मेदुवडे एअर फ्रायर मध्ये प्रायोगिक तत्त्वावर केले, पण अजून चांगले कसे होतील ह्यावर प्रयोग चालू होते. मेदुवडा मेकर ह्या नावाखाली शोधत असता गुगलबाबाने डोनटमेकर आणि डोनट मोल्ड दाखवले. म्हणून मग डोनट मोल्डचा वापर करून वडे केले. ते बरे झाले, पण चांगले नाही. म्हणून मग परत दुसर्या मोल्ड मध्ये करून पाहिले. ते छान झाले. म्हणून ही मेदुवडे रेसिपी शेअर करते आहे.
वड्यांसाठी:- २ वाट्या उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, उडदाचे पीठ १- २ चमचे
ओल्याखोबर्याचे लहान तुकडे ,कढिलिंबाची ५-६ पाने- बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या- बारीक तुकडे करून, थोडी मीरपूड किवा ५-६ मिरे ठेचून
तळणीसाठी तेल किवा एअर फ्रायर
उडदाची डाळ ४ ते५ तास भिजत घाला, त्यातच मेथ्याही घाला. नंतर जाडसर भरड वाटा. वाटताना कमीतकमी पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. वाटलेले पीठ हाताने उभे वरखाली करून भरपूर फेसा म्हणजे ते हलके होईल. त्यात खोबर्याचे तुकडे, मिरपूड किवा ठेचलेले मिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,कढिलिंबाची बारीक चिरलेली पाने घालून परत एकदा चमच्याने फेसा.
कितीही कमी पाणी घालून वाटले तरी ते नीट वाटले जायला थोडेफार पाणी कमीजास्त करावे लागते अशावेळी सगळे पीठ वाटून झाले की त्यात चमचा दोन चमचे उडदाचे पीठ घाला. त्याने पीठाला घट्टपणा येईल. (ही माझ्या एका मद्रदेशीय मैतरिणीची टीप)
तेल तापत ठेवा. हात पाण्यात ओला करून घ्या आणि हातावर वडा तयार करून मध्ये गोल भोक करून तळणीत टाका. तांबूस रंगावर तळा.
एअर फ्रायर वापरायचा असल्यास हातावर असे वडे करून अॅलु.फॉलीच्या छोट्या तुकड्यांवर ठेवा. किवा डोनट मोल्डला तेलाने ब्रश करून घ्या व त्यात वड्याचे मिश्रण घाला. डोनट मोल्ड मध्ये वडे घालताना पीठ थोडे पातळ हवे.
१८० अंश से वर ए फ्रा प्रिहिट करा.
वडे आधी ९ मिनिटे ए फ्रा करा. मग ते बाहेर काढा, मोल्ड मधून ताटलीत उपडे करा. ते घट्टसर झालेले असतील. त्याला ब्रशने ऑइल ग्रिझिंग करा आणि आता मोल्डशिवाय वडे अजून ५ मिनिटे ए फ्रा करा, उघडून पहा. लागल्यास अजून एखाद दोन मिनिटे एअर फ्राय करा.
सांबारासाठी:- तुरीची डाळ २ वाट्या,
२ ते ३ चमचे सांबार मसाला (मला एमटीआर सांबार पावडर आवडते), १ चमचा तिखट, १ लाल सुकी मिरची,
१ मध्यम कांदा,१ लहान टोमॅटो, दुधी भोपळयाचा वाटीभर फोडी होतील एवढा तुकडा ,एक लहान वांगे,२ शेवग्याच्या शेंगा, हवा असल्यास १ लहान बटाटा, मीठ चवीनुसार,
फोडणीचे सामान,१/२ लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ,थोडा गूळ(ऑप्शनल)
डाळ शिजवून घ्या.डाळीबरोबरच शेंगाही शिजवा. तेलावर खमंग फोडणी करून घ्या,त्यात लाल मिरची ,कांदा घालून परता,सांबार मसाला व तिखट घालून परता. कांदा जरा गुलाबी झाला की इतर भाज्या घालून परता.शेंगा घाला. झाकण ठेवून एक वाफ आणा. चिंचेचा कोळ व डाळ घाला, पाणी घालून हवे तसे पातळ करा. उकळी आली की मीठ व हवा असल्यास गूळ घाला. खळखळून उकळू द्या.
चटणीसाठी:- १ वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी डाळं, ४-५ हिरव्या मिरच्या, पेरभर आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर
चटणीसाठीचे सगळे पदार्थ थोडे पाणी घालून वाटा.. दही किवा ताक घालून सरसरीत कालवा.
वरुन तेल, मोहरी, उडीदडाळ, कढिपत्ता यांची फोडणी घाला.
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 6:25 pm | मांत्रिक
फोटो बघूनच तृप्त! झक्कास!!!
21 Nov 2015 - 6:41 pm | मितान
तोंडाला पाणी सुटले !!!!
21 Nov 2015 - 6:58 pm | स्मिता_१३
+१ तोंडाला पाणी सुटले !!!!
21 Nov 2015 - 7:07 pm | बहुगुणी
डोनट मोल्डचा वापर करून वडे केले. ते बरे झाले, पण चांगले नाही. म्हणून मग परत दुसर्या मोल्ड मध्ये करून पाहिले. ते छान झाले.
दुसरा मोल्ड कुठला वापरला? त्याचा दुवा मिळेल?आणि खात्री करून घेण्यासाठी:
१८० अंश से वर ए फ्रा प्रिहिट करा.
पहिल्यांदा एअर फ्राय करतांना मोल्डसकट करायचं ना? (म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हनला धातू चालत नाही तसा काही निर्बंध फ्रायरला नसावा....)वडे आधी ९ मिनिटे ए फ्रा करा. मग ते बाहेर काढा, मोल्ड मधून ताटलीत उपडे करा. ते घट्टसर झालेले असतील. त्याला ब्रशने ऑइल ग्रिझिंग करा आणि आता मोल्डशिवाय वडे अजून ५ मिनिटे ए फ्रा करा
आता एअर फ्रायर घेण्याचा प्लॅन प्रत्यक्षात आणायलाच हवा असं वाटायला लागलंय, गृहस्वामिनीकडून शिव्या न खाता परवानगी मिळवण्याचा काही सोपा मार्ग आहे का? ;-)
स्नॅपडील वर ४००० रुपयांपासून पुढे बरेच ऑप्शन्स दिसताहेत.
21 Nov 2015 - 7:20 pm | स्वाती दिनेश
पहिला मोल्ड मी मफिन्सचा घेतला होता, ह्यावेळचे वडे डोनट मोल्ड मध्ये केले. मी सिलीकॉनचे मोल्ड वापरले. धातूचे मोल्डही वापरू शकतो. मायक्रोवेव सारखा काही ह्यात निर्बंध नाही.
स्वाती
21 Nov 2015 - 7:32 pm | स्वाती दिनेश
आधी पहिल्या चित्रातले मोल्ड वापरले, आज लाल डोनट मोल्ड मध्ये केले. दोन्ही मोल्ड सिलिकॉनचे आहेत.
स्वाती
22 Nov 2015 - 7:37 am | बहुगुणी
एअर फ्रायर वापरून केलेल्या इतरही पाककृती वेळ मिळेल तशा टाकाव्यात ही विनंती.
21 Nov 2015 - 7:07 pm | अजया
तेरा इमोसनल अत्याचार!आता करावे लागेल उद्याच.नाहीतरी पोबा सुट्टीवर आहे.काहीतरी वेगळे करायचेच होते.
21 Nov 2015 - 7:36 pm | पैसा
मस्त!!
21 Nov 2015 - 8:14 pm | एस
निषेध!
22 Nov 2015 - 12:40 am | सुहास झेले
वाह !!!
22 Nov 2015 - 4:29 am | रेवती
ए फ्रा मध्ये वड्यांची कल्पना, तीही डोनट मोल्ड वापरून, हे छान वाटले. फोटू नेहमीप्रमाणेच छान आलाय.
22 Nov 2015 - 8:00 am | इडली डोसा
छान दिसतायेत मेदुवडे.
22 Nov 2015 - 10:36 am | परिकथेतील राजकुमार
स्वाती दिनेश आणि सानिकास्वप्नील हे आयडी बॅन करून टाका च्यायला!
22 Nov 2015 - 11:46 am | संजय पाटिल
जलो मत!! देखते रहो..
22 Nov 2015 - 4:36 pm | मुक्त विहारि
आणि
तो एक्जण कुवैती पनीरवाला म्हणून आहे, त्याला पण.....
स्वगत : तरी बरे आजकाल विविध प्रकारे चिकन खाऊ घालणारे, गणपाशेठ येत नाहीत.
22 Nov 2015 - 5:03 pm | विशाखा राऊत
मस्त आहे रेसेपी
22 Nov 2015 - 10:42 pm | नूतन सावंत
एअर फ्रायर घेतलाच पाहिजे आता.रच्याकने, तुला आता त्या कंपन्याकडून कमिशन घेतले पाहिजे.
22 Nov 2015 - 10:42 pm | नूतन सावंत
एअर फ्रायर घेतलाच पाहिजे आता.रच्याकने, तुला आता त्या कंपन्याकडून कमिशन घेतले पाहिजे.
23 Nov 2015 - 12:27 am | पद्मावति
खूपच मस्तं.
'हवा के साथ साथ' धाग्यावरून प्रेरणा घेऊन मी ए.फ्रा. घेतलाय. फ्रेंच फ्राईज बनवून उद्घाटन केलं. अगदी इतक्याश्या तेलात गोष्टी इतक्या छान चवदार बनू शकतात यावर विश्वास बसत नव्हता. तुला खूप खूप धन्यवाद ए.फ्रा. ची ओळख करून दिल्याबद्दल. आता असे मेदुवडे करून बघते. अशाच मस्तं मस्तं अजुन रेसेपीज येऊ दे.
23 Nov 2015 - 9:17 am | prasadranade
टिपिकल मेदूवड्या प्रमाणे आकार न देता छोटे मन्चुरियन बॉल्स प्रमाणे तळून किंवा भाजून मन्चुरियन ग्रेव्ही मध्ये टाका मस्त साऊथ इंडियन आणि chinese फ्युजन रेसिपी. जर तळले असतील तर दही वडे जसे तळल्या नंतर पाण्यात बुडवतात तसे बुडवून मग मन्चुरियन ग्रेव्ही मध्ये टाका. मी प्रयोग करून पहिला आहे. मस्त होतं.
25 Nov 2015 - 1:24 pm | दिपक.कुवेत
आता एअरफायर पाकृ असा वेगळा विभाग काढावा ही जाहीर विनंती