शेअरडे बाप-लेक

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in दिवाळी अंक
1 Nov 2015 - 3:19 pm

.
.
रंगरावने शेअर्सच्या उलाढालीत फार मोठी खोट खाल्ली होती. नशिबाने त्याची सासुरवाडी फारच गब्बर व भक्कम असल्यामुळे त्याला काही तसं फारसं कमी पडत नव्हतं. पण जेव्हा त्याचा एकुलता एक पोरगा गजा शेअर्सचा व्यवसाय निवडणार म्हणू लागला, तेव्हा रंगरावाची बायको चांगलीच हडबडली. तिच्या दृष्टीने हे भिकेचे डोहाळेच होते जणू. तिने एक सायकियाट्रिस्टच गाठले. त्यांना सगळी पार्श्वभूमी समजावून दिली. पोराला काहीही करून यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचं काउन्सेलिंग मागितलं.

सायकियाट्रिस्ट म्हणाले, "हे बघा मॅडम, पोराचा कल मला आजमावू दे. तुमच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलांप्रमाणे
त्यालाही शेअर प्रकारात रुची निर्माण होण्याची लक्षणं आहेत का, ते आपण तपासू. त्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन या. एक जुने स्नेही, अंकल अशी माझी ओळख करून द्या. तुम्हाला मी हमी देतो. जर संभाषणात सारखं शेअर्स शेअर्स असं वेड लागल्यासारखं करता राहिला, किंबहुना अगदी तुमच्या पूर्ण समाधानासाठी मी सांगतो की संपूर्ण संभाषणात एकदा
जरी शेअर्स या शब्दाचा उच्चार केला, तरी मी त्याला या व्यवसायापासून रोखीन. तुम्ही निश्चिंत राहा. मात्र तो इतरांसारखा नॉर्मल वाटला तर करू दे त्याला शेअर्सचा व्यवसाय. त्यात बिघडलं कुठे? इतर अनेक व्यवसाय, तसा हा शेअर्सचा एक व्यवसाय. शिवाय हेही तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्या शास्त्रात डायरेक्ट प्रश्न आम्ही विचारू शकत नाही. मी अगदी त्याच्या मनात शिरून त्याच्या मनातलं काढून घेईन."

ठरल्याप्रमाणे गजाच्या आईने त्याला सांगितलं, त्याच्या एका मानलेल्या काकाकडे आपल्याला जायचंय. नेहमीच सल्लामसलतीसाठी आपण त्यांच्याकडे जात असतो. जाणते, बुजुर्ग आहेत ते. आपल्याला त्यांच्या सल्ल्याचा नेहमीच फायदा होत आलाय. तुझंही शिक्षण आता पूर्ण होता आलंय. नोकरी की व्यवसाय याबाबत तूही त्यांच्याबरोबर मोकळेपणे चर्चा कर.

डॉ. सहस्रबुद्धे, एम.डी. सायकियाट्री यांच्याकडे गजाची आई त्याला घेऊन आली व 'अंकल' अशी त्यांची ओळख करून दिली.

"तर मग काय म्हणतो गजानन?" डॉक्टरांनी एकदम संभाषणालाच हात घातला.
डॉ. - तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस, गजानन?
गजा. - मी शे.. शे.. शे.......
डॉ. - बोल गजानन, पुढे बोल..
गजा. - मी शेतीसंबंधी कांहींतरी उद्योग करावा म्हणतोय.
डॉ. - व्हेरी गुड! पण तुला असं नाही वाटत की नुसतं काही विकत घ्यावं, विकावं, आपण आपली दलाली कमिशन मिळवावं..
गजा. - माझ्या काही लक्षात येत नाही. तुम्हाला कसला व्यवसाय मला सुचवायचा आहे? म्हणजे किराणा मालाचं दुकान तर सुचवायचंय?
डॉ. - नाही. हे बघा गजानन, फोर्ट एरियात दलाल स्ट्रीट आहे, तिथे कसला व्यवसाय चालतो?
गजा. - नक्की माहीत नाही, पण माझ्या एका मित्राचे वडील की आजोबा फार मोठे पेंटर होते. त्यांचं नांव दलाल. त्या परिसरात राहत असावेत. त्यांच्या नावावरून त्या रस्त्याला ते नाव पडलं असावं!
डॉ. - बरं, ते जाऊ दे. पूर्वी हर्षद मेहता म्हणून एक जण होऊन गेला. त्याचं नाव ऐकलंस कधी?
गजा - हो, ऐकलंय तर. फार मोठा गफला केला होता त्याने!
डॉ. (एक्साइट होऊन) - कसला, कसला, सांग बरं?
गजा. - बहुतेक प्रॉपर्टी एजंट असावा, नक्की माहीत नाही. माहिती काढून सांगेन फारतर.
डॉ. - गजानन, तू वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला यांची नावं ऐकली आहेस कधी?
गजा. - निम्मी निम्मी ऐकली आहेत.
डॉ. - म्हणजे?
गजा. - म्हणजे वॉरन बफे नाहीतर हेस्टिंग्ज. राकेश झुनझुनवाला नाहीतर रोशन, कोण क्रिकेटपटू होते का ते?

एव्हाना डॉ. सहस्रबुद्धेंना चांगलाच घाम फुटला होता. टकलावरचा घाम त्यांनी टिपला. पण अजून त्यांनी धीर सोडला नव्हता. गजाननला शेअरपासून परावृत्त करण्यात डॉ. यशस्वी ठरले असते, तर गजाननाची आई त्यांना मोठी फी देणार होती. त्यांनी संभाषण पुढे चालू ठेवलं.

डॉ. - गजानन, तू एम.बी.ए. केलं आहेस, तर मला सांग - कारखान्यांना पैसे लागले, तर ते कसे गोळा करतात?
गजा. - त्यात काय विशेष! शे.. शे...
डॉ. - बरोबर, सांग गजानन, सांग..
गजा. - शेतकर्‍यांच्या बिलातून कापून घेतात.
साखर कारखान्याला जमेला धरून गजाननचं हे उत्तर होतं. पण डॉक्टर आता चांगलेच कावरेबावरे झाले होते.
लीडिंग प्रश्न विचारून ते आता थकले होते. आता डायरेक्टच प्रश्न विचारायचा, असं त्यांनी ठरवलं.
डॉ. - बिझनेस स्टॅंडर्ड, इकॉनॉमिक टाइम्स ही वर्तमानपत्रं कशाशी संबंधित आहेत, सांगू शकशील?
गजा. - ती पांढरी असतात की पिवळी?
डॉ. - पिवळी.
गजा. - मग आमच्या बाबांनी कोणतंही पिवळं वाङमय हातातसुद्धा धरायचं नाही, असं सांगितलंय आणि बाबांच्या
शब्दाबाहेर मी नाही. त्यामुळे माहीत नाही.

हे सांगताना डॉक्‍टरांच्या घरातल्या आतल्या खोलीकडे गजानन डोकावत असल्याचा त्याच्या आईला भास झाला.

डॉक्टरांनी शरणागती पत्करल्याचं स्पष्टच दिसत होतं. पण तरीसुद्धा म्हणाले, आता शेवटचा प्रश्न.
डॉ. - ई.पी.एस, पी.ई. रेशो, मार्केट कॅपिटलायझेशन, बी.एस.ई. इंडेक्स हे कशासंबंधात आहे?
गजा.- काका आम्हाला बहुतेक एम् बी ए च्या अभ्यासक्रमात होतं. पण पटवर्धन म्हणून एक बाप
माणूस आम्हाला व्हिजिंटिंग मास्तर होते. ते बरेचवेळी इंग्लिश ऐवजी मराठी शब्द वापरायचे,
प्रत्यक्षात ते संस्कृत असायचे त्यामुळं सगळीच बोंब काहीच कळायचं नाही. त्यामुळं त्यांच्या
भाषेत सांगायचं तर हे सर्व मी विकल्पाला म्हणजे आॅप्शनला टाकले होते. जावू आम्ही काका आता ?

हताश हतबल डॉक्‍टरानी गजाला व त्याच्या आईला निरोप दिला व त्याच्या आईला म्हणाले तुम्हाला वाटतं
तसं कांहीं दिसत नाही. त्याला गमभन सुद्धा माहिती दिसत नाही. त्यामुळं तुमच्या मिस्टरांच्या सारखा तो छंदिष्ट्
अथवा व्यसनी नाही होणार, करू दे त्याला हवा तो व्यवसाय.

त्यांचं हे बोलणं चाललं असताना गजानन डॉक्टरांच्या कपाटातली पुस्तकं चाळण्यात गुंग होता.

गजानन व त्याची आई बाहेर पडले. मग गजानन एकदम आईला म्हणाला चला दहा हजाराची सोय झाली.
दोन तीन आय पी ओ नवीन येणार आहेत त्याना अर्ज करता येइल. चांगले प्रीमियम आहेत त्याना सूरत
ग्रे मार्केट मध्ये. राहुल पैज लावतोय साला माझ्याबरोबर. डॉ.सहस्रबुद्धेंचा मुलगा. एम् बी ए,चा माझा क्लासमेट.
त्याच्या बाबांच्याविषयी केवढा त्याचा कॉन्फिडन्स. पण मी तोंडातून शेअर शब्द एकदासुद्धा उच्चारणार नाही,
अशी दहा हजाराची मी पैज लावली होती त्याच्याबरोबर. जेंव्हा या कौन्सिंगचा फीडबॅक त्यानं मला दिला होता
आपल्या चर्चेवेळी आतून ऐकत होता साला. आणखीन एक, बेंजामीन ग्रहमंचं इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक
डॉक्टरांच्या परवानगी शिवाय मी त्यांच्या कपाटातून घेतलंय. दोन दिवसात राहुलकडून परत पाठवून देईन.
डॉक्टर पण बाबांच्यासारखे शेअरडे दिसतात. गजानन एका दमात एवढं बोलला .

त्याची आई, बेशुद्ध पडायची तेवढी राहिली होती.

.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2015 - 1:05 pm | मार्मिक गोडसे

गोलमालमधील अमोल पालेकर डोळ्यासमोर आला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2015 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत कथा आवडली. मजा आली.
पोरगं भारी निघलं. :)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 3:05 pm | टवाळ कार्टा

भारी

एस's picture

11 Nov 2015 - 3:06 pm | एस

हाहाहा! आई बेशुद्ध पडणार नाही तर काय?

अन्या दातार's picture

11 Nov 2015 - 3:31 pm | अन्या दातार

सॉलिड पंच =))

पीशिम्पी's picture

11 Nov 2015 - 3:52 pm | पीशिम्पी

शेवटचा टर्न आवडला...मस्त खुलवली आहे, आधी वाटले की वडीलांसोबत पैज लागलीय की काय :)

तिमा's picture

11 Nov 2015 - 4:09 pm | तिमा

'शेअरडे' हा शब्द दुसर्‍या एका कवितेतल्या 'भगविच्च्या' या शब्दाइतकाच आवडला.

कलाटणी लय भारी!!!! फारच मजा येत होती वाचताना... वर त्यात हे शेअरडे म्हणजे नक्की काय असेल त्याची उत्सुकता!

धन्यवाद!!

लेख आवडला,ओव्हरचा शेवटचा बाॅल एकदम गुगली टाकला,छान मजा आली. आई बेशुद्ध पडली नाही हे बरे झाले.हा दिवटा पुढे आपल्या व्यवसायात फारच यशस्वी होणार हे तिला आत्ताच कळले असणार

सस्नेह's picture

11 Nov 2015 - 7:58 pm | सस्नेह

भन्नाट आहे गोष्ट.
शेअरडे हा शब्द आवडला.

मितान's picture

11 Nov 2015 - 9:08 pm | मितान

छान :)

इडली डोसा's picture

11 Nov 2015 - 9:44 pm | इडली डोसा

शेअरडे शब्द छान आहे.
आधी वाट्लं फादर डे, मदर डे सारखा शेअर डे वगैरे पण असतो कि काय? :)

पैसा's picture

11 Nov 2015 - 9:46 pm | पैसा

मजेशीर!

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 11:35 pm | मित्रहो

पोरग चांगलच डोकेबाज आहे.

कारखान्यांना पैसे लागले, तर ते कसे गोळा करतात?
.. ....
.......
गजा. - शेतकर्‍यांच्या बिलातून कापून घेतात.

ह लयच भारी.

मास्टरमाईन्ड's picture

12 Nov 2015 - 1:04 am | मास्टरमाईन्ड

हसून हसून चक्कर आली

हीहीहीही.. चांगलाच सवाई बेटा निघाला.. मजा आली हलकी फुलकी कथा आवडली.

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:30 am | नाखु

सव्वा "शेर"

प्रभू-प्रसाद's picture

14 Nov 2015 - 7:24 pm | प्रभू-प्रसाद
प्रभू-प्रसाद's picture

14 Nov 2015 - 7:25 pm | प्रभू-प्रसाद
प्रभू-प्रसाद's picture

14 Nov 2015 - 7:25 pm | प्रभू-प्रसाद
प्रभू-प्रसाद's picture

14 Nov 2015 - 7:26 pm | प्रभू-प्रसाद
तुमचा अभिषेक's picture

14 Nov 2015 - 7:32 pm | तुमचा अभिषेक

शे शे ... शेवट मस्तय :)
कथाही खुसखुशीत ..

प्रभू-प्रसाद's picture

14 Nov 2015 - 7:34 pm | प्रभू-प्रसाद

शे शे शे शेकडो वेळा लिव्हलं तरी आम्हाला शे** काय कळणार प्रसाद भाऊ?
.
** शेतीतलं/शेअरमधलं/शेजारचं काय पाह्यजे ते घ्या.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2015 - 7:41 pm | मुक्त विहारि

शेवटची कलाटणी आवडली...

नूतन सावंत's picture

16 Nov 2015 - 8:34 am | नूतन सावंत

खूप छान कथा.धंद्यासाठी भांडवल गोळा करणारी शे.....शे......शेवटची कलाटणी तर छानच.

अभिजीत अवलिया's picture

16 Nov 2015 - 8:56 am | अभिजीत अवलिया

खूप मस्त आहे कथा ...