कोंकणवारी - दातेगड (सुंदरगड), ओझर्डे फाल्स, गुहागर, जयगड व गणपतीपुळे

चेतन पडियार's picture
चेतन पडियार in भटकंती
26 Sep 2015 - 5:31 pm

नमस्कार मित्रहो (भटक्यांनो),

गेले कित्तेक दिवस मिपा वर लेख लिहावा म्हणून संधि शोधत होतो. आता लेख लिहायचा म्हंटल की असा लिहावा ज्या ठिकाणा बद्दल आधीच फार काही लिहील गेलं नसावं असा एक विचार मनात आला कारण या आधी हरिश्चंद्रगड सारखे कित्येक ट्रेक्स मिपा वरच वाचले मग त्याबद्दल च पुनः माझ्या सारख्या नव्या बिडु ने लिहिण म्हणजे 'स्क्रीन पेक्षा sms मोठा' अशी गत नको! ;-)

असो, फार वेळ न घालवता मूळ मुद्द्याकडे वळतो. मी मुळचा सांगली चा. अंगारकी संकष्टीला सांगलीहुन गणपतिपुळयाला जाणार्यांची संख्या तशी भरपूर. तो च बेत एके दिवशी कट्ट्यावर बसल्या बसल्या ठरला. तसहि २०१६ मधे अंगारकी नाही, म्हंटल जाऊ. पण नुसतच पुळया ला जाऊन येण करण्यापेक्षा काहीतरी वेगळ करू अशी सर्वानुमाते चर्चा झाली आणि सर्वानी तो प्लानिंग चा भार सोडला माझ्यावर. एका रात्रित मी पण तयारी केली आणि प्लॅन ठरला. रविवार टू मंगळवार असा प्लॅन मी केला तो असा
सांगली-पाटण-दातेगड-ओझर्डे फाल्स-गुहागर-वेळणेश्वर-जयगड-गणपतीपुळे.

ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सांगलीच्या गणारायाचे दर्शन घेतले आणि स्टार्टर मारला. आष्टा येथे गरगरित मिसळ पाव खाऊन गाडी सरळ कराड मार्गे पाटण लाच थांबवली. कारण ट्रिप मधला पहिला स्पॉट अर्थात दातेगड चा रस्ता पाटण गावातूनच जातो हे मी वाचलं होत. गड खुप प्रसिद्ध किंवा नावाजलेला नवता तरी एका वड़ाप वाल्याने पत्ता सांगितला त्याप्रमाणे पाटण गावतुनच उजवीकडचा रस्ता पकडला. या वेळी माझ्या सोबत असलेली मित्र मंडळी ही तशी गड किल्ल्यांची फार चाहती न्हवती. सर्वांना कधी एकदा गुहागर पोचतोय आणि सुरमई हाणतोय अस च झालं होतं जणू.

पाटण हुन दातेगड हा गाडी प्रवास २० ते २१ किमी चा. या गडाला सुंदरगड असेही म्हणतात आणि पाटण पुढे काही ठिकाणी सुंदरगड नावानेच फलक लावलेले दिसतात. शेवटच्या २ ते ४ किमी चा कच्चा रस्ता सोडला तर शेवट पर्यन्त डाम्बरीकरण आहे आणि रस्ता एकदम चांगल्या स्थितीत आहे. योग्य त्या ठिकाणी फलक असल्यामुळे किल्ला शोधण्याची पंचायत फार उदभवत नाही. गड अगदी लहान असल्यामुळे ओलखणं तसं कठीण च. पण अशा ठिकाणी आलो की एक गोष्ट नेहमी तुमच्या आमच्या सारख्या दुर्ग भटक्यांना साथ देते ती म्हणजे स्थानिक लोकं. गुरं ढोरं चारणारी मंडळी. एखादा म्हातारा किंवा म्हातारी दुपारचं सावली ला बसलेली सापड़तातच्! अशाच एका म्हातार्या आजोबांना विचारलं आणि त्यांनी हाथानेच ईशारा केला. दातेगड किल्ला समोरच होता. आकाराने लहान असला तरी गड अगदी निसर्ग्ररम्य अशा ठिकाणी आहे. गडा वरुन कोयना जलाशय, कोंकण, पाटण गाव आणि आजुबाजुचा परिसर खुप सुंदर दिसतो. त्यात पावसाळ्याचे दिवस! वरुण राजाने सभोवतालचा अखंड भूभाग एकदम हिरवागार करून टाकला होता. नजर जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत निसर्गाची हिरविगार चादर नजरेत बसत होती. त्यातून अधुन मधून ढग हजेरी लावतच् होते, जणू काही या डोंगर दर्यांनी आपल्या सौन्दर्यावर अलंकार च चढवलेत. पावसाळ्यात मोठ मोठ्या गडांवर फिरण् जमत नसेल च तर अशा काही किल्ल्यांची सफर करणं कधीही चांगलं. म्हणजे एखाद्या किल्ल्या ला भेट दिल्याच् समाधान आणि कोणताही धोका पण नाही. ( कोल्हापुर जिल्ह्यातील समानगड पण असाच एक किल्ला. ) एकूणच १०व्या मिनिटांत आम्ही गडावर पोहोचलो आणि गडावरील प्रमुख बघण्या सारख्या असलेल्या दोन स्पॉट्स पैकी पहिल्या ठिकाणी पोहोचलो. गणेश आणि मारुती मूर्ति. खरं तर या दोन्ही देवांचं combination खुप गड कोटांवर जाताना बघावयास मिळतं, पण या गडावर या मूर्ति काही वैशिष्टयपूर्ण च आहेत. कातळात खोदुन कोरलेल्या या साधारण ५ ते ६ फुट मूर्ति खरोखरच अदभुत आहेत.अशा प्रकारच्या मूर्ती फारच कमी किल्ल्यांवर बघायला मिळतील. मूर्ति बघुन झाल्यावर काही अन्तरावरच गडमाथ्यावर वास्तुकलेचा आणखी एक आविष्कार बघायला मिळतो आणि तो म्हणजे ५० फूटी विहीर. तलवारीच्या आकाराची अशी विहीर ही इतर कोठेही बघायला नाही मिळणार! विहिरीचं पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. खाली थोड्या पायरया उतरून गेलो की एक महादेवाची पिंड लागते. या गुफेत पिंडी समोर उभा राहिलो असता प्रचंड गार असा वारा एका फटीतून येत होता. जणू नैसर्गिक AC च! या व्यतिरिक्त गडावर फार काही बघण्यासारखं काही नाही. काही पडिक अवशेष आहेत पण ते नेमके कशाचे आहेत सांगण कठीण. केवळ अर्ध्या तासात सम्पूर्ण गडाची फेरी झाली आणि पावसाची सर आली! मनसोक्त भिजत आम्ही पुनः गाडीत येऊन बसलो आणि पुढच्या स्पॉट कड़े मार्गस्थ झालो.
Ganesh Idol @ Dategad

Maruti Idol @ Dategad

Vihir

Vihir

रात्री चा मुक्काम गुहागर ला करायचा होता आणि हा पल्ला अजुन लांब असल्याने आम्ही पाटण चिपळूण रस्त्यावर च एका हॉटेलात जेवलो (पावसाळी वातावरणात चुलीवरची भाकर!) आणि कोयनानागर मार्गे पोचलो सरळ ओझरडे धबधब्या जवळ. कोयनानगरपासून नवजाकडे जाताना ओझर्डे धबधबा पाहता येतो. अभयारण्यात अत्यंत उंचावरून कोसळणारा जलप्रपात अंगावर रोमांच उभे करतो. या धबधब्यातून तीन मोठे प्रवाह कोसळतात त्यामुळे हे दृश्य अधिक विलोभनीय दिसते. कोयना परिसरातील एक सुप्रसिद्ध असा हा धबधबा पाहायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी काही कमी नसते. शासनाने उभा केलेल्या गेट जवळ टिकिट घेतले आणि पुनः पायांची पायपीट करीत साधारण २० मिनिटांत आम्ही धबधब्या जवळ पोहोचलो. ही वाट गर्द झाडीतून गेली असली तरी इथे सध्या पेविंग ब्लॉक्स ने वाट सोईस्कर केलि आहे. सम्पूर्ण पायी प्रवासात धबधब्याचा आवाज ऐकू येत असतो पण दर्शन मात्र अगदी जवळ गेल्यावरच होतं. प्रचंड उंचीवरून कोसळणार्या पाण्याचे तुषार चिंब भिजवल्याखेरीज राहत नाहीत!

Ozarde

कुंभार्लि घाटातून आम्ही पुढच्या म्हणजेच गुहागर च्या प्रवसाला लागलो. सूर्यास्त होण्या आधी कुंभार्लि घाट बघायचा मनसूबा काठोकाठ successful झाला. खर तर पावसाळी दिवसांत अशा घाटातून फिरणं याला भाग्य च लागतं. सह्याद्रीच्या निबार कातळ कडा आणि त्यातून वाट काढू पाहणारे छोटे मोठे असंख्य दूधी धबधबे! आणि याला साथ द्यायला ढग असतातच!आपण फ़क्त कैमरा ने टिपलेले चित्र बघतो पण त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त फ्रेम्स आपल्या मनाने आणि डोळ्यांनी कायम स्वरूपी कैद केलेले असतात त्या गोष्टीला तोड़ नाही!

वाया चिपळूण आम्ही रात्रि च्या भोजनापूर्वी वेळेत गुहागर या आमच्या मुक्काम स्थळी पोहोचलो आणि रिसोर्ट चेक इन केले. Sea Winds. ( हे रिसोर्ट मुक्कामास अत्यंत मस्त पण जेवायचे झाल्यास गुहागर मधेच १-२ खानावळ आहेत, तेथे जेवण करणे च उत्तम. ) दिवसभराच्या प्रवासाचा (साधारण २५०किमी झाल होतं) कंटाळा न करता मस्त सुरमई वर ताव मारला आणि गाढ़ झोपि गेलो.

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे च जाग आली आणि सबंध गुहागर चा फेर फटका उरकुन आलो. ( कोकणात गेल्यावर पहाटे फ़िरण शक्यतो कोणीच चुकवु नये ) त्यानंतर बीच, आंघोळ आणि गावतल्या च उफराटा गणपति च दर्शन. ही सगळी कामं बेतान झाली. गुहागर बीच हा गजबजलेला जरी असला तरी स्वच्छ नक्कीच आहे. म्हणा आम्ही गेलो तेव्हा पावसाळा असल्या कारणाने पर्यटक खुप कमी. एक दोन कॉलेज मधली प्रेम पंछी आणि आम्ही सोडल्यास बीच एकदम शांत होता. पावसाने सुद्धा मोठी कृपा केलि होती आणि स्वतःची गैरहजेरि मांडली होती. कोवळ्या उनात बीच वर वेळ कसा गेला काळालच नाही पण इच्छा नसताना पुढच्या प्रवासासाठी आम्हाला प्रयाण करावे लागले.

.

.

.

गुहागर हुन गणपतिपुळे हा कोस्टल प्रवास आज आम्हाला करायचा होता. वाट सुंदर होतीच् शिवाय वाटेत खुप सारे स्पॉट्स कवर करायचे होते. त्यातील च पहिला स्पॉट होता तो वेळणेश्वर! श्रावण महिन्यातला सोमवार असलया कारणाने याला एक वेगळच् महत्त्व होते. गुहागर पासून साधारण अर्धा पाउण तासात आम्ही वेळणेश्वर ला पोचलो. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा अस सोपे वर्णन करू शकतो या सुंदर जागेचे. मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यात 9-10 फुट उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच - तीन फुटी लांबीची पिंड असून पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे आहेत. तसेच वेळणेश्वर भक्त निवसातही उत्तम सोय होऊ शकते. त्यातल्या त्यात MTDC Resort सर्वोत्तम लोकेशन ला आहे. वेळोबाचे दर्शन घेऊन आम्ही पुनः मार्गस्थ झालो आणि गाड़ी सरळ थांबविलि हेडवि च्या दशभुजा गणपति मंदिराजवळ. हे मंदिर आणि बीच पाहण्यासारखे आहे. पुष्कळ वेळ नसल्या कारणांने आम्ही बीच पाहू शकलो नाही. पण इथल्या बीच वर खड़कातच पाण्याने तैयार झालेली घळ बघण्या सारखी आहे.

Velneshwar

Velneshwar

या सर्व निसर्ग्र रम्य परिसरतून आणि वळणावलनाच्या रस्त्यातून मार्ग शोधत आम्ही पोचलो टवसाळ ला जयगड किल्ल्याला तसेच गणपतिपुळयाला जाण्यासाठी टवसाळ जेट्टी तुन च प्रवास करावा लागतो. जेट्टिने ५ ते १० मिनिटांत आम्हाला पालिकडे पोचवले. आणि तिथून शुन्य मिनिटांत आम्ही जयगड च्या मुख्य द्वारापशि पोचलो.

शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला हा जलदुर्ग विजापुरकरांनी बांधला असा इतिहास आहे. हा किल्ला ३ बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. जयगड १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते. किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. (सौ. - विकिपिडिया)

Jaigad

Jaigad

Jaigad window

Jaigad ruins

View from Karhateshwar

जयगड बघण्याची मजा ही पावसाळ्यातच! टी घेऊन आम्ही आमच्या डेस्टिनेशन कड़े वळलो. वाटेत किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. इथे सुद्धा श्रावणी सोमवारी दर्शन करुन समाधान मिळाले. सकाळ पासून भरपूर तीर्थक्षेत्र बघुन झाली होती. गणपतीपूळे जवळ च होतं. जाताना मालगुंड वरुन गेलो. अत्यंत सुंदर असे हे गाव. नारळ सुपारीची आकाशाला गवसणी घालणारी उंच झाडे आणि कवी केशवसुतांचे स्मारक आहे. या सर्व गोष्टींची च न्याहारि करता करता आम्ही पोचलो श्री क्षेत्र गणपतीपुळे! पुढच्या दिवशीच् अंगारकी असल्याने आजचा मुक्काम गणपतीपुळे लाच. काहिक वर्षांपूर्वी गणपतीपुळे फ़क्त भावनिक आणि आध्यात्मिक क्षेत्र होते पण आज ते रत्नागिरी जिल्ह्यातील एक व्यावसायिक केंद्र म्हणून पण पुढे येत आहे. प्रचंड मोठी आणि प्रशस्थ हॉटेल्स आज इथले मुख्य आकर्षण बनली आहेत. असो, अशा या स्वयंभू गणपती चे आंगरकि ला ५ तास रांगेत उभारून दर्शन घेतले, एरविच धोकादायक असलेल्या बीच वर पावसाळ्यात पाण्यात आत जाण्याचा प्रश्न च न्हवता. अनेक मित्रमंडळी याना भेटून मोदकाच् जेवण करून आम्ही परतीच्या प्रवसाला लागलो. येताना कुंभार्लि घाटातून उतरलो पण जाताना मात्र आंबा घाटाच्या रमणीय सौंदयाचे काही क्षण डोळ्याच्या कैमर्यात टीपुन अखेरीस आमची यात्रा सांगली ला पोचुन संपली.

Jaigad

Night at Ganpatipule

Around MTDC Ganpatipule

लेख वाचून नक्की च आंनद वाटला असेल अशी अपेक्षा करतो आणि या मिपा च्या महापुरात माझा एक थेंब अर्पण करतो.

धन्यवाद.

जय भवानी
जय शिवराय!

प्रतिक्रिया

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 5:39 pm | चेतन पडियार

https://www.flickr.com/gp/126888530@N05/49G74N

ब्लॉग पोस्ट वर फ़ोटो नीट दिसत नसतील तर कृपया वरील लिंक वर फोटोज बघावेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिले तीन फोटो सोडून इतरांच्या लिक्स चुकीच्या पडल्या आहेत. काही सुधारल्या आहेत. इतर जरा महत्वाचे काम संपले की करतो.

फोटो टाकताना थंबनेल्सच्या नाही तर पूर्ण डिस्प्ले केलेल्या फोटोंच्या लिंक्स वापराव्या, म्हणजे ही समस्या येणार नाही.

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 7:58 pm | चेतन पडियार

डॉ. म्हात्रे सर

रेप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी नक्की चूक सुधारेन. आहे त्या पोस्ट मधे काही एडिटिंग करता येईल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2015 - 1:06 am | डॉ सुहास म्हात्रे

अहो, ते सर वगैरे नको ! मी काही करण्याअगोदरच कोणीतरी इतर संमं/सासंमं ससदस्याने इतर दुवेही सुधारले आहेत.

सर्व चित्रे सुंदर आहेत.

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 5:54 pm | चांदणे संदीप

जबरदस्त आलेत फोटू!

रेतीवरल्या पाऊलखुणा, B&W फोटो फारच सुंदर! धबधब्याचा तर अप्रतिम! मुनलाईटचाही विशेष आवडला!
खारूताई तर Dreamworks च्या एखाद्या चित्रपटातील असल्यासारखी भासतेय! खिडकी, सरडा बेस्ट!

फोटो पहायला थोडा त्रास झाला पण It's worth it! :)

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 6:25 pm | चेतन पडियार

चांदणे साहेब

आभारी आहोत.

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 7:24 pm | चांदणे संदीप

खुर्चीवर नीट बसताही येत नाही हो मला!

Sandy म्हटलात तर जास्त आवडेल!
मित्रांच्यात मी Sandy आहे आणि इथेही सर्वांशी मैत्री करायला आवडेल मला.
त्यामुळेच बरयाच वेळा मी प्रतिसाद लिहून झाल्यावर शेवटी Sandy असेच लिहितो, तरीही इथे लोक 'जी' लावतात (कुठन आणतात कैमैती), भाऊ, भौ अस काय काय म्हणतात.
अवघडल्यासारख होत!

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 7:54 pm | चेतन पडियार

इथून पुढे sandy ला sandy म्हणूनच संबोधण्यात येईल.

बर का साहेब! ;-)

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 8:32 pm | चांदणे संदीप

हा…हा
हे भारीय!

संजय पाटिल's picture

26 Sep 2015 - 5:54 pm | संजय पाटिल

छान लिहीलय प्रवस वर्णन! फोटो पेस्ट करण्यासाठी येथे भेट द्या.

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 6:24 pm | चेतन पडियार

संजय पाटिल साहेब
आपण सांगितल्या प्रमाणे केले आहे. पिकासा ऐवजी फ्लिकर ची लिंक दिली, तरिपण दिसत नाहीत.:-(

फोटो दिसले नाहीत, पण वर्णन छान आहे. रच्याकने, कोल्हापूर जिल्ह्यातील किला हा 'समानगड' नसून 'सामानगड' आहे. :-)

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 8:16 pm | चेतन पडियार

हो बरोबर swaps

सामानगड च लिहायचे होते पण संपूर्ण पोस्ट mobile वर बसून केली म्हणून काही ठिकाणी चुका झाल्या. :-D

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 10:44 pm | चेतन पडियार

सगळे फोटो दिसत आहेत. फोटो upload व्हायला थोडा वेळ लागला पण finally झाले.

पद्मावति's picture

26 Sep 2015 - 10:53 pm | पद्मावति

सुंदर वर्णन आणि फोटो.
ती तलावासारखी विहीर खरोखरंच आश्चर्यचकीत करणारी आहे. बाकी गुहागर, वेळणेश्वर, जयगड चे फोटो तर बघणार्‍याला वेगळ्याच जगात घेऊन जातात. खूप छान सफर केलीत. वर्णन सुद्धा खूप छान, सध्या सहज शैलीत केले आहे.

चेतन पडियार's picture

26 Sep 2015 - 11:33 pm | चेतन पडियार

धन्यवाद पद्मावती

आणखी खूप काही लिहायचा आहे येत्या काही दिवसात .

असाच प्रतिसाद मिळाला तर नक्की लिहीन.

चाणक्य's picture

27 Sep 2015 - 5:32 am | चाणक्य

लिहिलं आहे प्रवासवर्णन.

चेतन पडियार's picture

27 Sep 2015 - 11:14 am | चेतन पडियार

आहे.. :-D

इशा१२३'s picture

27 Sep 2015 - 8:14 am | इशा१२३

छान वर्णन.फोटोहि सुरेख.

चेतन पडियार's picture

27 Sep 2015 - 11:14 am | चेतन पडियार

धन्यवाद ईशा

खुप खुप आभारी आहे.. ;-)

दत्ता जोशी's picture

27 Sep 2015 - 1:24 pm | दत्ता जोशी

खूप छान. फोटोही मस्त. या ठिकाणांना भेटी दिल्या नाहीत. वेळ मिळाला कि नक्की.

चेतन पडियार's picture

28 Sep 2015 - 8:39 pm | चेतन पडियार

धन्यवाद जोशी सरकार;-)

दमामि's picture

27 Sep 2015 - 1:29 pm | दमामि

वा! आवडले.

चेतन पडियार's picture

28 Sep 2015 - 8:40 pm | चेतन पडियार

आभारी आहे..

सौंदाळा's picture

28 Sep 2015 - 12:12 pm | सौंदाळा

वर्णन आणि फोटो मस्त.

पण जेवायचे झाल्यास गुहागर मधेच १-२ खानावळ आहेत, तेथे जेवण करणे च उत्तम

या खानावळींची नावे मिळतील का?
गुहागरमधे आजपर्यंत ३-४ वेगवेगळ्या ठिकाणी जेऊन पण कुठेच चांगले जेवण मिळाले नाही.

चेतन पडियार's picture

28 Sep 2015 - 8:38 pm | चेतन पडियार

हॉटेल सुरुचि म्हणून आहे. व्याडेश्वर मंदिरा समोर. अगदी मैन चौकात च आहे. लगेच सापडेल. तिथे राहयाचि पण सोय आहे ठिक ठाक पण फक्त फॅमिली साठी च.

नाखु's picture

1 Oct 2015 - 9:19 am | नाखु

आणि सुंदर माहीती दिली आहे.
गुहागर मध्ये शाकाहारी जेवणाची चांगली सोय कुठे आहे?

दर भटकंती लेखावाचनानंतर सहलीचे फक्त इमले बांधणारा नाखु.

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:41 pm | चेतन पडियार

नाखू राव

वर सांगितलेलया हॉटेल मध्ये शाकाहारी पण उत्तम मिळते. सकाळ सकाळी न्याहारी तर जबरया!

खटपट्या's picture

1 Oct 2015 - 11:56 am | खटपट्या

सर्व फोटो दीसत नाहीत. सर्व फोटो दीसु लागल्यावर लेख वाचेन. फोटो बघत बघत वाचण्यात मजा आहे.

मितान's picture

1 Oct 2015 - 12:06 pm | मितान

सुंदर !!!!
या भागात केव्हाही फिरा, माणूस शांततेची झोळी भरूनच येतो !!!

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:42 pm | चेतन पडियार

आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप खुप आभारी आहे.

प्रभू-प्रसाद's picture

1 Oct 2015 - 7:50 pm | प्रभू-प्रसाद

फोटो व प्रवास वर्णन दोन्ही एकदम मस्त....
गुहागर मध्ये राहन्याची व शाकाहारी भोजनाची व्यवस्ता कशी होउ शकेल काय माहिती मिळेल का?

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:49 pm | चेतन पडियार

राहण्यासाठी sea winds , राजगड रेसोर्ट वगेरे हौटेल्स मस्त आहेत. शाकाहारी साठी सुरुची च उत्तम पर्याय आहे. या व्यतिरिक्त नवीन एखाद सापडलेच tar नक्की कळवेन .

पैसा's picture

1 Oct 2015 - 7:57 pm | पैसा

छान लिहिलंय आणि फोटो पण!

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:50 pm | चेतन पडियार

आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप खुप आभारी आहे.

नरेश माने's picture

1 Oct 2015 - 8:43 pm | नरेश माने

छान लेख आणि मस्त फोटो.

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:37 pm | चेतन पडियार

आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप खुप आभारी आहे.

रेवती's picture

2 Oct 2015 - 5:26 am | रेवती

लेखन व फोटू आवडले. चार वर्षांपूर्वी दुसर्‍या मार्गाने कोकण सहल झाल्याने मनाने मी तिकडे फिरत होते.

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:37 pm | चेतन पडियार

thank you रेवती.. :)

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 2:12 pm | बोका-ए-आझम

पण फोटो अप्रतिम! तो सरड्याचा फोटो तर फारच सुंदर! आणि हो, काय खाल्लं, कसं होतं वगैरे फोटो न टाकता किंवा वर्णन न करता इथल्या सदस्यांचं इनो वाचवल्याबद्दल णिशेध!

चेतन पडियार's picture

3 Oct 2015 - 9:35 pm | चेतन पडियार

आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप खुप आभारी आहे.