कलेवराचा उत्सव?

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
6 Oct 2015 - 10:56 am
गाभा: 

लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा.

नमस्कार,

लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही.

सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला.

त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा.

'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो.

उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे.

सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही.

संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही.

आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो.

ब्लॉग दुवा हा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

6 Oct 2015 - 6:48 pm | अन्या दातार

४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही?
वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.

मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.

मांत्रिक's picture

13 Oct 2015 - 7:25 pm | मांत्रिक

पब वगैरेविषयी टिपणी नाही. कारण ती मला आवडणारी गोष्ट नाही. साहजिकच त्याबाबत मौनच पाळतो.

आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही.
.
कसे ते आत्ता लिहू शकत नाही.
धन्यवाद.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:08 am | वेल्लाभट

हरकत नाही :) जमेल तेंव्हा लिही.

तर्राट जोकर's picture

6 Oct 2015 - 7:11 pm | तर्राट जोकर

मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार.

लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.

दत्ता जोशी's picture

6 Oct 2015 - 7:14 pm | दत्ता जोशी

"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे."
+१०००
अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.

दत्ता जोशी's picture

6 Oct 2015 - 7:21 pm | दत्ता जोशी

अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).

एस's picture

6 Oct 2015 - 7:22 pm | एस

छान, संयमित उत्तर दिले आहे.

आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत
१. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे.
२. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे.
३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत.
४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:10 am | वेल्लाभट

एक्झॅक्टली

यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.

पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत?
ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:32 am | वेल्लाभट

ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.

बरं...

आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.

आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते.

आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.

वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे.
----------------------------------------------

ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.

हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे!
आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.

जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.

ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?

ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.

खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का?

एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!

आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस??
हो

बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे"
काहीही हं भाकरी

म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत?
थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही.

आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा.

एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!
अगेन, व्हेरी फनी.

प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.

भाकरी's picture

7 Oct 2015 - 6:39 pm | भाकरी

आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस??
हो

....... काय बोलणार यावर?

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:33 am | वेल्लाभट

आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

तुम्हीच म्हणालात !

मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 9:48 am | अंतरा आनंद

मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे.
स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे.
स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते.
अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं.
आता मूळ लेखावर...
छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं
’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".

त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.

कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.

निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.

हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:45 am | वेल्लाभट

ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.

वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.

मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.

शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये

मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं.

असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.

माझीही शॅम्पेन's picture

7 Oct 2015 - 4:47 pm | माझीही शॅम्पेन

+१००००

संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला

जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 10:01 am | अंतरा आनंद

भाकरी यांचा ता.क. आवडला. (इथे प्रतिसाद संपादनाची सुविधा नाही का? म्हणजे हे वाक्य माझ्या मूळ प्रतिसादात टाकता आलं असतं.)

अनुप ढेरे's picture

7 Oct 2015 - 10:50 am | अनुप ढेरे

पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.

यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 12:19 pm | टवाळ कार्टा

हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे

अनुप ढेरे's picture

7 Oct 2015 - 12:28 pm | अनुप ढेरे

पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?

चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.

पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?

टोकाचा निष्कर्ष. असो.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 2:40 pm | टवाळ कार्टा

हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:10 am | वेल्लाभट

तर्राट जोकर, दत्ता जोशी, स्वॅप्स, मदनबाण, बोका
तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सॅपचा अंगठा !

एक सामान्य मानव's picture

7 Oct 2015 - 12:05 pm | एक सामान्य मानव

लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार?
दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा.
यावर लेखकाने मत मान्डावे...
(अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..)
आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा
एक सामान्य मानव...
(अक्षराला हसू नये)

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 2:36 pm | वेल्लाभट

भाकरी यांना दिलेला प्रतिसाद बघावा त्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी_माणूस's picture

7 Oct 2015 - 12:22 pm | मराठी_माणूस

मोठ मोठे आवाज ऐकण्याची सक्ती करणे हे अमानवीय आणि क्रुर आहे.

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 12:42 pm | सतिश गावडे

माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही.

ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 12:54 pm | तर्राट जोकर

---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ----

साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 1:28 pm | दत्ता जोशी

उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.)
अंतरा ताई,
बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते.
मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो.
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार
अरे बापरे !
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते.
समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:39 pm | सतिश गावडे

अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.

दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते.

आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे.

सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.

अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.

+१

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 2:38 pm | अंतरा आनंद

बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.

पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.

ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.

नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 2:39 pm | वेल्लाभट

अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच

तो उन्माद नसतो हो....
उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.

यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही.

+१

उत्सव साजरे करणाऱ्या तरुणाईला " कलेवराचा" उत्सव म्हणणे हा कोणता जिवंत पण आहे हे कळले नाही.

सर्वसाक्षी's picture

7 Oct 2015 - 1:46 pm | सर्वसाक्षी

मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो.

कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले.

अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का?

बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच.

जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 2:39 pm | अंतरा आनंद

जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

अगदी अगदी.

चैतन्य ईन्या's picture

7 Oct 2015 - 3:14 pm | चैतन्य ईन्या

हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 3:28 pm | वेल्लाभट

प्रतिसादाशी सुरुवातीच्या ५ वाक्यांपुरता सहमत.

ढोल ताशे आता दहिहंडी, नवरात्र, शिवजयंती यांच्यातपण असतात. (पुण्यात दिसतात) फक्त गणेशोत्सवामध्ये वाजवतात हे म्हणणं चूक आहे.

राही's picture

7 Oct 2015 - 3:05 pm | राही

शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत.
शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 3:29 pm | वेल्लाभट

If playing Dhol on the streets during festival is उन्माद then I don't know what उन्माद is.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 3:34 pm | दत्ता जोशी

मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का
अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
"माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "...
काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 3:44 pm | दत्ता जोशी

दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते.

काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे.

बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.

अनावश्यक महापुरुष कोणते?

ते नै का पोस्टरात प्रकट होतात ते...

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 4:01 pm | अंतरा आनंद

मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.

पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.

मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.

सुनील's picture

7 Oct 2015 - 4:04 pm | सुनील

बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही

हे अनावश्यक महापुरुष कोणते???

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 4:20 pm | दत्ता जोशी

"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही."
बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.
"अनावश्यक महापुरुष" नाही.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 4:21 pm | तर्राट जोकर

ज्यांच्या जयंतीला डीजे लावून नाच होतो असे महापुरूष एकच आहेत भारतात...

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 4:29 pm | प्यारे१

नै वो. प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे असे एक एक आहेत.
वाटून घेतलेत आपसात.

अंतरा आनंद's picture

7 Oct 2015 - 4:30 pm | अंतरा आनंद

अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके).
आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 5:09 pm | दत्ता जोशी

ओ TJ भाऊ!

लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 5:15 pm | दत्ता जोशी

किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?

वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्‍यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 5:07 pm | दत्ता जोशी

अहो ताई,
आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 5:59 pm | दत्ता जोशी

"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली "
विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय!
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 6:01 pm | बॅटमॅन

उगी उगी हां. अचं नै कलाचं! फार जळजळ होत असेल तर इनो घ्या.

मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.

हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.

राही's picture

7 Oct 2015 - 6:19 pm | राही

सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर?
कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 6:29 pm | दत्ता जोशी

याला मी उत्तर देणार नाही.

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 6:10 pm | दत्ता जोशी

"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.
काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते.

असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 6:13 pm | बॅटमॅन

तिसर्‍या अवताराबरोबर मल्लविद्येचे प्रयोग करायची इच्छा नाही, तस्मात पास.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 6:30 pm | तर्राट जोकर

__/\___

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 6:34 pm | दत्ता जोशी

विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि.
पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते.

बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 9:19 pm | दत्ता जोशी

धन्यवाद, बॅटमॅन. हक्काने अरे तुरे म्हटलेलं चालेल का?

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 9:43 pm | बॅटमॅन

चालणार नाही. पळेल मात्र.

एवढ्या वेगाने निचरा झालेला आज पहिल्यांदाच बघ्तोय....

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 6:35 pm | प्यारे१

+१
अनावश्यक महापुरुष दत्ता जोशी यांचा निषेध. ;)

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 6:47 pm | दत्ता जोशी

+१. प्यारे भाऊ. सर आन्खोपर. :-)

काळा पहाड's picture

7 Oct 2015 - 8:57 pm | काळा पहाड

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 9:27 pm | टवाळ कार्टा

+१११११११

माझीही शॅम्पेन's picture

7 Oct 2015 - 9:33 pm | माझीही शॅम्पेन

+ ११११११

अगदी अचुक !!!!

त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

नावांची टक्केवारी बघता जास्त करुन हिंदूंच्या सणावरच तुमचा रोष दिसतोय.
-भगवा झेंडा

+१११११११११११११११११११११११११११

हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर.
आवडले.
काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते.
तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट.
मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2015 - 10:41 am | पिलीयन रायडर

अहाहाहा!!!

काय प्रतिसाद लिहीलाय हो!!

सुबोध खरे's picture

8 Oct 2015 - 9:15 pm | सुबोध खरे

@काळा पहाड
अचूक नेम +100

जातवेद's picture

13 Oct 2015 - 2:15 pm | जातवेद

+११११११

नाखु's picture

16 Sep 2018 - 8:52 pm | नाखु

पहाडी आवाजात कडकड झालाय?
सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी
डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु.

इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता.
पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले.
त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

चांदणे संदीप's picture

7 Oct 2015 - 11:12 pm | चांदणे संदीप

या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का!

कावळा लागला थुईथुई नाच करू
तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची...

...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो...

धन्यवाद!

दिवाकर कुलकर्णी's picture

8 Oct 2015 - 12:31 am | दिवाकर कुलकर्णी

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.
एकदम सही

सह्यमित्र's picture

8 Oct 2015 - 1:44 pm | सह्यमित्र

एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.

ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा

तरीच म्हटले अजून सवाईचा उल्लेख कसा कोणी केला नाही...

सह्यमित्र's picture

8 Oct 2015 - 3:10 pm | सह्यमित्र

विषयाशी निगडीत आहे म्हणून केला. बाकी चालू द्यात.

दिवाकर कुलकर्णी's picture

8 Oct 2015 - 12:39 am | दिवाकर कुलकर्णी

एकदम सही काला पहाड़ याची प्रतिक्रिया
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती,
काळा पहाड - Wed, 07/10/2015 - 20:57

रेवती's picture

8 Oct 2015 - 2:24 am | रेवती

माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून?
जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे.
मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते.
पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 2:32 pm | वेल्लाभट

ब...र !

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा

प्रचंड सहमत

बॅटमॅन's picture

8 Oct 2015 - 12:27 pm | बॅटमॅन

वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 8:38 am | तर्राट जोकर

इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 10:09 am | तर्राट जोकर

म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 7:37 pm | तर्राट जोकर

तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 2:31 pm | वेल्लाभट

कुणाचं काय तर कुणाचं काय.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 2:37 pm | वेल्लाभट

एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं.
आणि हा १०० वा प्रतिसाद.

च्यामारी फुल टू उन्माद !

प्यारे१'s picture

8 Oct 2015 - 2:40 pm | प्यारे१

संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो!
एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये.

एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

भीमराव's picture

8 Oct 2015 - 3:58 pm | भीमराव

पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो.
ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत.
किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच.
हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे.
का? काय म्हायत।

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 4:27 pm | तर्राट जोकर

हेच मत आमचे....

पैसा's picture

8 Oct 2015 - 4:16 pm | पैसा

त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 4:54 pm | वेल्लाभट

हे इनडोअर चांगलं वाटेल तै.
भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको?

हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही.

ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही.

रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

पैसा's picture

8 Oct 2015 - 7:41 pm | पैसा

माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार.

राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे.

आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच.
तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो.
सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल.
अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

प्यारे१'s picture

8 Oct 2015 - 6:17 pm | प्यारे१

>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल.

फारच आशावादी ब्वा तुम्ही!
(उपरोधानं लिहीतोय)

काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 11:00 pm | वेल्लाभट

ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.

प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन

तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

एक सामान्य मानव's picture

9 Oct 2015 - 2:18 pm | एक सामान्य मानव

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

_मनश्री_'s picture

8 Oct 2015 - 8:11 pm | _मनश्री_

त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव

एखाद्याचा जीव गेला तरी चालेल ,
पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत

कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

वेल्लाभट's picture

8 Oct 2015 - 11:02 pm | वेल्लाभट

ग्रँड या शब्दावरून पुन्हा जो विपर्यास झालाय तो हास्यास्पद आहे. Absolutely childish.

Ok this has now become a series of baseless arguments. So; I am done.

तुमचं चालूदे.

चांदणे संदीप's picture

9 Oct 2015 - 12:07 am | चांदणे संदीप

ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी!
ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल.
तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला.
म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली!
तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात...
कावळा लागला थुईथुई नाच करू
आपण मोर आहोत असंच मनात समजून
कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून
तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची!
माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला
त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी
कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती
तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता
ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई
त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी!
डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप!
त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल
तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र
आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा
खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या!
- कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____
बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून!
धन्यवाद!
Sandy

तर्राट जोकर's picture

8 Oct 2015 - 11:54 pm | तर्राट जोकर

धागालेखकाच्या मूळ उद्देशाचा फालुदा होने मिसळपाववर विशेष नाही असे दिसते. एवढ्यातले काही धागे बघितले तर कळोन आले.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 10:46 am | टवाळ कार्टा

संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य
पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले
आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

सतिश गावडे's picture

9 Oct 2015 - 11:05 am | सतिश गावडे

हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही.

त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे.

मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे.

माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता.

दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 11:21 am | टवाळ कार्टा

या नाचणार्यांच्या घरचे पालक संस्थळांवर हे सगळे किती वाईट असे टायपत बसलेले असू शकतील :)

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 2:27 pm | बॅटमॅन

आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 3:44 pm | अस्वस्थामा

मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत.
तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

प्यारे१'s picture

9 Oct 2015 - 3:58 pm | प्यारे१

थोडक्यात
ढोल वाजतो, वाजतो वाजतो ढोल वाजतो,
ढोल सगळ्यांचा वाजतो, वाजतच राहतो!

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 4:05 pm | बॅटमॅन

आं?

त्रास होतो असे म्हणणार्‍यांनी "हे असेच चालायचे" असे कुठे म्हटलेय?

अस्वस्थामा's picture

9 Oct 2015 - 4:56 pm | अस्वस्थामा

माझा निर्देश या प्रतिसादाशी होता.

अत्रन्गि पाउस's picture

9 Oct 2015 - 11:35 am | अत्रन्गि पाउस

कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे ..

आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ...

आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ...
परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे

जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2015 - 1:55 pm | श्रीगुरुजी

"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे.

सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत.

खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धर्मराजमुटके's picture

9 Oct 2015 - 4:26 pm | धर्मराजमुटके

धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते.
त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो.

गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.

टीप : ३०० होतील ना आता ?

तर्राट जोकर's picture

10 Oct 2015 - 4:37 pm | तर्राट जोकर

नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.

जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा.

माझा एक जेन्युईन प्रश्न,

तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार??

१९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते.

सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते.

इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत.

तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का?

तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

वेल्लाभट's picture

13 Oct 2015 - 1:42 pm | वेल्लाभट

व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी.

मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी
http://www.misalpav.com/comment/752417
या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना.
सो;

तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा.

आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:00 pm | रेवती

तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

प्यारे१'s picture

13 Oct 2015 - 6:05 pm | प्यारे१

कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय????

मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा.
मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;)

कळावे,
आ. न.
प्यारे पैलवान

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 6:19 pm | टवाळ कार्टा

त्याच्याकडे बुचं पण हैत असे ऐकून आहे =))

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2015 - 2:16 pm | पिलीयन रायडर

अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर..

आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

अशं नै बोलाचं बाबा. आमाला लाग येतो मग.

आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना

मस्त. आवडले.

हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 2:29 pm | टवाळ कार्टा

खिक्क

आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

तुमचा काय अनुभव आहे? ;)

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2015 - 2:44 pm | पिलीयन रायडर

मले काय ठावे बाबा..
मी तरी आजवर लोकांना माझी मतं पटवणे हेच एकच उदात्त कार्य करत आहे..

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 2:49 pm | टवाळ कार्टा

शहाणे करूनी सोडावे सकळजन =))

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2015 - 2:54 pm | पिलीयन रायडर

त्याचसाठी हे अवतारकार्य... त्याचसाठी हा अट्टाहास...

मोदक's picture

13 Oct 2015 - 3:07 pm | मोदक

मले काय ठावे बाबा..

तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;)

ऑन अ सिरीयस नोट,

१) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?"
२) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा"
२.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक!

हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.