गाभा:
काॅलेज डिग्री नसलेले बिलिनिअर्स
1. बिल गेटस - मायक्रोसाॅफ्ट
2. पाॅल अॅलन - मायक्रोसाॅफ्ट
3. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक
4. डस्टिन माॅस्कोव्हिटस - फेसबुक
5. स्टिव्ह जाॅब्स - अॅपल
6. जाॅन कोम - व्हाॅटसअॅप
7. जॅक डोरसे - व्टिटर
8. इव्हान विल्यम - व्टिटर
9. मायकेल डेल - डेल काॅम्प्युटर
10. लॅरी इलिसन - ओरॅकल
11. अझीम प्रेमजी - विप्रो
यावरून हे लक्षात येते की उच्चपदी पोहचण्यासाठी डिग्रीच असली पाहिजे असे नाही तर कुशाग्र बुद्धी, चिकाटी, ध्येय या गोष्टी आवश्यक असतात. यावर मिपाकरांचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा टाकला. तरी प्रत्येकाने आपला अमुल्य प्रतिसाद द्यावा.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 12:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मार्क झुकरबर्ग कडे डिग्री नाही? आँ.
मग हार्वर्ड ला कोण गेलेलं म्हणे?
16 Oct 2015 - 1:01 pm | कानडाऊ योगेशु
तेच म्हणतो.
अझीम प्रेमजींकडे ग्रॅज्युएशन डिग्री असावी. ते स्टॅन्फोर्ड मध्ये पदव्युत्तर उच्चशिक्षण घेत असताना तो अभ्यासक्रम अर्धवट सोडुन परत भारतात आले.
माझ्यामते इथे डिग्री च्या ऐवजी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असे अभिप्रेत असावे.
16 Oct 2015 - 12:58 pm | टवाळ कार्टा
तुम्च्याकडे डिग्री आहे? असेल तर श्या...अता कसे बन्नार तुमी बिलिनिअर :)
16 Oct 2015 - 1:00 pm | प्यारे१
राऊल विन्ची - आय इन सी
कुशाग्र बुढ्ढी. :)
16 Oct 2015 - 1:28 pm | दत्ता जोशी
कुशाग्र बुढ्ढी
LOL ...हसून हसून पुरेवाट झाली.
इथे लई हायेत हो असे.
16 Oct 2015 - 1:30 pm | हेमंत लाटकर
वरील सर्वजण काॅलेज ड्राॅपआऊट आहेत.
16 Oct 2015 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
अमेरिकेत शिक्षणातली संबोधने आपल्यापेक्षा वेगळी आहेत, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला आहे.
भारतातले संबोधन = अमेरिकेतले संबोधन
कॉलेज/ग्रॅज्युएट डिग्री (बॅचलर डिग्री) = हायस्कूल/अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा
पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्री (मास्टर्स डिग्री) = ग्रॅज्युएशन / ग्रॅज्युएट डिग्री
मास्टर्स डिग्री होल्डर = ग्रॅज्युएट / कॉलेज डिग्री होल्डर
युनिव्हर्सिटी = कॉलेज / युनिव्हर्सिटी
पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्रीचे शिक्षण अर्धवट सोडलेली व्यक्ती = काॅलेज ड्राॅपआऊट
16 Oct 2015 - 1:35 pm | हेमंत लाटकर
http://www.businessinsider.com/14-tech-superstars-who-didnt-need-college...
16 Oct 2015 - 2:05 pm | फुलथ्रॉटल जिनियस
हे असे लोक ज्ञाननिर्मिती करतात आणि त्यावर आपल्यासारखे पामर कॉलेजच्या डीग्र्या मिळवून आयुष्यभर पाट्या टाकत बसतात.
16 Oct 2015 - 2:13 pm | आदूबाळ
लाटसाब, या असल्या याद्या "सिलेक्शन बायस" चा प्रकार आहे. सोप्या भाषेत म्हणजे आधी बाण मारायचा आणि मग त्याभोवती वर्तुळ रंगवायचं.
हे तर आहेच. पण म्हणून डिग्रीला कमी लेखणं बरोबर नाही.
16 Oct 2015 - 2:27 pm | तर्राट जोकर
अगदी हेच टंकायला आलो होतो. आपने मेरे हातसे कीबोर्ड छीन लिया... :-)
16 Oct 2015 - 3:30 pm | जातवेद
+१
16 Oct 2015 - 3:37 pm | चैतन्य ईन्या
+१००००. ह्याच बरोबर किती लोक कॉलेज सोडून घरीच नुसते बसलेत ह्याचा पण आढावा घ्यावा. जे लोक असे करतात ते मुळातच अत्तुच्य बुद्धीचे असतात. उगाचच आपल्या सारख्या सामान्य माणसाने नसत्या कल्पनांच्या नाडी लागू नये.
16 Oct 2015 - 3:40 pm | अद्द्या
+१००
16 Oct 2015 - 3:44 pm | बॅटमॅन
काय उदाहरणे आहेत, वा वा वा. ढोपरवाडी खुर्दच्या डीआयटी अर्थात ढोपरवाडी "इन्स्ट्यूट" ऑफ टेक्नॉलॉजीची डिग्री अर्धवट सोडणे आणि हार्वर्ड, प्रिन्स्टनसारखी डिग्री अर्धवट सोडणे काही फरक आहे की नाही?
16 Oct 2015 - 3:51 pm | तर्राट जोकर
डीग्री असल्याने उच्चपदावर पोहचण्याच्या संधी मुबलक व तुलनेने अधिक सोप्या आहेत. नियमास अपवाद असला म्ह्णून अपवाद हा नियम होऊ शकत नाही.
16 Oct 2015 - 4:22 pm | हेमंत लाटकर
मला डिग्री असणार्यांना कमी लेखायचे नाही. डिग्री असणारेच हुशार असतात व डिग्री नसणारे हुशार नसतात असे काही नसते हे सांगायचे आहे.
आपल्या भारतातही असे डिग्री नसताना बुद्धीच्या जोरावर स्वत:ची कंपनी काढून नावलौकीक कमावलेले आहेत.
16 Oct 2015 - 11:03 pm | तर्राट जोकर
डिग्री नसताना बुद्धीच्या जोरावर स्वत:ची कंपनी काढून नावलौकीक कमावलेले आहेत.
>> लाटकर साहेब, तुमचा मुद्दलात घोळ आहे बरं का.. स्वतःची कंपनी काढायला कुठल्याही डीग्रीची कधीच आवश्यकता नसते. नेवर. स्वतःची कंपनी काढून नावलौकिक मिळवणे हेच एक मोठी अचीवमेंट असते. त्याचा शिक्षणाशी तसा काहीही संबंध नाही. व्यवसाय ही गोष्टच सर्व शैक्षणिक नियमांच्या बाहेर आहे. पण जगात असे गिनेचुने लोक असतात. बहुसंख्य लोकांच्या अपेक्षा छोट्या असतात. अन् नोकरीच्या जगात डीग्रीशिवाय कोण उभे करतं का? आयबीएमला गेट्सने सॉफ्टवेअर पुरवलेत, ते त्यांनी घेतले का तर बिल एक व्यावसायिक म्हणून त्यांना भेटला. एक कॉलेज ड्रॉप-आउट म्हणून त्यांच्या दरवाजावर गेला असता आणि म्हटले असते की मी तुम्हाला सॉफ्टवेअर लिहून देतो मला नोकरीवर ठेवा तर त्याला कोणी उभे केले असते?
थोडा विचार करा या अँगलने. व्यवसाय आणि नोकरी यात खूप फरक आहे. नोकरी करणार्यांना त्या जगात प्रवेश करायला डीग्रीचे कागद पासपोर्ट म्हणून लागतातच. व्यावसायिकाला धंदा कळला तरी बास. त्यामुळे 'अशिक्षित वा कमी शिक्षित असून स्वतःची कंपनी काढली' चे कौतुक उचित नाही. त्यातून उद्योजकाच्या खर्या गुणांकडे दुर्लक्ष होऊन त्यांची अवहेलना होते आहे.
16 Oct 2015 - 4:31 pm | हेमंत लाटकर
भारतीय काॅलेज ड्राॅपआऊट बिझिनेसमनस्
http://inc42.com/buzz/indian-college-dropout-entrepreneurs/
16 Oct 2015 - 5:28 pm | अनिरुद्ध.वैद्य
एकदा डिग्री असलेले बिलिनिअर्स सांगा बर? आणि सोबतच डिग्री नसलेले अन त्यामुळे दरिद्री राहिलेले लोक्स ह्यांचीपण आकडेवारी येउन जाउद्यात!
16 Oct 2015 - 7:22 pm | पाटीलअमित
जाऊ द्या हो
त्यांनी फक्त कुठून तरी मिळालेली माहित मराठीत टंकली ( तसे पण माझ्या ब्लोग ला नावे ठेव्णार्यांकडून अपेक्षा एवढीच )
जाता जाता
माझा ब्लोग http://kahihikasehi.blogspot.in
16 Oct 2015 - 7:36 pm | मुक्त विहारि
टाळ्या.
16 Oct 2015 - 8:39 pm | हेमंत लाटकर
पाटील साहेब मला सांगता का ब्लाॅग कसा बनवतात.
16 Oct 2015 - 10:51 pm | तर्राट जोकर
अरे ब्लॉग नही बाबा, ब्लोग ब्लोग. ब्लोsssssग.
16 Oct 2015 - 7:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान माहिती रे हेमंता. पण सगळेजण आय.टी.क्षेत्राशी संबंधित आहेत.सर्वजणांनी आपल्या करीयरची सुरुवात अमेरिकेतून केली आहे.'राईट टाईम राईट प्लेस' का काय म्हणतात तसे.कुठल्याही क्षेत्रात व्यावसायिक अत्युच्च झेप घ्यायला हे आवश्यक असते.चिकाटी,बुद्धिमत्ता वगैरे हवेच पण 'योग्य वेळ्,योग्य जागा'तेवढेच महत्वाचे.
रेडमंडच्या बील गेट्सच्या बुद्धिमत्तेचे लोक रत्नागिरी,रांचीला असतील,पण तशी झेप घेऊ शकणार नाहीत.
16 Oct 2015 - 8:07 pm | मुक्त विहारि
List of the Richest School Drop Out Billionaires and Successful Entrepreneurs =====>
http://www.mytopbusinessideas.com/school-drop-out-billionaires-successfu...
-----------------------------------------
Top 100 Entrepreneurs Who Made Millions Without A College Degree ====>
http://www.businessinsider.com/top-100-entrepreneurs-who-made-millions-w...
-----------------------------------------
16 Oct 2015 - 10:40 pm | दा विन्ची
श्री बापू जाधव - सरोज आयर्न वर्क्स - कोल्हापूर
17 Oct 2015 - 1:42 am | दिवाकर कुलकर्णी
शिक्षण व यशस्वीतता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. परंतु चार ऊदाहरणं समोर फेकली ,म्हणून शिक्षणाची ऐंशी कि तैंशी
होउ शकत नाही. शिक्षणाची संघी उपलब्ध असणारे १०० व उपलब्ध नसणारे१०० घेतले तर यशस्वीतामध्ये त्यांची टक्केवारी अनुक्रमे अंदाज़े ,
५०व १० अशीच असेल.
मात्र तरीहि लौकिक अर्थानं कमी शिक्षण असलेल्या जुन्या पीढितल्या एका व्यक्ति चं उदाहरण द्यायचा मोह मला आवरण नाही.
जून्या पीढीतले एक प्रख्यात कादंबरीकार (आजच्या पीढीला त्यांचं नांवहि माहित नसेल)ह.ना. आपटे यांची कोर्टात एकदा साक्ष होती,
त्याना कुत्सितपणानं त्यांच शिक्षण विचारलं गेलं ,त्यावर ते म्हणाले माँझे शिक्षण कांहीं फ़ार झालेला नाही ,पण माझ्या कादंबर्या
एम्.ए. ला असतात.
17 Oct 2015 - 9:31 am | हेमंत लाटकर
मला येथे शिक्षणाची काही गरज नाही हे सांगायचे नाही. आपल्याकडे शिक्षणाचा नुसता बाजार झाला आहे. 1 ली ते 10 वी, 11 वी-12 वी-सीईटी, इंजिनिअरिंग यासाठी पालक क्लासेस वगैरे लावून मुलांना खुप ताण देतात. यातून केवळ 15⅝ मुले यशस्वी होतात. जे IIT करून पास होतात ते शेवटी अमेरीकेच्याच पाट्या टाकतात.
वर दिलेल्या उदा. तील लोकांनी काॅलेज ड्राॅपआऊट केले म्हणजे त्यांना ते जमले नाही असे नाही तर त्यांना पुस्तकी ज्ञानाची गरज वाटली नाही . त्यापेक्षा स्वत: ची कंपनी काढणे त्यांनी पसंद केले.
17 Oct 2015 - 11:00 am | आदूबाळ
ओके लाटकाका. समजा, एक बारावी झालेला मुलगा तुमच्याकडे आला, आणि करियरसंबंधी सल्ला विचारला, तर खालीलपैकी कोणता पर्याय त्याला सुचवाल -
१. पुढे शीक, (उदाहरणार्थ) इंजिनियर हो
२. शिक्षणक्षेत्राची बजबजपुरी झालिये रे, तू आपला एक कंपनीच टाक.
लक्षात घ्या - १ किंवा २ यापैकीच एक सुचवायचं आहे.
18 Oct 2015 - 4:45 pm | पाटीलअमित
मध्ये बोलल्याबद्दल क्षमस्व
पण भारतात खरच देग्री ची किमत नाही तर skill ची आहे
17 Oct 2015 - 11:09 am | कैलासवासी सोन्याबापु
त्याने कॉलेज सोडले म्हणून तो स्टीव जॉब्स नव्हता तर तो स्टीव जॉब्स होता म्हणुन त्याने कॉलेज सोडले
हे लक्षात आले/घेतले की असल्या धाग्यांची निरुपयोगीता ध्यानी येते असे वाटते :)
17 Oct 2015 - 11:35 am | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य बोललास रे बापू. आणी त्या स्टीव्ह जॉब्सच्या जोडीला स्टीव वॉझ्नियाक,जेफ रॅस्किन्,बील अॅट्किन्सन अशी 'तिकडच्या' आय.आय.टी.तून(एम.आय.टी.,बर्कली,सॅन डियागो..) शि़क्षण घेतलेली मंडळी होती.
तुमच्याकडे बुद्धी अचाट असेल पण असे गुणवत्ताधारक लोक समाजात नसतील तर काही भव्य करू शकत नाही तुम्ही.
https://en.wikipedia.org/wiki/Jef_Raskin
https://en.wikipedia.org/wiki/Bill_Atkinson
17 Oct 2015 - 11:40 am | कैलासवासी सोन्याबापु
आपण खुल्ला म्हणतो
जॉब्स ची तांत्रिक गती होती त्याट वाद नाही but he eas not just anothet nerd, केलेले संशोधन उत्तम पैकेजिंग करणे ही कला त्यास वश होती! ह्याची झलक 'पर्सनल कंप्यूटर्स वोंट बी अग्ली ग्रे बॉक्सेस' ह्या त्याच्या द्रष्टेपणातुन दिसते, पण अर्थात मई आजी चा मुद्दा आहेच
19 Oct 2015 - 2:02 am | तर्राट जोकर
सोन्याबापु,
थोडा अलग सोचते हम. स्टीवजॉब्स एक धुरंधर सेल्समन होता. एक महान मार्केटींग तज्ञ आणि कसलेला बिजनेसमन. उद्योजकांमधे तो नेहमीच वरच्या फळीत मानाची जागा मिळवेल. उद्योजकांचे ढोबळमानाने चार प्रकार असतात. एक जो ट्रेंड चालू आहे ते बनवतात, दुसरे जो ट्रेंड चालू आहे त्यात सर्वात उत्तम बनवतात, तिसरे काळाची पावले ओळखून येणारे ट्रेंड बनवतात. चौथे ते जे स्वतः ट्रेंड बनवतात. फार कमी लोक ह्या चौथ्या कॅटेगीरीत येतात. स्टीव वाज वन ऑफ देम. चला कौतुक बास झालं. त्याच्या कडे दोन गोष्टी प्रामुख्याने होत्या ज्यामुळे त्याने संगणकक्षेत्र १८० अंशात वळवले, ते म्हणजे काय असलं पाहिजे याची 'क्लिअर विजन' व कसे विकले पाहिजे याची 'क्लिअर स्ट्रॅटेजी'. कसे बनवले पाहिजे हे तांत्रिक टीम बघायची. त्यामुळे त्याला सगळे श्रेय देतांना त्याच्या योजना, स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणारी टीमही तेवढीच कौतुकास पात्र आहे.
लीडर कितीही चांगला असेल तरी कंपनीमधला प्रत्येक रीकरूटही तेवढ्याच तयारीचा पाहिजे की नाही..? तरच मोहिमेस यश येते. एखादी कंपनी कधीही एकट्याच्या जीवावर मोठी होत नसते.
19 Oct 2015 - 8:56 am | अत्रे
+१
अवांतर - "रंगरूट" म्हणायचंय का?