नमस्कार्स मिपाकर्स !!!!
आम्ही इथे आलो तेंव्हा मिपाचे जवळजवळ ११०० सभासद होते. पण गेल्या अडिच महिन्यात ही संख्या १९०० वर पोहोचली. (ड्युप्किकेट आय डींचा हातभार फार फार तर ५० चा असेन) . असो ... इथले काही सभासद हे अंतरजालिय ब्लॉगर्स आहेत आणि त्यांचा वावर फार पुर्वीपासून तत्सम साइट्स वर आहे. त्यामुळे ते तात्यांच्या ओळखीमुळे मिपाकर्स झाले असतील ही शक्यता आहे. पण मिसळ पाव गुगल किंवा याहू सारखे नाही. किंवा त्याची जाहिरात आपण कुठल्या चॅनल वर पहात नाही (कमीत कमी मी तरी नव्हती पाहिली). म्हणून दिवसेंदिवस मिपाचा वाढता अवाका पाहून प्रश्न पडले. मी इथे येण्या आधी ब्लॉग्ज बद्दल फक्त ऐकून होतो. जसे की ब्लॉगस्पॉट . पण असल्या संस्थळाबद्दल पुर्ण अंधारात होतो . मला मिसळपाव सापडले ते फार फार चुकून. एक तर इकडे एकटा असल्याने फावल्या वेळात नेट सर्फिंग हा एकच विरंगुळा.. असाच गुगल बाबाला मराठी पीजे म्हणून क्वेरी टाकली .. तर मला प्राजूने सुरू केलेल्या "फालतू पीजे" या पानाची लिंक मिळाली. मग थोडी साइट चाळाचाळ केल्यावर गटण्याच्या वहीणीच्या बांगड्या सापडल्या .... आणि म्हटलं अरेच्च्या अंमळ मजेशीर साइट आहे ही तर. मी पण सभासद झालो................ तो आज पर्यंत जे काही झाले त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात.
माझा प्रश्न असा आहे ... तुम्ही मिपा वर कसे आलात ? सोर्स काय ? का आलात ? इथे काय आवडलं .. काय नाही ?
कुतूहल आहे ,,, म्हणून हा काथ्याकुट :)
------------------------------------------------------------------------------------- ( आघाऊ टारझन )
प्रतिक्रिया
2 Sep 2008 - 1:31 am | भडकमकर मास्तर
मी गेल्या डिसेंबरात देशावरच्या पेरेंट्सच्या अमेरिकावारीबद्दलचा एक उपहासात्मक प्रवासवर्णन लेख वाचला .... मला अंमळ मजेशीर वाटला ...त्यानंतर मी येथे नियमित येऊ लागलो..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Sep 2008 - 12:42 pm | सर्किट (not verified)
च्यायला, मास्तर, माझा एक लेख तुम्हाला इथे घेऊन आला ! धन्य झालो !
-- सर्किट
2 Sep 2008 - 3:35 pm | भडकमकर मास्तर
:)... आपण धन्य झालात, आम्हीही धन्य झालो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Sep 2008 - 3:43 am | चतुरंग
गेल्या डिसेंबरात (अचूक सांगायचं तर १२ डिसेंबरला) मला जीमेलवर एक लिंक आली मस्त लेख आहे वाच म्हणून. असेल काहीतरी पकाऊ म्हणून मी लगेच वाचले नाही. एकदोन दिवसांनी सवडीने वाचले आणी काय सांगू, माताय! एकदम ह ह पु वा!!
मग तसाच एक आठवडा वाचनमात्र होतो. रोज काही तास पडीक असायचो मिपावर, बायको कावली माझ्यावर काय चाललं आहे म्हणून.
मग सदस्यत्वच घेऊन टाकलं आधी प्रतिक्रिया देण्यातून सुरुवात, मग थोडे लिखाण, मग विडंबनं, मधुशालेचा अनुवाद, बुद्धीबळावर लेखन, संपादकीय असा प्रवास सुरु आहे आणि चालूच राहील ह्यात शंका नाही! :)
चतुरंग
3 Sep 2008 - 7:38 am | सर्किट (not verified)
च्यामारी, मिपाच्या एक नव्हे दोन दोन पाहुण्या (त्यातील एक खर्या) संपादकांना मिपावर आणण्यास आमचा लेख कारणीभूत झाला, त्यामुळे आम्ही हवेत आहोत (हवेत रे ! अंमलात नाही.).
तात्या, शिंच्या, जरा इकडे लक्ष दे रे !!!!
-- सर्किट
3 Sep 2008 - 8:26 am | विसोबा खेचर
तात्या, शिंच्या, जरा इकडे लक्ष दे रे !!!!
तुझ्या लेखामुळे मिपाकडे काही चांगले लोक वळले हे छानच झाले! :)
3 Sep 2008 - 11:08 am | अभिज्ञ
च्यामारी, मिपाच्या एक नव्हे दोन दोन पाहुण्या (त्यातील एक खर्या) संपादकांना मिपावर आणण्यास आमचा लेख कारणीभूत झाला, त्यामुळे आम्ही हवेत आहोत (हवेत रे ! अंमलात नाही.).
तात्या, शिंच्या, जरा इकडे लक्ष दे रे !!!!
सर्किट.
तुझ्या लेखामुळे मिपाकडे काही चांगले लोक वळले हे छानच झाले!
तात्या.
तात्यानु, व सर्किटशेठ ह्ये समद ठिक हाय,पर त्यो लेख कुट हाय? ~X(
तात्या व सर्किटशेठ, का ते आम्हाला माहित नाहि परंतु हा लेख इथे दिसत नाहिये.
सर्किटशेठ,खास लोक आग्रहास्तव हा लेख परत येथे देउ शकाल काय?
किंवा,
तात्या,
http://www.misalpav.com/node/338
हा दुवा पुन्हा स्थापित करता येईल का? मला वाचनखुणात साठवायचा आहे.
अभिज्ञ.
2 Sep 2008 - 3:44 am | बिपिन कार्यकर्ते
मला २००५ साली मनोगत हे संस्थ असेच योगायोगाने सापडले... तिथे तात्या, सर्किट, प्रियाली, संजोप राव इ. मान्यवरांचे लिखाण वाचत होतो. असं होता होता, एक दिवस तात्यासाहेब गुल तिथनं... मी आपला मधनं मधनं तात्या, सर्किट च्या ब्लॉग वर नजर टाकायचो... आणि एक दिवस मिपाचा उल्लेख वाचला... लगेच इथे आलो आणि सभासद झालो.
मिपा कसं विकसित होत गेलं ते बघितलं. बिंदास तात्या... डेंजर भयाली... नावाला जागणारे, अतिशय हुशार आणि प्रतिभावान सर्किट साहेब... अतिशय सुंदर लिहिणारे आणि एकात अनेक असणारे रामदास काका, मराठी आंतरजालावर वावरणारे स्वतः फार कमी लिहिणारे पण साहित्याची उत्तम जाण असणारे नंदन सारखे... बेसनलाडू, कोलबेर इ. हेही तसेच, पण नावामुळे विशेष लक्षात राहणारे लोक... अश्या सर्वांमुळे, त्यांच्या लिखाणामुळे, आपापसात चालणार्या गंमतीजमती... इथे परत परत यावंसं वाटतं...
मिपाचं दुसरं रूप म्हणजे... टीपी... ख.फ. वर पोट्टे पोट्टी लै धुमाकूळ घालतात. कधी कधी लै म्हणजे लैच ताण असतो डोक्याला (ते धम्या, डॉन्या आणि गँग काय डोक्याला शॉट का काय म्हणतात तेच)... इथे आलं की जरा बरं वाटतं... इथे माननिय धमाल मुलगा साहेब (ओळख ठेवलीच पाहिजे, ह्यांचे पुढे उच्च प्लॅन आहेत, साहेबांची ओळख कामाला येईल), आदरणिय सखारामजी गटणे साहेब (ह्यांचा आदर केलाच पाहिजे नाही तर अजून एखादी ओळख परेड टाकून डोक्याचा शॉट वाढवतील) असे काही महान लोक भेटले. हुशार, चलाख पण अतिशय सरळ मनाचा टारूबाळ आणि त्याची विक्षिप्त (म्हणजे साध्या सरळ भाषेत येडचाप म्हणतात ते) यमी आजी तर मस्तच.
माझ्या अतिशय विस्कळीत आणि बर्याच काळापासून खंडित झालेल्या वाचनाला थोडी शिस्त लावायच्या प्रयत्नात मला इथल्या मेघना, रामदासकाका सारख्यांची मदत होतेय. मिपामुळेच माझ्या शब्दसंपत्तितही भर पडली. अंमळ (शब्द माहिती होता, पण तो परत भयानक लोकप्रिय करायचे श्रेय केवळ आणि केवळ मिपाचेच), शॉट, घरशणाकरशण, क्षाराल्कलीयुक्तघनगोलगड्डू..... आणि सगळ्यात जहबहर्या म्हणजे...'तद माताय' ... _||_
काहिही म्हणा इथलं वातावरण आवडलं. जे काही कडूगोड प्रसंग घडतात त्याबद्दल इतकंच म्हणायचंय, यातूनच काहितरी नवे घडेल आणि त्यामुळे मिपा अजून सुंदर व्हावे हीच इच्छा.
बिपिन.
2 Sep 2008 - 11:26 am | पांथस्थ
आपले पण असेच झाले बुवा!!!
इथले खुसखुशीत लेख, त्या लेखांमधले भाषावैविध्य, शाब्दिक कोट्या, विचार (आणी वैचारिक धडका), विडंबन ई. ई. फार आवडते...
आपला,
(भरकटलेला) पांथस्थ
2 Sep 2008 - 4:33 am | घाटावरचे भट
मला माझ्या तात्यांसारख्याच गाण्यातल्या एका मित्राने तात्यांच्या ब्लॉगची लिंक दिली होती. तिथे मिसळपावविषयी उल्लेख होता, ते पाहून म्हटलं बघावी तरी काय आहे साईट...नाव तर मोठं झकास दिसतंय, असं म्हणून मी पहिल्यांदा इथे आलो. आणि इथले लेख, कथा आणि कविता वाचून (आणि खफ बघून) इथला सदस्य झालो!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
2 Sep 2008 - 5:01 am | आजानुकर्ण
टारोपंत,
आम्ही सुरुवातीपासूनच येथे आहोत
मात्र कसे आलो तेच आठवत नाही.
आपला,
(दस नंबरी) आजानुकर्ण
2 Sep 2008 - 5:07 am | बिपिन कार्यकर्ते
मास्तर... आपलं नाव घ्यायचं राहिलं... आपल्या 'चड्डीत रहा ना भौ' ची आठवण कायम राहिल...
बिपिन.
2 Sep 2008 - 5:15 am | आजानुकर्ण
आमचे नाव घेतले नाही तरी आमची आठवण अनेकांना नेहमी असते.
आपला,
(चड्डीत) आजानुकर्ण
2 Sep 2008 - 1:32 pm | सर्किट (not verified)
होय, आपली आठवण असतेच. पण त्या आधीही किंवा त्या अनुषंगाने म्हणा, आपल्या आदरणीय गुरुजींची आठव्ण झाल्याशिवाय रहात नाही.
जे झाले ते वाईट झाले, एवढेच म्हणतो. मिपाच्या पहिल्या वर्धापनदिनाला त्यांची आठवण येत राहील.
-- सर्किट
3 Sep 2008 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली आठवण असतेच. पण त्या आधीही किंवा त्या अनुषंगाने म्हणा, आपल्या आदरणीय गुरुजींची आठव्ण झाल्याशिवाय रहात नाही.
हा हा हा हा वर्धापणदिनाला आठवण येतेच :)
4 Sep 2008 - 1:01 pm | सर्किट (not verified)
वर्धापण नाही ! वर्धापन दिन.
उगाच नाही भलत्या सलत्या ब्लागांवर एका विशिष्ट मराठीच्या प्राध्यापकावर कामेंट होत ! ;-)
-- सर्किट
4 Sep 2008 - 1:07 pm | नंदन
विदर्भ ज्या दिवशी महाराष्ट्रात सामील झाला, तो दिवस मात्र वर्धा-पण-दिन म्हणून साजरा करता येईल. ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
4 Sep 2008 - 1:30 pm | सर्किट (not verified)
वर्धाच कशाला, त्याला आपण गोंदियापण दिन म्हणून साजरा करू. महाराष्ट्र एक्सप्रेस नावाची गाडी गोंदियाहून निघते आणि कोल्हापूरला जाते.
-- सर्किट
2 Sep 2008 - 9:03 am | सखाराम_गटणे™
'चड्डीत रहा ना भौ' म्हणजे नक्की कोणच्या चड्डीत राहायचे असते???
ऐक प्रामाणिक शंका
2 Sep 2008 - 2:24 pm | बिपिन कार्यकर्ते
सख्या... आजानुकर्ण साहेबांचा ब्लॉग बघ...
2 Sep 2008 - 5:20 am | प्रियाली
चालकांच्या रितसर आमंत्रणाने येथे आले. :)
(बिल्ला क्र. ३-१३ ;) )प्रियाली
2 Sep 2008 - 10:14 am | नंदन
मीही असाच आलो, फक्त आधी सदस्य झालो आणि मग अक्षत :)
बिल्ला क्र. १७
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Sep 2008 - 11:50 am | स्वाती दिनेश
मी ही..
(बिल्ला क्र.१५) स्वाती
2 Sep 2008 - 4:57 pm | विकास
मी पण चालकांच्या रितसर आमंत्रणाने येथे आलो!
4 Sep 2008 - 12:50 am | चित्रा
अशीच आले. प्रियालीसारखी.
2 Sep 2008 - 5:31 am | रेवती
माझ्या नवर्याला मिपाबद्दल माहिती दिली (भावाला कसे कळले ते माहीत नाही). माझा नवरा सदस्य आहे. कधीही बघावं तर हा आपला मिपावर. शेवटी मी चिडले की काय चाल्लयं तरी काय? हळू हळू वचायला लागले. नवरा म्हणाला की सदस्य हो (मी अर्थातच नाही म्हणाले). आठ महीने मिपावर येऊन जाऊन होते. नंतर कधितरी प्रतिसाद द्यावासा वाटूनही देता येत नव्हता, मग सदस्य झाले.
आधी सदस्य व्हावेसे वाटत नव्हते कारण मी जेंव्हा मिपावर यायचे तेंव्हा योगायोगाने काहीतरी वाद (मनोगतावरून) चालू असायचे (ते कशावरून आहेत ते माहीत नाही), व इथे हे काय चालू असते असे वाटायचे.
आता त्याचे काही वाटत नाही (सवय झाली).
येथे जो मोकळेपणा आहे तो आवडतो. न आवडलेलं फारसं असं अजून तरी नाही. टारझन चं नाव आधी जे होतं त्याला मी नक्कीच घाबरले होते (आता नाही).
रेवती
2 Sep 2008 - 6:29 am | मेघना भुस्कुटे
टारू, मस्त आहे धागा!
मी अगदी सुरुवातीपासून होते मिपाची सदस्य. पण वाचनमात्र.
पण भडकमकर मास्तरांचा 'दिलवाले दुल्हनिया...'वरचा लेख वाचला. त्यांचं ते 'उतर रे उतर, अंमळ येडझवाच दिसतोय की रे हा' वाचून मी दिवसभर हसत होते. तेव्हापासून मिपाची सवयच झाली. आता इथले अभ्यासू, वात्रट, कवी, मस्तीखोर, भांडखोर... सगळ्याच लोकांची सोबत होते.
मला बिलकूल वाटलं नव्हतं, जालावर अशी मैत्रीबित्री होईलसं. पण मिपानी सगळे अंदाज खोटे ठरवले. धन्यु (हा एक मिपाचाच शब्द) मिपा!
2 Sep 2008 - 6:44 am | llपुण्याचे पेशवेll
त्याचे झाले असे की मी प्रथमच अमेरि़केत गेलो होतो. पहील्यांदाच घराबाहेर म्हणजे पुणे २९-३० च्या बाहेर. म्हटले बघावे अमेरिकेत मिसळ कुठे मिळते का. म्हणून 'मिसळपाव' असे गूगलवले. तिथे हि लिंक मिळाली. मग मिपा पाहिल्यावर हे कळाले की मिपा मराठीतून लिहीण्या वाचण्या साठी निर्मिलेले स्थळ आहे. १-२ लगेच वाचले. आणि मिपाचा शोध मला लागल्यापासून अवघ्या १ तासात सदस्य झालो मिपाचा.
पुण्याचे पेशवे
2 Sep 2008 - 7:41 am | सूर्य
मी 'त्या' संकेतस्थळावरचा सभासद असल्यापासुन तात्या, प्रियाली, सर्किट यांचे लेख वाचत होतो. नंतर तात्यांनी उपक्रमावर मिपाची घोषणा केल्यापासुन मी वाटच बघत होतो. मिपा सुरु झाल्यानंतर मी लगेचच सभासद झालो.
- सूर्य.
3 Sep 2008 - 1:43 am | भाग्यश्री
माझेही असेच झाले.. निर्माण होण्याच्या घोषणेपासून साक्षीदार! :) निर्माण झाल्यावर अर्थातच सभासदत्व घेतले.. पण 'अंमळ' उशीरा..
(बिल्ला क्रमांक २०२) भाग्यश्री..
2 Sep 2008 - 7:49 am | रामदास
फिरता आलो आनंदवनभुवनी.
3 Sep 2008 - 1:04 am | संदीप चित्रे
हिंडत फिरत आलो ना भौ. तात्याच्या ब्लॉगवर 'बसंतचं लग्न', 'रौशनी' वगैरे वाचत होतोच.
मग एकदा नंदनने विचारले की सदस्य आहेस का ?
म्हटलं नंदनसारखे जागरूक आंतरजालीय वाचक ज्या साईटचा सदस्य आहे तिथे डोळे मिटून सदस्यत्व घ्यावे :)
2 Sep 2008 - 8:20 am | अनिल हटेला
माझा ही असाच लोच्या झाला !!!
चीन मध्ये आल्यावर कुणाशीच बोलायची सोय नव्हती.......
कलीग सगळे काम से काम ठेवणारे......
आणी बाहेर फार फार तर हिंग्लीश मध्ये भूकाव लागाय्च .....
आणी गूगलवत असताना मिसळ-पाव शी ओळख झाली.....
३ दिवस नुसता वाचत होतो...
खायची शुद्ध नाही की काहीच नाही...
आणी मग मिपा वर " बैलावतार " झाला......
एक मात्र खर की काहीही केल नाही तरी मिपा वर आक्खा दिवस कसा जातो समजत नाही...
त्याबद्दल खरतर धन्यु मिपा !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Sep 2008 - 8:36 am | सहज
असाच कधीतरी उपक्रमाचा शोध लागला व एकसे बढकर एक मोठ्या लोकांची ओळख झाली. म्हणजे बघा सर्किट, तात्या, धनंजय, मोठी/ दिग्गज लोक, अफाट बुद्धी व व्यासंग अजुन काही बोलायची माझी लायकी नाही. तिघांचाही फॅन आहेच. गुंडोपंत, प्रा. डॉ. [गुंडोपंत व प्रा डॉ यांनी पहिल्यापासुन आपुलकीने स्वागत केले व प्रतिसाद-लेखन करायला प्रोत्साहन दिले ], प्रमोदकाका, यांच्याशी गप्पा व उपक्रमावर बराच काळ टिकून रहाण्यात यनावालांच्या कोड्यांचा मोठा हात आहे व जितका काळ तिथे वावरलो अजुन ओळखी , उत्तम वाचन झाले जसे विकासराव, प्रकाशकाका घाटपांडे, चित्राताई. तसेच ट्ग्या, प्रियाली, राजेंद्र, कोलबेर, विसुनाना यांचे प्रतिसाद वाचायला सॉलिड मजा आली/येते. स्वातीदिनेश यांच्या पाकृ /प्रवासवर्णने, केसु यांची विडंबने, ऋषीकेशचे लहानमुलांचे लेखन, मुक्तसुनित यांचे संयत सुंदर प्रतिसाद या गोष्टिंचा फॅन होणे जगातली सर्वात आपसुक होणारी गोष्ट. नीलकांतचे चौफेर वाचन व लेखन याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. आजानुकर्ण व संजोपराव यांच्या चांगल्या लेखाचा उल्लेख न करणे आकसाचे ठरेल.[पण.. :-) ]
बरेच दिवसापासुन सर्वांना धन्यवाद द्यायचे होते. मराठी टाईप करता येणे व मराठीतून व्यक्त होता येणे या करता उपक्रम, मिसळपावचे आभार मानावे तितके कमी. गमभनकार जोशी, नीलकांत, शशांक, तात्या यांचे परत एकदा आभार.
तर टार्याचा प्रश्न की मिपावर कसे आलात तर उपक्रमावर असताना कळले की तात्या मिपा काढणार आहे त्याचे स्वरुप आधीच्या दोन म्हणजे मनोगत व उपक्रमापेक्षा वेगळे आधीक स्वतंत्र असणार आहे. उपक्रमावर नाही म्हणले तरी बोअर होतेच किती वेळ ज्ञान-विज्ञान करायचे त्यालाही काही लिमीट. :-) मनोगताने स्पाँटेनीटी चा बट्ट्याबोळ केला होता. कूठल्याही जिंदादिल माणसाला मिपा सहाजिकच जवळचे होते. तात्याने आमंत्रण दिले होतेच. अगदी सुरवातीलाच बिल्ला नं ८ सदस्यत्व घेतले.
असो तर वर उल्लेख केलेल्या लोकांच्या सहवासात, उत्तम लिखाण वाचनात वेळ घालवायला कोणाला नाही आवडणार. आता तर मिपावर रामदास, भडकमकर मास्तर, सौरभ असे उत्तमोत्तम लेखक मंडळी आहेत. उत्तमोत्तम पाकृ वाचायला मिळतात. फूल्ल टिपी करणारी आज्जी पासून अफ्रिकेत बसुन धिंगाणा घालणारी नवी लोक आहेत. मधूनच असा एखादा धागा निघतो ज्यात नव्यापासुन जुने सगळे हिरिरीने चर्चा करतात. दिवसेदिवस मिपा मोठे होत आहे व मिपाकर लोक जोडली जात आहेत. और क्या मंगता है लाईफ मे. बाकी सगळे तर आपण मिळवतच आहोत.
2 Sep 2008 - 1:36 pm | सर्किट (not verified)
और क्या मंगता है लाईफ मे. बाकी सगळे तर आपण मिळवतच आहोत.
बस लाईफ में और कुछ नही मंगता ! बस थोडी लोकशाही और भी होयेंगी तो कितना मज्जा आयेगा !
-- सर्किट
2 Sep 2008 - 8:33 am | विसोबा खेचर
पैलवानासकट सर्व मिपाकरांचे मनापासून आभार....!
आपल्यासारख्या सर्व सभासदांमुळेच केवळ अन् केवळ मिपाची शोभा आहे. सभासदांशिवाय मिपा, म्हणजे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेची इमारत जितकी भयावह दिसते तितकेच भयावह दिसेल! आपल्यासारख्या रसिक मिपाकरांची अखंड सोबत आहे म्हणूनच मिपाची वाटचाल सुरू आहे....
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
अवांतर - टारझन या इसमाला आम्ही टार्या, टाळूबाळ इत्यादी काहीही न म्हणता यापुढे नेहमी 'पैलवान!' असंच म्हणणार! :)
2 Sep 2008 - 10:21 am | टारझन
आवो तात्या .. बर्रेच लोक्स मला प्रेमाने भिम(जय भिम नव्हे,म्हाभार्तात्ला भिम), (मॅथ्थ्यु)हेडन्,(अँड्र्यु )सायमंड,टायसन, बॉक्सर, सांड्,टारझन्,भाई,बिल्डर आजुन माहित नाय काय काय (कृष्णाचं रेकॉर्ड मोडणार आपण) या नावांनी कॉलवतात. पैलवान म्हणनारे तुम्ही पहिलेच :)
आमाला कुस्तीतला येक बी डाव येत नाय.. आम्ही निसतीच वजनं उचलणारी माणसं.
एक किस्सा : रेखा ही आमची १२वीची मैत्रिण, नंतर ती एम.बी.बी.एस. ला गेली आणि आम्हा कळफलक बडवे (ब निट लिहिला आहे.. प्रॉपरली वाचाचे) झालो. माझी जिगरी मित्रही बापू एम.बी.बी.एस.ला होता. आम्ही तिच्या घरी बरेच वेळा जात असू. या दोघा भाऊ-बहिणीचे केमिकल/मेडिकल लोचे सुरू झाले की मी पकत असे. मग रेखाची आइ ते कळून कधी कधी एखादा शब्द माझ्याशी बोले.पण तो एक शब्द अजुन आठवला की हसतो.त्याचं टायमिंग परफेक्ट आणि त्यांनी ज्या निरागसतेने प्रश्न विचारला ते पण परफेक्ट्च...मला एक दिवस म्हणे " तुम्ही फौजदार आहात का हो ? " तो प्रश्न विचारल्याबरोबर मी,रेखा अन् बाप्प्या एकसाथ नवज्योत सिद्धू झालो.त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला. ३०-१ मिनिटे राहून राहून परत परत हसत होतो. रेखाची आइ उत्तर न मिळाल्याने अजुनही गोंधळलेली होती. रेखाने आम्ही कोण हा खुलासा केल्यावर त्या ही हसल्या. आणि मला जाताना सल्ला दिला..तुझ्या पर्सनॅलिटीमुळे मला तसे वाटले .. राग मानू नको पण फौजदार हो भारी करियर आहे .. तुला पोरगी पण चांगली मिळेल. जात्याच खडूस आणि हटके रिप्लाय द्यायची खोड.. मी उत्तर दिले .. पण फौजदाराला एम.बी.बी.एस. पोरगी नाय मिळत हो. आणि पुन्हा हशा :)
बरेच किस्से आहेत लेका ... एखादं दिवस पब्लिश करायला हरकत नाही :)
कुस्ती-बिन-पैलवान,
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 Sep 2008 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते
जात्याच खडूस आणि हटके रिप्लाय द्यायची खोड.. मी उत्तर दिले .. पण फौजदाराला एम.बी.बी.एस. पोरगी नाय मिळत हो. आणि पुन्हा हशा
टारू, मला माहिती आहे... तू खडा मारून बघितलास, लागला तर लागला.... ;) आणि आता उगाच सांगतोस की हटके वगैरे रिप्लाय द्यायची खोड आहे म्हणून.... :) गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, काय?
बिपिन.
2 Sep 2008 - 1:32 pm | टारझन
आम्ही कशाला गाजराची पुंगी वाजवू... ज्या महाशयांसाठी आम्ही तिकडे सोबत जात असू ..तिथे आम्ही आमचाच नंबर लाऊ का ?आम्ही मुद्दाम त्या दोघांना भावा-भैनीचं प्रेम म्हणायचो :) काय राव ... आणि आम्हाला नकोच ते डागतर बगा ... अंमळ अरसिक+बोर आणि तरुण वयात महत्वाची कामे सोडून नुसता अभ्यास ? छ्या ... मग काय फायदा ? (तुरळक अपवाद सोडता)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 Sep 2008 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे
आम्हि येथे आलो ते उपक्रमामुळे. लईच वैचारिक म्हन्ल्याव डोस्क जाम व्हतयं मंग जरा "उतारा" लागतोच . तव्हा तात्याच्या नादानं आलो.
बिल्ला क्रमांक सत्तावीस
दोन आधिक सात बरोबर नउ! नव्वा फिट
प्रकाश घाटपांडे
2 Sep 2008 - 4:06 pm | धनंजय
मिपाबद्दल ऐकले, सदस्य झालो.
बिल्ला क्रमांक १२
2 Sep 2008 - 9:23 am | सुनील
सूक्ष्मात सांगायचे तर, मायबोली ---> मनोगत ---> उपक्रम ---> मिसळपाव अशी वाटचाल सांगता येईल.
(वाटसरू) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Sep 2008 - 9:27 am | ऋचा
मी कंटाळा आला म्हणुन जालावर हिंडत होते.
तेव्हा "मनोगत" मिळाली. त्यावर कोणाचातरी लेख होता नाव आठवत नाही :(
त्या लेखाला मिपा ची लिंक दिली होती.
एक महीनाभर फक्त वाचत होते.
मग मी रीतसर सदस्य झाले.
आता मला कमी कंटाळा येतो ;;)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
2 Sep 2008 - 10:19 am | यशोधरा
असंच एकदा गुगलून मिपाचा धागा मिळाला, काही दिवस येऊन नुसतंच वाचन केलं, काही दिवसांनी सभासदत्व घेतलं.
2 Sep 2008 - 12:22 pm | मनस्वी
+१
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
2 Sep 2008 - 10:26 am | आनंद
ऑर्कुटा वर तात्यांची रोशनी वाचुन मि पा चा सदस्य झालो.
2 Sep 2008 - 12:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्या एकदा घरी आले होते, त्यांचे मानलेले मामा, म्हणजे माझे मानलेले काका आमच्या घरी उतरलेले असताना! त्यांनी काहीतरी लिहून देशील का म्हटलं. तेव्हा तर वेळ नव्हता पण एकदा मिपावर नजर टाकली. तेव्हा काही फार लक्ष घातलं नाही, कारण तेव्हा खरं काम महत्त्वाचं वाटण्याचे दिवस होते. आता खय्रा कामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, आणि इथे पडलेली असते. इथेच माझी मेघना, आंद्या, धम्या, ऋचा वगैरेंशी दोस्ती झाली, (अकाली) टारूसारखा कर्तबगार (हे वाचा सांड असं) नातू मिळाला, आणि राजे, इजाभौ, पेठकर काका, सहजराव, बिपिन, शेखरभौ, सख्या, मनोबा, इनोबा, डान्या वगैरे लोकांशी गप्पा सुरू झाल्या.
मेघना म्हणते तसं आभासी जगात कोणाशी मैत्री होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण झाली. मेघना, आंद्या वगैरेंच्या वह्या चाळल्या तर आमची "उच्च" मैत्री दिसेलच! ;-) (धम्या, आंद्या त्या शिव्या जरा ह.घ्या आणि ऋचा, मेघना, ते टवळे, भवाने वगैरे सगळं प्रेमानी हां; शब्द जेवढा वाईट तेवढी आपुलकी जास्त)
आणि माझ्या विक्षिप्तपणाला आणखी एक जागा मिळाली व्यक्त करण्यासाठी!
तात्या, अंमळ धन्यवाद मिपा सुरू केल्याबद्दल, जोशीसाहेब "गमभन"बद्दल (आमच्या लिनक्स मधूनपण मराठी टाईपता येतं)!
2 Sep 2008 - 1:18 pm | बिपिन कार्यकर्ते
आता खय्रा कामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, आणि इथे पडलेली असते.
माझ्या एका शंकेचे, मी न विचारताच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.... ;)
बिपिन.
2 Sep 2008 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या एका शंकेचे, मी न विचारताच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद....
आता मित्र-मैत्रिणींकडून काहीतरी नको का शिकायला? हो ना गं, मेघना!
बाय द वे, मला जी.एम.आर.टी.वर १८ तास मिळाले आहेत त्यामुळे एकदा ते १८ तास झाले की मी खरं काम पुन्हा करणार!
2 Sep 2008 - 2:31 pm | बिपिन कार्यकर्ते
छ्या ...
फारच चांगली मैत्री आहे तुमची दोघींची... मला शंका फक्त एकिबद्दलच होती... तू तिला पण ओढली गाळात... ;)
बिपिन.
2 Sep 2008 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फारच चांगली मैत्री आहे तुमची दोघींची... मला शंका फक्त एकिबद्दलच होती... तू तिला पण ओढली गाळात...
मेघना, बघ हे काय केलंस तू? साधी, भोळी, गरीब बिचारी होते मी, आता लोकं मला सरळ गाळातलीच समजतात! :-(
सगळा कचरा माझ्या रेप्यूटेशन आणि इमेजचा! ;-)
(मैत्रीण) अदिती
2 Sep 2008 - 2:53 pm | टारझन
साधी, भोळी, गरीब बिचारी होते मी,
=)) =)) =))
साध्या भोळ्या आज्जी ... अर्ध्या गौर्या खपल्या का काय ?काम नसेल एक काम करा .. अंतराळातुन कोणी एलियन शत्रु येतोय का पहा ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 Sep 2008 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साध्या भोळ्या आज्जी ... अर्ध्या गौर्या खपल्या का काय ?काम नसेल एक काम करा .. अंतराळातुन कोणी एलियन शत्रु येतोय का पहा ?
कोणाचा शत्रु? :?
2 Sep 2008 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते
बाय द वे, मला जी.एम.आर.टी.वर १८ तास मिळाले आहेत त्यामुळे एकदा ते १८ तास झाले की मी खरं काम पुन्हा करणार!
खरं काम पुन्हा करणार की पुन्हा खरं काम करणार? फरक आहे बरं... पहिला ऑप्शन असेल तर पुन्हा पुन्हा तेच काम करायला कट्टाळा येत नाही व्हय तुमास्नी? ;)
बिपिन.
2 Sep 2008 - 1:40 pm | सर्किट (not verified)
शब्द जेवढा वाईट तेवढी आपुलकी जास्त
गहिवर गहिवर म्हणतात तो हाच !
ए भवाने, टवळे ;-)
(आपुलकीने म्हणतोय ;-)
तुझे नाव मी आजपासून ताती ठेवतोय. कारण आमचे परममित्र तात्या, त्यांच्या खास जवळच्या लोकांसाठी असे वाईट शब्द वापरतात. त्यांचा मनोगत प्रशासकांना उद्देशून लिहिलेला लेख त्यांच्या अनुदिनीवर वाचा. तात्याचे मनोगतावर किती प्रेम आणि आपुलकी आहे, ते लक्षात येईल.
-- सर्किट
2 Sep 2008 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गहिवर गहिवर म्हणतात तो हाच !
=))
पण धम्या घाबरला होता मला, काय रे, हो ना?
ए भवाने, टवळे
हो ती मीच.... बय्राचदा! ;-)
आपुलकीने म्हणतोय
आपल्या आपुलकीमुळे माझं डोळे भरून आले, रुमाल ओला झाला .....
आपल्या आपुलकीबद्दल मला अपरंपार आदर आहे! म्रूगनयने, बरोबर बोल्ले ना?
तुझे नाव मी आजपासून ताती ठेवतोय.
जिथे जन्मदात्रीनेच मला अनेक नावं ठेवली/दिली आणि मी स्वतःही, तिथे तुम्ही नावं देताय, ती काय आहेत याचा कुठे हिशोब मांडणार मी?
आणि शेवटी नावात काय आहे हो, कसं?
जाउ दे, फार पकवलं आता, जरा गप गुमान काम करण्याचं नाटक करते! :-D
अदिती (हे ही एक खोटं नाव)
2 Sep 2008 - 5:54 pm | मेघना भुस्कुटे
यमे,
तू माझ्याकडून काय शिकलीस त्याचा आधी खुलासा कर बघू. मग आपण पुढचं बघू. ;)
बाकी शब्द जितका वाईट तितकी आपुलकी जास्त, हे मिपाच्या बाबतीत खरंच आहे. कारण मी इथे जेव्हा असले वाईट-साईट ( =)) ) शब्द वापरते, तेव्हा मला माहीत असतं समोरचा माणूस तो कुठल्या संदर्भात वाचणार आहे. हे समजणार्या माणसांनाच उद्देशून मी ते शब्द वापरते. बाकी कामाच्या ठिकाणी आपण असला विक्षिप्तपणा दाखवू शकत नाही. पण मिपाचा अपवाद. मी यमीला 'नालायक गधडी' म्हणू शकते, आणि ती मला 'टवळे, भवाने'! ही सवलत सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या माणसांसाठी नाही, हे उघडच आहे.
बाकी बिपिन (हे नाव मी लहानपणी 'बिपिन बुकलवार गोष्ट सांगतो'मधे प्रथम वापरलं होतं, त्यानंतर आज!),
तुम्हांला कसली शंका होती, बोला बघू!
2 Sep 2008 - 6:11 pm | विसोबा खेचर
बाकी बिपिन (हे नाव मी लहानपणी 'बिपिन बुकलवार गोष्ट सांगतो'मधे प्रथम वापरलं होतं, त्यानंतर आज!),
तुम्हांला कसली शंका होती, बोला बघू!
आयला! मेघनाताई एकदम फॉर्मात दिसताहेत! :)
तात्या.
2 Sep 2008 - 12:13 pm | डोमकावळा
आंद्या कडूनच कळाले....
त्याच्या मागे मागे मनोगता मग उपक्रम, मिपा...
आणि आता लोकायत सुद्धा...
2 Sep 2008 - 12:26 pm | शिंगाड्या
आधी मनोगत..मग मिसळपाववर्..अगदी पहील्या दिवसापासुन वाचक..(पन आता लिखाणही करायला हवे)..
2 Sep 2008 - 12:36 pm | II राजे II (not verified)
आम्ही तात्यांना मनोगतपासून ओळखतो... निलकांत तर्फे कळाले व येथे आलो ;)
व येथे जो मित्र वर्ग भेटला आहे.. सगळी कडे आनंदी आनंदच आहे =))
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
2 Sep 2008 - 12:48 pm | सर्किट (not verified)
तेच तर सांगत होतो "इतिहासातून". पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी इथे आलो, त्यांनाच इतिहास नकोसा झाला. मग काय सांगणार *ट ?
-- सर्किट
2 Sep 2008 - 1:53 pm | ऍडीजोशी (not verified)
मी मिपा वर असाच फिरत फिरत येउन पोचलो. इथे येउन पहातो तर संचालक पदावर विसोबा खेचर. लगेच मिपा चा सभासद झालो. नी त्यानंतर फुल्ल टू धतींग सुरु झाली. आता तर सकाळी ऑफीस मधे आल्या आल्या जे मिपा वर लॉग-इन होतो ते जातानाच लॉग-आउट करतो. सदैव पडीक.
इथे बरेच चांगले मित्र मिळाले. मिपा मुळेच माझ्या आयुष्यातल्या एका विकांताची संध्याकाळ फळांचे "ताजे" रस पिण्यात गेली.
आणि मुख्य म्हणजे मिपा वर येऊन मी लिहीता झालो. ह्या बद्दल मी मिपा चा सदैव ॠणी राहीन.
मिपा काढणार्या तात्या साहेबांचा विजय असो.
2 Sep 2008 - 1:58 pm | अभिज्ञ
आम्ही येथे यावयास कारण म्हणजे "धोंडोपंत".
अर्थात वैयक्तीकरित्या ते आम्हाला ओळखत नाहीत वा आम्ही त्यांना.
आम्हाला विरोपाने कोणीतरी "हुकलेली संधी" पाठवली होती.
ती वाचून आम्ही तर ह्या प्रतिभेपुढे चाटच पडलो. मग त्या अनुषंगाने बाकिचे लेख हि वाचून काढले.
सर्किट रावांचा "पालकांची अमेरिकावारी" ह्या विषयावरील लेखहि तेंव्हा वाचनात आला होता.
परंतु हा लेख का उडवला गेला ते माहित नाहि.
http://www.misalpav.com/node/338
नवीन सदस्यांनी हि
http://www.misalpav.com/node/361
संधी हुकवु नये. ;)
अभिज्ञ.
2 Sep 2008 - 2:45 pm | आनंदयात्री
अहाहा .. संधीची काय आठवण काढलित अभिज्ञराव !! काय सुरेख लिहली होती पंतांनी ती कविता .. नंतर त्यांची रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहिलीच नाही तशी परत, या पंत .. लिहा पुन्हा सुरेख तसे.
2 Sep 2008 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते
च्या मारी... हे बघितलंच नव्हतं.... आत्ता बघितलं.... आता या पुढे कार्यालयातून मिपा बघायचे नाही असा पुनर्निर्धार केला (कितव्यांदा ते माहित नाही) .... वेड्यासारखा हासलो आणि मग खूप जोरात पडली मला .... :(
बिपिन.
2 Sep 2008 - 3:25 pm | लिखाळ
मला तो लेख दिसत नाही. तो जालावर 'इतरत्र' आहे का?
--लिखाळ.
3 Sep 2008 - 7:45 am | सर्किट (not verified)
सर्किट रावांचा "पालकांची अमेरिकावारी" ह्या विषयावरील लेखहि तेंव्हा वाचनात आला होता.
परंतु हा लेख का उडवला गेला ते माहित नाहि.
पालकांची अमेरिकावारी हा लेख उडवला गेलेला नाही. हा लेख मिपावर प्रकाशित झाल्यानंतर, थोड्याच दिवसात मिपावर आणी बाणि सुरू झाली, त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यापूर्वी प्रकाशित केलेले आमचे बरेच लेख येथून स्वतःहूनच काढून टाकले. नंतर आम्ही सुमारे तीन महिने वाचनमात्र होतो. तसे असताना, ह्या आणिबाणीतून सुटका, ही आम्ही दूर राहून होणार नाही, हे लक्षात आले म्हणून.
हा लेख http://thebhandarkars.com/milind/archives/102 येथे दिसेल.
-- सर्किट
2 Sep 2008 - 2:02 pm | नीलकांत
मला तात्यांनी मिसळपाव वर बोलावलं. आधी उपक्रमवर चर्चा करायचे. मग त्यांनी फोन करून बोलवूनच घेतलं.
तरी येथे येई स्तोवर अंमळ उशीरच झाला होता. माझा बिल्ला क्रं ३२ आहे. ;)
नीलकांत
2 Sep 2008 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर
कसे आलात ?
यजमानांच्या आमंत्रणावरून आलो मिपावर.
सोर्स काय ?
श्री. तात्यासाहेब अभ्यंकर फ्रॉम 'मनोगत'.
का आलात ?
आयला, का आलात म्हणजे? दमातच घेताय की. तात्यासाहेब आमचे (बैठकीतले) मित्र आहेत. आणि मित्राच्या सत्कार्यात आपलाही सहभाग असावा ह्या विचाराने आलो.
इथे काय आवडलं
जे नाही आवडलं ते सोडून सर्व.
काय नाही
लेखनस्वातंत्र्याचा गैरवापर.
2 Sep 2008 - 2:12 pm | ऋषिकेश
मनोगतावरील "गणपतीला तीन डोळे असतात का?" या माझ्या चर्चेत प्रियालीताईने एक उपक्रमाचा आणि एक मिसळ्पावचा असे दोन दुवे संदर्भासाठी दिले होते (त्यातला एक उडवला गेलाय :) ओळखा पाहू )
ते वाचायला म्हणून मी इथे आलो. तेव्हा तर आणीबाणी नसलेले दिवस होते. मग वातावरण किती स्वतंत्र असेल विचार करा ;)
सारं काहि मस्त होतं..
सर्कीटरावांचा "वारी" वरील लेखाला मी दिलेला प्रतिसाद हा इथला पहिला प्रतिसाद.. पुढे काहि दिवस दोन्ही स्थळांवर लिखाण करत होतो. नंतर इतर ठिकाणी ललित लेखन बंद केले .. फक्त मिपा.. आणि आता तर इथे पूर्णपणे रमलो आहे.
-(बिल्ला# २७०) ऋषिकेश
मु.पो. मिसळपाव
2 Sep 2008 - 3:07 pm | लिखाळ
इतिहासाचे ऋण आहेतच हो! इतिहास वाचतो आणि साक्षीपण आहे त्यामुळे कळंतंच राहतं. (आणि थोडासा इतिहास माहित असल्याने अधून मधून आलेल्या 'ऐतिहासिक लाटे' दरम्यान फार कंटाळवाणे होत नाही.. हा त्याचा फायदा.)
मनोगत > उपक्रम > मिपा असा प्रवास. (मनोगत आणि उपक्रमामधल्या जागेत ब्लॉग, याहू ग्रुप :) वगैरे !)
मिपा चालू होणार हे माहित असल्याने लक्ष ठेउनच होतो पण प्रियालीने व्यनी मधून लक्ष वेधले आणि लगेच रुजू झालो.
पिवारचे अनेकांचे लेखन आवडते.
लेखन स्वातंत्र्याचा अतिवापर आणि गैरवापर आवडत नाही.
तसेच विभक्तीप्रत्यय शब्दाला चिकटुन न लावण्याची अनेक मिपाकरांची सवय आवडत नाही.
शुद्धलेखन आणि भाषा या भाषेच्या मह्त्त्वाच्या दोन आयामांवर चर्चा करायची बंदी आवडत नाही.
बाकी मिपाकर असण्यात मजा आहे.
सध्या साधे बोलताना सुद्धा कुणाचे बोलणे खोडून काढले की 'प्रतिसाद उडवला' असे मनात येते.
मनोगत-उपक्रम-मिपा यांवरील वावराने चांगले स्नही मिळाले याबद्दल आभारी आहे.
--लिखाळ.
2 Sep 2008 - 3:14 pm | आनंदयात्री
>>तसेच विभक्तीप्रत्यय शब्दाला चिकटुन न लावण्याची अनेक मिपाकरांची सवय आवडत नाही.
आमच्या सारख्या ऐर्या गैर्या नथ्थु खैर्यांना समजेल अशी या वरच्या वाक्याची उकल सांगता का लिखाळराव ?
2 Sep 2008 - 3:23 pm | लिखाळ
अहो ! ऐर्य गैर्या काय म्हणता ! आणि उकल कसली त्यात !
'लिखाळाने' मधला ने हा एक प्रत्यय आहे. मिपावर अनेक जण अगदी लेखाच्या शीर्षकातसुद्धा ने, ला इत्यादी प्रत्यय वेगळे लिहितात असे पाहिले आहे. मी पुरावे देत बसणार नाही.
मला तरी व्याकरण कुठे समजते ! पण ते समजावे अशी इच्छा आहे. आणि मिपावरच्या अनेकांना व्याकरणाची उत्तम जाण आहे. त्याचा फायदा मिळावा अशी इच्छा आहे. असो.
--लिखाळ.
2 Sep 2008 - 3:27 pm | आनंदयात्री
>>अहो ! ऐर्य गैर्या काय म्हणता !
आहोत म्हणुन !
>>आणि उकल कसली त्यात !
उकलच की .. ते वाक्य आमच्या डोक्यावरनं पार जिओस्टेशनरी ऑरबिटमधनं गेलं होतं, म्हणुन उकल शब्द वापरला.
अच्छा म्हणजे 'लिखाळाने' योग्य अन 'लिखाळा ने' हे चुक, असे का ?
बर तसे लिहले तर काय फरक पडतो असा ?
2 Sep 2008 - 3:36 pm | लिखाळ
आपण माझ्या प्रतिसादातील मताला दाखवलेल्या स्वारस्याबद्दल आभार.
माझे नीरिक्षण आणि मत मी नोंदवले. मी व्याकरणज्ञ नसल्याने यावर मी अधिक चर्चा करु शकत नाही.
याउप्पर काही बोलायचे असल्यास खरडवहित बोलूया का? ..इथे विषयांतर होत आहे असे वाटते.
--लिखाळ.
2 Sep 2008 - 3:17 pm | cnt
GREAT !!
2 Sep 2008 - 3:39 pm | डूर्क्या
मी फार काहि साहित्य वाचनारा मुळिच नाहि. लिखान करने तर फार दुर. पण काहि चांगल वाचायला मिळाले कि अवडिने वाचतो. माझ्या एक मित्राने मला मि.पा. बदद्ल सांगितले. एकदा मि.पा. वर आलेला परत परत येतच रहातो. मी ही रोज येतोच.
3 Sep 2008 - 2:57 am | पिवळा डांबिस
आता कसा आलो, आनि का आलो?
म्हंजे त्येचं काय जालं बगा,
कुटं काय म्हराटी वाचायला गावतंय का ह्ये हुडकीत जालावर भटकत होतू.
तवा एके दिशी ह्या तात्या आभ्यंकराचा बलॉग सापडला...
मानूस तर लई इरसाल वाटला. त्याची ती खास देवगडी ओळख वाचून लई मज्जा वाटली म्हनून तेचा बलॉग समदा वाचून काहाडला....
लिखान लई आवडलं म्हनून थितं येत र्हायलो, आन एके दिशी त्यानं मिसळपावाचा कट्टा उगडलाय म्हनून म्हायती पडलं की वो....
मंग काय! हितं आलो आन मेंबर झालो.....
काय उगीच हितं कायतरी पर्तिक्रिया (म्हराटीत फीडबॅक!) द्येत होतू....
काय नाय, उगीच आपलं, हितं-थितं, काय-बाय!
तशी दोसदार पन गावले, इसोबा, डॉन्या, ईन्या, धम्या, आन इजुभावसारके आनि अनेक...
मग काय, तवापासून तर उनाडक्यांना ऊतच आलाय की वो.....
;)
3 Sep 2008 - 8:33 am | डॉ.प्रसाद दाढे
मी सात सालच्या डिसेम्बर महीन्यात मिसळपाववर प्रविष्ट झालो. सागरने माझे स्नेही वि.ग.कानिटकर या॑च्या खूप गाजलेल्या नाझी भस्मासूराचा उदयास्त ह्या पुस्तकावर चर्चा चालवली होती. माझा मित्र सतलज भडकमकर (मास्तर) ह्याला माझा दुसर्या महायुद्ध विषयातला रस माहीत होता. त्याने ती सर्व चर्चा विरोपावर पाठवून मला मिसळपाववर ओढले.
तसाही झणझणीत मिसळ हा माझा अत्य॑त आवडता पदार्थ. त्याचा तो॑डाला पाणी आणणारा फोटो पाहून मी आणखीनच आकृष्ट झालो. अर्थात तात्या॑शी सूर जुळले कारण पुल, स॑गीत आणि साहित्य ही आम्हा दोघा॑ची मर्मब॑धातली ठेव! मिपावरील रामदास, पि.डा, विजूभाऊ, मास्तर या॑च्या लेखनाचा मी जबरदस्त फॅन आहे.
मिपा कट्ट्याच्या निमित्ताने पेठकरकाका॑शी ओळख झाली, काय माणूस आहे! पर्सनॅलिटी तर रूबाबदार आहेच पण बोलणे समोरच्याची दा॑डी गुल करणारे आहे. मीतर खलासच झालो.
विजूभाऊ हे मिपामुळे बनलेले आणखीन एक मित्र. हेही एक अफलातून रसायन आहे. अफाट वाचन, सुरेख भाषा.. क्या बात है!
असली एक से एक अफलातून वल्ली मिपामुळे माहीत झाली.
आता मिसळपाव माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनले आहे (जसे काश्मीर भारताचा..इ.इ.) एखादा दिवस मिपावर नाही येऊ शकलो तर काही तरी चुकल्यासारखे वाटत राहते :)
3 Sep 2008 - 11:23 am | ब्रिटिश
माज्या यका दोस्तानं मिपा ची साइट दाकवली.
"रोशनी" वाचली तात्यांची न मंग वाटला आपन बी लीवून बगू क जमतय क ते
पन जल्ला लीवाला येल भेटत नाय.
जे भना वांदा नाय आक्कं आयुक्श परलय
मदुन मदुन यत रावू भेटत रावू
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला नावानच सगला हाय)
3 Sep 2008 - 6:03 pm | विजुभाऊ
ओर्कुट वर कोणीतरी मला या संस्थळाचा पत्ता दिला . मी सर्वप्रथम "टाळण्याची कला" वाचली आणि त्या नन्तर मिपाला टाळूच शकलो नाही.
पिवळा डाम्बीसाची डाम्बीस उत्तरे / कोलबेरकाकांचे बेरकी जबाब आणि धमाल मुलगा , डॉ दाढे यांचा जसजसा परिचय झाला तसतसा मी साईटला ऍडीक्ट झालो.
मिपा मुळे मी लिहिता झालो.
एका कट्ट्यावर भेटलेले मिपाकर मला एक विलक्षण ठेवा देउन गेले.
मला पुन्हा एकदा आमच्या एकत्र कुटुम्बातल्या जुन्या घरात गेल्यासारखे वाटले. जिथे आम्ही सगळे भावंडे मिळुन धमाल उडवायचो. गम्मत रुसवे फुगवे टारगटपणा अगदी सगळे तसेच
राखी पौर्णीमेला सकाळी सकाळी आलेला स्वाती राजेश चा फोन हा एक सुखद धक्का होता.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Sep 2008 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्यांना विचारले,
मिसळपाव सुरु झाले का ? ते म्हणाले हो, आणि आम्ही सभासद झाले. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(बिल्ला क्र. २८)
4 Sep 2008 - 12:22 pm | झकासराव
तात्यांनी त्याच्या आरकुटातल्या दोस्त लोकाना हे संकेत स्थळ सुरु केल्यावर लिन्क धाडुन दिली होती.
त्या सुताच्या आधारे हा स्वर्ग गाठला.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
9 Sep 2008 - 8:04 pm | १.५ शहाणा
मिसळ चे चित्र कुठे मिळते का. म्हणून 'मिसळपाव' असे गूगलवले. तिथे हि लिंक मिळाली. स्थळ आहे. १-२ लगेच वाचले. आणि मिपाचा शोध सदस्य झालो मिपाचा.
9 Sep 2008 - 8:32 pm | मनिष
योगेश च्या ह्या लेखाने सदस्य झालो, अणि इथेच रमलो, लिहिण्यापेक्षा वाचतोय जास्त आताशा... ;)