१_
६ यमीताई, खास आपल्यासाठी पानगीची कृति देत आहे.साहित्य- २-४ केळीची पाने,२वाट्या तांदूळाची पिठी,३-४ वाट्या दूध,पाव वाटी तूप,चवीपुरते मीठ,हवा असल्यास पाव वाटी गूळ.
कृति-तांदूळाच्या पिठीत तूप व दूध घालून ,मीठ घालून सैलसर भिजवून घ्यावे.(फार सैल किंवा घट्ट नको)डावेने घालता येइल असे असावे.केळीच्या पानाचे लहान तुकडे करून एका तुकड्यावर २ वाट्या पीठ घालावे.त्यावर पानाचा दुसरा तुकडा ठेवून तव्यावर खरपूस भाजावे.पानगी तयार झाल्यावर दोन्ही पाने आपोआप सुटू लागतात.पाने काढून टाकली की पानगी तय्यार! फोडणीच्या मिरचीबरोबर उत्तम लागते.गोड पानगी हवी असल्यास पीठात थोडा गूळ घालावा.झट्पट तयार होणारा नाश्ता!
ता.क.--आजच सकाळी पानगी केली होती पण फोटो काढला नाही .त्यामुळे देऊ शकत नाही.क्षमस्व.
प्रतिक्रिया
8 Sep 2008 - 1:40 pm | ऋचा
मी २-३ वेळा केलय नवरोबासाठी
अगदी पटकन होते ही.
मलाही आवडते करायला :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
8 Sep 2008 - 1:40 pm | मेघना भुस्कुटे
सहीये पाकृ.
अशीच ताकातली पानगीपण करतात. दुधा-तुपाऐवजी ताक + हिरवी मिरची + थोडं भरडलेलं जिरं + मीठ घालून भिजवायचं तांदुळाचं पीठ. तीपण पानगी मस्त लागते.
8 Sep 2008 - 1:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वैशालीताई, थ्यँक्स! आम्ही पूर्वी आजोळी गावाला जायचो तेव्हाचा आवडता ब्रेकफास्ट होता हा; आई चुलीवर भाजून द्यायची पानगी आणि घरची केळ्याची पानं आणि तांदूळपण ... गेले ते दिन गेले!
पण आता परत आणायचा प्रयत्न केलाच पाहिजे!
ते फोडणीच्या मिरचीचं काय कळलं नाही. ते पण सांगा ना नीट आम्हा नवशिक्यांसाठी!
अवांतरः ऋचा, घरी कधी बोलावणार पानगी खायला घालायला? ;-)
8 Sep 2008 - 2:05 pm | ऋचा
ये की रविवारी :)
मी एकलाच असतो तु ये
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
9 Sep 2008 - 6:47 am | वैशाली हसमनीस
सोप्पी आहे.बुटक्या,जाड मिरच्या मिळाल्या तर फार उत्तम. नसेल तर मिळतील त्या मिरच्या घेऊन त्याचे मोठे तुकडे करावेत.फोडणीत ते घालून त्यावर थोडी जास्त हळद,मीठ घालून ३-४ मिनिटे परतून घ्यावे.मग त्यावर लिंबू पिळावे.किंवा मिरचीच्या लोणच्याशीही चांगली लागते.
9 Sep 2008 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वैशालीताई,
आता मी पानगी केली की फोटो काढून पहिले तुम्हालाच पाठवणार. धन्यवाद.
अदिती
8 Sep 2008 - 8:11 pm | प्राजु
आम्हाला इथे केळीची पाने कुठे मिळणार?? त्याला दुसरा काही ऑप्शन आहे का? पानगी मलाही खूप आवडतात.
कोकणांत माझ्या आत्याकडे केळीच्या पानांच्या ऐवजी हळदीची पाने वापरतात. ते एकदम अफलातून लागतं. ओल्या हळदीचा स्वाद सह्ही येतो एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2008 - 8:15 pm | प्रियाली
कोणत्याही मेक्सिकन दुकांनातून मिळतील. मुबलक मिळतात. अमेरिकेत सर्वत्र वापरली जातात.
स्प्रिंगमध्ये अंगणात केळी लावल्यास घरातच उपलब्ध होतील.
9 Sep 2008 - 7:00 am | वैशाली हसमनीस
प्राजुताई,तुम्ही म्हणता त्याला कोंकणात 'पातोळे' म्हणतात.तांदुळाचा पीठी घेऊन ,त्यात गूळ घालून,असल्यास काकडीच्या पाण्यात ते पीठ जाडसर भिजवावे व हळदीच्या पानावर घालून मोदकाप्रमाणे उकडावे.गोड असल्यामुळे कोंकणात ते पक्वान्न मानले जाते.खास करून नवरात्रात तवस(मोठी) काकडी मिळाल्यावर ते केले जातात्.
9 Sep 2008 - 9:48 am | नभा
निवगर्या आणि पानगी एकच आहे का?
9 Sep 2008 - 11:46 am | स्वाती दिनेश
निवगर्या- मोदकाच्या उकडीत मीठ,जिरे,मिरची वाटून घालून मळायचे आणि थापायचे व उकडायचे.
स्वाती
9 Sep 2008 - 11:58 am | वैशाली हसमनीस
निवगरी व पानगी एकच नाहीं. निवगरी म्हणजे मोदकासारखी उकड काढून घेऊन त्यात जिरे,मिरची,मीठ, कोथिंबीर घालून मोदकासारखीच मळून घेऊन त्याच्या छोट्या पारी (छोटी जाड पुरी) करून त्या मोदकांप्रमाणेच वाफवून घेतल्या की झाले,निवगरी तैयार !
9 Sep 2008 - 1:39 pm | सहज
निवगरी आवडेल असे वाटते आहे.
:-)
धन्यु
9 Sep 2008 - 10:06 am | स्नेहश्री
एक तर ती परत परत वापरता येतात. आणि त्याचा स्वाद पण वेगळा लागतो.
पळसाची पाने जर एखद्या गजर्या बरोबर आली असली तर त्य फुलांचा सुवास पण येतो. आता केळीची पाने वापरुन बघेन.
गोड पानगी असेल तर त्या बरोबर साजुक तुप आणि लोणच्याची फोड हवीच.
आता तिखट पण करुन बघेन.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
9 Sep 2008 - 10:07 am | चटोरी वैशू
केळीची पाने .... आणि हळदिची पाने ..नसल्यास???.... दुसरा पर्याय.... सांगा ना..... मला पण पानगी बनवुन बघायची आहे...
10 Sep 2008 - 12:37 am | चकली
पानगी आणि मिरचीचे लोणचे...आहाहा !
चकली
http://chakali.blogspot.com
11 Sep 2008 - 12:26 pm | विसोबा खेचर
वा! पानगी म्हण्जे आमच्या देवगडातला खास पदार्थ!
वैशालीताई, पानगीचा फोटूही दिला असतात तर आणखी मजा आली असते! :)
असो, अजूनही अश्याच उत्तमोतम मराठमोळ्या पदार्थांची पाकृ येऊ द्यात प्लीज!
तात्या.