ड्रिम जॉब !!!

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
8 Sep 2008 - 2:00 pm
गाभा: 

पुन्यांदा रामराम लोकांनो ...
आज पुन्हा नविन टॉपिक आणलाय चर्चेसाठी ... आमच्या बागायती डोक्यात नेमीच कायबी इपरीत चालू आसतय...
तर झालं आसं ... परवा आमच्या प्रॉजेक्टची मिटींग झाली हो .. जाम राडा ... मेलामेली .. हा त्याला तो ह्याला .. नुसता ब्लेम गेम ... हत्त्च्च.. च्यायला इट आला बघा सगळ्याचा ....
आम्ही सॉफ्टवेअर वाले . १२वी झाल्यावर एका ओढ्यात वाहिल्यासारखे कंप्युटर इंजिनियरींग ला आलो. चुकुन इंजिनियर झालो .. अजुन थोडी चुक झाली आन् जॉब पण लागला. ऍडमिशन घेताना ... काय काय स्वप्न पाहिलेली सगळ्याचा पार चुराडा .. मस्त एसी रुम असेल . आपला एक क्युबिकल असेल,लठ्ठ पगार असेल.. परदेशवारी ... विमान .. फाइव्ह स्टार हॉटेलात फु़क्कट रहायला आणि चापायला मिळेल .... आजुबाजुला पोरी पण असतील .. मस्त मजा ... नो टेंशन नो वरीज ... पण मायला .. वरच्या पैकी ९०% गोष्टी ट्रू झाल्या ... पण उरलेले १०% ज्याला मानसिक ताण म्हणू.... कधी कधी फार फार विट योतो या जॉबचा .. इतका की वाटतं आता सगळं सोडून जावं हिमालयात पळून. ते तर साला ९९% च्या बरोबर आहे. म्हणून सम टाइम्स आय फील लाइक... धिस वॉज नेव्हर व्हाट आय वाँटेड टू बी !!! ईट्स जस्ट कॉज ऑफ मनी सेक अँड अ टिपीकल ऑर्थोडॉक्स करीयर पाथ.

माझा प्रश्न आहे, तुमचा स्वप्नातला जॉब कोणता? तुम्हाला मनापासून आवडेल असं कोणतं काम करावसं वाटतं ?
कारण मला माहीत आहे आज कमीत कमी ९०% पेक्षा जास्त लोकं इच्छा नसताना केवळ पैसे मिळवणे महत्वाचे म्हणून आपल्याला आवडणारं काम करत नाहीत. कारणे बरीच असू शकतील .. जसे की माझी लायकी नाही, मला ते वाटतं पण मला जमणार नाही...मला योग्यवेळी योग्य डायरेक्शन मिळाली नाही.... त्या क्षेत्रातील संधींची माहिती नाही .. किंवा आनिक काही...
काहींना स्पोर्ट्स मधे जायचं असतं . ... काहींना क्रिकेट मधे करियर करायचं असतं .. काहींना स्टोरी वाल्या चित्रपटांत काम करायचं असतं .. तर काहींना बिना स्टोरीच्या (होय .. काही दिवसांपुर्वी याच सब्जेक्ट वर चेन मेल सुरू केलेली.. त्यात असेही सत्य समोर आले आहे ... असते एकेकाची आवड .. आपण काय करणार :) ..काहींना पत्रकार व्हायचं असतं ... पण या गोष्टी साध्य न होण्याची कारणे मी नमूद केलीच आहेत.

मला खरंतर चित्रकार व्हायचं होतं .... पण एक व्यवहारिक विचार आला की .. साला चित्रकार झालो तर .. तिच चित्रे रद्दी डेपोत विकून उदरनिर्वाह करावा लागेल. कधी डिस्कव्हरी वर "लोनली प्लानेट" नावाची भटकंती मालिका पाहून त्या "इयान"चा हेवा वाटला.. च्यायला म्हंटलं .. जगभर फुकट फिरने ५-७ तारांकित मधे राहाणे ,प्रत्येक ठिकाणचं खाऊ खाणे... बक्कळ पैका .. आणिक वर मस्त जगभर लोक आपल्याला पाहाणार ... वावावा ... मला ही असंच करायचंय .. मी हा जॉब एंजॉय करेल ... पण लायकी नाही ... कसा जाणार या क्षेत्रात ? कधी वाटलेलं शरीरसौष्ठव क्षेत्रात जाऊ. पण पुन्हा व्यवहारिक विचार डोक्यात आले .... आणि इकडेच पडलो...

आपणही लिहा आपले ड्रिमजॉब ... इथे लिहायला कुठलीही अट नाही.... आपली लायकी, पात्रता, व्यवहारिक विचार ... किंवा वेळ निघुन गेली ई.ई सगळं विसरा... आपल्या स्वप्नातला जॉब आहे यार .... लिवा पटापट ...
आशा करतो तुम्ही हाही धागा एंजॉय कराल...

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2008 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टारू, मी लोकांना नेहेमी सांगते ते आज इथेही लिहिते. मला खगोलशास्त्राचा अभ्यास करायला आवडतं. आणि मी तेच करते (मधून-मधून मिपा-मिपा खेळते ते वेगळं)... तर मुद्दा असा की मी मला आवडतं ते काम, खगोलशास्त्रात संशोधन, करते आणि गंमत म्हणजे त्याबद्दल भारत सरकार करातून जमा झालेल्या पैशातून मला पगारही देतं! :-)

पण एक मात्र दहावी-अकरावीच्या वेळी ठरवलं होतं; काय व्यवसाय या दृष्टिने होईन ते होईन पण खूप आनंदी आणि सुखी असेन, आणि आज मी आनंदी आणि सुखी आहे.

टारझन's picture

9 Sep 2008 - 10:52 am | टारझन

आज्जे ... म्हणूनच तु माझी इंडियन ऑइल (की आयडोल) आहेस .... चियर्स आज्जे.. फार कमी लोक एवढे हुशार असतात ज्यांना आपल्या आयुष्याचं ध्येय १०वी मधेच कळतं .. तुला तर माहितच आहे मी तर १०वीला शेंबूड गाळत गावभर कुटाळक्या करत हिंडायचो :)
आमच्या यम्मी आज्जींचा विजय असो

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

ऋचा's picture

8 Sep 2008 - 2:10 pm | ऋचा

मला सैन्यात जायच होतं.
पण नाही जाता आलं,मी कॉलेज मधे असताना खास ह्या कारणासाठी एन्.सी.सी. घेतलं होतं,
पण मी नाही जाऊ शकले मला ह्याच खरच खुप वाईट वाटतं.
पण आत्ता जे मी करत आहे त्यात मला समाधान आहे.
:)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

टारझन's picture

9 Sep 2008 - 10:37 am | टारझन

आगं ऋचे .... शेवटी तुला समाधान मानावं लागलं ... आम्ही ही आय.टी. मधे येऊन समाधानी आहोत. मनस्ताप , टेंशन इइ. गोष्टींमुळे कणखर पण बनेल .. नि त्यावर कधी रडत पण नाही ... नथिंग इज पर्फेक्ट (सो ट्राय टु बी नथिंग)
शेवटी कोणालाही विचारं "कसं चाललय ? " तो "बरं चाललंय!!" असेच म्हणतो.. सगळे आयुक्षात समाधानच मानतात गं .. तु सैन्यात गेली असतीस तर "समाधानी आहे" हे शब्द वापरले असतेस ?

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अनिल हटेला's picture

8 Sep 2008 - 2:18 pm | अनिल हटेला

टा-या लेका दुखती रग पे हाथ रख्या रे तु !!!

लहाण पणापासुन च इच्छा होती पोलिस खात्यात जायची....

प्रामाणीक पणाने प्रयत्न देखील केले .........

पण आपून का बॅड लकी च खराब !!!!

असो !! नंतर सैन्य भरती साठी पण प्रयत्न केले ...

३ वेळा भरतीला गेलो .....

एकाला सोबत म्हणुन नेलेल ..त्याच सीलेक्शन झाल ...

आणी मला नारळ मिळाला.....

अर्थात आता कळून चुकलये......

प्रयत्न करत राहने आपल्या हातात आहे .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नंदन's picture

8 Sep 2008 - 2:20 pm | नंदन

अन्नू कपूर आणि त्याच्या बायकोच्या भूमिकेत स्वरूप संपत यांची पूर्वी एक डीडी-मेट्रोवर सिरीयल लागायची (नाव विसरलो). त्यात एकाला असाच ड्रीम जॉब लागतो. पंचतारांकित हॉटेलात फूड टेस्टरचा. विमानाने देशोदेशी फिरायचं, चांगलं-चुंगलं खायचं आणि वर त्याचा पगार घ्यायचा. तेव्हा एकदम बेष्ट जॉब वाटला होता, पण मग अशा टेस्टर्सना एरव्ही खाण्यापिण्यात किती कडक पथ्य पाळावं लागतं हे समजलं. तेव्हा मग - ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड हे पटलं.

इथे शिकत असताना लायब्ररीत सहाय्यकाचा एक जॉब लागला होता. निवांत खुर्चीत बसून हवी ती पुस्तकं घेऊन वाचत रहायचं. अधूनमधून विद्यार्थी एका छोट्या झडपेतून पुस्तकं परत करत असतात. त्यांचा ढीग साठला की ती कॉम्प्युटरवर चेक-इन करायची इतकंच काम :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

8 Sep 2008 - 2:43 pm | आनंदयात्री

विस्तृत प्रतिसाद नंतर देतो.
पण लहानपणी आम्हाला २ इच्छा होत्या.
१. थेटरात डोअरकिपर व्हायची - पिक्चर पहायला मिळावेत म्हणुन.
२. गायक व्हायची - तेव्हा आमची समजुन अशी होती की रेडिओच्या आतमधे पोरी बसुन गाणे म्हणतात, मग आतमधे कसा असेल बॉ रेडिओ. ते पहायची उत्सुकता होती म्हणुन गायक.

बबलु's picture

8 Sep 2008 - 2:46 pm | बबलु

टारझन जी....
वाचून असं वाटलं की या ओळख-पाळख नसलेल्या माणसाला माझ्या मनातलं कसं कळलं ?

माझी EXACTLY अशीच अवस्था आहे गेली २-३ वर्षे. मला माहित्येय की मी जे काही करतोय ते मला करायचंच नव्हतं मुळी.
पण मार्ग मिळत नाहिये.
(software वगैरे पकाऊगीरी करतोय इथे सिलीकॉन दरी मध्ये).

परवा जालावर पण शोध घेतला. त्यात एक चांगलं वाक्य मिळालं...
"Doing what you like is success.... Liking what you do is happiness".
च्यामारी... आता काय करावं ? वरचं वाक्य पण जरा बरं आहे की.

तरी प्रश्ण सुटत नाही. सध्या जे काही करतोय त्यात मजा नाही.
मिपा वरचे लोक म्हणतील काय confused माणूस आहे.
आहेच मी confused.

असो....मला खरंतर फिरायची फार हौस. वयाच्या १५ व्या वर्षीच ८०% भारत फिरून झालेला.
हिमालयात मोठ्ठे ट्रेक झाले (चंद्रखणी-पास, सार्-पास वगैरे...). सह्याद्री गड्-किल्ले मजेत फिरलो.
आता काही वर्षं अमेरिकेत... क्यालिफोर्निया सगळं झालं, नेवाडा, अरिझोना झालं, यलोस्टोन झालं (मोंटाना/वायोमिंग), फ्लोरीडा चा प्लॅन आखतोय.
BBC च्या किंवा कोणत्याही ट्रॅव्हल प्रोग्राम बरोबर क्यामेरामन म्हणून जायला काय बहार येईल ....असं वाटत राहतं.

असो... जमेल की नाही माहीत नाही. डोक्यात कीडा कधीपासून आहे.
काही जादू घडून माझं स्वप्न पूर्ण झालं तर माझ्यासारखा आनंदी कोणी नसेल.

....बबलु-अमेरिकन

शिवा जमदाडे's picture

8 Sep 2008 - 3:06 pm | शिवा जमदाडे

शेती करायची आहे......
कोणे एके काळी घरी कुंडी मधे सोप टाकून त्याचे छोटे झाड आल्यावर फार आनंद झाला होता. एवढा दांडगा अनुभव आहे गाठीशी. बघु कसे जमते ते.....

-शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

भास्कर केन्डे's picture

10 Sep 2008 - 9:01 pm | भास्कर केन्डे

आपला पण ड्रीम जॉब शेतीच हाये. पण आमच्या गावातल्या समद्या शेतकर्‍यांस्नी एकदा खाल्ल तर दुसर्‍या टायमाची भ्रांती हाये. मनून मनलं शिकून आधुनिक शेती कराव... पण काय राव ते कदी जमलच न्हाई. आन आता ह्यो इकडं आमेरिकेत मिपावर किबोर्ड बडवीत बसलोय.

आपला,
(शेतकरी दादा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

माझे २ छंद खाणे आणि वाचन
१२ त असताना बाबांनी सांगितले तु आपली सरळ्सोट बी.ए. कर झाले मी बी.ए. पण मला व्हायचा होत फूड टेस्टर किंवा शेफ. पण तिर्थरुपानी गोड बोलुन गंडवला. मग विचार केला ठिक आहे आता दुसरा छंद वाचन्...मग ग्रंथपालन करु म्हणजे भरपुर पुस्तके वाचु...कसच काय्......येथे एवढी फायनान्सची पुस्तके आहेत की एखद्याची वाचनची आवड पण निघुन जावी.
गेल्या २ वर्षात एक पण वाचण्या लायक पुस्तक या ऑफिसात घेतला नाही आहे..... सगळी आपली ती फायनान्सची पुस्तके चव ना ढव...

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

डोमकावळा's picture

8 Sep 2008 - 3:28 pm | डोमकावळा

छान प्रश्न विचारलास मित्रा....
मला लहानपणी आमचे नातेवाईक विचारायचे तू काय होणार... मी प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर द्यायचो.
लहानपणी मला बरच काही व्हायची ईच्छा होती म्हणजे माझे लहानपणीचे ड्रीम जॉब्स आणि त्यांची कारणे...
मला पोलिस व्हायचं होतं कारण सगळे पोलिसांना घाबरतात अस मला वाटायचं.
मला पायलट व्हायचं होतं कारण माझ्यामते त्याच्याकडेच फक्त खरं विमान असायचं.
मला डॉक्टर व्हायचं होतं कारण त्यांना इंजेक्शन घ्यावं लागत नसतं असच मला वाटायचं.
मला पुजारी व्हायचं होतं कारण त्यांना सगळे लोक घरी जेवायला बोलवत असत आणि दक्षिणा देत असत.
मला अजूनही बरच काही व्हायचं होतं आणि कारणही तशीच होती शुल्ल्क होती...
एकूण काय माझ्या सगळ्या ईच्छा क्षणिक असायच्या...
आणि ईथून पूढे काय करायचय यावर मी तितकासा विचार केलेला नाहीये...

(नेहेमी गोंधेळलेला)
-डोम...

विजुभाऊ's picture

8 Sep 2008 - 3:31 pm | विजुभाऊ

हाटीलात शेफ्फ व्हायचे होते
भाषेचा प्राध्यापक व्हायचे होते
नाटक करायचे होते
बासरी वादक व्हायचे होते
आणखी बरेच काही हरवलेले आहे.
सध्या मिळत आहेत ते क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करतो आहे.
खरेच टारु भौ जर काल यन्त्रमिळाले तर गेल्या १०/१५ वर्षात केलेल्या सगळ्या चुका पुसुन टाकणार आहे.
एक निर्णय आपण घेतो आणि त्या पाठोपाठ बरेच काही गमावतो.
इट्स अ कोस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रकाश घाटपांडे's picture

8 Sep 2008 - 4:56 pm | प्रकाश घाटपांडे

मला आगोदर ब्यांडवाला व्हायच होत. भरजारी चमचमणारे कपडे पाहुन मला तसे वाटायचे.
नंतर डॉक्टर व्हायचं होते. बी ए एम एस ला प्रवेश पण घेतला पण तेव्हा त्या कोर्स मधील ऍलोपथी काढण्याचा निर्णय झाला व तो शुद्ध आयुर्वेद झाला म्हणुन वडिलांनी प्रवेश रद्द केला.
नंतर लष्करात जायचं होत. घरच्यांना न कळवता गुपचुप उद्योग केले पण मेडीकली फिट झाल्यावर त्या लष्करच्या डॉक्टर ला पैसे दिले नाही म्हणून माझ्यासमोर फिट खोडून अनफिट लिहिले व जा म्हणाले ( पैसे दिले नाही म्हणुन अनफीट हे नंतर कळाले; जे इतर भरती झाले त्यांनी नंतर सांगितले. मला लष्कर हे देशभक्तीचे साधन वाटायचे. तिथे भ्रष्टाचार असेल हे स्वप्नात ही वाटले नव्हते)
नंतर विंजिनियर व्ह्यायच होत निदान पन ते बी जमल नाई.
नंतर व्यावसायिक ज्योतिषी व्ह्यायच होत . पण माझा महादेवशास्त्री जोशी झाला.
जिथ जायच नव्हत तिथे डोकावल आन तिथच चिकाटलो. मेंदु गुडघ्यात आला. कायतरी म्हनुन बिनतारी. एक सायेब म्हन्ला २०२० पर्यंत टिकनार का? गाढवाला गोपाळशेट म्हणायला शिकलास तरच टिकशील इथे. मग गोपाळ शेट म्हनायला लागलो. पन ते सारखं अं अं करायल लागल. मग सारख सारख गोपाळ शेट! गोपाळ शेठ! असं म्हणायला लागायचं. पण गोपाळशेट त्यांच्या मर्जीतल्या 'राखीव' लोकांच ऐकायला लागले. बर हे 'राखीव' लोक पन आपले मित्रच. म्हटल आपल नाय तर आपल्या मित्रांच तरी ऐकतोय यातच समाधान.मग २००७ मधी बाहेर पल्डो. नंतर काही लोक म्हन्ले आरे तुझ बोलन त्यान्ला एकू जात नव्हतं. तुमच्याच लोकांचा लई गोंगाट होता म्हनुन त्यांनी कानावर हात ठुले व्हते आन डोळे बी बंद केल्ते.आता लोक मला गाढव शेट गाढव शेट म्हणायला लागले. सध्या स्वतःच डोक न वापरल्या बद्द्ल शासन फुल ना फुलाची पाकळी दरमहा देत. बसतो हुंगत महिनाभर.
(सुवासिक)
प्रकाश घाटपांडे

रामदास's picture

8 Sep 2008 - 8:16 pm | रामदास

गेल्या पन्नास वर्षातजे केले ते काहीच करायचं नव्हतं.
तक्रार न करता करत होतो न काढलेल्या तिकीटावरचा प्रवास.
वेगवेगळ्या गली रस्त्यावरून आयुष्य मला जनावराच्या मढ्यासारखे ओढत नेत होतं.
मेलो हे डिक्लेर केल्यावर मढं पण अंमळ सुखी झालं.
* ******
आता क्या से क्या नंतर रोज मनाला देतो १००मिलीचा एनीमा
सज्जनाचा पंथ सोड म्हणून सांगतो सकाळी रोज कानीकपाळी.
अभी जमाना सॉफ्ट वेर का अंकल.
म्हटलं बघा ना तेच तर घातलंय
स्साले रामदासाच्या लंगोटीला जी-स्ट्रींग म्हणतात.
** **** **
असो टारझना असे कठीण प्रश्न टाकू नको बॉ.जरा जास्त टाकायला लागते

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

टारझन's picture

9 Sep 2008 - 10:26 am | टारझन

तक्रार न करता करत होतो न काढलेल्या तिकीटावरचा प्रवास.वेगवेगळ्या गली रस्त्यावरून आयुष्य मला जनावराच्या मढ्यासारखे ओढत नेत होतं.मेलो हे डिक्लेर केल्यावर मढं पण अंमळ सुखी झालं.
=D> =D> =D>
हॅट्स ऑफ ... तुमच्या शब्दांत ताकद आहे काका

असो टारझना असे कठीण प्रश्न टाकू नको बॉ.जरा जास्त टाकायला लागते
बरं असतं हो ... आधनं मधनं असले प्रश्न टाकायला ... तुम्ही शिनियर चार गोष्टी लिवता तरी

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्राजु's picture

8 Sep 2008 - 8:27 pm | प्राजु

माझ्या कल्पनेतलं प्राणी संग्रहालय काढायचं आहे.(हसू नये)
ज्या मध्ये सगळे प्राणी मुक्त असतील.. आणि मुख्य म्हणजे माझ्या सवयीचे असतील. तशी इथे बरिच आहेत प्राणीसंग्रहालये.. पण माझं असं ते वेगळंच असेल. हे प्राणी संग्रहालय भारतात असेल.. आणि मला जमेल तेव्हा मी हे नक्की करेन.
सध्याच्या कामातही मी आनंदी आहे. लोकांना माझा आवाज आवडतो आहे.. माझ्या आवाजावरून लोक मला ओळखताहेत हे सुद्धा लाईक अ ड्रिम कम ट्रू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

9 Sep 2008 - 11:00 am | टारझन

प्राणी संग्रहालयाची कल्पना खरोखर आगळी वेगळी पण झाक आहे ...
(कोणी हसला असेल तर दंतविमा काढून घ्यारे ;))
वा ! तुला जे काही करायचंय ते भारतातच .. आनंद जाहला
आणि तुझा आवाज खरेच फार गोड आहे ... मिसळ कट्ट्याच्या विडियो क्लिप पाहिल्यावर मला त्याची कल्पना आली.

सगळ्यांनी प्रांजळ पणे आपले ड्रिम्स लिहिले .. त्याबद्दल हे पसायदान : जो जे वांछिल , तो ते लाभो (का लाहो .. स्पेलिंग मिस्टेक माफ करा पामरांना)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनिष's picture

8 Sep 2008 - 8:47 pm | मनिष

जुस्तजू जिसकी थी उस को तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने

आणि थोडा बदल करून --

किसीसे गिला न किया ख़ुद भी पशेमाँ न हुये
जिंदगी की रस्म को इस तरह निभाया हमने

काय विषय काढलाय यार....खूप लिहिता येईल, मी माझ्या ब्लॉगवर ह्याविषयी लिहिलेही होते....हम्म, नंतर लिहिन सविस्तर!

लिखाळ's picture

8 Sep 2008 - 9:12 pm | लिखाळ

काय हवे आहे ते मला अजून समजले नाही पण काय नको ते आतापर्यंत समजले आहे.
असे किती काळ चालू राहिल ते महित नाही.

गरीबमुलांसाठी शाळा, अन्नछत्र, मनोरुग्ण-वृद्ध लोकांसाठी मध्यमवर्गीय खिशाला परवडेल अशी निवासी वैद्यकीय सोय यांपैकी हातून काही घडावे आणि 'काहितरी देह कष्टावा' असे वाटते.
-- (प्रवासी) लिखाळ.

ऋषिकेश's picture

11 Sep 2008 - 3:14 pm | ऋषिकेश

काय हवे आहे ते मला अजून समजले नाही पण काय नको ते आतापर्यंत समजले आहे.
असे किती काळ चालू राहिल ते महित नाही.

अगदी हेच म्हणतो!

-(नासमझ प्रवासी) ऋषिकेश

खरतर आम्ही आधी रेडिओखगोलशस्त्राच्या प्रेमात पडलो होतो आणि आता बंगलुरात तारे पहायचच काम करतोय .......
पंढरी अजुन दुर आहे .... बराच पल्ला गाठायचाय .... थोडिशी अस्थिरता आहे ... पन होइल सगळ व्यवस्थित काळानुरुप ........

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

भाग्यश्री's picture

8 Sep 2008 - 11:31 pm | भाग्यश्री

मला नेहेमीच कंप्युटर इंजिनिअर व्हायचं होतं, ती झालेही.. सॉफ्टवेअर मधले टेन्शन्स्,ताण, हेक्टीक रूटीन कसंही असलं तरी मला आवडतं.. पण ह्म्म, कंप्युटर इंजिनिअर व्हायचं हा प्रॅक्टीकल विचार होता.. जो मला पोटापाण्याची सोय करायला उपयोगी पडला असता वगैरे.. पण ओढा थोडासा जास्त पुस्तकं,चित्र-शिल्पकला,भरपूर हिंडणे-फिरणे, संगीत,सिंथेसायझर,गिटार अशा गोष्टींकडे.. अर्थात या गोष्टी पोटापाण्यासाठी नाही उपयोगाच्या.. किंवा छंदापुरत्या मर्यादीत ठेवता येतात.. ज्या मी केव्हाही करू शकते.. :)

बेसनलाडू's picture

9 Sep 2008 - 5:03 am | बेसनलाडू

मला नेहेमीच संगणक अभियंता व्हायचं होतं, तो झालोही.. सॉफ्टवेअर मधले टेन्शन्स्,ताण, हेक्टीक रूटीन कसंही असलं तरी मला आवडतं..
(सहमत)बेसनलाडू

सर्किट's picture

9 Sep 2008 - 11:34 pm | सर्किट (not verified)

हेच म्हणतो.

-- सर्किट

गणा मास्तर's picture

9 Sep 2008 - 6:05 am | गणा मास्तर

मी पण आलो टार्‍यासारखा वहात वहात सॉफ्टवेअरमध्ये. चार वर्षे थिअरीशी झगडलो. कसाबसा पास होत गेलो.
पण प्रोग्रॅमिंग जाम आवडायला लागलं. स्ट्रगल बिगल करुन नोकरीबी लागली. पण कधीकधी मेलामेलीचा वीट येतो.
इश्यु शब्द तर डोक्यात असा बसलाय की कोणी तो उच्चरला की भणभणायला होतं. पण तरी करतोय ते काम आवडतय, कोडींग करताना जाम मजा येते.
एखाद प्रॉब्लेम सुटला की शेजारच्याला टाळी द्यावीशी वाटते......
ड्रीम जॉब म्हणाल तर लहाणपणी वाटायच पोस्ट्मन व्हावं, त्याला कसं मस्त दिवसभर सायकलवर फिरायला मिळतं. नंतर वाटायचे एस टी मध्ये कंडक्टर होउन नवीनवी गावं बघावीत. ईंजिनीअरींग झाल्यावर नोकरी मिळत नाही म्हणुन काही महिने आमच्याच कॉलेजात मास्तरकी केली. ते काम खुप मनापासुन केलं. एकतर माझा मास्तर लोकांचा अनुभव वाईट होता. त्यामुळे कसे व्हायचे नाही, काय करायचे नाही ते पक्के ठाउक होते. त्यात विद्यार्थी फक्त १-२ वर्षाने लहान , बरेचजण मित्र, त्यांमुळे त्यांना मी त्यांच्यातलाच वाटायचो..... आयुष्यातला सर्वात चांगला काळ होता तो. लेक्चररशिपच्या एकदी प्रेमात पडलो होतो.
पण पैसा नाही......मग अचानक सॉफ्टवेअरमध्ये नोकरी लागली आणि दिली मास्तरकी सोडुन्......आजही वाटतं जाव परत कॉलेजात.....पोरांना डीएसएफ सी प्लस प्लस शिकवाव......
बघु जमलं तर पुढं कधीतरी......

एकलव्य's picture

9 Sep 2008 - 7:57 am | एकलव्य

आमचे स्वप्न तसे नेहमीच बदलत गेले. पण स्वप्नांबरोबर करिअरची दिशा बदलण्याची हिम्मत आजवर तरी दाखवित आलो आहोत. क्षणिक गटांगळ्याही खाल्या पण तेव्हाच तर मनसोक्त डुंबायला शिकलो. मागे वळून पाहताना "हे" मी तेव्हा करून पाहायला पाहिजे होते अशी खंत मनात नाही.

पुढे काय करावं याची पडणारी स्वप्ने मात्र गेली काही वर्षे अगदी अस्वस्थ करून टाकत आहेत. जीवाची घालमेल शब्दांत मांडता येण्याजोगी नाही.

कळीच्या विषयाला हात घातल्याबद्दल टारझनाचे अभिनंदन!

(झोप उडालेला) एकलव्य

वरील प्रतिसादात "काय" आणि "कसे" याचे तपशील दिलेले नाहीत... कारण त्याची मला आणि इतर कोणालाही गरज आहे असे वाटले नाही. :)

मदनबाण's picture

9 Sep 2008 - 2:49 pm | मदनबाण

मला व्हायचं होत कंप्युटर इंजि पण झालो प्रॉडक्शन इंजि,,बरेच हात पाय मारुन मारुन आयटीच्या जंगलात आलो, तर आता काळ वेळ पण समजेनासे झाले आहे..फक्त शिफ्ट करण्यासाठी ऑफिसला यायचे हेच मेंदुला कळते !!
कधी कधी फार फार विट योतो या जॉबचा .. इतका की वाटतं आता सगळं सोडून जावं हिमालयात पळून.
असं मला बर्‍याच वेळेला वाटतं,तो हिमालय सुध्द्दा माझी वाट पाहुन पाहुन कंटाळ्ला असावा..
टकुर्‍याच चमन करुन लाल रंगाची वस्त्रे परिधान करुन एखादा हिमालयन लामा बनण्याची इच्छा कधी कधी प्रबळ बनते.(विशेषतःमाझ्या प्रोजेक्ट मधे एखादा लोचा झाला की नको असलेली मेला मेली करायची वेळ आली की)
जमलं असतं तर प्राध्यापक बनावयास आवडले असते..
असो बरेच जॉब केले सोडले,,सध्याच्या कंपनीत दोन वर्ष होतील !! आता नवीन ठिकाणी उडी मारण्याचा विचार करतोय..

शिफ्ट मधेच जगणारा आयटी हमाल..
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

शेखस्पिअर's picture

9 Sep 2008 - 4:36 pm | शेखस्पिअर

हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले...
बहोत निकले मेरे अर्मान लेकीन फिर भी कम निकले...

बेमट्या ,नोकरी आणि बायको ,दुसरी चांगली वाटली म्हणून पहिली बदलायची नसते..

मिसंदीप's picture

9 Sep 2008 - 7:50 pm | मिसंदीप

मला संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी करायचे आहे(होय ...मि आहे आसे म्हणतो कारण मि प्रयत्न चालु ठेवले आहेत)
संगीतात पण.. व्हॉयलीन शिकायची फार इच्छा आहे. बघुया कसे जमते ते.

समस्त मंडळ's picture

9 Sep 2008 - 11:55 pm | समस्त मंडळ

Who says NOTHING is IMPOSSIBLE in life......

I have been doing NOTHING for years......

and its POSSIBLE !!!!!!

=))

रेवती's picture

10 Sep 2008 - 3:36 am | रेवती

असं काही विचारून अडचणीत आणलेस बुवा!
मी लहान असताना म्हणजे दुसरी किंवा तिसरी ईयत्तेमध्ये, आमची मोलकरीण काम सोडून जाते म्हणाली. आईने साहजिकच का? असा प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली कि तीला विड्या वळण्याचे काम मिळाले आहे व पैसेही चांगले मिळणार आहेत. मला त्यावेळी विड्या वळायला जावेसे वाटत होते. असे बोलल्यावर बाबा रागावले. मीही तशी समजूतदार असल्याने नाद सोडला विड्या वळायचा :) .
शालेय शिक्षण संपताना मला शेफ व्हावेसे वाटत होते पण यावेळी आज्जी रागावली,"काय मेले ते आचारी होण्याचे डोहाळे, चांगले ईंजनीर नाहीतर डाक्तर व्हायचं सोडून....." मग झाले विंजनेर विलेक्टोनिक्मधे.

रेवती

मला लहानपणी आईस्क्रीमची फॆक्टरी काढावी असे वाटायचे, कधी कधी खुप केक खाण्यासाठी बेकरी काढावी असे वाटायचे.
पण हाय आईस्क्रीमची स्वप्न विरघळुन गेली आणि मी पर्सनल सेक्रेटरी झाले.
आता सगळे जॊब वगैरे सोडुन नवर्या बरोबर यु.एस. मध्ये घरी केक करून खात आहे. :)

स्वप्निल..'s picture

10 Sep 2008 - 4:41 am | स्वप्निल..

आपल्याला पण टारया सारखे चित्र काढन्याची भारी छंद....म्हणुन मग सिविल इंजीनीअर व्हायचे होते ( माझ्या मामा कडे बघुन) कींवा आर्कीटेक्चर ला जायचे होते....म्हणजे माझा चित्रे काढन्याचा छंद पुर्ण होइल म्हणुन..पण आर्कीटेक्चर साठी वेगळा फॉर्म लागतो हेच माहित नव्हते आणि सिविल इंजीनीअर ला नोकरया नव्हत्या..त्यावेळेस..तरी पण फॉर्म भरतांना कॉम्प्युटर आणि सिविल यासाठीच भरला होता..पण जे कॉलेज सिविल साठी पाहीजे होते ते नाही मिळाले आनि मग कॉम्प्युटर घेतली आणि आता त्यातच पी.जी. करुन नेहमी साठीच अडकलो...
(आता फोन वाजला की भीति वाटते की ऑफीसचा असेल म्हणुन्..सपोर्ट मध्ये असण्याचा दुष्परीणाम...~X()

आणि हो मी एन. डी. ए. चा फॉर्म पण भरला होता बारावी नंतर..खुप ईच्छा होती..पण मला त्या परीक्षेसाठी लागनारे ओळखपत्र परीक्षा झाल्यावर दुसरया दिवशी मिळाले..आपल्या इथला कारभार... :(

पुढे खुप काही करायचे डोक्यात आहे..बघु काय काय जमते ते..

असो..सध्या तरी एवढेच..

स्वप्निल..

भास्कर केन्डे's picture

10 Sep 2008 - 9:16 pm | भास्कर केन्डे

रोज आठ तास आम्ही तुरुंगात असतो. ५ बाय ५ च्या चौकटीत बसून बाहेरचे तापमान किती आहे ते संगणकावर पाहतो. बायकोचा फोन आला की लेकरांचा आवाज अस्पष्ट ऐकतो. आई-वडिल गावी कसे असतील याचा विचार करतो. किमान पुढच्या वर्षीची दिवाळी तरी भावंडासोबत घालवायची हा विचार करत ५ चा ठोका किती वेळाने पडणार असे म्हणत देवाने दिलेले सुंदर आयुष्य चार दमडीसाठी सडवतो.

हा तुरुंग फोडायचाय. ३६५ पैकी ३६५ दिवस शेतात उघड्या छातीने घाम गाळायचाय पण .... पोराबाळांच्या मुखात दोन घास जातील याची खात्री करून (मराठवाड्यातल्या शेतकर्‍याचे स्वप्न शेवटी!).

एक नाटक बसवायचय... दिनानाथ मध्ये चालवालया नाही पण संध्याकाळी गावच्या चावडीत दाखवायला.

आणी पंतप्रधान बनायचय.... समान नागरी कायदा करायला.

आपला,
(कैदी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

चतुरंग's picture

10 Sep 2008 - 9:44 pm | चतुरंग

"आपण पुढं काय करायचं" हा विचार करण्याच्या काळात मला माझ्या मित्रामुळं इलेक्ट्रॉनिक्सची गोडी लागली.
त्याचे वडील डॉक्टर असले तरी त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचा नाद. त्यामुळे घरी जुन्याबाजारातून आणलेली असंख्य उपकरणी, जुने टीव्ही, व्ही.सी.आर., कॅसेट प्लेअर्स, ऑसिलोस्कोप्स, ढिगाने इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्स ह्यांच्यातच आम्ही खेळायचो. काहीतरी उचापती करुन बघणे सतत चालू असे. (विजेचे झटके खाणे तिथूनच सुरु झाले! पुढच्या आयुष्यातल्या कित्येक झटक्यांची पूर्वतयारीच म्हण! ;) )(एक गमतीशीर प्रकार आठवतोय. आम्ही कपॅसिटर्स चार्ज करुन हातात काळजीपूर्वक धरुन बसायचो. खोलीत येणार्‍या दुसर्‍या मित्रांच्या अंगावर टाकायचो. अभावितपणे झेलला गेलेला कपॅसिटर डिसचार्ज होऊन झटका बसला की मित्र ओरडत कपॅसिटर फेकून पळून जाई आणि आम्ही खिदळत असू! ;) )कित्येक बंद पडलेली उपकरणी आम्ही प्रयोग करुन चालू केली. त्याचा खूप आनंद व्हायचा.
त्यातूनच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनेर व्हायचे नक्की केले! हार्डवेअर आणि त्यातही मायक्रोप्रोसेसर्स हा माझा आवडीचा विषय. ह्यातच काम केले आणि करत राहिलो.
कशी कोण जाणे पण सॉफ्टवेअरच्या लाटेने मला कधीही भुरळ घातली नाही. मुळात मला काँप्यूटरवर बसून कोडिंग करणे ह्या प्रकाराचा वीट आहे. त्यामुळे माझे काम आजही हार्डवेअरशीच संबंधित आहे आणि त्यात मला प्रचंड आनंद मिळतो!
हा ड्रीम जॉब आहे का? माझं कामाचं क्षेत्र गेली १८ वर्षे सतत थोडेथोडे बदलते आहे आणि त्यात मी निश्चितच सुखी आहे!

मला काय व्हायला आवडलं असतं असं विचारशील तर मला मोठा बुद्धीबळपटू व्हायला आवडलं असतं! कालेजात असताना काही काळ डोक्यावर ते भूत होतं ही.
माझा डॉ. मावसभाऊ उत्तम खेळतो त्याच्याकडे उत्तमोत्तम डाव असलेले दोन-अडीच हजार पानांचं एक पुस्तक होतं त्यात बघून आणि त्याच्याशी खेळून मी शिकत गेलो. कॉलेजला असताना युनिवर्सिटी खेळलोय. रात्र्-रात्र खेळायच्या नादात मॅथेमॅटिक्स २ ने दांडी उडवली! (नंतर त्याच एम२ ला ९६/१०० असा धुतला) पण बुद्धीबळाचा आपसूकच नाद सुटला. आजही आवड कायम आहे. आता मुलाला शिकवतोय! :)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 11:46 am | विसोबा खेचर

डॉक्टर किंवा तिकिट रेल्वेचा तिकिट तपासनीस! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Sep 2008 - 2:43 pm | llपुण्याचे पेशवेll

डॉक्टर किंवा तिकिट रेल्वेचा तिकिट तपासनीस

हिहाहाहा.. एक नंबर उत्तर.. यालाच versatile व्यक्तिमत्व म्हणतात काय? :)

पुण्याचे पेशवे

मन's picture

11 Sep 2008 - 2:56 pm | मन

करणे हाच माझा "जॉब" आहे.
रिकाम्या वेळात मी माहिती तंत्रज्ञानाची कामं करतो.

टु ड्रीम इज माय जॉब.

आपलाच,
(दिवसा उजेडी स्वप्न बघणारा कलंदर )मनोबा