(इंडियन) अमेरिकन आई बाप

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
3 Sep 2008 - 12:18 am
गाभा: 

आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा. पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असं त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.
"काय भाऊसाहेब आज विषेश काय?"
असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले,
"सामंत , काय हो तुम्हाला आठवतं का,
ज्यावेळेला तुम्हाला पहिलं मुल झालं तेव्हा तुम्ही कधी त्याला कौतूकाने घेऊन फिरवत असाल.पण त्याचे कपडे बदलणं त्याचे आपण पुर्वी लंगोट म्हणायचो- त्याला इकडे डायपर म्हणतात- तसं काही तुम्ही बदलायचा का त्याला कधी मांडीवर घेऊन झोपवलं आहेत का तुम्ही? बहूतेक नसणार कारण तुमच्यावर ती पाळीच कदाचीत आली नसणार.पण इकडे बघा आमचे जांवई हे सर्व करतात.
त्याना म्हणे इकडे ट्रेनींग देतात.ही मुलांची सर्व कामं इकडे आई बाबानां मूल होण्यापुर्वी शिकून घ्यावी लागतात. त्याना ही सर्व कामं करताना पाहून कौतुक वाटतं. मुलाच्या बाबाला दुधाची बाटली पण द्यायचं शिकवतात.
म्हणजे बघा बापाला जवळ जवळ आईची कामं शिकवतात.आणि हे बाबा पण ही सर्व कामं अगदी आनंदाने आणि अगत्याने करतात.

आता आजी आजोबा झाल्यावर नातवंडाची हीच कामं आपल्याला करायला किती आनंद होतो.
सामंत,तुमचं म्हणण काय आहे याच्यावर ते जरा विस्तारने मला सांगा बघू."

हे त्यांचं म्हणणं ऐकून,
"मी थोडा विचार करून मला काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला उद्या आपण भेटू तेव्हा चर्चा करूं."असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी जेव्हां आम्ही भेटलो तेव्हा ह्या विषयावर उहापोह केला.तो असा.
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,ह्याला मुख्य कारण इकडची कुटुंब संस्था आणि इकडची-म्हणजे अमेरिकेतली- परिस्थीती मुख्यता कारण असावी.
अहो,त्यावेळी भारतात आपल्या एकत्र कुटुंब संस्थेमूळे किती माणसं जवळ असायची बघा. त्यामुळे मुलांची ही कामं करायची पाळी तरूण बापावर कशी येणार.आणि इतकं असून तसं करायला जरी जायचं तरी एक म्हणजे त्या वयात थोडी लाज वाटाची आणि बायको पण कामं करू द्यायची नाही कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त
वाटायचं आणि मोठी माणसं पण असली कामं तरूण बाबाने केल्यास आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच होतो.

उलट इथे आईबाबा आणि मूल ह्या शिवाय घरात कोणच नसतं. आणि ही कामं एकट्याची नसून दोघांची असतात हे इथं पटवलं जात असल्याने- विशेष करून पुरुष्याला- त्यामुळे असली दृश्य आपल्याला दिसतात.
आणि दुसरं म्हणजे मदतीला आजी आजोबा जरी भारतातून आले तरे त्यांचा सहा महिन्याचा व्हिसा असतो मग सहा महिन्यानी ते गेल्यावर ही कामं कुणी करायची सांगा?

आपण आजोबा म्हणून जेव्हां इकडे नातवंडाचे कौतुकाने लाड करत असतोना, त्याच पण अनेक कारणा पैकी एक कारण एका अनुभवी व्यक्तीने मला समजावून सांगीतलं. त्याच म्हणणं असं की आपण तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या गोड कौतुकाची इछ्या त्यावेळी जमत नसल्याने आता आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो.
कारण आपली टिंगल करायला कुणी नसतं आणि आजीला पण वयोमनाप्रमाणे जमत नसल्याने आजोबाला काही असली कामं वाटून मिळतात.हे त्या अनुभवी माणसाचे तत्वज्ञान मला पटतं भाऊसाहेब, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मला उद्या विचार करून सांगा ह्यानंतर आम्ही हा विषय इथे संपवला."

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

सर्किट's picture

3 Sep 2008 - 7:54 am | सर्किट (not verified)

त्याच म्हणणं असं की आपण तरुण बाप असताना सुप्त राहिलेली आपली मुलांच्या असल्या गोड कौतुकाची इछ्या त्यावेळी जमत नसल्याने आता आपण अजोबा झाल्यावर वसूल करतो

आम्ही तरुण बाप असताना, आमच्या दोन्ही मुलांची अशी सगळी गोड कौतुके केली आहेत, त्यांच्या लंगोट्या बदलल्या आहेत. वगैरे वगैरे सगळे केले आहे.

आता आमच्या नातवांना (जेव्हा केव्हा येतील तेव्हा) आमचा असाच आधार मिळणार नाही, असे तुमच्या देसाईंचे मत असेल, तर ते चुकीचे आहे.

आजोबा झाल्यावर कौतुक विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हा एक मूळ पॉझिटीव्ह पॉईंट असतो ! तबल्यावर हात आणी डग्ग्यावरही, अशी सिचुएशन कुणाला नाही आवडणार ?

-- सर्किट

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Sep 2008 - 11:16 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किटजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"आता आमच्या नातवांना (जेव्हा केव्हा येतील तेव्हा) आमचा असाच आधार मिळणार नाही, असे तुमच्या देसाईंचे मत असेल, तर ते चुकीचे आहे."

देसायांच मत त्यांच्या बद्दल होतं,त्यांच्या जांवया बद्दल नव्हतं.जांवयांना त्यांच्या नातवाना आधार देताना जांवयांची कौतुकं सुप्त राहणारच नाहीत. कारण तरूण बाप असताना त्यांच्या मुलांची लंगोट्या बदलून गौड कौतुकं केली आहेत ना!
देसायाना त्यांच्या परिस्थितीत ते करायला मिळत नव्हतं ना!

"आजोबा झाल्यावर कौतुक विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हा एक मूळ पॉझिटीव्ह पॉईंट असतो ! तबल्यावर हात आणि डग्ग्यावरही, अशी सिचुएशन कुणाला नाही आवडणार ?"

जांवई आजोबा झाल्यावर "रिस्पॉन्सिबिलिटी" हा त्यांचा सुद्धा "पॉझिटीव्ह" पॉईंट होणार हे उघडच आहे.ते कुठच्याही आजोबाला चुकलेलं नाही.

सर्किटजी,
अहो! तबल्यावर हात आणि डग्ग्यावरही हात अशी सिच्युएशन आल्या शिवाय गाणं आणि तबल्याचे बोल कसे वाजणार? आणि गाणं जांवयाना पण आवडणारच की.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अमेयहसमनीस's picture

3 Sep 2008 - 9:24 am | अमेयहसमनीस

विषय फार पटला नाही.

अमेय

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Sep 2008 - 11:19 am | श्रीकृष्ण सामंत

अमेयहसमनीसजी,
म्हणजे काय?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

4 Sep 2008 - 7:31 pm | रेवती

असं वाटायचं की कधी हा डायपरचा व्याप संपणार? त्यातून माझा लेक इतकी वळवळ करायचा की डायपर बदलणे म्हणजे अरे देवा! माझा नवराही बिनदीक्कतपणे मुलाचे डायपर बदलायचा.ती आठवण झाली.
त्यासुमारास एक गम्मत झाली. माझे सासरे माझ्या मुलाला खेळवत होते ते बघून सासूबाई आश्चर्यचकीत होऊन म्हणाल्या की त्यांना माहीतच नव्हते की आपला नवरा लहान मुलांशी खेळू शकतो. त्यावर सासर्‍यांचे मत असे होते की पूर्वी वडीलांनी (स्वत:च्या) मुलाशी खेळणे फारसे प्रचलीत नव्ह्ते. नातवंडांशी खेळलेले मात्र चालायचे (त्यावेळची पण आता आम्हाला न पटणारी पद्ध्त आहे.); पण आपले लेखन पटले.

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:16 am | श्रीकृष्ण सामंत

रेवतीजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
हा आपला अनुभव आपण लिहित आहा,त्यामानाने आपण खूपच तरूण आहात.आणि आपले सासू सासरे सुद्धा त्यामानाने तरूण आहेत.ज्या मानाने मी त्या पिढी बद्दल लिहित आहे ज्याना खरोखरच आपल्या तरूण पत्नीशी सर्वांसमोर बोलायची "टाप" नसायची.
कल्पना करा की आपल्या सासू सासर्‍यांच्या (फक्त उदाहरण म्हणून) आई वडिलांची या बाबतीत स्थिती काय झाली असावी.
आणि अगदी तेच मी माझ्या लेखात लिहित आहे.
माझे लेखन आपल्याला पटले हे वाचून आनंद झाला.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

5 Sep 2008 - 8:25 am | पिवळा डांबिस

आणखी एक केलं पाहिजे, आपल्या भारतातल्या मुलांसाठी!

इथे जसं नवर्‍याला आपल्या मुलांच्या जन्मवेळी हजर ठेवतात.....
आपली लाडकी बायको ज्या वेदनातून आणि त्रासातून जाते ते सर्व या डोळ्यांनी पहायची सुविधा (?) या मुलांना ठेवली पाहिजे.....
कुटुंबनियोजनाला दुसरा पर्याय नाही.....
भारतात ठीक आहे......
बायकोला पेन्स सुरू झाल्या....
तिला हॉस्पिटलात ऍडमिट केली.....
बाहेर उभा राहून दोन सिगरेटी ओढल्या....
मुलगा/ मुलगी बातमी बाहेर आल्यावर पेढे/ बर्फी आणायला धावले.....
ते मूल या जगात आणण्यासाठी आपल्या प्रियतमेला काय त्रासातून जावं लागलंय हे त्या मुलांना कळलंच पाहिजे.....
सगळे नाही पण जे सर्‍हुदय बाप असतील त्यांच्या साठी तरी एक उपाय.....

आपला प्राऊड बाप,
पिवळा डांबिस

(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)

सहज's picture

5 Sep 2008 - 9:41 am | सहज

(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)

सहमत.

अवांतर- डायपर, लंगोट बद्दल बोलणे चालले आहे तर बाळाच्या "पॉटी ट्रेनिंग" बद्दलही लिहा सामंतआजोबा. आयुष्य बरेच सुखकर होते. :-)

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:21 am | श्रीकृष्ण सामंत

डांबिसजी,
"प्राऊड बाप" म्हणून घ्यायला आपण खरोखरच,लायक आहात.
आपण लिहिलेली सत्य परिस्थिती आणि त्यावर सुचवलेले उपाय हे आपल्या आणि आपल्यासारख्या अनेक बापांच्या हृदयातून आलेले शब्द असावेत असं मला आपली प्रतिक्रिया वाचल्यावर वाटलं.
मी नेहमीच म्हणतो,
"जो स्त्रीला सन्मान देतो त्यालाच खरा सज्जन म्हणावं "

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

महेश हतोळकर's picture

5 Sep 2008 - 12:35 pm | महेश हतोळकर

(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)

हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. एका हातात ते इवलस गाठोडं आणि दुसर्‍या हातात टेबलवर पडलेल्या बायकोचा हात. माझ्यासाठी त्याक्षणी जग तेवढच होतं....
पण ही पद्धत आपल्या कडे नको. मुलीच्या जन्मावेळेस आजुनही बर्‍याच वेळा बापाची प्रतीक्रिया अत्यंतीक टोकाची असते. आई आणि बाळाच्या सुरक्षीततेसाठी ते योग्य वाटत नाही.
महेश हतोळकर

रेवती's picture

5 Sep 2008 - 7:47 pm | रेवती

पिडाकाका,
मलाही असंच वाटतं. वेदनेनी विव्हळणार्‍या बायकोला पाहून काहीजण तर म्हणे लट्लट कापत असतात, पण म्हणून त्या बापांची सुटका होउ देऊ नये. तसेच सर्व रेटून नेण्यास भाग पाडले पाहीजे. बहूतेकवेळा माहेरी पहीले बाळंतपण असते त्यामुळे नवर्‍यांवर वेळही कमीच येते. पण माझा भाऊ मात्र भारतात वहीनीच्या बरोबर सर्व ठीकाणी होता, वहिनीच्या इतर नातेवाईकांना थोडे विचित्र वाटले पण त्यांच्याकडे लक्ष न देता त्याने बाळ होत असताना तेथे हजर राहण्याची परवानगी मागितली. सुदैवाने डॉक्टरही समजूतदार होते.

रेवती

इथे जसं नवर्‍याला आपल्या मुलांच्या जन्मवेळी हजर ठेवतात.....

हल्ली भारतातही तो विकल्प उपलब्ध आहे, असं ऐकिवात आहे.

अर्थात तरीही आजमितीस भारतातले किती टक्के बाप मुलाच्या जन्माच्या वेळी हजर असतात याची कल्पना नाही, परंतु उदाहरणं माहितीतली आहेत. तीही तेराचौदा वर्षांपूर्वीची.

(अवांतरः ते छोटुकलं बंडल डॉक्टर किंवा नर्सने आपल्या हातात दिलेलं.... अजून त्याला नीट पुसलेलंही नाही... असं हातात मिळाल्यावर काय वाटतं हे शब्दांनी सांगता येण्याजोगं नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा...)

अगदी!

मुळात भारतीय पुरुषांत सर्वसाधारणतः याबद्दल उदासीनता का, हे कळत नाही. म्हणजे जन्म देणे, बाळंतपण वगैरे हे बाईचे (/बायकांचे) काम वगैरे भावना. हे आपलं मूल आहे, त्याला या जगात आणताना आपलाही सहभाग असावा, त्याचं स्वागत करायला आपण तिथे असावं असं आपल्याकडच्या बापांना कसं वाटू शकत नाही हेच एक कोडं आहे. हे सगळं आपलं काम नाही, या सगळ्यापासून दूर राहावं असं वाटूच कसं शकतं?

("लाज? लेको, गर्भधारणेच्या [conceptionच्या] वेळी हजर होतात तेव्हा लाज वाटली नाही, मग आता डेलिव्हरीच्या वेळी हजर राहतानाच रे शिंच्यो नेमकी कसली लाज वाटते?" हे या बाबतीतलं कोण्या अनामिक भगिनीचं [वाचीव - म्हणजे इथल्याच कोण्या स्थानिक अमेरिकन वर्तमानपत्राच्या 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'त वगैरे कधीकाळी वाचलेलं] मत चिंत्य आहे.)

विसोबा खेचर's picture

5 Sep 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

श्रीकृष्णराव,

आपला लेखनाचा उत्साह अंमळ थक्क करणारा आहे! :)

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:25 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपण वेळात वेळ काढून माझ्या लेखनावर मनापासून दिलेली प्रतिक्रिया लाख मोलाची आहे.त्या बद्दल आभार.
आपल्या मिसळपावा सारख्या संस्थाळावर-साईटवर-लेखनावर दिलेल्या प्रतिक्रिया-मलाच नव्हे तर इतरानाही- पोटतीडकीने दिलेल्या असतात असं मला वाटतं.मग त्या प्रशंसासहित असो अथवा प्रशंसाविरहित असो,त्या पाहून माझ्या सारख्याला तरी प्रेरणा मिळते.आणि
"प्रेरणा ही उत्साहाची जननी आहे."
तेव्हा आपण माझ्या लेखनाने अंमळ थक्क होता.आणि मी आपल्या सारख्यांच्या प्रेरणाने अंमळ थक्क होतो.हीच खरी "ग्यानबाची मेख " आहे असं मला वाटतं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

ऋचा's picture

5 Sep 2008 - 9:20 am | ऋचा

डांबीस काकांशी सहमत!!!
खरच सामंत काका खुप छान लिहीलय!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Sep 2008 - 11:28 am | श्रीकृष्ण सामंत

ऋचाजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पद्मश्री चित्रे's picture

5 Sep 2008 - 12:35 pm | पद्मश्री चित्रे

पटलं तुमचं म्हणणं-सामंत काका .
आणि पि डां शी तर १०१% सहमत..

ईश्वरी's picture

6 Sep 2008 - 1:21 am | ईश्वरी

>>पटलं तुमचं म्हणणं-सामंत काका .
आणि पि डां शी तर १०१% सहमत..

हेच म्हणते

ईश्वरी

शितल's picture

9 Sep 2008 - 7:55 am | शितल

लेख आवडला,
पिडाकाकांची प्रतिक्रीया तर प्रत्येक स्त्रीच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
:)