गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ
२ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची+जायफळ स्वादासाठी, बदामतुकडे +बेदाणे सजावटीसाठी
घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ
घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा.
हे घाटले तयार झाले.यातील दूध लवकर आळते आणि मिश्रण घट्ट होते ,त्यामुळे वाढायच्या आधी १/२ ते १ कप दूध घाला व खिरीसारखे सरसरीत मिश्रण करा.दूध घातल्याने अगोड वाटल्यास थोडी साखर/गूळ घाला.(परंतु गूळ चटकन विरघळत नाही.)
घावने: तांदळाची पिठी पाणी व चवीपुरते मीठ घालून घावनाला/धिरड्यांना भिजवतो तसे भिजवा,१०/१५ मिनिटे ठेवा.तवा चांगला तापवून घावने घाला.घाटल्याबरोबर खा.
प्रतिक्रिया
7 Sep 2008 - 9:57 am | विसोबा खेचर
ख ल्ला स....!
फोटू पाहून जळून जळून खाक! :)
तात्या देवगडकर.
7 Sep 2008 - 10:36 am | धनंजय
सोपी वाटते कृती - पण घावन मला जमेलच अशी कधी शाश्वती नसते :-(
फोटो बघून खल्लस! :-)
7 Sep 2008 - 7:56 pm | रेवती
फोटो मस्त आलाय! घावनांना जाळी छान पडलीये.
एक शंका आहे, एक वाटी कणकेचे घाटले हे दोन वाट्या तांदूळ पिठीच्या घावनांसाठी जास्त होत नाहीत का? कणिक शिजवल्यानंतर घट्ट होत राहते व आपण दूध घालत राहतो म्हणून असे वाटले.
रेवती
8 Sep 2008 - 12:46 pm | स्वाती दिनेश
रेवती,खाण्याच्या आधी घाटल्यात दूध घालून सारखे केले तर जास्त नाही होत आणि तसेही घाटले जास्त उरले तर नुसते खाता येते आणि घावने जास्त उरली तर चटणीशी, सो ..नो प्रॉब्लेम ;)
स्वाती
8 Sep 2008 - 3:23 am | प्राजु
स्वातिताई,
तू अमेरिकेत येणार आहेस का? किंवा पुढच्या गौरीच्या सणाला तू इथे किंवा मी तिथे. मी आणेन हो गौरी तुझ्या घरच्या... खास हे घावन घाटले खाण्यासाठी..
- (सर्वव्यापी , कोकणस्थ)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2008 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वातीताई,
कालच एका मित्राकडे हे (माझ्या आठवणीत पहिल्यांदाच) खाल्लं; पण तरी आता वाचून, फोटो पाहून आणि आठवणीनी भूक लागली.
अवांतरः पानगी कशी करायची सांगशील का?
8 Sep 2008 - 10:41 am | मिंटी
स्वाती तई एकदम सोप्पी पाककॄती.............
फोटो तर फारच मस्त आलाय.............
8 Sep 2008 - 10:45 am | मेघना भुस्कुटे
घावन हमखास सुटावे, म्हणून थोडा रवा घातला तर चालेल? एकदा आंबोळ्या करून तव्याचा रंग बदलून घेतल्यापासून मला आपली भीती वाटते. :)
बाकी फोटो पाहून खरंच ख-ल्ला-स. अप्रतिम आला आहे फोटो.
8 Sep 2008 - 12:49 pm | स्वाती दिनेश
रवा चालेल की, पण मेघना , तवा चांगला तापवून तेल घाल(निर्लेपचा असला तरीही)आणि मग घावन घातलेस तर चिकटणार नाही.