राशिभविष्य

रामदास's picture
रामदास in दिवाळी अंक
12 Nov 2015 - 7:36 pm

या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात काही नवी भर घालावी असा विचार बरेच दिवस करत होतो.जे इतर दिवाळी अंकात नसेल असे ते मिपाच्या दिवाळी अंकात असावे असे नेहेमी वाटते. हाच विचार पुढे नेत या निष्कर्षावर पोहचलो की दृकश्राव्य स्वरुपात जर काही करता आले तर ते करावे. एका संध्याकाळी किसनरावांचा फोन आला " काका,अरुण म्हात्र्यांच्या काही कविता ध्वनीमुद्रीत करून द्याला का ? " मी अरुणला विचारलं त्यानी पण होकार दिला. चिन्मय मांडलेकरच्या मुलाखतीची तयारी केली . विघ्नेश जोशीच्या हार्मोनीयम वादनाचे ध्वनीमुद्रण करायचे ठरवले.अनंत मराठे हे माझे स्नेही आहेत .त्यांनी सूचना केली ." अहो, मुद्रीत दिवाळी अंकात येणार्‍या वर्षाचे भविष्य कथन असते (जे तुमच्या आंतरजालावर नसते असा काहीसा सूर होता),ते काम मी करतो " एकंदरीत मिपाच्या दिवाळी अंकावर "दिवाळी पहाट " करण्याची जय्यत तयारी केली आणि आजारी पडलो.तारखा निघून गेल्या. मराठ्यांचा उत्साह मात्र कायम होता. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आणि माझ्या हातात दिले. तोपर्यंत मिपाचा दिवाळी अंक जवळजवळ पूर्ण झाला होता.गेले दोन दिवस दिवसरात्र काम करून अनंत मराठ्यांच्या शूटचे एडीटींग केले जे तुमच्या समोर ठेवतो आहे. भविष्य -फलादेश वगैरे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विश्वासाचा भाग आहे.पण त्यातला मनोरंजनाचा भाग सगळ्यांसाठी एकसारखा आहे या बद्दल दुमत नसावे. आवाजाचा दर्जा सांभाळता आलेला नाही ही त्रुटी जाणवते आहे पण डबींग साठी वेळ नव्हता. बघा जमलंय का ?

---------------------------------------------
ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद अनंत विष्णू मराठे,
यांना आपण खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करु शकता.
१०६, सोलंकी अपार्टमेंट, लुईसवाडी , ठाणे (प) ४००६०४,
---------------------------------------------
धन्यवाद

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

आता अंक पूर्ण झाला असे वाटत आहे. मुद्रीत अंकाचे हे वैशिष्ट्य जालावरच्या अंकात आले.
धन्यवाद रामदास काका. खूप कष्ट घेतलेत तुम्ही. जरा प्रकृतीला जपा.
श्री. मराठेशास्त्रींना खूप धन्यवाद.

अजया's picture

12 Nov 2015 - 7:47 pm | अजया

वा! छान कल्पना आहे.
याचप्रकारचा मिपाकरांचा कथा कविता वाचन असा अंकात आॅडिओ फाईल रुपाने प्रयोग करायचा विचार मांडला होता.यावेळी जमला नाही.पण भविष्यात करुन पहायचा आहे हा प्रयोग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2015 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक आणि राशिभविष्य नाही, असं होऊ शकत नाही. आपण प्रकृती बरी नसतांना मिपा दिवाळी अंकासाठी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न गेली महिनाभरापासून करत आहात आणि नेमकं आजारी पडलात वाईट वाटलं. प्रकृतीची काळजी घ्या.

मिसळपावसाठी दिवाळी अंकातील दृकश्राव्यच्या या प्रयोगाचं मिपाकर स्वागत करतील अशी अपेक्षा.

रामदास काका, माझ्या मीन राशीचं भविष्य जरा म्यानेज करुन चांगलं, उत्साही, भरभराटीचं, आणि बाकी राशिवाल्यांना हेवा वाटेल असं करुन घ्यायचं होतं ना ;) माझं भविष्य ऐकुन किंचित नर्व्हस झालो. :)

रामदासकाका पुन्हा एकदा आभार. दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.....!

-दिलीप बिरुटे

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 8:08 pm | सानिकास्वप्निल

अरे वाह! मस्त कल्पना आहे आणि उत्तमरित्या सादरही झाली आहे.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2015 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा !

वाचकाचा भविष्यावर विश्वास असो अथवा नसो, हे नवे तांत्रीक वैशिष्ठ्य मिपाची आकर्षकता वाढवायला नक्कीच मदत करेल.

खेडूत's picture

12 Nov 2015 - 8:15 pm | खेडूत

धन्यवाद..
चांगली कल्पना आहे!
असेच काव्यवाचन् सुद्धा आवडेल.

संदीप डांगे's picture

12 Nov 2015 - 8:19 pm | संदीप डांगे

एवढं सगळं घडवून आणण्यामागचे कल्पकता आणि श्रम माहित असल्याने रामदासकाकांना एक कडक सॅल्युट... जिओ मिपा...

मदनबाण's picture

12 Nov 2015 - 8:20 pm | मदनबाण

छानच कल्पना... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 8:24 pm | यशोधरा

मजा आली ऐकायला. धन्यवाद रामदासकाका.

मित्रहो's picture

12 Nov 2015 - 10:08 pm | मित्रहो

असेच काव्यवाचन सुद्धा यायला हवे.
दिवाळी अंकासाठी मेहनत करुन दृकश्राव्य माध्यमातून भविष्य कथन लोकांसमोर आणल्याबद्दल तुमचे आणि श्री मराठे यांचे आभार.
धन्यवाद

इडली डोसा's picture

12 Nov 2015 - 10:24 pm | इडली डोसा

अजुन ऐकल्या नाहीत सगळ्या चित्रफिती. घरी जाऊन ऐकणार.
या सगळ्या मागच्या तुमच्या मेहनतीला सलाम. तब्बेतीची काळजी घ्या.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2015 - 10:11 am | बोका-ए-आझम

धन्यवाद रामदासकाका!

चांगला आहे दृकश्राव्य लेख .आता नाही जमलं आजारपणाने पण पुढे करता येईल
-वसंत व्याख्यानमाला -ओडिओ फाइल्स.
-अथवा त्याअगोदर मार्गशीर्ष कथा वाचन.

एक सूचना फाइल साइझ द्या.

नंदन's picture

13 Nov 2015 - 11:49 am | नंदन

एरवी राशिभविष्याच्या राशीला जात नाही, पण 'तुमची राशी जितकी धाडशी आहे, तितकीच हळवीही आहे' हे वाक्य अस्मादिकांच्या राशीबद्दल ऐकून माझा त्यात वर्तवलेल्या भविष्यावर पूर्ण विश्वास बसला आहे! :)

नंदन's picture

13 Nov 2015 - 12:29 pm | नंदन

हाहाहा, जय जय रघुवीर समर्थ! ;)

दिवाकर कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 11:57 am | दिवाकर कुलकर्णी

यात मनोरंजन काय आहे हे कळण्यात स्वारस्य आहे
मिपा तुम्ही सुध्दा.......

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2015 - 12:11 pm | स्वाती दिनेश

हा वेगळा प्रयोग आवडला.
स्वाती

सुबोध खरे's picture

13 Nov 2015 - 12:43 pm | सुबोध खरे

मला एक मूलभूत शंका आहे कि माझी रास कोणती?
जन्म जुलै महिन्यात झाल्याने त्याप्रमाणे कर्क येते.
पण पत्रिकेत वृश्चिक दिली आहे
म्हणजे मग माझी रास नक्की कोणती धरायची?

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 4:21 pm | मुक्त विहारि

आमच्या बाबांच्या आगामी "गेल्या १०,००० वर्षांपासून ते पुढील १०,००० वर्षां पर्यंतचे राशी-भविष्य"ह्या १७६० ग्रंथातील एक वाक्य, सांगतो....

आपली स्वतःची रास कुठलीही असो...

"पुरुषांची रास कुठलीही असो, पुरुषांच्या राशीवर, त्याची पत्नी,सासरा,सासू आणि मुहुणा ह्यांचा प्रभाव असतो"

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:20 am | नाखु

काही झाले तरी ते आपले स्थान आणि "राशी फल " द्यायचे सोडत नाहीत. त्याला कुठलाही उपाय नाही.

बाबांच्या साहित्य लेखनाचा मुवींचा सह्वाचक

मांत्रिक's picture

14 Nov 2015 - 1:39 pm | मांत्रिक

@ खरे साहेबः जुलै महिन्यात जन्म झाल्यामुळे जी कर्क रास आहे ती सौर किंवा पाश्चात्य.
आणि तुमच्या कुंडलीत जी रास दिलेली असते ती भारतीय किंवा चंद्ररास असते.

मांत्रिक's picture

14 Nov 2015 - 1:43 pm | मांत्रिक

रामदास काकांनी सांगितल्याप्रमाणे चंद्ररासच आपण ग्राह्य मानतो. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. व ग्रह मनाच्या माध्यमातूनच व्यक्तीवर प्रभाव पाडतात.

रामदास's picture

13 Nov 2015 - 12:56 pm | रामदास

वृश्चिक रास नक्की धरायची.

धोंडोपंत नावाच्या टोपण नावाने लिहिणाऱ्या व्यक्तीने( श्री आपटे) वृश्चिक हि चंद्र रास आहे आणि कर्क हि सौर रास आहे असे सांगितले त्यामुळे गोंधळ अजूनच वाढला आहे.

रामदास's picture

13 Nov 2015 - 6:27 pm | रामदास

बरोबरच आहे. येथे चित्रफीत बघताना वृश्चिक बघा.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Nov 2015 - 12:06 pm | प्रकाश घाटपांडे

बरोबर आहे. तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते पण वर्तुळाकार कुंडली मांडण्याची पद्धत पाश्चात्यात आहे.दक्षिण भारतात चौकटीतच परंतु थोडी वेगळया पद्धतीने मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे.आपल्या जन्मपत्रिकेत
आपल्या जन्माच्या वेळी आपल्या पत्रिकेत चंद्र वृश्चिक राशीत होता व सूर्य कर्क राशीत होता. भारतीय ज्योतिष चंद्ररास ही जन्मरास मानते. त्यामुळे आपण वृश्चिकेचे भविष्य पहा.

अहो इमेज लोड नाहि होते एक पन :(
एक पन इमेज दिसत नाहिये :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2015 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यूट्यूब व्हिडियो आहेत नॉट इमेज. नेट स्पीड किंवा अन्य काही तांत्रिक कारण असावं असं वाटतं !

-दिलीप बिरुटे

आवडि's picture

13 Nov 2015 - 4:13 pm | आवडि

हो पाहिला विडिओ
मि याचिच वाट बघत होते ...अपलोड केल्या बद्दल आभारी आहे :)

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 4:26 pm | मुक्त विहारि

आवडला...

माझ्या राशीचे छान छान आहे भविश्य. फक्त तेवढे ऑपरेशन सांगितलेय. जुळवाजुळव करायला हवी. ;)

स्पा's picture

13 Nov 2015 - 7:57 pm | स्पा

माझी येकदम परफेक्ट हं

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:21 am | नाखु

पण वाचनखुणेची सोय का नाही म्हणतो.मी??

(आ)राशीचा नाखु

छान मनोरंजन झाले. भविष्याच्या अदमासाचा विचार करता हाती ठोस असे काहीच लागले मात्र नाही. असो.

रातराणी's picture

14 Nov 2015 - 12:22 pm | रातराणी

:) कठीण कठीण कठीण किती वर्ष बाई.

कठीण कठीण कठीण किती नवीन वर्ष बाई, असा बदल केल्यास चालीत म्हणता येईल...

रातराणी's picture

14 Nov 2015 - 4:21 pm | रातराणी

:)

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 6:46 pm | NAKSHATRA

धन्यवाद रामदासकाका