माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.
मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत. खरेतर सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, FC/F/FA, झालंच तर MBA असे किती पर्याय आहेत. शिवाय भारतातही रामा नारायण(दिल्ली), झेविअर(कोलकाता), लोयोला(चेन्नई), नरसी मूनजी (मुंबई) आणि बंगलोरच्या ख्रिस्त कॉलेजसारखे नामांकित कॉलेजेस आहेत. पण आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो.
आता कॅनडात आपल्या 12+3 वर कॉमर्सचे कुठले ऑप्शन उपलब्ध आहेत. टोरोंटो (Toronto), अल्बर्टा (Alberta), डी मोंटरेल (de Montréal), ब्रिटीश कोलंबिया (British Columbia), मॅकगिल (McGill), लवाल (Laval), कॅलगरी (Calgary), वेस्टर्न ओंटारिओ (Western Ontario) आणि ओटावा (Ottawa) या काही चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत, हे वाचून-ऐकून माहिती आहे. कृपया आता कुठल्या शिक्षणाच्या संधी कॅनडात मिळू शकतील, पात्रता, खर्च, इतर काही टेस्टस याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. काही स्कॉलरशिप मिळू शकतील का? SPP अर्थात स्टुडेंट पार्टीसीपेशन प्रोग्राम काय आहे?
आयसीआयसीआय बँकेच्या कॅनडा शाखेची विद्यार्थ्यांना काही मदत होते का?
कॅनडात सुमारे 70% भारतीय जेथे राहतात त्या Toronto, Vancouver मध्ये Surrey किंवा Abbotsford आणि नजीकच्या उपनगरात काय संधी आहेत? Calgary, Edmonton आणि Montreal हेही भारतीय लोक असलेले ठिकाण आहे. तिथे काय संधी आहेत? या भागात अर्न एंड लर्न सोपे होवू शकेल काय?
कॅनडाइतके चांगले, दर्जेदार व तुलनेने स्वस्त शिक्षण अन्य कुठल्या सुरक्षित युरोपीय, अमेरिकी प्रांतात मिळू शकते का?
कॅनडातील वाणिज्य शिक्षण आणि भारतीय शिक्षण यामुळे मिळणाऱ्या जागतिक संधीत काय फरक पडू शकतो?
केवळ UK व्हिसा मिळवून त्या आधारे लवकर US व्हिसा मिळवायचा ही तर मायग्रेशनवाल्यांची आयडिया युवापिढीला गारुड घालत नसेल ना? कारण माझी एक बहिण अशीच UK तून US ला गेलीय. पण ती सॉफ्टवेअरमध्ये आहे.
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार?
कृपया मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
20 Nov 2015 - 8:33 pm | मोदक
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार?जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा.
बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या.
आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो.तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;)
ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.
20 Nov 2015 - 8:45 pm | स्रुजा
१२+३ ला ऑप्शन्स फार कमी आहेत. १२+४ ला ऑप्शन्स आहेत. आयसीआयसीआय चा उपयोग होईल , टोरॉटो मधुन. अर्न अँड लर्न सोपं होईल पण स्कॉलरशिप हवी. कॉमर्स ला तुम्ही उल्लेखलेल्या भागांत भरपूर संधी आहेत, शिवाय आटोवा मध्ये फेडरल गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत. फेड गव्ह चा जॉब हाय अर्निंग आणि फुल ऑफ पर्क्स समजला जातो. कॅनडातल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो, नीट जॉब मिळाला तर पर्मनंट रेसिडेन्सी देखील मिळते. या दोन्ही स्टॅटस मध्ये हेल्थ केअर असतं, शिवाय इथल्या जॉब मार्केट चा आणि त्याहीपेक्षा स्टॅटस चा बराच फायदा नंतर अमेरिकेत जायचं असेल तर किंवा भारतात परतण्यासाठी पण होतो.
21 Nov 2015 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
तो कॅनडामध्ये सेटल व्हायच्या दृष्टीने बघत असेल तर बी.कॉम पुर्ण झाल्यावर एम.बी.ए. करायला टोरांटो, ओटवा किंवा कॅलगेरीसारख्या ठिकाणी अॅडमिशन घेउ शकेल. नंतर वर्क व्हिसा घेउन जॉब करु शकेल व नंतर पी. आर साठी अर्ज करुन पुढे ४ वर्षांनी सिटीझनशिप घेता येइल.
या कॉलेजचे सर्व ऑनलाईन अर्ज व माहीती मिळू शकेल. विनिपेगही एक चांगले ठीकाण आहे व तिथले रेड रिव्हर कॉलेज चांगले आहे.
http://www.rrc.ca/index.php?pid=5691
राहण्याचा खर्च शेअरिंगमध्ये महीन्याला साधारण ५०० डॉलर्स आणि खाण्याचे १५० डॉलर्स अंदाजे होतील. बस पास ८०-१० डॉलर्स महीन्याचा. एकट्या माणसाला एव्हढे पुरेसे होईल.
शक्यतो एजंट्शिवाय स्वतःच माहीती घेउन करा.टोरांटोला महाराष्ट्र मंडळपण आहे. बहुतेक व्हॅन्कुव्हरलापण आहे.
http://www.cic.gc.ca/ ही कॅनडा गवर्न्मेंटची साईट बघा. शिवाय व्हिसा वगैरेसाठी
http://www.canadavisa.com/canadian-student-permits-and-student-work-perm...
हा ब्लॉग किवा ईतर ब्लॉग रिफर करु शकता.
21 Nov 2015 - 4:08 pm | आदूबाळ
सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही.
■■■■
फायनल? की इंटर/IPCC?