मंदमंद पावडरी, लाडिकलाडिक लिपष्टिका
छंदीफंदी अत्तरं, हलक्याहलक्या टवाळ्या
तिन्ही ऋतू सातही वार, सगळ्या ड्युटया मारतो,
एकपण खाडा करत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
नाजुकनाजुक पर्सा, मखमली पिशव्या
झुळझुळीत साड्या, झिरझिरीत ओढण्या
त्यांच्या रुमालातली नाजुक चिल्लर
मी कधी मोजत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
गरोदर बाईला, ऐंशीच्या म्हातारीला
शाळकरी पोरीला, कॉलेजच्या ताईला
सगळ्यांना जागा मिळते, फुल्ल्ल असली बस तरी
मी ष्टॉपला कट मारत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
सगळ्या मला दादा म्हणतात,
मीही सगळ्यांना ताईच म्हणतो,
पण पाचव्या शीटच्या, अबोलीच्या गजर्याला
मी तिकीट कधी विचारीत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 10:20 am | टवाळ कार्टा
;)
10 Nov 2015 - 11:02 am | खटपट्या
असा कंडक्टर तुमच्या पहाण्यात आला आहे का?
10 Nov 2015 - 12:08 pm | मित्रहो
बाकी कविता मस्त आहे.
11 Nov 2015 - 7:21 am | मितान
:)
11 Nov 2015 - 12:30 pm | पैसा
आवडली!
12 Nov 2015 - 2:24 pm | शिव कन्या
तुमच्या त्या बसप्रवासाची आठवण आली. तिकडे केवळ महिला बस नाहीत का?
11 Nov 2015 - 1:20 pm | जव्हेरगंज
झणझणीत शेवटामुळे नीट समजली आणि म्हणुनच आवडली...!!!!
ਸਾਰੇ ਦੇ Dipavali ਇੱਛਾ !!
12 Nov 2015 - 1:47 pm | शिव कन्या
कसे का असेना.... आवडली तर!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
11 Nov 2015 - 4:14 pm | तिमा
या कवितेवरुन आठवलं. फारा वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राची इच्छा, 'लेडीज टेलर' होण्याची होती. बिचारा, आता या जगांत नाही.
12 Nov 2015 - 2:57 pm | सागरकदम
मापे काढत बसला असेल
12 Nov 2015 - 3:35 pm | टवाळ कार्टा
आम्च्या एका मिपाकर गुंठामंत्री (विथ कॉर्पिओ) मित्राचीसुध्धा अशीच इच्छा होती ;)
17 Nov 2015 - 3:53 pm | बॅटमॅन
आमच्या एका मित्राची इच्छा शेणसार बोर्डाचा अध्यक्ष व्हावे अशी होती.
12 Nov 2015 - 4:13 pm | एक एकटा एकटाच
सहिय
12 Nov 2015 - 10:27 pm | परिकथेतील राजकुमार
झमझम बार आठवला...
17 Nov 2015 - 10:19 am | प्रभाकर पेठकर
कविता छान आहे.
पण कंडक्टरला 'जांबियाची' उपमा का द्यावीशी वाटली कळले नाही.
17 Nov 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा
=))
17 Nov 2015 - 10:24 am | अत्रुप्त आत्मा
मज़्ज़ा मज़्ज़ा आली वाचताना!