बाप्पाचा नैवेद्य : खरवस

भुमी's picture
भुमी in पाककृती
19 Sep 2015 - 8:21 am

खरवस ( गाईच्या/म्हशीच्या ) चिकाची वडी-

गाय किंवा म्हैस व्यायल्यावर सुरुवातीचे काही दिवस घट्ट दूध देतात, त्याला चीक असे देखील म्हणतात. या दुधात जास्त प्रमाणात प्रथिने असतात. साधारण पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या दिवसाचा चीक खरवसाच्या वड्या करण्या साठी वापरतात. पहिल्या दिवसाचा चीक घट्ट असतो. खालील कृतीत त्याच दिल्या आहेत. दुसर्‍या, तिसर्‍या दिवशीचा करताना साधे दूध कमी प्रमाणात वापरावे.

साहित्य -
गाईचे अथवा म्हशीचे खरवसाचे दूध (चीक)१/२ लिटर, गाईचे किंवा म्हशीचे साधे दूध १/२ लिटर
१०० ते १२५ ग्रॅम साखर किंवा गूळ, याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
केशर काड्या १०-१२,
वेलची पूड

कृती-
गाईचा चीक पातळ असतो पण म्हशीचा घट्ट असतो, त्यामुळे म्हशीच्या दुधाचा करताना साध्या दुधाचे प्रमाण वाढवावे लागते.
गाईचा करताना जेवढं चीक तेवढाच दूध वापरायचं.
१/२ लि चिकाला १/२ ली दूध मिक्स करायचं त्यात चवीप्रमाणे गुळ किंवा साखर घालायची. गूळ जास्त छान लागतो. चांगलं ढवळून विरघळवायचा.
मग गाळून घ्यायचं. आणि वेलची पूड घालून परत ढवळायचं .
कूकरच्या डब्यात हे दूध अर्ध्यापर्यंत ओतायचे, वरून केशर काड्या पसरवाव्यात. नंतर मोठ्या पातेल्यात पाणी तापत ठेवायचं त्यात स्टँड ठेऊन कुकरचा डबा ठेवायचा. पातेलं वरून झाकायचं. (water bath) झाकणावर जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफेवर चांगलं शिजेल. १५ मि. चांगले उकडायचे. नंतर डबा बाहेर काढून गार होऊ द्यायचा. मग वड्या कापायच्या. गाईच्या वड्या मऊ होतात. चीक पातळ असेल तर दूध न घालता केल्या तरी चालतात. म्हशीच्या वड्यांना दूध लागतेच. नाहीतर वड्या कडक होतात. गरम खायच्या नाहीत तोंड येते. उष्ण पडतात.

kharwas

प्रतिक्रिया

स्नेहानिकेत's picture

19 Sep 2015 - 8:32 am | स्नेहानिकेत

आहाहा!!!!सकाळी सकाळी खरवस!!!!!! किती किती तो दुष्ट्पणा करावा तो माणसाने.
मस्त फोटु.

मस्तच!सुरेख सोपी पाककृती आणि आवडती.

स्रुजा's picture

19 Sep 2015 - 8:45 am | स्रुजा

काय कहर फोटो आलाय. प्रचंड आवडतो खरवस :)

सस्नेह's picture

19 Sep 2015 - 10:32 am | सस्नेह

कुठाय, मला का दिसत नाही तो ?

मुक्त विहारि's picture

19 Sep 2015 - 4:39 pm | मुक्त विहारि

आता शोधा.

नूतन सावंत's picture

19 Sep 2015 - 8:52 am | नूतन सावंत

मस्त ग भूमी.लय भारी.गणपतीबाप्पा एकदम खूष.

त्रिवेणी's picture

19 Sep 2015 - 8:55 am | त्रिवेणी

आलेच ग खरवास khyala.

मदनबाण's picture

19 Sep 2015 - 8:57 am | मदनबाण

आहाहा... लयं भारी ! :)
काही जण गूळाच्या जागी साखर घालुन खरवस करतात, पण मला मात्र गूळाचाच खरवस आवडतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधव

खरवस अगदी आवडता.छान सोपी पाकृ!

तुषार काळभोर's picture

19 Sep 2015 - 9:12 am | तुषार काळभोर

रंग, टेक्स्चर-पोत, सजावट, अप्रतिम!!!

मुक्त विहारि's picture

19 Sep 2015 - 9:15 am | मुक्त विहारि

आमचे वलसाड सुटले आणि उत्तम चीकाचे दूध आणि खरवस पण बंद झाला.

गेले ते दिन गेले.

आता आमच्या डोंबोलीत पण तयार खरवस मिळतो, पण ती चव नसते.

आवडीचा पदार्थ. हाच खरवस थोडा घट्ट बनवून किसून वाळवून अजून वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ बनविता येतात.

पियुशा's picture

19 Sep 2015 - 9:49 am | पियुशा

वा भूमी तै वा !

किसन शिंदे's picture

19 Sep 2015 - 10:05 am | किसन शिंदे

या लेखात फोटो आहे? मला का दिसेना.?

रच्याकने खरवस माझाही फार आवडता.

Maharani's picture

19 Sep 2015 - 1:02 pm | Maharani

Aha kharvas......atyant aavadata.....kruti pan mast lihili aahes

तुषार काळभोर's picture

19 Sep 2015 - 1:31 pm | तुषार काळभोर

सकाळी तर होत्ता...
आत्ता दिसंनासा झालाय..

प्यारे१'s picture

19 Sep 2015 - 1:36 pm | प्यारे१

ज्या कोणी खरवस (फोटो) पळवून नेला असेल त्यांनी कॄपया गणपतीच्या डाव्या बाजूला आणून ठेवावा.

धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

19 Sep 2015 - 2:45 pm | स्वाती दिनेश

भयंकर, प्रचंड वगैरे वगैरे आवडतो..
ठाण्यात गोखले रोडला स्वीट हनुमान नावाचे एक दुकान आहे, सुरभी, मयेकर ऑप्टिशियन च्या रांगेत, त्याच्याकडे खरवसाची पावडर मिळाली होती मागच्या भारतभेटीत.. आणि मग दुधाची तहान ताकावर, आता जर्मनीत हवा तेव्हा खरवस खाता येईल ह्या आनंदाने ती आणली.. आणि बरा झाला होता. 'खरवस' खाल्ल्यासारखे वाटत होते.
स्वाती

कविता१९७८'s picture

19 Sep 2015 - 4:19 pm | कविता१९७८

मस्तच गं भुमी, मला खुप आवडतं खरवस. छान पाककृती.

रॉजरमूर's picture

20 Sep 2015 - 12:35 am | रॉजरमूर

अत्यन्त आवडता पदार्थ
३-४ दिवसांपासून करून ठेवलाय फ्रीजमध्ये. रोज थोडा खाणे चालू आहे .
हा पदार्थ थंडगार खाण्यातच मजा आहे .

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2015 - 12:54 am | प्रभाकर पेठकर

मस्त पदार्थ. जास्त खाल्यास गरम पडतो त्यामुळे मन आवरावे लागते. गोरेगावात आरे कॉलनीत नेहमी मिळतो. चीक कींवा तयार खरवस दोन्ही मिळते.

खरवस खाण्याची आवड बेताची आहे. गूळ घातलेलाच आवडतो. तरी आमच्या एक नातेवाईक वेगळ्या पद्धतीने साखरेच्या पाकातील किसलेला खरवस करत असत ते आठवले. तो आवडायचा. फोटू दिसला नाही.

भुमी's picture

20 Sep 2015 - 8:00 am | भुमी

सर्वांचे आभार

मितान's picture

20 Sep 2015 - 8:05 am | मितान

मस्त खरवस !!!

जव्हेरगंज's picture

20 Sep 2015 - 8:35 am | जव्हेरगंज

फोटो बघायला आलतो खास. पण तोच नाहीये.
बाकी खरवसाला चिक मिळणं दुर्मिळ होत चाललय आजकाल.
बऱ्याच दिवसांनी अगदी परवाच खाल्ला.

पदम's picture

21 Sep 2015 - 11:26 am | पदम

सुरेख सोपी पाककृती. आता चिक शोधण आलं.

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:09 pm | सानिकास्वप्निल

खरवस आवडत नाही पण घरी मी सोडून सगळेच खरवस प्रेमी आहेत :)
पाककृती छान आहे, फोटो हवे होता.

इन कम's picture

2 Nov 2015 - 9:40 pm | इन कम

आमच्याकडे खरवसचे दूध उपलब्ध असते.हवे असल्यास सांगणे.

भुमी's picture

2 Nov 2015 - 10:34 pm | भुमी

kharwas

भुमी's picture

2 Nov 2015 - 10:41 pm | भुमी

kharwas

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2015 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

नूतन सावंत's picture

2 Nov 2015 - 10:43 pm | नूतन सावंत

लय भारी.

पियुशा's picture

2 Nov 2015 - 11:04 pm | पियुशा

एकच नंम्बर :)