गुगल क्रोम

विकास's picture
विकास in काथ्याकूट
3 Sep 2008 - 8:26 am
गाभा: 

आज (म्हणजे मंगळवारी २ सप्टेंबरला) गुगलने स्वतःचा इंटरनेट ब्राउजर १०० देशातील लोकांसाठी खुला केला. त्याचे नाव आहे गुगल क्रोम.

आज संध्याकाळीच तो घरच्या संगणकावर वापरून पाहीला. फायर फॉक्स आणि इंटरनेट एक्स्प्लोररमधील बर्‍याच गोष्टी एकत्रीत केल्यात असे वरकरणी वाटले. अर्थात हे त्यांचे बेटा व्हर्जन आहे. काही साध्या साध्या सुविधा म्हणजे आपण कुठलेही पान उ.दा. मिपा, शॉर्टकट म्हणून क्विक लाँच मधे, डेस्कटॉपवर ठेवू शकतो. टॅब ब्राउजर मधे नाविन्य नाही, पण पहील्या ब्राउजर मध्ये आता ९खिट्डक्या दिसतात त्यात आपण जास्त वापरलेली ९ पाने सेव्ह होतात वगैरे...त्यांनी काही माहीती त्यांच्या कॉमिक बुक्स मधे ठेवली आहे...

असे म्हणतात की गुगलचे हे स्वतःचे इंटरनेटबेस्ड ऑपरेटींग सिस्टीम तयार करण्यासाठीचे पहीले पाऊल आहे.

आपल्याला आलेले अनुभव समजून घेयला आवडतील. तसेच "एक्सपर्ट काँमेट्स"समजूणन घेयला आवडतील...

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Sep 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

धन्यवाद विकासभावजी,

डाऊनलोड करतो आहे, बघू कसं वाटतंय ते! :)

पांथस्थ's picture

3 Sep 2008 - 9:10 am | पांथस्थ

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे काहि विशेष जाणवले नाहि बुवा ह्या 'बेटा' मधे ;)

असो, बाळाकडे लक्ष असू देण्यास हरकत नाहि.....कधी तरी गुण उधळेलच की....

(अग्नीकोल्ह्याचा भक्त) ....

भाग्यश्री's picture

3 Sep 2008 - 9:24 am | भाग्यश्री

ह्म्म पांथस्थ यांच्याशी सहमत.. खूप विशेष नाही दिसत आहे.. पण लुक आवडला मला.. वेगळा आणि फ्रेश वाटतोय..

विसोबा खेचर's picture

3 Sep 2008 - 9:26 am | विसोबा खेचर

मजा नाही!

मिपाचा फॉन्ट जसा आय ई वर छान दिसतो तसा गुगलवर दिसत नाही! सबब आम्ही तो वापरणार नाही! मोझिलावरही मिपाचा फॉन्ट चांगला दिसत नाही!

आपला,
(आयई प्रेमी) तात्या.

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 2:22 pm | देवदत्त

सहमत.
हा फॉन्ट आय ई वरच छान दिसतो. फायरफॉक्स व क्रोमवर एकसारखे दिसतात. पण क्रोमवर मिपाच्या पानाची आणखीन वाट लागली. एक ठोकळा एका आकाराच्या अक्षरात तर दुसरा ठोकळा दुसर्‍याच आकारात दिसतोय.

त्यामुळे सध्या तरी मराठीकरीता क्रोम नाही, पण चाचणीकरीता इंग्रजी संकेतस्थळे नक्कीच पाहीन. :)

विकास's picture

3 Sep 2008 - 6:19 pm | विकास

पण क्रोमवर मिपाच्या पानाची आणखीन वाट लागली. एक ठोकळा एका आकाराच्या अक्षरात तर दुसरा ठोकळा दुसर्‍याच आकारात दिसतोय.

वास्तवीक मला मिपा क्रोमवर फायरफॉक्स (३ च्या आधीचे) पेक्षा चांगले दिसले - आय ई आणि क्रोमवर वाचण्यात फरक जाणवला नाही. फायरफॉक्स ३.० वर मात्र मिपा नीट वाचता/लिहीता येते असा अनुभव आहे. बाकी कुठला ब्राउजर "परफेक्ट" हे पहायचे असेल तर लोकसत्ता उघडून पहा काही प्रयत्न न करावे लागता वाचता येत असेल तर तो ब्राउजर परफेक्ट! माझे ते फक्त फायरफॉक्स मधे झाले!

क्रोममधे एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्यात एखादा टॅब क्रॅश झाला तरी संपूर्ण ब्राउजर बंद होणार नाही.

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 9:30 am | जैनाचं कार्ट (not verified)

डाऊनलोड करुन पाहीले.

काय आवडले :
१. चेहरा.. प्रथमदर्शनी ह्याचे लुक आवडले !
२. टॅब सुविधेचा योग्य वापर
३. फालतू बटन वापरले नाहीत हे छान केले आहे !
४. स्टेट्स बार फक्त कार्यरत होत असतानाच दिसतो... व नतर गायब होतो .. जागेचा अपव्याप थांबवला !
५. सर्वात महत्वाच्या जागी शत्रुपक्षाच्या संकेतस्थळांना जागा दिली आहे .. क्या बात है... Microsoft ची महत्वाची संकेतस्थळे एकदम दर्शनी जागी ;)

काय कमी आहे :

फ्लॅश प्लेयरचा सपोर्ट नाही आहे.
जावा सुविधा (JVM) नाही आहे.
खुप काही आशा होती पण अजून सुविधा कमी आहेत हे खेदाने म्हणावे लागत आहे :(

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

टारझन's picture

3 Sep 2008 - 3:34 pm | टारझन

क्रोम दिसायला अंमळ बरा आहे. फाँट्स ऍप्पल मँक नेटकिट चे घेतले आहेत. मॉझिल्ला आणि मॅकचं कॉंबिनेशन करण्याचा प्रयत्न आहे. ठिक आहे.
पण ऑर्कुट मधे लोकल लँग्वेज मधे टाइपता येत नाही. म्हणून बाद.

मॉझिला फायरफॉक्स प्रेमी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 5:12 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मिपा आइ मध्ये व्यवस्थीत दिसते व गुगल मध्ये नाही कारण फॉन्ट प्रकार आइ मध्ये लॅटिन (टाईम्स न्यु रोमन ) आहे व गुगल मध्ये नाही पण सेटींग मध्ये जाऊन मराठी भाषा जर ऍड केली तर मिपा हे आइ प्रमाणेच सुंदर व व्यवस्थीत गुगल क्रोम मध्येपण दिसते (प्रयोग करुन पहा)

गुगल क्रोम मध्ये अजून एक गोष्ट चांगली आहे जी आताच वापरताना लक्षात आली... डाऊनलोड मॅनेजर हा इनबिल्ट आहे.. जो तुम्हाला मोठ्या फाईली डाऊनलोड करावयास मदत करतो... ही सर्वात महत्वाची सुविधा आहे !

तसेच संकेतस्थळाचे नाव लिहीत असतानाच गुगल सर्च होऊन संबधीत संकेतस्थळ व त्याच्या संबधीत दुवे आपल्या आप खाली येतात ही सुविधा देखील उपयुक्त आहे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

लंबूटांग's picture

3 Sep 2008 - 5:24 pm | लंबूटांग

क्रोम बनवण्यामागचे मुख्य उद्दिष्ट होते सिक्युरीटी. त्या बद्दल अधिक माहिती.

ब्लॅकलिस्ट
क्रोम मधे २ काळ्या याद्या आहेत. एक phishing साईट्स ची यादी (उदाहरणार्थ: समजा तुमचे बँक खाते misalpav नावाच्या बँकेत असेल आणि त्यांची वेबसाईट misalpav.com असेल तर फिशिंग साईट misalpaav.com असू शकते. नावातल्या सूक्ष्म फरकामूळे सर्वसामान्य यूजर ती ओपन करतो. दिसायला ती पूर्णपणे मूळ साईट प्रमाणे दिसते परंतु तुम्ही तुमचे लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकलेत की ते त्या साईट ओनर ला मिळते जे वापरून तो मूळ साईट वर लॉग इन करू शकतो आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करू शकतो.) आणि दुसरी अशा साईट्स ची यादी ज्या तुमच्या कंप्यूटर वर malware (हानिकारक software) install करतात. ह्या याद्यांचे अपडेट्स ठराविक काळाने क्रोम आपणहून डाऊनलोड करते.

Sandboxing
प्रत्येक टॅब स्वतःच्या वेगळ्या process मध्ये Sandbox केला जातो. त्यामुळे malware स्वतःहून install होऊ शकत नाही आणि एका टॅब मधे चालू असलेल्या गोष्टी दुसर्‍या टॅब ला affect करू शकत नाहीत. जर एका टॅब मध्ये malicious software रन होत असेल जे credit card numbers शोधते तर ते दुसर्‍या टॅब मधील माहिती वाचू शकत नाही. तो टॅब बंद केल्यानंतर ते software पण बंद होते. प्रत्येक process ला least privilege असतात जेणेकरून sensitive areas (my documents, desktop) मधली माहिती सुरक्षित राहील. (Windows Vista वरिल आय ई ७ मधे Protected Mode आहे तसेच).

Plugins
Adobe Flash Player आणि तत्सम Plugins ना Sandbox करता येणे शक्य नसल्यामुळे त्याच्या थ्रू sensitive areas access करणे शक्य होऊ शकते. हे होऊ नये म्हणून Plugins ना वेगळ्या process मधे टाकले जाते. ह्या process सुद्धा प्रत्येक टॅब साठी dedicated असतात.

ही माहिती मी विकीपीडीया वरून घेतली आहे. जर हे मिपाच्या नियमांत बसत नसेल तर हा प्रतिसाद उडवून टाकावा ही विनंती.

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 5:55 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>जर हे मिपाच्या नियमांत बसत नसेल तर हा प्रतिसाद उडवून टाकावा ही विनंती.

अरे नाही यार... एकदम उपयुक्त व महत्वाची बातमी आहे व सर्व सदस्यांच्या उपयोगाची देखील !
छान माहीती गोळा केलीत !

व्यवस्थीत मिसळपाव पाहण्यासाठी हे बदल करा.

options >> Minor Tweaks >> Change font and language settings >> Languages मध्ये मराठी ऍड करा व फॉन्ट असे बदलुन घ्या.
Serif Font : Times New Roman, 15pt
Sans-Serif Font : Arial 15pt
Fixed-width Font: Arila 13 pt

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 7:03 pm | देवदत्त

राजे तुम्ही सांगितले तसे बदलही करून पाहिलेत. पण काही उपयोग नाही. काही तरी मस्त बदल करावे लागतील असे वाटते :)
वर एक सांगायचे राहिले की जरी आय ई मध्ये फॉन्ट जास्त चांगला असला तरी मी घरी मिसळपाव फायरफॉक्स मधूनच पाहतो. ह्याला कारण हे पहा.

आय ई. ६.०

फायरफॉक्स ३.०.१

क्रोम

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 7:05 pm | जैनाचं कार्ट (not verified)

प्रथम पानावर जी गडबड दिसत आहे ती क्रोम मुळे नाही, तर त्यामागे कारण आहे ते मॉड्युल जे मिपासाठी वापरले आहे !
बाकी सर्व पाने (नवे लेखन.. ईत्यादी ) एकदम व्यवस्थीत दिसतात ... अगदी तुमच्या फायरफॉक्स पेक्षा उत्तम ;)
निलकांतला सुचना देतो मी करेल योग्य तो बदल !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

आजानुकर्ण's picture

4 Sep 2008 - 12:10 am | आजानुकर्ण

किंबहुना सर्व ब्राऊजर हे w3c च्या नियमानुसार पाने दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही पानांवरील न जुळणार्‍या ट्यागांमुळे ती पाने नीट दिसत नाही. याचा अर्थ ब्राऊजर मध्ये दोष नसून त्या पानामध्ये दोष आहे.

आपला,
(तंत्रज्ञ) आजानुकर्ण

शितल's picture

3 Sep 2008 - 6:51 pm | शितल

अरे लंबुटांग छान माहिती वर्धक प्रतिक्रीया दिली आहे.
मिपाकरांच्या उपयोगी आहे.:)

प्राजु's picture

4 Sep 2008 - 12:11 am | प्राजु

लंबूटांग ने छान माहिती दिली आहे.
बाकी, हा क्रोम दिसतो गोंडस आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 7:06 pm | देवदत्त

ह्म्म..
इतर माहितीबद्दल धन्यवाद.
आतापर्यंत एक End Userम्हणून क्रोम पाहिले होते.
आता एक Advanced User म्हणून पहावे लागेल :)

Secured pages चे प्रमाणपत्र क्रोम दाखवतो का?

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 7:26 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>Secured pages चे प्रमाणपत्र क्रोम दाखवतो का?

हो, दाखतो ! तसेच हिडन सोर्स पण दाखवतो ;)

अजून एक गुपित सापडलं.... तुमच्या सुरक्षेसाठी क्रोम तुमचा आय-पी बद्लत राहतो... (दोन वेळा मी प्रयत्न करुन पाहीला आहे.. )

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

विकास's picture

3 Sep 2008 - 8:34 pm | विकास

अजून एक गुपित सापडलं.... तुमच्या सुरक्षेसाठी क्रोम तुमचा आय-पी बद्लत राहतो... (दोन वेळा मी प्रयत्न करुन पाहीला आहे.. )

अरे वा! याचा अर्थ जनरल डायर आमचा आय पी ऍड्रेस ब्लॉक करू शकणार नाहीत असा घ्यायचा का? ;)

तात्या हे पहा नवीन काम तयार झाले :)

आजानुकर्ण's picture

3 Sep 2008 - 8:39 pm | आजानुकर्ण

म्हणजे दुसरे आयडी घेण्यासाठी अनेकांना टॉर वापरण्याची गरज नाही वाट्टं

आपला,
(टॉरप्रेमी) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

4 Sep 2008 - 12:09 am | मुक्तसुनीत

म्हणजे दुसरे आयडी घेण्यासाठी अनेकांना टॉर वापरण्याची गरज नाही वाट्टं
खो खो खो !
कर्णा ....तुझे बाण बरोब्बर वर्मी बसताहेत बरे का शब्दशिखंडींच्या ;-)

चतुरंग

सर्किट's picture

3 Sep 2008 - 9:32 pm | सर्किट (not verified)

मुळात आय पी ऍड्रेस ब्राउझरने बदलावा का ?

तसे झाले, तर सगळे ऍब्स्ट्रॅक्शन गेले *कात.

राजे, तुमच्या डी एच सी पीची लीझ संपली असेल, पुन्हा एकदा बघा.

-- सर्किट

कोलबेर's picture

4 Sep 2008 - 2:47 am | कोलबेर

नाही बदलत.. मी आताच माझ्या संगणकावर चाचणी घेउन बघीतली. आय पी आणि सेवादाता व्यवस्थित देतो आहे.

विकास's picture

4 Sep 2008 - 3:39 am | विकास

नाही बदलत.. मी आताच माझ्या संगणकावर चाचणी घेउन बघीतली. आय पी आणि सेवादाता व्यवस्थित देतो आहे.

माझा पण तोच अनुभव आहे. आय पी पत्त्ता बदलत नाही...

हा प्रतिसाद मी क्रोम वापरूनच लिहीत आहे!

जैनाचं कार्ट's picture

4 Sep 2008 - 10:28 am | जैनाचं कार्ट (not verified)

अरे गडबड झाली.... :(

त्यावेळी माझी एक प्रणाली चालू होती त्यामुळे आयपी बदलत होते :''(

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

रामदास's picture

3 Sep 2008 - 11:51 pm | रामदास

काही कळत नाही.
फार हाय फंडा आहे.
आता नीलकांत काय म्हणतो ते बघावे.

चंबा मुतनाळ's picture

4 Sep 2008 - 12:29 pm | चंबा मुतनाळ

क्रोमावर लॉग इन करुन मिपावर लिहायचा प्रयत्न केला, पण जसे म.टा. मध्ये कधीकधी 'आस्ड्फृऍऍर्‍ए' असे दिसते, तसे इथे टाईप होताय