ताकाचा मसाला

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
31 Oct 2015 - 12:28 pm

सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.
masala
कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल.
masala

प्रतिक्रिया

आज आत्ता ताबडतोब करण्याची पाकृ! धन्स गं सुगरणे :)

मस्तच गं अनन्न्या.नक्की करणार.

कविता१९७८'s picture

31 Oct 2015 - 12:54 pm | कविता१९७८

वाह मस्तच गं, मीही करुन पाहते.

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2015 - 1:08 pm | स्वाती दिनेश

हा छान दिसतोय मसाला. मी समाधानचा घेऊन येते भारतातून येताना. आता असा करून पाहिन.
स्वाती

त्रिवेणी's picture

31 Oct 2015 - 4:42 pm | त्रिवेणी

मी केला ता तर अर्धी vaticha करुन बघेन.

मस्तच, यात पुदिना घातल्यावर छान चव लागेल, पुदिना वाळलेला असला तरी चालतो

प्रचेतस's picture

31 Oct 2015 - 4:55 pm | प्रचेतस

झकास पाकृ.

यातलं पादेलोण म्हणजे काळं मीठ पण शेंदेलोण म्हणजे नेमकं काय? मला आधी दोन्ही एकच वाटायचं. कारण शेंदेलोण हा शब्द सैंधव वरुन आलाय.

हे उत्तम प्रतीच औषधी मीठ असत. ते पाचक, त्रिदोषनाशक व आरोग्यकारक असत. जर इतर मीठ वर्ज्य केले असेल तर सैंधव खायला हरकत नाही. ( आंतरजालावरून साभार.)

प्रचेतस's picture

31 Oct 2015 - 6:03 pm | प्रचेतस

हे ही खनिज मीठच ना?

अनन्न्या's picture

31 Oct 2015 - 6:08 pm | अनन्न्या

खनिज मीठच!

प्रचेतस's picture

31 Oct 2015 - 6:10 pm | प्रचेतस

ओके.

भुमी's picture

31 Oct 2015 - 6:01 pm | भुमी

लगेच करून बघते आता...

स्मिता_१३'s picture

31 Oct 2015 - 10:24 pm | स्मिता_१३

लगेच करून बघते.

प्यारे१'s picture

31 Oct 2015 - 6:12 pm | प्यारे१

बेस्ट!

आमचे बुवा कुठे गेले? ताकाचं भांडं द्या ओ बुवा.

पियुशा's picture

31 Oct 2015 - 6:30 pm | पियुशा

मस्त !

मधुरा देशपांडे's picture

31 Oct 2015 - 7:12 pm | मधुरा देशपांडे

मस्त. यावेळी भारतातुन आणला आहे, तो संपला की या पद्धती ने करेन.

तुमचा अभिषेक's picture

1 Nov 2015 - 2:36 am | तुमचा अभिषेक

मला खरे तर प्लेन ताकच आवडते. ते सुद्धा घरी मी स्वता बनवलेले.
पण घरच्यांना मसाला ताक आवडते, बाहेरचे घेण्यापेक्षा त्यांना हा घरच्याघरी बनवायला हा फॉर्मुला सांगायला हवा.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2015 - 2:44 am | अत्रुप्त आत्मा

व्वा...मस्स्स्त!

अरे वा! असाही मसाला घरी करता येतो हे समजले. ग्रेटच!

यशोधरा's picture

1 Nov 2015 - 6:29 am | यशोधरा

Wah! Sugaran taaincha ajun ek chavishta dhaga

अभ्या..'s picture

1 Nov 2015 - 12:42 pm | अभ्या..

झकास.

पैसा's picture

1 Nov 2015 - 9:04 pm | पैसा

एवढेच मसाले असतात काय त्यात! कृती छान सुटसुटीत!

केला मसाला ! मस्त झालाय !!!!
धन्यवाद गं :)

अनन्न्या's picture

1 Nov 2015 - 10:35 pm | अनन्न्या

लगेच करून पाहिल्याबद्दल!

एस's picture

1 Nov 2015 - 11:29 pm | एस

वाह!

मी स्वतः हा मसाला करून पाहीला,अप्रतिम झालाय,ओवा कमी वेळात परतावा लागतो हे नंतर लक्षात आले. सौ. कुठलाही मदत घेतली नाही . बाजारातील किंमती पेक्षा 1/5 किंमत पडते .

अनन्न्या's picture

2 Nov 2015 - 1:13 pm | अनन्न्या

हे छान झाले, सौ.खूश आणि स्वत: केल्याचा आनंद काही औरच!

बॅटमॅन's picture

2 Nov 2015 - 2:33 pm | बॅटमॅन

करून पाहिल्या जाईल!

(ताक आणि भांडेप्रेमी) बॅटमॅन.

पद्मावति's picture

2 Nov 2015 - 4:13 pm | पद्मावति

मस्तं मसाला. करून पाहीन.

त्याच दिवशी केला.रोज वापरते आहे.धन्स गं.पोरगं ताक प्यायला लागलं! मसाला घालुन टेस्टी लागतं म्हणतोय :)

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2015 - 8:36 pm | सानिकास्वप्निल

अनन्न्या छान आहे पाकृ मसाल्याची, मी नक्की बनवणार :)

मसाल्याची पाकृ. दिल्याचं सार्थक झालं, मुलांचे फार नखरे असतात. पण एकदा चव आवडली की मग प्रश्न नाही.
सर्वांचे आभार. यावेळी लगेच करून पाहणारेही असल्याने खरच खूप आनंद झालाय!

स्नेहल महेश's picture

11 Mar 2016 - 12:30 pm | स्नेहल महेश

काल केला ताकाचा मसाला १-१ वाटीचाच केला
खूप छान झालाय आणि अगदी १०-१५ मिनिटात बनवला

चामुंडराय's picture

29 Apr 2019 - 6:43 am | चामुंडराय

उनाळा लई व्हाडलाय !!

म्हणूनशान हा धागा वर काडला बघा.
आता बिगी बिगी ताक करा बघू.