झटपट आणि सोप्पी हैद्राबादी चिकन बिर्यांनी

सत्याचे प्रयोग's picture
सत्याचे प्रयोग in पाककृती
7 Nov 2015 - 12:00 pm

साहित्य
चिकन १/२ किलो , दिल्ली / बिर्यांनी राईस १/२ किलो , कांदे १/२ किलो , गोडेतेल तेल २ - ३ चमचे , जिरे २ चमचे, तेजपत्ता ३-४, लाल तिखट मसाला , चिकन बिर्यांनी मसाला २ चमचे, ( चिकन बिर्यांनी मसालाच वापरावा पुलाव मसाला किंवा फक्त बिर्यांनी मसाला नाही ) ५ स्टार फुले , ५ हिरवी इलायची , ७- ८ लवंग , दालचिनी , आले लसूण पेस्ट २ चमचे , तूप २ चमचे , १ कप दही फेटलेले , पुदीना १ वाटी चिरून , कोथींबीर १ वाटी चिरून , १/२ चमचा हळद, मीठ, कणीक किंवा अल्युमिनियम फोइल .

सुरु करा
१) १/२ किलो दिल्ली / बिर्यांनी राईस पाण्यात भिजत घाला. ( १/२ तासासाठी )
२) २५० - ३०० ग्रा. कांदे चौकणी कापून घ्या. ३ - ४ मध्यम आकाराचे कांदे फक्त उभे कापून घ्या.
.
३) २ -३ गोडेतेल चमचे तेल कढईत गरम करा त्यात ३-४ तेजपत्ता तळून घ्या. नंतर त्यात २ चमचे जिरे टाका , जिरे तडतडले की थोडयाच वेळात चौकणी कापलेला कांदा त्यात टाकून चांगले परतून घ्या . कांदा गुलाबी व्हायला लागला की चिकन टाका . एक ते दीड चमचा मीठ टाका चांगले मिक्स करा झाकण लावा १० मिनटे शिजवा. ( मध्यम आच करा)
आता ह्या वेळात दुसरीकडे २ क्रमांकावरील उभे कापलेले कांदे तेलात तळून काढा ( कुरकुरीत करायचे नाहीत)

.
४) १० मि. ने चिकन मध्ये १/२ चमचा हळद , १ ते १/२ चमचे लाल तिखट ( आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी -जास्त ) २ चमचे आले लसूण पेस्ट टाका व चांगले मिक्स करा व झाकण लावा ०५ मिनटे शिजवा ( मध्यम आच करा) आता ह्या वेळात १ वाटी दही फेटून ठेवा.
.
५) ०५ मि. ने २ चमचे चिकन बिर्यांनी मसाला टाका व चांगले मिक्स करा व झाकण लावा ५ मिनटे शिजवा
( मंद आच करा )

.
.
६) आता भिजत घातलेला राईस त्यात ५ हिरवी इलायची, ५ स्टार फुले , ७-८ लवंग , ७-८ दालचिनीचे तुकडे एका स्वच्छ फडक्यात बांधून त्याची पोटली करून भात शिजवताना टाका व भात अर्धा कच्चा शिजवा.

.
७) वरील चिकनचे ५ मि झाल्यावर त्यात १ कप दही फेट्लेले टाका मिक्स करा झाकण लावा ५ मिनटे शिजवा (मंद आच करा ) ह्या वेळात पुदीना व कोथींबीर चिरून घ्या.

.
.
.
.
.
.
.
.

८) ५ मि झाल्यावर शिजलेले चिकनचे अंदाजे २ भाग भांड्यात काढा व १ भाग शिल्लक चिकन मध्ये अर्धा कच्चा भातापैकी अंदाजे तीन भाग करून १ भागाचा थर लावा त्यावर चिरलेला पुदीना व कोथींबीर व तळलेला कांदा टाका . असेच चिकन – भात - पुदीना - कोथींबीर - कांदा तळलेला याप्रमाणे टाकून तीन थर लावा. शेवटी २ चमचे तूप टाका. आवडीप्रमाणे केशर टाका ( इकडे संपले होते म्हणून नाही टाकले ) मग झाकणाचे कडेस कणीक किंवा अल्युमिनियम फोइल लावून झाकण घट्ट लावा, दम द्या ८ – १० मि. (मंद आच करा) १५ – २० मिनिटाने झाकण खोला.
झाली हैद्राबादी चिकन बिर्यांनी हाय काय नाय काय !!!

प्रतिक्रिया

मस्त डिस्टीय.पण आता हैद्राबाद मध्येच आहे तर paradise ची खायींन बिर्याणी.

सत्याचे प्रयोग छान जमलेत हा :)

सत्याचे प्रयोग's picture

7 Nov 2015 - 1:13 pm | सत्याचे प्रयोग

ठॅंकू

यशोधरा's picture

7 Nov 2015 - 1:56 pm | यशोधरा

मस्त दिसतं आहे!

उगा काहितरीच's picture

7 Nov 2015 - 4:40 pm | उगा काहितरीच

बिर्याणी म्हणजे विक पॉइंट ! (लाळ गाळणारी स्मायली कल्पावी)

नूतन सावंत's picture

7 Nov 2015 - 5:24 pm | नूतन सावंत

झटपट बिर्याणी करणाऱ्यांना आपला सलाम.दिसतेय तर सुरेखच.

_मनश्री_'s picture

7 Nov 2015 - 6:09 pm | _मनश्री_

1

मित्रहो's picture

7 Nov 2015 - 7:27 pm | मित्रहो

आहे बिर्याणी.
यात चिकनऐवजी भाज्या टाकल्या तर व्हेज बिर्याणी करता येइल काय

परिकथेतील राजकुमार's picture

7 Nov 2015 - 7:49 pm | परिकथेतील राजकुमार

'सत्याचे प्रयोग' कडून बिर्यानीचा धागा?
हा हन्त हा हन्त! कलंत्री काका बघताय ना? ;)

हे म्हणजे परिकथेतील राजकुमार आयडी कडून 'संपादकांचे कौतुक आणि अभिमान' असा धागा येण्यासारखे झाले.

बाकी, आम्ही गवताळ माणूस असल्याने ह्यातले काय कळत नाय. पण धाग्याचे आणि लेखकाचे नाव ह्यांची अंमळ मौज वाटल्याने थोडी गंमत करायला आलो झाले.

(आता ह्यावरती कोणी उपप्रतिसाद म्हणून, 'परा अरे तू चिकन ऐवजी बटाटा/फ्लॉवर इ. इ. वापर' असले बौद्धिक दिवाळखोर शब्द टंकू नयेत. धन्यवाद. )

कवितानागेश's picture

9 Nov 2015 - 11:20 pm | कवितानागेश

परा अरे तू बटाट्या ऐवजी पनीर वापर!
हॅप्पी दिवाळी!! :ड

सानिकास्वप्निल's picture

9 Nov 2015 - 3:46 pm | सानिकास्वप्निल

तोंपासू दिसतेय बिर्याणी :)

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2015 - 4:06 pm | स्वाती दिनेश

बिर्याणी तोंपासु दिसते आहे,
स्वाती

मुक्त विहारि's picture

9 Nov 2015 - 5:10 pm | मुक्त विहारि

बिर्याणीत गोडेतेल.....

मग उद्या तुम्ही जिलबी पण गोडेतेलात तळाल आणि बेसनाचे लाडू वनस्पती तुपात घोळवाल.

बिर्याणीला, बेसनाच्या लाडवाला आणि जिलबीला, शुद्ध तुपा शिवाय पर्याय नाही.

सत्याचे प्रयोग's picture

9 Nov 2015 - 10:20 pm | सत्याचे प्रयोग

तेलाऐवजी तूप चला आता परत प्रयोग करणे आले.

घरची बिर्याणीच उत्तम लागते.

हॉटेल मध्ये घरचे तूप मिळेलच ह्याची खात्री नसते.

आम्ही तरी बिर्याणी,जिलबी,गुलाबजाम हे पदार्थ बाहेरून मागवत नाही.

नूतन सावंत's picture

9 Nov 2015 - 10:10 pm | नूतन सावंत

मुविंशी +१००१ टक्के सहमत

खादाड's picture

16 Nov 2015 - 11:34 am | खादाड

छान पाक्रु :)

पैसा's picture

16 Nov 2015 - 6:05 pm | पैसा

शॉर्ट कट बिर्यानी आहे. फोटो छान!