मन दुणे मन

नीलमोहर's picture
नीलमोहर in दिवाळी अंक
30 Oct 2015 - 7:42 pm

.
.

मन चिमणं पाखरु,
उंच आभाळासी जाई.
मन पिंजऱ्यातील पक्षी,
बंध तोडूही न पाही.

मन ग्रीष्मासम तप्त,
शिशिर गारवा मनात.
वर्षाधारा संतत बरसत,
ऋतु बदलती क्षणात.

खोल मनाचिया डोही,
तळ कसा तो गाठावा.
चिरंतनाचे गूढ मनी,
शोध कधी न लागावा.

दूरवर पल्याड मनाचिये गाव,
ठाव तयाचा लागता न लागे.
शोध घेऊनी शिणला जीव,
कुठवर धावावे त्याचिया मागे.

मन उभे ऐलतीरी,
मन पैलतीरासी जाई.
मना ओढ किनाऱ्याची
नाव भरकटत राही.

मनाचिये गुंती,
अडकतो जीव.
तुटता तुटेना,सुटता सुटेना,
घट्ट बांधियेली वीण.

- नीलमोहर.
.
1
.
.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 4:29 pm | कविता१९७८

मस्त कविता

मितान's picture

11 Nov 2015 - 7:23 am | मितान

सुंदर !!!
चित्रही आवडले :)

सस्नेह's picture

11 Nov 2015 - 8:20 pm | सस्नेह

खोल मनाचिया डोही,
तळ कसा तो गाठावा.
चिरंतनाचे गूढ मनी,
शोध कधी न लागावा
>>>
हे भारी आवडले !

पैसा's picture

11 Nov 2015 - 10:05 pm | पैसा

चित्रही आवडले.

पद्मावति's picture

12 Nov 2015 - 2:32 am | पद्मावति

सुंदर कविता.

स्रुजा's picture

12 Nov 2015 - 2:37 am | स्रुजा

सुरेख ! खुप आवडली, चित्र देखील सुयोग्य..

मधुरा देशपांडे's picture

12 Nov 2015 - 4:33 pm | मधुरा देशपांडे

कविता आणि चित्र दोन्ही फारच सुंदर!!

छान आहे कविता! आवडेश!