पेढे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
11 Nov 2015 - 6:58 pm

आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा.
लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले.
तर आजच्या लक्ष्मीपूजनासाठीचे हे पेढे-
साहित्य-
१ कप मिल्क पावडर(मी नेस्ले ची निडो घेतली.),
५ ते ६ चमचे मिल्कमेड(नेस्लेचे मिलकमेड घेतले),
२ टेबलस्पून साजूक तूप,
२ टे स्पून पिठीसाखर (मिल्कमेड गोड असते त्यामुळे साखरेची गोडी आवडीनुसार कमी जास्त करता येईल.)
वेलची, केशर स्वादासाठी, १ टे स्पून दूध- केशर खलण्यासाठी, बदाम पिस्त्याचे काप वरून लावण्यासाठी.
कृती-
केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवा
तूप मायक्रोव्हेव मध्ये पातळ करून घ्या.
त्यात मिल्क पावडर घाला, मिल्कमेड घाला. एकत्र करा.
हाय पॉवर (@८०० वॅट) वर १ मि. मायक्रोव्हेव करा, बाहेर काढून ढवळा, त्यात वेलची पावडर व केशराचे दूध घाला.
चांगले ढवळून परत एक मि. मायक्रोव्हेव करा व बाहेर काढा.
आता मिश्रण पातळ झालेले दिसेल. परत ढवळा आणि अजून एकदा एक मिनिट मायक्रोव्हेव करा.
एवढ्या प्रमाणाला टोटल ३ मिनिटे ८०० वॅटवर मायक्रोव्हेव केलेले पुरते.
आता बाहेर काढून एकदा ढवळा आणि निवत ठेवा.
पूर्ण गार झाल्यावर चांगले मळा.
हाताला तूप लावून घ्या आणि पेढे वळा. बदाम पिस्त्याच्या कापाने किवा दूधमासाल्याने सजवा.

.

प्रतिक्रिया

अहाहा! मस्त दिसत आहेत पेढे!

आरोह's picture

11 Nov 2015 - 7:12 pm | आरोह

आमच्या देशात म्हणजे?
बाकी पाककृती छान आहे

रुस्तम's picture

12 Nov 2015 - 11:36 am | रुस्तम

स्वाती ताई जर्मनीत असतात.

कविता१९७८'s picture

12 Nov 2015 - 2:10 pm | कविता१९७८

वाह , छानच, अगदी सोपी पाककृती

पैसा's picture

12 Nov 2015 - 5:06 pm | पैसा

खूपच छान!!

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 7:04 pm | सानिकास्वप्निल

छान, सोपी पाककृती :)

Mrunalini's picture

12 Nov 2015 - 10:54 pm | Mrunalini

मस्तच स्वाती ताई.
नक्की करुन बघेन. मला आवडतात हे पेढे.

हेमंत लाटकर's picture

13 Nov 2015 - 9:26 am | हेमंत लाटकर

आमच्या देशात नाही

अाम्ही राहतो त्या देशात

असे लिहायला पाहिजे.

मीता's picture

13 Nov 2015 - 1:21 pm | मीता

नक्की करुन बघेन

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2015 - 5:29 pm | दिपक.कुवेत

जरा कलर घातला असता तर अजून आकर्षक दिसले असते. पण मिल्क पावडर का? फुल फॅट दुध आटवून, त्याचा खवा करुनहि पेढे करता येतात की!!!

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2015 - 7:15 pm | स्वाती दिनेश

नको होता, पांढरे पेढेच हवे होते मला, सो फक्त थोड्या केशरकाड्या घातल्या. खवा बनवून येतात ना पेढे पण किती वेळ, श्रम घालवायचे त्यात? ते सगळं टाळयला असे करून पाहिले.
स्वाती

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2015 - 12:22 pm | दिपक.कुवेत

तू पाकृत तसं म्हटलं आहेस पण माझं वाचायचं राहून गेलं. सॉरी.

नूतन सावंत's picture

17 Nov 2015 - 11:10 pm | नूतन सावंत

मलाही पांढरेच पेढे आवडतात.करायला सोपे आहेत.दिसताहेत पण सुरेख.

इडली डोसा's picture

18 Nov 2015 - 1:51 am | इडली डोसा

मिल्कमेड म्हणजे कंडेंस्ड मिल्क का?

इडली डोसा's picture

18 Nov 2015 - 1:52 am | इडली डोसा

उचलुन पट्कन तोंडात टाकवेसे वाटतायेत.

मस्त पाकृ व फोटू. मैत्रिणीने करून दिले होते तेंव्हा आवडले होते.

पद्मावति's picture

18 Nov 2015 - 12:08 pm | पद्मावति

मस्तं दिसताहेत पेढे.

सस्नेह's picture

18 Nov 2015 - 12:27 pm | सस्नेह

झटपट पेढे !

पियुशा's picture

18 Nov 2015 - 6:06 pm | पियुशा

झक्कास !

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 6:48 pm | मांत्रिक

झकास पेढे!!!

मदनबाण's picture

19 Nov 2015 - 2:38 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog