मदत हवी आहे - बाळासाठी पाककृती

पसायदान's picture
पसायदान in पाककृती
3 Dec 2015 - 5:21 pm

नमस्कार मंडळी,
सहा महिने ते एक वर्षे वय असणार्‍या बाळासाठी बनवण्यासारख्या पोषक आणि घरघुती पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत.
जाणकार मिपाकर सहाय्य करतील अशी आशा आहे.
ह्यापूर्वी जर ह्या विषयावर जर चर्चा झाली असेल तर त्याचा संदर्भ मिळाला तरीही चालेल.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

3 Dec 2015 - 5:25 pm | सस्नेह

http://www.misalpav.com/node/33213
हा धागा पहा.

वेल्लाभट's picture

3 Dec 2015 - 5:25 pm | वेल्लाभट

हे बघा
http://www.misalpav.com/node/33213

आणि हे (थोड्या मोठ्या मुला/मुलींसाठी)
http://www.misalpav.com/node/33214

गोड बाळासाठी गोड आणि स्वादिष्ट अशा भरपूर पाककृती इथे मिळोत अशी सदिच्छा..

एक वर्षाच्या आसपास मोठ्या व्यक्तींच्या पानातले सर्वच पदार्थ (कमी तिखट) बाळाच्या पानात असावेत असं म्हटलं जातं.

पिलीयन रायडर's picture

3 Dec 2015 - 6:05 pm | पिलीयन रायडर

इथे वर लिंक्स दिल्या आहेतच. पण सह महिन्यापासुन पुढे आपण जे खातो तेच मऊ स्वरुपात हळुहळु द्यायला हरकत नाही. पेज, वरणाचे पाणी, मऊ भात, उकडलेल्या भाज्या कुस्करुन, खीरी इ.

फक्त मिक्सर वापरु नका रवाळ करायला. हाताने जितपत होईल तितपतच.

कंजूस's picture

3 Dec 2015 - 7:18 pm | कंजूस

बदाम उगाळून कधी देतात?

मी माझ्या मुलांना सव्वा महिन्याचे झाल्यावर द्यायला सुरुवात केली.

सहाणेवर पहिल्या दिवशी एक वेढा, दुसर्‍या दिवशी दोन, असे हळूहळू वाढवत नेऊन मग एक चतुर्थांश बदाम होईपर्यंत वेढे वाढवले. दुधात उगाळून वर्षभर दिले. त्यात जायफळ, खारीक हेही घातले. जायफळ मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदीच नाममात्र घातले. बाळाला खोकला झाला होता तेव्हा ज्येष्ठमधही घालायला सुरुवात केली आणि मग तेही देत राहिले. काही जण हळकुंडही घालतात असे ऐकले आहे. काय आणि किती द्यावे हे आपापल्या जबाबदारीवर ठरवावे! :)

हळकुंड द्याल ते सिद्ध करून द्या. धुवून हळकुंड वरण शिजवताना त्यात घालावे. वरण शिजल्यावर हळकुंड काढून धुवून उन्हात वाळवणे व बाळासाठी वापरावे.

कवितानागेश's picture

8 Dec 2015 - 5:29 am | कवितानागेश

यातच सुरवारी हिरड्याचे पाच सात वेढे द्यायचे. पोट साफ़ राहायला मदत होते.

रुपी's picture

9 Mar 2016 - 6:27 am | रुपी

धन्यवाद!

हा प्रतिसाद वाचून मी माझ्या बाळाच्या घुटीत सुरवारी हिरड्याचीही भर घातली. त्यामुळे आणि बहुतेक मधल्या काळात त्याच्या हालचाली वाढल्यामुळे (पालथे पडणे वगैरे) खूपच फरक पडला आहे. आधी त्याला बर्याच वेळा दूध प्यायल्यावर उलटी होत असे, शिवाय मांडीवर आडवे ठेवले की आणि झोपल्यावरही तो खूप अस्वस्थ असायचा. ढेकरही बराच वेळ निघत नसे. आता या सगळ्या गोष्टींत खूप प्रमाणात सुधारणा झाली आहे!

पसायदान's picture

8 Dec 2015 - 12:18 am | पसायदान

धन्यवाद स्नेहांकिता, वेल्लाभट! तुम्ही दिलेल्या घग्यांमुळे माहितीचा खजिनाच मिळाला.
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांसाठीही खूप धन्यवाद गवि, पिलीयन रायडर, कंजूस आणि रुपी. मला खात्री होती की मिपा वर नक्कीच माहिती मिळेल.

पसायदान's picture

8 Dec 2015 - 12:51 am | पसायदान

धाग्यांमुळे*

कवितानागेश's picture

8 Dec 2015 - 5:35 am | कवितानागेश

मी भात शिजवताना सोबत भाजीच्या ४ फोडीही घालते. सगळे एकत्र मिक्सरमध्ये किंचितफिरवून देते. अत्तापासून बहाज्यांच्या चवींची सवय होतेय.
काहीही देताना शक्यतो चवी बदलून दया, मीठजीरेपूड, हींग, हळद, मिरेपूड़, साखर हे आलटून पालटून दिले किमुलाना इंटरेस्ट वाटतो.
पौष्टिक पदार्थ म्हणून शिंगाड्याच्या पीठाची लापशी किंवा शिरा द्यावा.

शिंगाड्याच्या पीठाची लापशी

लापशी = खीर, शिंगाडा = ?

अनुमित's picture

8 Dec 2015 - 5:25 pm | अनुमित

Tumhi rajgira khir pan deu shkata.
Tupa madhe rajgira pith bhajun dudh kiva pani takun khir banavu shakta.
Me kaju,badam,velchi saglaychi separate powder banvate pratek week la.
ani saglya prakarchya khir madhe takate.
Tillachi powder karun tyache ladu thandi chya divsat changale astat.