण, मी कधीच व्हेज खाल्ले नाही तिथे, सो अनुभव नाही. ऑर्डर आधी द्यावी लागते. उकडीचे मोदक हवे असतील तर तेही ऑर्डर देतांनाच सांगावे लागते. ऐनवेळी मिळत नाहीत.

नॉनव्हेज: पाटील खानावळ, अळूस्कर आणि पेडणेकर खानावळ. पैकी, पाटील आणि पेडणेकर येथे जाऊन आलेलो आहे, निर्धास्त जाऊ शकता. फक्त आधी ऑर्डर द्यावी लागते, तेव्हा ते पथ्य पाळा.

श्रीवर्धनला प्रसाद हॉटेल फेमस आहे.

काय बघाल:

दिवे आगर बीच अप्रतिम आहे. तिथे आजकल Water Sports सुरु आहेत, ते घेऊ शकता. शिवाय रूपनारायण मंदिरही सुरेख आहे.

वर म्हंटलेय तसे दिवे-आगर - शेखाडी - श्रीवर्धन रस्ता झक्कास. तो जरूर करावा.

श्रीवर्धनला बीच सोडला तर पाहण्यासारखे मला आढळले नाही.

हरिहरेश्वरला मंदिर सुरेख आहे. आता प्रदक्षिणा मार्ग सुरु झाला असेल, तर ती जरूर करा. डॉल्फिन दिसू शकतील :)

दिवेआगरला थांबून सकाळी हरिहरेश्वर आटोपून पुण्यास परत येतांना शिवथरघळ करता येऊ शकेल. जर लेट झालात, तर शिवथरघळ येथे भक्तनिवास आहे.

आणि जाऊन आल्यावर येथे वृतांत जरूर लिहा.

Happy Vacations!!

(हे स्वतःचे वाहन आहे असे उमजून लिहिलेय. जर सार्वजनिक व्यवस्था वापरणार असाल, तर एसटीची चौकशी कराल)

श्रीरंग_जोशी's picture

16 Dec 2015 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

मी २००७ साली दोनदा दिवे आगरची सहल केली आहे. एक रात्र तिथे मुक्काम अन परतीच्या दिवशी एकदा श्रीवर्धन व हरिहरेश्वर अन दुसर्‍या वेळी हरिहरेश्वर अन जंजिरा किल्ला असे फिरलो आहे.

दिवे आगर येथील आनंदयात्री हे राहायचे ठिकाण प्रसिद्ध आहे. आम्हाला तिथले बुकींग न मिळाल्याने त्याच रस्त्यावर पलिकडे मेहंदळे यांच्या लॉजमध्ये राहिलो होतो.

दिवे आगरहून श्रीवर्धनला जाणारा रस्ता अप्रतिम नयनरम्य आहे.

शान्तिप्रिय's picture

17 Dec 2015 - 2:10 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद मित्रान्नो

दापोली आणि आसपासच्या ठिकाणचे पण पत्ते मिळाले तर बरं होईल.

पूर्वाविवेक's picture

18 Dec 2015 - 3:57 pm | पूर्वाविवेक

पुण्याहून ताम्हणी घाट मार्गे गोरेगाव वरून जाता येईल.
श्रीवर्धन-आगरदांडा फेरी बोट आहे. स्व:ताच्या वाहनासकट जाता येते. आगरदांडावरून मुरुड-काशीद-नागाव-अलिबाग करत पुण्याकडे परत जाता येईल.
पण हा सिझन खूपच गर्दीचा आहे. राहायला जागा मिळत नाही.

नितीनचंद्र's picture

18 Dec 2015 - 4:20 pm | नितीनचंद्र

२००८ साली मी दिवेआगर आणि हरिहरेश्वर ला गेलो होतो. पुण्यात शनीपारापाशी एक दुकान आहे ज्यात दिवेआगरला रहाण्याचे बुकिंग केले. वाहन नव्हते एस टी ने दिवेआगरला गेलो. एस टी महाड पर्यंतच मिळाली पुढे म्हसाळ्याला दुसर्‍या एस टी ने आणि म्हसाळा से दिवेआगर रिक्षाने.

दिवेआगरला रहाण्याची आणि जेवणाची सोय ऊतम आहे. २००८ साली कमर्शीअल झाले नव्हते. मला हरिहरेश्वरला दिवेआगरहुन जायला टॅक्सी/कार मिळाली नाही म्हणुन चक्क सहा सिटरने गेलो. समुद्र किनार्‍याने केलेला हा प्रवास सहा आसनीचा प्रवास सोडता ( घाणेरडा ) एक उत्तम प्रवास होता.

ही घ्या लिंक http://www.maayboli.com/node/14959

हरिहरेश्वरला समुद्रात जाउ नये. आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत.

गोरेगावच्या बस डेपो कँटिनची कोथिंबिरवडी घ्याच.

कोथिंबीर स्वच्छ धुतली असेल का ही शंका येते.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2015 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

पुणे - ताम्हणी घाट-माणगाव- साई मोरबा-म्हसळा-श्रीवर्धन-हरीहरेश्वर ..
हरेश्वर-श्रीवर्धन-शेखाडी-दिवेआगर-म्हसळा-साई मोरबा- माणगाव -ताम्हणी घाट-पुणे..

प्र कटन समाप्त...!

ताम्हणी चूक, ताम्हिणी बरोबर.

दु-रुस्ती समाप्त..!