खुलेआम अफ़गाण जलेबी धागा- आपला आवडता स्तंभ कोणता ?

मारवा's picture
मारवा in पाककृती
13 Sep 2015 - 9:42 am

जलेबी धागा हि अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. जलेबी खाणे जलेबी पाडणे या अत्यंत मधुर गोष्टी आहेत. या गोड उपक्रमाला जाहिर व जोरदार पाठींबा म्हणुन मी हा धागा काढत आहे. तसा प्रत्येक धागा हि जलेबी च असते असे माझे मत आहे. तर यात लपवाछपवी कशाला उगाच ? म्हणुन मी आज सर्व जलेबी धागालेखकांना विनंती करतो की त्यांनी उजळ माथ्याने समाजात वावरल पाहिजे, जलेबी चा प्रचार प्रसार हा झालाच पाहीजे. जलेबी धागालेखकांनी विडंबक क्रुर कंसांना भिउन आपल्या जिलबीय संवेदनांना आवर घालु नये खरी अस्स्ल मुक्त उधळलेली जिलेबी कुठल्याही विंडंबक कंसाच्या कढाईच्या अर्धगोल कुंपणाकडुन रोखली जाउ शकत नाही.
तर आजच्या जलेबी धाग्याचा विषय आहे मराठी वर्तमान पत्र. साप्ताहिक, मासिके यातुन अनेक दर्जेदार स्तंभ आजतागायत चालविण्यात आलेले आहेत. व सध्याच्या काळात हि फ़ार सुंदर स्तंभ चालविव्यात येतात ( स्तंभ फ़ार वजनदार शब्द आहे त्यामानाने सदर शब्द फ़ार चिल्लर वाटतो शिवाय सदर लेखक म्हणजे सदर कारणास्तव अस काहीतरी शासकीय मराठी टाइप वाटत शिवाय जलेबी धाग्यात वजनदार शब्द नकोत याचा निषेध म्हणुन स्तंभ आणि स्तंभ सारखा जड शब्द वापरल्याने दंभ तृप्त होतो हा एक फ़ायदा ) त्यातील काही अत्यंत दर्जेदार स्तंभ आहेत. अनेक स्तंभलेखनाची नंतर एकत्रित करुन पुस्तके पण प्रकाशित झालेली आहेत. स्तंभा च स्वरुप सहसा एखादा विषय केंद्रीत स्तंभ किंवा मुक्त ललित लेख अस असत. अनेक दिग्ग्ज्जांनी स्तंभलेखन केलेल आहे. आमच्या काळीच्या चालीत ही व आजके जमानेमे च्या चालीत कस ही गाऊ शकता पण आपले आवडते स्तंभ कोणते का आवडले त्यात काय खास होत आदि मांडावे, त्यांची पुस्तक बनलेली असतील तर ती सांगा म्हणजे वाचता येईल. कारण गेलेला स्तंभ फ़क्त पुस्तक रुपात जिवीत असेल तरच भेटतो दुसरा मार्ग नसतो. स्तंभ नही आते उनकी किताबे आती है.
एक स्तंभ होता महेश एलकुंचवारांचा पश्चिमप्रभा नावाचा लोकमत मध्ये बहुधा अत्यंत सुंदर प्रगल्भ असा स्तंभ यात एलकुंचवारांनी त्यांच पाश्चात्य साहीत्याच केलेलं वाचन यावर आधारीत अस लिखाण होत. फ़ार च सुंदर यात त्यांच नाटकावरच लेखन येत असे (ते इथेच की अजुन कुठे नेमक आठवत नाही ) पण एका लेखातील एक अजुनही आठवतय त्यात ते चांगल्या नाटकासाठी काय लागत नेपथ्य संगीत नाट्यगुह अस एकेक खोडत नेती नेती करत ते येतात एक प्रेक्षक एक नट बास. फ़ार मार्मिक विवेचन होत पुढच सर्व.

एक विजय तेंडुलकरांचा लाइव्ह वाचला नाही पुस्तक रुपात वाचलेला स्तंभ आहे रामपहाट (नाव गंडतय काहीतरी) खुप सुंदर स्तंभ मराठीतला सर्वात्कुष्ठ कदाचित त्यातले लेख आठवतात एक वेटींग फ़ॊर गोदो नाटक समजावुन सांगितलेला अप्रतिम लेख एक बाबावरचा लेख त्या पुस्तकात श्री पु भागवतांचे एक खोचक कमेंट होती रोज लिहाव लागत असल्यामुळे मर्यादा येते का अस काहीतरी,

एक होता कवी ग्रेस यांचा जुना सामना च्या उत्सव पुरवणीत यायचा संडे ला कधीकधी एक एक संडे चुकवुन यायचा बहोत ही सुपर्ब नाव मृगजळाचे बांधकाम ( मेमरी स्तंभ या विषयात खुप धोका देते ) नंतर त्यातच नाव बदलुन त्यांनी वार्‍याने हलते रान या नावाने पण चालवला होता. मी बरेच कात्रण जमवले होते आता ते ही सापडत नाही,

एक सध्याच्या काळात दिव्य मराठी ची रविवार पुरवणी सर्वात श्रीमंत आहे एकेकाळी उत्सव होती एकेकाळी मंथन होती कधीतरी चतुरंग होती. ते मला वाटत दरवर्षी एकेकाची टीम जुळून येते. तर सध्यामध्ये एक अनोखा स्तंभ होता श्रीधर तिळवे चा तिसरी नवता लय जबराट वेगळाच काहीतरी होता.

एक राजु परुळेकरांचा क्लोज शॉट सुंदर स्तंभ होता त्यात परवीन बाबी च्या मृत्युवरचा लेख ,ओशो वरचा अनंत सामंतवर चा सुंदर लेख होते त्यांच्या अलकेमेस्ट्री पेक्षा हा स्तंभ ग्रेट होता.
त्यांच्या साइट वर सर्व मोकळ उपलब्ध करुन दिलेल आहे लुटा लेकहो लुटा.

एक दिव्य मराठी त अत्यंत युनिक असा स्तंभ होता रॉक म्यु्झिक वर लेकक नेहमीचे यशस्वी मधील नव्हता पण काय अफ़ाट सुंदर लेखन रॉक म्युझिक व त्यातील शिलेदारांवर आधारीत
फ़ार च सुंदर
एक काही काळापुर्वी संपलेला मैत्री पर्व हा पण फ़ार वेगळ अनुभवविश्व मांडणारा स्तंभ अस त्या बर्फ़ाळ प्रदेशातल अनोख लाइफ़ ज्याने जगल त्याने मांडलेल म्हणुन अधिक जीवंत जोशी का काय नाव
शशिकांत सावंत चा पुस्तकांवरचा अगोदरचा स्तंभ खुप सुंदर त्यामानाने सध्याचा एरोटीका विषयावरील स्तंभ जमुन नाही आला
अजुन काय तुटक तुटक आठवणी द्वारकानाथ संझगिरीचा क्रिकेट वरचा सामनातला, कणेकरांचे सर्वच ( मनातला अंधार थिएटरच्या अंधारात मिळवुन ) संजय मोने एक जीनीयस माणुस फ़ार सुंदर लिहीतो पण त्याच पुस्तक छान आहे.
चित्रलेखा मधला सागर राजहंस चा अत्यंत मनापासुन वाचावस वाटणारा राजकारण हा तसा भंगार विषय पण सागर राजहंस चा लेख वाचावासा वाटतो दोन पानांत इतकी मार्मिक व अभ्यासु संदर्भ संपन्न टिप्प्णी असते की बस
चित्रलेखा मधील च ती पुर्वा नगर कर एकदम क्लास क्लास क्लास
आपले तंबी दुराइ दोन फ़ुल एक हाफ़ वाले त्यांनी तर दर्जा ची विनोदाच्या दर्जाचे अंतिम पातळी च गाठलीय जणु
दवणे चं एक यायच थेंबातल आभाळ ते मी त्यातील सुवीचारांच्या जिलेब्या खाण्यासाटी वाचत असे त्याने रुचिपालट चांगला होत असे दवणे जिलेबीवाल्यांचे आयडॉल आहेत. दवणे सतत वाचला की ढसाळ चकण्यासारखा घ्यावा ढसाळ जास्त वाचला तर दवणे तोंडी लावावा संतुलन आत्म संतुलन तांबेइश छान साध्य होते.
एक यु म पठाण चा चिमुकला स्तंभ होता मराठीत आलेले पर्शियन उर्दु शब्द लय भारी होता आपले अनेक आवडते घरगुती मराठी शब्द मुळ एकदम विदेशी लय मजा यायची लोकमत मध्ये होता. तो स्तंभ.
तर असो जिलेबी अशीच पसरट अस्त्यव्यस्त असते जितकी पसरट तितकी छान लागते तुकडे पण गोडच लागतात म्हणुन माझी जिलेबी गोड मानुन घ्यायची गरज नाही
आपले आवडते स्तंभ याविषयी सांगा शेअर करा

प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी भन्नाट उचकपाचक जिलबी पीठ आले आहे.उल्लेख केलेले स्तंभ अधुन मधून वाचले आहेत आणि गाजलेले आहेत.किंबहुना काही स्तंभा़मुळेच काही वर्तमानपत्रे मासिके यांचे खप वाढले आहेत.तुम्ही सांगता तसेच नावांच्या बाबतीत मेमरी दगा देते आणि कधीकधी स्तंभलेखकांचे जिलबीचे पीठ बिघडते.वारंवार बिघडले की उँफ निघून जाते अन वाचक दुसरीकडे वळतो.मला वाटतं काही स्तंभलेखक आता आपली जिलबी आपल्याच हॅाटेलात पाडतात त्याला blogspot अथवा wordpress वगैरे गोंडस नावे आहेत.नंतर पेपरवाले ते छापतात. यामुळे एकाच स्तंभाखाली वाचक चिरडून जात नाही आणि सध्या कोणी जिलबी चांगली आहे ते चाखायला मिळते.
काही नावे-
गुजराती चित्रलेखा मासिकात
-नारद
-तारक मेहतानो उंधो चष्मो फार आवडायचं आणि त्याची आता भर घालून सोनीवरती सिरिअल असते.
ललितमधले जयवंत दळवींचं ठणठणपाळ उर्फ मराठी लेखकांची रेवडी उडवली जायची.
फ्री प्रेस मधले डॅाम मोरायस, फ्रँक मोरायस. चिनमयानंदांचे गिताभाष्य.
इवनिंग न्युज मध्ये बिझिबी.
आताचे तंबिदुराई -राजकीय उपहास.
शोभा डे-पॅालटिकली इन्करेक्ट
आकार पटेल
आशिष शाक्य.
बरेच आहेत नवीन .
जुन्यापैकी प्रमोद नवलकर आठवले.

नवलकर फिरस्ते भटके होते
मुंबई त्याम्च्यात भिनलेली होती रात्रीची मुंबई वगैरे
त्यांच वर्णन चित्रदर्शी असे.
मुंबईतली तळागाळातील लोक त्यांचे धंदे त्यांच लाइफ
छान कव्हर करायचे स्तंभातुन
शोभा डे पण मस्त लिहीते कधी कधी डोक्यात जाते मात्र
अजुन आठवलेले स्तंभ म्हणजे लोकमान्य ते महात्मा हा डॉ. मोरेंचा असामान्य स्तंभ ज्याच पुढे छान जाडजुड
पुस्तक हि आलं हा म्हणजे फारच संतुलित फार सुक्ष्म वेध घेणारा स्तंभ होता. स्वातंत्र्य मिळवण्याची प्रोसेस कीती बहुआयामी होती किती विविध विचारधारा त्या काळी अस्तित्वात होत्या त्यांचे आपसातले तणाव तेव्हाचे नेते सर्वांचा मुलगामी वेध मोरेंनी घेतलाय.
मोरेंची भुमिका हि समन्वयवादी आहे छान संतुलन साधतात कुठलाही अतिरेक भडकपणा नेहमीच कटाक्षाने टाळतात.
मोरेंची तत्वज्ञानाच्या अभ्यासाची बैठक मजबुत आहे.

ऋतुराज चित्रे's picture

13 Sep 2015 - 11:38 pm | ऋतुराज चित्रे

नवलकर दै. नवशक्तित 'भटक्याची भ्रमंती' हा स्तंभ लिहायचे.

मित्रहो's picture

13 Sep 2015 - 12:02 pm | मित्रहो

आम्ही लहान असताना मा. गो. वैद्य हे नागपूर तरुण भारतचे संपादक होते. त्यांनी तिरकस शैलीत लिहिलेला सरकारवर ताशेरे ओढनारा अग्रलेख दर सोमवरी यायचा. वाचायला मजा यायची.
लोकसत्ता मधे माधव गडकरी मला वाटत चौफेर म्हणून स्तंभ लिहायचे तोही वाचण्यासारखा होता. माधव गडकरी लोकसत्तातून गेल्यावर त्यात वाचण्यासारखे फारसे राहीले नाही असे वाटते.
जयवंत दळवींचं ठणठणपाळ.
तंबी दुराइ यांचा लोकप्रभामधील स्तंभ
आधी टाइम्स ऑफ इंडीयात आणि नंतर हिंदू मधे पी साइनाथ यांचे फार माहीतीपूर्ण लेख यायचे. अनंतपूरमधील दुष्काळ, पेड न्यूज, विदर्भातील आत्महत्या यावरील त्यांचे लेख तळागाळातल्या माणसाच्या समस्या लोकांपर्यंत पोहचवणारे होते. नंतर नंतर त्यांच्या लिखाणात फार निराशावाद दिसायला लागला. हिंदूत नंतर बरेच व्यवस्थापकीय बदल झाले त्यानंतर साइनाथानी हिंदू पण सोडले असे वाचण्यात आले.
नवीन आणि इंटरनेटच्या युगात यअर स्टोरी मधल्या काही सु्दर गोष्टी किवा पॉल ग्राहमचा ब्लॉग.

आत्ता काही आठवत नाहीये, आठवतील तसतसे एकेक स्तंभ इथे सांगेन.

ठणठणपाळ पुस्तकातुन वाचलय छान प्रसन्न खुसखुशीत शैली.
पी.साईनाथ विषयी काहीच माहीती नाही त्यांच दुष्काळ आवडे सर्वांना हे पुस्तक मला खुप जणांनी रीकमेंड केलय.
पण वाचलेल नाही.
पी. साईनाथ विषयी जाणुन घ्यायला आवडेल
कृपया विस्तारपुर्वक माहीती द्या

बोका-ए-आझम's picture

13 Sep 2015 - 5:42 pm | बोका-ए-आझम

हे हिंदू मध्ये Rural Editor या पदावर होते. त्यांच्यासाठी हे पद खास निर्माण करण्यात आलं होतं.शेतकऱ्यांच्या त्महत्या आणि शेतकी कर्जाच्या सावकारी पाशाबद्दल त्यांनी बरंच लिखाण केलं आहे. वक्ते म्हणून साईनाथ हे फार उत्कृष्ट आहेत. सलग चार तास सुसंबद्ध भाषण करु शकतो हा माणूस आणि एकही मुद्दा रिपीट होणार नाही. जर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल थोडीफार जनजागृती झाली असेल, तर त्याची सुरुवात साईनाथ यांच्यामुळे झालेली आहे. साईनाथ यांच्या Everybody Loves a good drought या पुस्तकाचा सुनील कर्णिक यांनी (नक्की आठवत नाहीये) दुष्काळ आवडे सर्वांना हा अनुवाद केलेला आहे. जरी साईनाथ हे डावे असले आणि मला डाव्या विचारसरणीची अॅलर्जी असली तरी त्यांचे मुद्दे आणि प्रश्न हे नेमके आणि भेदक आहेत. पण सर्व डाव्या लोकांप्रमाणेच ideology हा त्यांचा problem आहे. बाजारपेठ ही गरिबी दूर करण्याचं साधन असू शकते आणि सरकारच्या बाजारपेठेतल्या हस्तक्षेपाने समाजवाद प्रस्थापित होत नाही हे या लोकांना समजून घेण्याची इच्छाच नसते.

मित्रहो's picture

13 Sep 2015 - 6:52 pm | मित्रहो

पी. साईनाथ मुळचे आंध्रातले. आधी ते टाइम्स ऑफ इंडीया साठी लिहायचे. Everybody Loves Good drought हे भारतातील गरीब जिल्ह्यातले त्यांनी TOI मधे रिपोर्ट केलेल्या गोष्टी आहेत. कुठलाही मुद्दा घेउन त्यावर सनसनाटी रीपोर्टींग करण्यापेक्षा त्या मुद्द्याचा शेवटपर्यांत पाठपुरावा करणे यामधे त्यांचा हातखंडा होता. त्या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी वृत्तपत्रात आल्यानंतर त्याचे काय झाले याची माहीती सुद्धा पुस्तकात आहे.
पेड न्यूज ही गोष्ट उजेडात आणण्यासाठी साईनाथांनी जे लेख लिहिले ते वाचण्यायोग्य होते. दोन वृत्तपत्रात आलेले वृत्त हे शब्द न शब्द सारखे आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. शेतकरी आणि त्याचे प्रश्न यावरही त्यांनी बरेच लिखाण केले. त्यानी कुठेतरी म्हटले होते रोज मोठ्या आवडीने फॅशनवीक विषयी वाचनाऱ्यांना तो कापूस पिकवनारा शेतकरी काय करतो याची कल्पना नाही.
साईनाथ हे कट्टर डाव्या विचारसरणीचे होते त्यामुळे खाजगीकरण, जागतिकीकरण या साऱ्या गोष्टीला त्यांचा विरोध होता. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असली तरी त्याची कारणे आणि उपाय हे त्यांनी त्यांच्या डाव्या विचारसरणीच्या चष्म्यातून पाहीली. समाजवादाचा भारतातील प्रयोग आणि जगभरातील साम्यवादाचा प्रयोग हे फसलेले प्रयोग आहेत हे स्वीकारयला इतर डाव्यांसारखे तेही तयार नव्हते त्यामुळे त्यांच्या लिखाणात एक निराशावादी उपहास यायला लागला होता. त्यांनी हिंदूत लिहीणे बंद केल्यानंतर आज तळागाळातले जनतेचे प्रश्न त्या पोटतिडीकेने मांडनारा कोणी नाही याचे वाइट वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2015 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये गेली अनेक वर्षे येणारे स्वामीनॉमिक्स. हे सदर खरोखर वाचनिय असते.
त्यात आर्थिक घडामोडींचा एका वेगळ्या अंगाने यात विचार केलेला असतो.

पैजारबुवा

मारवा's picture

13 Sep 2015 - 2:22 pm | मारवा

मराठीतल्या ग्रेट ब्लॉग्ज मध्ये
१- searchingforlaugh.blogspot.com ( हा द्विभाषी ब्लॉग आहे पण अती दर्जेदार )
2- ekregh.blogspot.com
3- rbk137.blogspot.com
४- dnyanadadeshpande.blogspot.com
हे आवडतात

बोका-ए-आझम's picture

13 Sep 2015 - 8:15 pm | बोका-ए-आझम

यांचा niranjan-vichar.blogspot.in हा छान ब्लाॅग आहे. हिंदीमध्ये आहे. प्रकाश घाटपांडे, नंदन, भडकमकर मास्तर यांचेही ब्लाॅग्ज छान आहेत.

नंदन सरांचा ब्लॉग वाचलाय ग्रेट आहे.
जेव्हा सतीश काळसेकर हे नाव फारस चर्चेत नव्हत ( एका मर्यादित वर्तुळाबाहेर तरी)
तेव्हा नंदन यांनी त्यांच्या ब्लॉगवर वाचणारयाची रोजनीशी विषयी अत्यंत मार्मिक लेख लिहीलेला
लेख १ सप्टेंबर २०११ चा आहे त्याच्या दोन वर्षानंतर काळसेकरांना त्याच पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला
त्यांचा मार्व्केज वरील लेख ही सुंदर च आहे या मार्क्वेझ वर लिहाव अस कीती वेळा वाटल मला
त्याच एक एक करत सगळ वाचुन झाल पण त्याच्यावर लिहायच कस हा आजही प्रश्न पडतो
आणि नंदन काय सुंदर लिहीतात बघा
त्यांची एका मुक्तसुनीत यांच्या धाग्यावर एक प्रतिक्रीया होती मला वाटत आदर्शां संबधित धाग होता
त्यात काय मार्मिक टिप्पणी होती.
नंदन एक महान वाचक आहेत.
निरंजन विचार च्या लिंक साठी मनापासुन धन्यवाद

Nitin Palkar's picture

8 Sep 2016 - 8:56 pm | Nitin Palkar

मराठी ब्लॉग्ज मध्ये जागता पहारा हा एक वाचनीय ब्लॉग आहे.

मागचे खुशवंत सिंग आणि एम व्ही कामत.
शोभा डे थेट बोलते .तिचं मराठी लोकांबद्दलचे निरीक्षण बोचरे वाटले तरी विचार करायला लावणारे असते.हे विचार बरेच मराठी लोक भितीने आणि रोष ओढवायला नको म्हणून व्यक्त करत नाहीत.

बोकोबा व मित्रहो

पी साईनाथ यांच्याविषयी महत्वपुर्ण माहीती पुरवण्यासाठी मनापासुन धन्यवाद.
आता दुष्काळ आवडे सर्वांना वाचायलाच पाहीजे अस वाटतयं.
अशा प्रश्नांवर सखोल लिखाण करणारे फारच कमी लोक शिल्लक राहीलेय अस वाटत.
पुर्वीची संडे टाइम्स ची पुरवणी पण दर्जेदार होती.
आता संडे टाइम्स ची पुरवणी कीती खालच्या पातळीवर घसरलेली आहे.
एकही अर्थपुर्ण लेख त्यात नसतो केवळ फॅशन पेज थ्री च च मटेरीयल एकदम मार्केट ओरीएंटेड पुरवणी.
मार्केट ओरीएंटेड होण्यात गैर नाही पण अतीरेक च होतोय.

मित्रहो's picture

14 Sep 2015 - 11:00 am | मित्रहो

गुगलच्या मदतीने हे सापडले
https://psainath.org/
https://ruralindiaonline.org/authors/p-sainath/

सिरुसेरि's picture

14 Sep 2015 - 7:39 am | सिरुसेरि

पुर्वी लोकप्रभामध्ये अभिजीत देसाई यांचे लेख वाचनीय असत . प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांची "कणेकरी" , "यादोंकी बारात" , "मेतकुट" हि सदरेही लोकप्रिय होती.

नाखु's picture

14 Sep 2015 - 9:34 am | नाखु

लोकसत्ते तील "तिरकी रेघ" हे सदर आवडायचे वस्तुनिष्ठ आणि मुद्देसूद विवेचनातून चिरफाड असायची. त्याचा दर्जा मला तेव्हां कळला जेव्हा "जाणत्या " राजाचे मूल्यमापन केलेल्या पापच्या मापासह पदरात टाकले होते.

आणि लगोलग प्रत्युत्तर म्ह्णून "भाट" लेख असबेंनी लोकसत्तेत लिहिला, नंतर मूळ लेखच लोकसत्ता इ आव्रुत्तीतून गायब केला गेला.

लेखक कोण म्हणालात ?
असबे तुम्हाला रावसाहेब कसबे अस म्हणायच आहे का ?

नाखु's picture

14 Sep 2015 - 11:11 am | नाखु

संजय पवार

आणि हा तो लेख तिरकी रेघ

वाचा आणि ठरवा काय ते ??

अमितदादा's picture

9 Sep 2016 - 10:59 pm | अमितदादा

संजय पवार माझेही आवडीचे स्तंभलेखक. हा लेख आधी वाचलेला परत एकदा वाचून काढला. लक्तरे काडलीत अक्षरशः

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2015 - 7:46 am | बोका-ए-आझम

त्यांना प्रताप आसबे म्हणायचं असेल. रावसाहेब कसबे प्राध्यापक आहेत. पत्रकार नाहीत.

संडे टाइम्स ऐवजी शनिवारचा टाइम्स घ्या.रत्नागिरी टाइम्स ( टाइम्स ग्रुपचा नाही)मध्ये कुडाळकडच्या कोकणीत विनोदी स्तंभअसायचा.कोकणी शिकण्यासाठी मस्त होता.

सूड's picture

14 Sep 2015 - 7:00 pm | सूड

जलेबी, कढाई...ओके!!

पुंबा's picture

8 Sep 2016 - 11:23 am | पुंबा

माझे आवडते स्तंभः

उंबरठ्यातून- सदानंद मोरे- सा. साधना
गल्लत गफलत गहजब- राजीव साने- लोकसत्ता
एक फूल दोन हाफ- प्रवीण टोकेकर- सा. लोकप्रभा
कथा अकलेच्या कांद्याची- म्रुदुला बेळे
राम नाईक सकाळ्मध्ये लिहीत तो स्तंभ देखील सुंदर होता.
धूळ्पेर- आसाराम लोमटे- हा मी वाचलेला सर्वात सुन्दर स्तंभ. अतिशय ओघवती आणि अक्रुत्रीम शैली. जबर्दस्त लेखण. दुर्दैवाने लोमटे आणि टोकेकर हे दोघेही तसे अप्रसिद्धच(साहीत्यीक वर्तुळात असतीलही पण माझ्यासारख्याला फार माहिती नसते.)

गणामास्तर's picture

8 Sep 2016 - 11:53 am | गणामास्तर

नक्की आठवत नाही पण बहुदा 'तरुण भारत' मध्ये बब्रुवान रुद्रकंठावार मराठवाडी बोली भाषेत एक स्तंभ लिहायचे.
बब्रुवान आणि त्याचा दोस्त असे दोन कॅरॅक्टर वापरून विविध विषयांवर मार्मिक भाष्य असायचे त्यात,अगदी नर्मविनोदी शैलीत. त्यातल्या काही स्तंभाचे एकत्रिकरण करून 'बर्ट्रांड रसेल वूइथ देशी फिलॉसॉफी' म्हणून पुस्तक छापले आहे 'जनशक्ती वाचक चळवळ' ने.

सतिश रानडे's picture

8 Sep 2016 - 1:30 pm | सतिश रानडे

दादूमिया यांचे लेखनही सुंदर असायचे

अलका सुहास जोशी's picture

9 Sep 2016 - 1:21 pm | अलका सुहास जोशी

प्रकाश अकोलकर यांचे पेन ड्राईव्ह हे उत्तम सदर मटा किंवा लोकसत्तेत येत असे. सलील कुलकर्णीचे लपविलेल्या काचा हे सदरही अगदी अलिकडचे,मला फार आवडलेले सदर.

रामपहाट (नाव गंडतय काहीतरी) >>> रामप्रहर