केक रस्क

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
14 Dec 2015 - 3:37 pm

rusk 16

साहित्यः
१. मैदा - १.५ कप
२. बटर - १०० ग्रॅम
३. बेकिंग पावडर - १.५ चमचा
४. अंडी - ३
५. साखर - १/२ कप किंवा आवडीप्रमाणे कमी/जास्त
६. तेल - १/४ कप
७. दूध - १/४ कप
८. व्हॅनीला ईसेंन्स - १ चमचा
९. फूड कलर - ऑप्शनल
१०. चवीप्रमाणे मीठ

कृती:
१. ओव्हन १८० से. प्री-हीट करत ठेवा. एका भांड्यांत बटर, तेल आणि साखर फेटून घ्या. बटर क्रिमी आणि फ्लपी होईस्त फेटत रहा.

rusk 1 rusk 2

२. आता मिश्रणात एक एक अंडं घालून फेटत रहा. दुसर्‍या एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ घालून ३-४ वेळा चाळून घ्या जेणेकरुन सर्व एकजीव होईल.

rusk 3 rusk 4

३. आता क्रिमी झालेल्या बटर मधे व्हॅनीला ईसेन्स आणि फूड कलर घाला. हळू हळू मैदा आणि दूध घालत मिश्रण एकजीव करा जेणेकरुन एकही गुठळी राहणार नाही.

rusk 5 rusk 6

४. स्प्रींगफोर्म टिनला बटरचा हात लावून बटर पेपर ने कवर करा. मिश्रण घातलत की भांड हलकसं टॅप करा जेणेकरुन एअर बबल्स (हवेचे बुडबुडे??) निघून जातील.

rusk 7 rusk 8

rusk 9

५. प्री-हीट झालेल्या ओव्हन मधे २०-२५ मि. बेक करा. विणायची सुई किंवा सुरी खुपसून पहा. क्लीन बाहेर आली की केक झाला. ५ मि. केक ओव्हन मधेच राहू द्या.

rusk 10 rusk 11

६. केक पुर्ण गार झाला की हव्या त्या आकारात कापून घ्या. बेकिंग ट्रे मधे बटर पेपर घालून तुकडे केलेला केक परत १५-२० मि. किंवा स्लाईस क्रिस्पी होईस्त बेक करा. रस्क पुर्ण गार झाले की हवाबंद डब्यात भरुन चहासोबत कींवा नुसतेच खायचा आनंद घ्या.

rusk 13 rusk 12

rusk 14 rusk 15

rusk 16

टीपा:
१. चहासोबत रस्क खायचा प्लॅन असेल तर जरा कमी गोड चालतील. बच्चे कंपनीला डब्यातही देता येतील.
२. तुकडे/केक स्लाईस जेवढा जाड तेवढा रस्क क्रिस्पी होण्यास वेळ लागेल. स्लाईस मोठा असेल तर रस्क्स बाहेरुन क्रिस्पी दिसतील पण आतून मॉईस्ट असतील. म्हणून लोफ टिन मधे केक केल्यास छान एकसारखे स्लाईस करता येतील.
३. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक स्लाईस करुन जरा अधीक बेक केले की त्याच वेगवेगळ्या चवीचे रस्क होतील. करणारा आणि खाणारा दोघेही खुश.
४. एगलेस केक / रस्क साठि "दही" हा पर्याय पाहिला आहे पण अंड्यांनी केक जसा हलका होतो तो दह्याने कितपत होईल त्या बाबतीत जरा अजाण आहे. तरी एकदा प्रयत्न जरुर करणार आहे.
५. नुसता केक करणार असाल तर तेल जरुर घाला. तेलाने केक आतून मॉईस्ट राहतो आणि कोरडा होत नाही.

rusk 17

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

14 Dec 2015 - 3:44 pm | सस्नेह

तुझी पाकृ म्हणजे डोळ्यांची चैनी आणि (तोंडाचे पाणी गिळून ) पोटाचे हाल !
बादवे, (आम्ही अंडी घालत नसल्यामुळे) ही पाकृ अंडे न घालता कशी करावी ?

स न वि वि's picture

14 Dec 2015 - 4:01 pm | स न वि वि

एगलेस केक / रस्क साठि "दही" हा पर्याय पाहिला आहे पण अंड्यांनी केक जसा हलका होतो तो दह्याने कितपत होईल त्या बाबतीत जरा अजाण आहे. तरी एकदा प्रयत्न जरुर करणार आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2015 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा

@डोळ्यांची चैनी आणि (तोंडाचे पाणी गिळून ) :- +++१११

ही घ्या अंड्यासाठी पर्यायी पदार्थांची यादी. (आंतरजालावरुन साभार)
https://veganthom.files.wordpress.com/2012/11/20121110-070557.jpg

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 6:59 pm | दिपक.कुवेत

दही घालून केक केलाय पण म्हणावा तसा झाला नाही. आय मीन स्पाँजी झाला पण हलका नाही.

कौशिकी०२५'s picture

31 Dec 2015 - 1:10 pm | कौशिकी०२५

पुण्यामधे जिथे केक्स्चे साहित्य मिळते त्या दुकानांमध्ये एक पावडर मिळते...ती अंड्याऐवजी वापरता येते..छान हलका न फ्लफी होतो केक..

अक्षया's picture

14 Dec 2015 - 4:40 pm | अक्षया

छानच दिसतोय. :)

कविता१९७८'s picture

14 Dec 2015 - 5:21 pm | कविता१९७८

मस्त

तुषार काळभोर's picture

14 Dec 2015 - 5:40 pm | तुषार काळभोर

.

(माझ्याकडे एक सोलो माय्क्रोवेव्ह पडून असतो.त्यात करता येईल का?)

अनन्न्या's picture

14 Dec 2015 - 5:53 pm | अनन्न्या

माझ्या लेकाला खूप आवडतात

रस्क छान दिसतायत. कधी खाऊन पाहिले नाहीत पण.

पद्मावति's picture

14 Dec 2015 - 10:40 pm | पद्मावति

खूपच टेंप्टिंग. मस्तं दिसताहेत रस्क.

कपिलमुनी's picture

14 Dec 2015 - 10:52 pm | कपिलमुनी

तोंपासु !

एगलेससाठी यीस्ट वापरुन पहा ( पुढच्या आठवड्यात करायचा प्रयत्न करतो )

कंजूस's picture

14 Dec 2015 - 11:07 pm | कंजूस

आमचा पास.
पिकलेली केळी घालून केक नेहमी होतो आमच्याकडे पण तो रस्क वगैरेच्या तोडीचा होतो का ते माहित नाही.

स्रुजा's picture

15 Dec 2015 - 1:42 am | स्रुजा

वाखु साठवली आहे __/\__

प्रभाकर पेठकर's picture

15 Dec 2015 - 2:16 am | प्रभाकर पेठकर

मस्तं रस्क. नुसते पाहण्यावरच समाधान मानावे लागणार. असो.

नुसते पाहण्यावरच समाधान मानावे लागणार. असो.??
साखर न घालता कराना.

इडली डोसा's picture

15 Dec 2015 - 8:06 am | इडली डोसा

मस्त दिसतोये केक रस्क.. करुन बघायला हवा. कप केक्स करुन बघितले एकदा पण ते बर्‍यापैकी कडक झाले बाहेरुन. ह्या रस्कचं टेक्श्चर खूप सॉफ्ट वाटतये. मी नुसतचं बटर घातलं होतं तेल नव्ह्तं घातलं त्यामुळे असेल कदचित... पुढच्या वेळी बटर आणि तेल दोन्ही घालणार.

नुसता केक करणार असाल तर तेल जरुर घाला. तेलाने केक आतून मॉईस्ट राहतो आणि कोरडा होत नाही.

हि टीप उपयुक्त आहे.

अजया's picture

15 Dec 2015 - 9:22 am | अजया

झकास.वाखुसा.

धन्यवाद सोपि रेसेपि . करतेच् आता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2015 - 3:03 am | डॉ सुहास म्हात्रे

तोंपासु !

इशा१२३'s picture

30 Dec 2015 - 8:29 am | इशा१२३

मस्तच !

पैसा's picture

30 Dec 2015 - 10:59 pm | पैसा

पण रस्क कशाला? तसेच खाऊन टाकायचे की! =))

मुक्त विहारि's picture

31 Dec 2015 - 7:58 am | मुक्त विहारि

नाही म्हणजे,

खास तुमच्यासाठी डोंबोलीत कट्टा सप्ताह आखू या.

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 10:19 am | सुबोध खरे

+१००

कौशिकी०२५'s picture

31 Dec 2015 - 1:12 pm | कौशिकी०२५

मस्त पाकॄ...करुन बघेन...

c
सुरेख झाला केक.मुख्य म्हणजे सोपा अगदि. फक्त रस्क साठि कसेबसे चार तुकड ठेवलेले ते हि संपले. रस्क प्रयोग पुढच्यावेळि आता.
धन्यवाद!

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 7:03 pm | दिपक.कुवेत

फोटोवरुनच केकच्या टेक्श्चरचा अंदाज आलाय. करेक्ट फ्लपआ, हलका आणि स्पॉजी झालेला दिसतोय. तुझं खरं आहे....असा केक झाल्यावर रस्क साठी तुकडे उरलेच तर आपलं नशीब.

त्रिवेणी's picture

31 Dec 2015 - 7:22 pm | त्रिवेणी

मस्तय एकदम.
पूर्ण वेळ १८० ठेवायचे का टेम्परेचर?

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 7:04 pm | दिपक.कुवेत

पूर्ण वेळ १८० ठेवायचे टेम्परेचर

अरे ह्याला बदडा रे कोणीतरी!

त्रिवेणी's picture

1 Jan 2016 - 1:53 pm | त्रिवेणी

काय ही असहिशिष्णुता यशो तै.

हीहीही! असहिष्णुता गं! (भौतेक हां):D

त्रिवेणी's picture

1 Jan 2016 - 1:53 pm | त्रिवेणी

काय ही असहिशिष्णुता यशो तै.

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 7:05 pm | दिपक.कुवेत

खाण्यासाठीच जन्म आपूला....

मस्त ... शनिवार दुपार बूक फॉर रस्क्स :)

थँक्स दिपु काका ... :)