क्रिकेट

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
1 Oct 2015 - 12:59 pm

क्रिकेटवर मी पूर्वी ३-४ धागे काढले होते. प्रत्येक धागा एका विशिष्ट मालिकेसाठी/स्पर्धेसाठी होता. ती मालिका/स्पर्धा संपल्यावर धाग्याचे आयुष्य संपले. विश्वचषक स्पर्धा मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु वर्षभर जगात कोठे ना कोठे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने होतच राहतात. त्यासाठी हा एक कॉमन धागा आहे. सध्या चालू असलेले सामने/स्पर्धा/मालिका इ. विषयी इथे लिहिता येईल.

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

20 Oct 2016 - 9:35 pm | अभिजीत अवलिया

हरलो :( ...

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2016 - 6:26 pm | श्रीगुरुजी

भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. परंतु २ बाद १५३ अशा चांगल्या स्थितीतून त्यांचा डाव ८ बाद १९९ असा कोसळला. परंतु तरीही शेवटी ४९.४ षटकात त्यांनी २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताची अवस्था ८.५ षटकात २ बाद ४२ इतकी बिकट झाली आहे. रोहीत शर्मा व रहाणे बाद झाले आहेत. रोहीत शर्मा पूर्ण अपयशी ठरलेला आहे. पहिल्या ३ सामन्यात त्याने १४, १५ व १३ अशा धावा केल्या आहेत.

दुसरीकडे बांगला वि. इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २९३ धावांना उत्तर देताना बांगलाने २४८ धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव २३८ मध्ये संपल्यावर विजयासाठी २८६ धावांचा पाठलाग करताना बांगलाची अवस्था ८ बाद २५३ अशी आहे. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी

काल ऑसीज वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना आफ्रिकेने १७७ धावांनी जिंकला. या सामन्यात आफ्रिकेच्या बव्हुमाने अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण करताना डेव्हिड वॉर्नरला एका अभूतपूर्व पद्धतीने धावबाद केले.

वॉर्नर ३५ वर खेळत असताना त्याने रबाडाचा एक चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळला. चेंडू बॅटला लागून शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने संथपणे जाऊ लागला. तिथे क्षेत्ररक्षक नसल्याने वॉर्नर धाव घेण्यासाठी पळू लागला. त्यावेळी पॉईंटवर क्षेत्ररक्षण करीत असलेला बव्हुमा चेंडूच्या दिशेने धावला. चेंडूजवळ पोहोचून तो डावा पाय हवेत फेकून उजव्या पायावर झुकला व उजव्या हाताने चेंडू पकडून सर्व शरीर हवेत असताना त्याच अवस्थेत त्याने गोलंदाजाच्या बाजूला असलेल्या यष्ट्यांवर चेंडू फेकला. चेंडू जवळपास जमिनीला समांतर जाऊन यष्ट्यांवर आदळला त्यावेळी वॉर्नरची बॅट क्रीजच्या आतील रेषेपासून जेमतेम १ सेंटींमीटर दूर होती. त्यामुळे तो धावबाद झाला. अशा तर्‍हेने पूर्वी कोणीही धावबाद झाला नव्हता.

खालील चित्रफितीत हे धावबाद होण्याचे दृश्य आहे व मार्क टेलर आणि इयान हेली यांनी या अभूतपूर्व प्रसंगाचे विश्लेषण केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=IJ9AJD9LjuI&feature=youtu.be

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2016 - 8:41 pm | श्रीगुरुजी

"चेंडू बॅटला लागून शॉर्ट मिडविकेटच्या" हे वाक्य "चेंडू बॅटला लागून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या " असे वाचावे.

गामा पैलवान's picture

27 Nov 2016 - 7:26 pm | गामा पैलवान

इस्कू बोल्ते म्याच

http://picpaste.com/pics/Ogh5xgxj.1480254891.PNG

शेवटी सामना बरोबरीत!

-गा.पै.

गामा पैलवान's picture

27 Nov 2016 - 10:16 pm | गामा पैलवान

http://picpaste.com/pics/Ogh5xgxj.1480265150.PNG

श्रीगुरुजी's picture

27 Nov 2016 - 8:50 pm | श्रीगुरुजी

आज तीन कसोटी सामने सुरू होते.

ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना शेवटी ऑस्ट्रेलियाने जिंकून लाज राखली. मायदेशात खेळताना पहिले दोन कसोटी सामने गमावून ऑस्ट्रेलियाने मालिका आधीच गमावली होती. ए बी डीव्हिलिअर्स व डेल स्टेन यांच्या अनुपस्थितीत सुद्धा आफ्रिकन्स भारी ठरले. तिसरा सामना गुलाबी चेंडूने खेळला गेला व शेवटी ऑस्ट्रेलियन्सला विजय मिळाला.

भारत वि. इंग्लंड दुसरा कसोटी सामना चांगल्या अवस्थेत आहे. दुसर्‍या दिवसाखेर इंग्लंडच्या २८३ धावांना उत्तर देताना भारताने ६ बाद २७१ अशी मजल मारली आहे. मागील ५ कसोटी सामन्यात रहाणे बहुतेक डावात अपयशी ठरला आहे. आजही तो शून्यावर बाद झाला. पुजारा व कोहली भरपूर फॉर्मात आहेत.

न्यूझीलंड वि. पाकडे सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील २७१ धावांना उत्तर देताना पाकड्यांचा पहिला डाव २१६ मध्ये संपला.

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी

स्टिव्हन स्मिथने घेतलेला जबरदस्त झेल.

न्यूझीलंडच्या डावाच्या २५ वे षटक सुरू होते. न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १४० अशी असताना मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या वॉल्टिंगने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. वॉल्टिंगने फटका मारताच क्षणार्धात पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्टीव्हन स्मिथने हवेत झेप घेऊन एका हातात अप्रतिम झेल टीपला.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 2:52 pm | श्रीगुरुजी

आजपासून भारत वि. इंग्लंड यांच्यातील ४ था कसोटी सामना मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू झाला. इंग्लंडने पहिल्या दिवशी आतापर्यंत ६७ षटकांत २ बाद २१६ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या कीटन जेनिंग्जने पदार्पणातच नाबाद शतक झळकावले आहे.

आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाचे वानखेडे हे घरचे मैदान आहे. आपल्या संघाला फायदेशीर होण्यासाठी मुंबई इंडियन्सने या मैदानाच्या खेळपट्टीचे पाटा खेळपट्टीत रूपांतर केले. २०१५ मध्ये आफ्रिकेविरूद्धच्या ५ व्या एकदिवसीय सामन्यात याच खेळपट्टीवर आफ्रिकेने ५० षटकांत ४३८ धावांचा डोंगर रचला होता. पाटा खेळपट्टीचे आज पुन्हा एकदा प्रत्यंतर येत आहे.