सुंदर रूपाचं चांदणं....! (भारत उपासनी)

दिवाळी अंक's picture
दिवाळी अंक in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 11:43 pm

.
.

तुझ्या रूपाचं चांदणं

पोरी जपून ठेवावं

आणि नक्षत्राचं दान

त्यात ओतून ठेवावं //१//

असं टिपूर पडलं

तुझ्या रूपाचं चांदणं

तुला कसं गं सुचलं

माझ्या नावाचं गोंदणं //२//

तुझ्या रूपाचं चांदणं

माझ्या नावाचं गोंदणं

तुझा मेंदीचा गं हात

माझं नक्षीचं कोरणं //३//

तुझ्या हातावर नक्षी

माझ्या नावाची कोरली

चंद्रकोर आकाशीची

उगा स्वतःशी लाजली //४//

कशापायी लाजली गं

चंद्रकोर आकाशीची

मिठी पडली पृथ्वीची

दूरवर क्षितिजाची //५//

माझ्या काळजाच्या पोटी

तुझी पृथ्वी किती मोठी

तुझ्या रूपाचं चांदणं

त्याला क्षितिजाची मिठी //६//

1
.
.
(चित्रः पियुशा)
.
.

कवि : भरत उपासनी

शारदाकुंज,एन थ्री एल २४,सिडको कॉलनी,पहिली स्कीम,नाशिक ४२२००९.

भ्रमणध्वनी : ८०५५८५२९७८.
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मितान's picture

11 Nov 2015 - 7:25 am | मितान

छान कविता :)

सुंदर कविता! एकात एक गुंतलेली कडवी आवडली! ह्या कवितेच्या फक्त शीर्षकावरून सुलेखन केले होते. कविता कशी आहे हे माहीत नव्हतं, आत्ता लक्षात कविता वाचल्यानंतर आलं की सुलेखनातही शब्द एकमेकांत गुंफल्यासारखे आले आहेत. :-) फार छान कविता. मागच्या अंकातही तुम्ही कविता दिल्या होतात ते आठवलं.

पैसा's picture

13 Nov 2015 - 1:30 pm | पैसा

कविता आवडली. पिवशीने काढलेलं चित्र पण छान!

एक एकटा एकटाच's picture

13 Nov 2015 - 2:04 pm | एक एकटा एकटाच

छान कविता

कवितानागेश's picture

14 Nov 2015 - 12:51 am | कवितानागेश

छान . आवडली.

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 1:20 pm | चांदणे संदीप

सुंदर कविता! दिलखुश!

पुनवेचा चन्द्र's picture

26 Nov 2015 - 2:50 pm | पुनवेचा चन्द्र

खुपच छान.
तुझ्या हातावर नक्षी....माझ्या नावाची कोरली....चंद्रकोर आकाशीची....उगा स्वतःशी लाजली..... माझ्या काळजाच्या पोटी...तुझी पृथ्वी किती मोठी...तुझ्या रूपाचं चांदणं....त्याला क्षितिजाची मिठी

अप्रतिम रचना!!!! शब्द छान गुन्तवले आहेत एकमेकात

नाखु's picture

26 Nov 2015 - 2:53 pm | नाखु

आणि कवीता दोन्ही मस्त आहेत..

पद्मावति's picture

26 Nov 2015 - 4:40 pm | पद्मावति

अतिशय सुरेख. कवितेला छान लय आहे. खूप आवडली.
पियुशा, चित्र खूप छान आहे.

रातराणी's picture

26 Nov 2015 - 8:37 pm | रातराणी

आवडली कविता!