तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in काथ्याकूट
13 Sep 2015 - 1:51 am
गाभा: 

एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.

धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.

धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं

या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.

१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)

उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

15 Sep 2015 - 3:10 pm | प्यारे१

आजार दाखवला आणि औषध नाही मिळालं तर काय उपयोग असतो का बुवा?
डॉक्टरकडं जाऊन औषध मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकी आरोप वगैरे कोणीही करत नाहीये. होमिओपथी पटली नाही म्हणून अ‍ॅलोपथी चं पूर्ण शिक्षण करुन हॉस्पिटल चालवणारे डॉ. शंतनु अभ्यंकर म्हणून एक आहेत. वाईचे. तसं काही पटत नाही म्हणून वेगळं करण्याचा विचार करता येत असल्यास कळवा.
तुम्हाला पौरोहित्य म्हणजे दुकान वाटतं ना मग तसं स्पष्ट बोला. त्यातले फायदे घ्यायचे आहेत का फक्त? बाकी काही जबाबदारी नको आहे का?

काये ना, एकदा जस्टिफिकेशन द्यायचं म्हटल्यावर कशाचंही देता येतं. बाकी चालू द्यात.

प्रसाद गोडबोले's picture

15 Sep 2015 - 6:27 pm | प्रसाद गोडबोले

काये ना, एकदा जस्टिफिकेशन द्यायचं म्हटल्यावर कशाचंही देता येतं. बाकी चालू द्यात.

अगदी १००% अणुमोदन !

अनुप ढेरे's picture

15 Sep 2015 - 6:33 pm | अनुप ढेरे

एकदा जस्टिफिकेशन द्यायचं म्हटल्यावर कशाचंही देता येतं.

सहमत आहे. आपले श्रीगुरुजीच बघा की!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2015 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

@अमुक एक पूजा करुन काहीही होणार नाही किंवा ही पूजा करु नका ती करा. >>| ते धर्म उच्छेदकाचं काम आहे, ते आपणहून आमच्या माथी का मारता तुम्ही?

@साध्या भोळ्या यजमानांचा हा फायदा उचलताय कि तुम्ही. ही फसवणूक आहे कि. यजमानांना काय माहिति असते का अमुक एक पूजा करायची आहे . >>>| निरर्थक दुर्लक्षणीय.. असो!

@कुणीतरी
सांगतं म्हणुन ते तुमच्याकडं येतात. बुवा पूजा करायची आहे. >>| ते जे कोणी सांगतं त्यांना विचारा जाऊन.. ते आमच्याकड लागतच नाही.

@तुम्ही काही सांगता का? अमुक एक कारण असलं तर हे करा अन्यथा नका करु. त्यानंतर समोरच्याची मर्जी.>>| वर| उत्तर आलं आहेच , आमचा हा प्रांतच नाही.. हे तुमचं तुम्ही मुद्दाम आमच्यावर आरोप करण्याच्या सोईखातर लादताय..सबब ते आंम्ही झीडकारुन लावत आहोत. लल्ूललूललू :p

प्यारे१'s picture

15 Sep 2015 - 3:01 pm | प्यारे१

भुमिका समजली.

धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2015 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

मी धर्म उच्छेदक नाही, धर्म सुधारक आहे... हे समजून घेतल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

प्यारे१'s picture

15 Sep 2015 - 3:11 pm | प्यारे१

ह्या ह्या ह्या!

प्रसाद गोडबोले's picture

15 Sep 2015 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

मी धर्म उच्छेदक नाही, धर्म सुधारक आहे

सत्यनारायणाची पुजा हे ठार थोतांड आहे हे स्पष्ट दिसत असताना ही चालु ठेवणे ही धर्मसुधारणा होय ?

आणि सत्यनारायणासारख्या भाकडकथां चालु ठेवुन मुळ वैदिक , उपनिशदे , गीता , ब्रह्मसुत्रे , शंकराचार्य , ज्ञानेश्वर वगैरे ग्रंथांनी लोकांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर टीका करायची ही धर्मसुधारणा होय ?

मागे एका चर्चेत मी "ज्ञानेश्वरांनी बुध्दमताचा उल्लेख स्वभावतः खंडितु" असा केला आहे हे निदर्शनास आणुन दिले होते तेव्हा पुरोगामी धर्मसुधारकांनी आम्हाला अत्मसत्ये एकवली होती - चालु दे तुमचे निरथक अत्मरंजन वगैरे वगैरे !

हे असे लोक म्हणजे वैदिक ज्ञानाच्या खजिन्यावर बसलेल्या भुजंगासारखे आहेत ! कोणी वैदिक धर्माचा अभ्यास करायला जवळ गेला तर मनुस्मृती मनुस्मृती असले विखारी विषारी फुत्कार टाकतात , मग बिचारी माणसे निराश होवुन सनातन वैदिक तत्वज्ञाना पासुन दूर गेली की "बघा आम्ही कसे तुम्हाला ह्या विषारी धर्मा पासुन वाचवले" असे म्हणत धर्म सुधारणेचा आव आणतात !!

असो .
आजचे ब्राह्मण असे तर तुकोबांच्या काळचे कसे असतील असा विचार मनात येतो , उगाच नाही तुकोबा म्हणाले ते - वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2015 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा

मध्यंतरी झालेल्या वादात हे सगळे मुद्दे स्पष्ट केलेले होते.. तिथे काहीही बोंबलता न आल्यानी ईकडे पार बोट घालून तीच ओकारी काढलेली स्वच्छ दिसते आहे...
तस्मात , चालू द्या तुमचे निर्लायकी निरर्थक आत्मओकन... बॉडबॉडबॉड बॉडॉक्क्क!
=====
:p

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2015 - 11:34 am | प्रसाद गोडबोले

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

गब्बरसींगच सांगतो ठाकूरची सदवचने स्वत:च्या बाजूनी..
एकदा तुकारामांनी टनाटन्यांना कसं जेड्यानी हाणलय ते पहा!
अर्थात माहित असेलच.. याची खात्री आहे!

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2015 - 11:49 am | प्रसाद गोडबोले

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||

ह्या अभंगावरुन तुकारामांना वेदांविषयी आणि वैदिक धर्माविषयी आदर होता हे स्पष्ट दिसुन येते . वैदिक धर्माविषयी तुमच्या सारखा तिरस्कार असता तर तुकोबा असे म्हणालेच नसते !१

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 11:56 am | प्यारे१

मी काय म्हणतो.
एक कट्टा करा. प्रगो इकडून आपले चिकन मटन घेऊन येईल बुवा तिकडून त्याची मिसळ तर्री आणेल. चपात्या, पाव आम्ही देऊ. कांदा, लिम्बु सरांकडे. (कुठलेतरी एक सर फुकट देतीलच्च)
आजूबाजूला शांत निसर्ग असला की झालं. काय बोलता?

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2015 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

केलाही असता प्यारे ...

पण कसे आहे की त्यांना संपुर्ण वैदिक तत्वज्ञानाचीच अ‍ॅलर्जी आहे मग त्यात वेद पुराणे उपनिषदे गीता ब्रह्मसुत्रे ज्ञानेश्वरी अमृतानुभव एकनाथी भागवत तुकाराम गाथा दासबोध सारेच आले .
ह्या विषयी त्यांना कधी तरी बोलताना पाहिले आहे का तुम्ही ?

त्यांना फक्त सत्यनारायण आणि मनुस्मृती च आवडते की ज्यातील एकही वैदिक नाही ... मनुस्मृती टीका करुन पुरोगामित्वाची जाहिरात करायला आणि सत्यनारायण ....

हे म्हणजे मिसळपाव खाताना फरसाण , तर्री आणि पावाला शिव्या घालण्या सारखे झाले =))

असो .

नाखु's picture

16 Sep 2015 - 12:08 pm | नाखु

सुट्टीच्या दिवशी नसला तर मी खास सुट्टी घ्यायला तयार आहे.

प्यारे ये काम तुम ले लो अपने अंगपे प्लीज

"कट्टेसे कटुता कम करो"

केकता कपूरच्या आगामी शिरेल्चे नाव.

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 12:28 pm | प्यारे१

हम वादा करते है. हम जब हिन्दुस्थान आएंगे तो नक्की प्रगो और बुवा का मिलन (मनोमिलन की बात कर रहे है गलतफहमी ना कीजियेगा) करवाएंगे.
तालियाँ.
बुवा आखिर हमारा है प्रगो.
प्रगो भी तो अपनाही है ना बुवा.

- नाखूनकाकाचालवतसलेल्यासमझोताएक्सप्रेसचासिग्नलमन

नाखु's picture

16 Sep 2015 - 2:40 pm | नाखु

आप्का हुकुम सर आंखोपर!!!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या! :D

कवितानागेश's picture

16 Sep 2015 - 7:49 pm | कवितानागेश

मी धर्म उच्छेदक नाही, धर्म सुधारक आहे.---- यासाठी जोरदार टाळ्या आत्मुगुरुजी. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद माऊ ली!. :)

@थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत. >> हे आपणा सामान्यांना सहज कळणार असतं. लबाडांना तर (आधीच) माहीत असतं. पण ते इतक्या (आणी कितक्याही) सहजतेनं मान्य करत नाहीत, कारण मग त्यामुळे धर्मामधून सोय करुन ठेवलेला कपटी कावा आणी स्वार्थ साध्य होत नाही ना त्यांचा!

ज्यांना धर्म मानवी बुद्धीने शुद्ध करवून वापरण्याची इच्छा व तयारी असते.. त्यांना तो तसा करवूून - देणं.. हे माझं काम. म्हणून त्याला शब्द "सुधारक" , हा. :)

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 8:03 pm | प्यारे१

>>>> ज्यांना धर्म मानवी बुद्धीने शुद्ध करवून वापरण्याची इच्छा व तयारी असते.. त्यांना तो तसा करवूून - देणं.. हे माझं काम. म्हणून त्याला शब्द "सुधारक"

उदाहरणार्थ?????

अवांतरः बुवा आमच्याकडं एकानं सांगितलं येत्या वर्षात सत्यनारायण घाला म्हणून. काय करु?

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

@उदाहरणार्थ????? >> अता बघा हं.. एक झालेला संवाद देतो इथे (दोन वर्षापूर्वी झालेल्या एका विवाहविधीच्या कार्यक्रमातील..)

यजमान:- गुरुजी एक प्रॉब्लेम आहे.
मी:-काय?
यजमानः-आमची मुलगी लग्नात ते कन्यादान "नको" म्हणते.
मी:- बरं..मग नको करायला.
यजमानः- पण काहितरी तर अ‍ॅडजस्ट्मेंट लागेलच ना
मी:- ते येइल करता..आधी मला ती नको का म्हणते ते सांगा?
यजमानः- ते काय दान वगैरे कन्सेप्ट्स नाही पटत म्हणे तीला
मी:- ठीक आहे..लग्नाच्या दिवशी मी करीन तसा बदल..तुम्ही निश्चिंत रहा.

नंतर विवाहाच्या दिवशी सकाळी मी त्या वधूला तीचे म्हणणे योग्य आहे,की मुलगी ही दानाची वस्तू वगैरे नव्हे..हे मान्य करून तो विधी न करण्याला तयार झालो. नंतर तीला समजावले..की वडीलांची (नातेवाइकां समोर)पंचाईत उडू नये,म्हणून आपण सेम फोटो मुव्हमेंट्स असलेला..एक वधूवर स्विकाराचा नवा विधी त्या जागी करू(जो मूलभूत विवाहविधीत-नाही.) आणि नंतर हा नवा विधी का व कशासाठी केला हे मी माइकवरून उपस्थितांना समाजावून जाहीर करूनंही सांगेन.. जेणे करून तुला अपेक्षीत घडून येइल.

याला वधुने संमती दिली,व मग पुढे आंम्ही त्याप्रमाणे कार्यवाही केली.

हा मी माझ्या बुद्धीने केलेला बदल... (समाजमन बदलाला जिथे अनुकूल असेल,तिथे हे बदल आपण धर्मशास्त्र बदलून करत आहोत.. असे सांगून मी करून घेतो.. आणि इतर वेळी जिथे जिथे मला समोरचा माणूस असा बदल स्विकारेल..असे वाटेल तिथे तिथे लोकांसमोर हे पर्याय ठेवतो... )
========================================

अवांतरः बुवा आमच्याकडं एकानं सांगितलं येत्या वर्षात सत्यनारायण घाला म्हणून. काय करु? >>> आता तुमची इच्छा काय ते आधी सांगा.. मग त्यानुसार आपण बदल करू..
@ कुणिही सांगितलेलं असलं,तरी आंम्हाला हे थोतांड वाटतं असं म्हणत असाल..तर मला विचारण्याचा प्रश्नच येत नाही..जेंव्हा थोतांड वगैरे असूनही याच्याजागी पूजापाठातलं चांगलं काय करता येइल? असा प्रश्न असेल..तर मी तुम्हाला पुढचा पर्याय देइनच.
माझ्या पौरोहित्य करताना हे करायच्या क्रायटेरीयात समाज जिथे जिथे बदलाला तयार असेल,तिथे तिथे त्याला हात देणे..ही पहिली मर्यादा आहे..आणि मी आपणहून समोर ठेवलेला बदल समाजानीही उचलून धरला..तर ती दुसरी मर्यादा आहे..अर्थात हे सर्व बदल धर्मातले चुकिचे विधी,चुकिची मुल्य बदलण्याच्या कक्षेतच असणार ही मूळ आणि अंतिम मर्यादा आहे.

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 11:40 pm | प्यारे१

>>> धर्मातले चुकिचे विधी,चुकिची मुल्य बदलण्याच्या कक्षेतच असणार

मुद्दा याबाबत जास्त आहे. चुक काय नि बरोबर काय हे ठरवणार कोण?

आमचा (भाषा तुमचीए: ग्राहक) मुद्दा: सत्यनारायण केला तर आम्हाला प्रसन्न वाटतं, छान नवीन कपडे घालता येतात, वर्षभर जे काय गोंधळ घातलेले असतात त्यावर थोडं पाणी पाडता येतं, चार माणसं येतात, भेटतात, जेवतात, थोडं पुण्य कमावल्यासारखं वाटतं..... यापासून अनेक कारणं असून शकतात. एखादा नवस, एखादा आजार, एखादं काम होणं इत्यादी गोष्टी गृहीत आहेत.

तुमचा (भाषा तुमचीए: विक्रेता) मुद्दा : विधी चुकीचा आहे हे तुम्हाला माहित असून तुम्हि गप्प बसला असाल तर.... ??? गोळ्या चुकीच्या पण निरुपद्रवी आहेत असा विचार करुन दिल्या गेलेल्या डॉक्टर ला ठाऊक असतं कारण पहिल्या बरोबर डोस मध्ये पेशंट बरा झाला तर चार दिवसांनी परत कसा येणार असं काही आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2015 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

माझं उत्तर तुम्हीच कसं काय ठरवता?
अता ते पर्वा देतो.. जे काय आहे ते..

बाय दी वे ... लेबर वगैरे भाषा पहीली (त्यावेळी) आपऩच वापरलेली होतीत... हे ध्यानात आणा!

वर वाद घालत असणार्या लोकांना माझा एक प्रश्न आहे.तुम्ही करत असलेल्या व्यवसाय/ नोकरीतल्या सर्व गोष्टी तुम्हाला आवडतात पटतात म्हणून करता का? जेव्हा आपण पोटार्थी म्हणून व्यवसाय करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला रुचेल तसेच करायचे स्वातंत्र्य फार कमी लोकांना मिळते.अगदी माझ्या व्यवसायातसुध्दा हेच आहे.लोक दाताचे दुखणे चिघळवून दात बरा न करता काढायला येतात.त्यांना काढणे ही ट्रीटमेंट नाही.वाचवा दात असे सांगणे माझे काम.त्याउपरही त्यांना दात काढूनच हवा असेल तर तो पेशंट न घालवता मी दात काढून टाकते, ग्राहकांचा संतोष बेसिसवर!
शेवटी जगातल्या प्रत्येक माणसाला आपण आपले विचार पटवायला जाऊ शकत नाही.रोजीरोटी प्रत्येकालाच महत्त्वाची.
त्यामुळे तुमच्या मनातल्या धर्मसंकल्पना तुम्ही तुमच्या यजमानांवर लादू शकत नाही.सुचवू शकता.त्यांना पटले ठिक न पटल्यास आलेली पूजा एखाद्या पुरोहिताने का सोडावी? तो नाही तर अजून कोणीतरी येऊन करेलच ना!

तसं असेल तर पोटार्थी म्हणूनच भूमिका असावी.
'जगाच्या कल्याणाच्या आणि धर्मसुधारणां'च्या भाषा करु नयेत मग. विषय मिटला. आम्ही स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये काही सुधारणा करु वगैरे भाषा करत च नाही. त्यात ज्या गोष्टी झेपतात नि जमतात त्याच करतो. न पटणार्‍या बाबतीत सीनियर शी भांडतो वगैरे सगळं करतो.

बाकी हे बर्‍याच व्यवसायात नि बर्‍याच बाबतीत लागू पडतं हे तेवढंच खरं आहे.
दुर्दैवानं आपल्याकडं धर्माची आणि अध्यात्माची सांगड अशी घातली जाते की धार्मिक म्हणजे श्रद्धाळू म्हणजे आध्यात्मिक म्हणजे बुवा म्हणजे पूजा म्हणजे कर्मकांड म्हणजे उपास व्रत म्हणजे ..... अ= ब =क =ड च्या सगळ्या शक्यता संपल्या तरी सुरु राहतील असं काही सुरु असतं.

जाता जाता: अध्ययन, अध्यापन, संशोधन, ज्ञान दान (ज्ञान म्हणजे सगळ्या प्रकारचं) हे सारे गुण एका विशिष्ट समुदायाला आपल्या वर्णाश्रम संस्थेनं दिले होते. त्या मध्ये आणखी एका समुदायाचे काही 'दुर्गुण' आले नि लई मोठा घोळ झाला एवढंच.

पुष्करिणी's picture

17 Sep 2015 - 11:00 am | पुष्करिणी

अवांतर- ''स्वयंवर' या लग्न प्रकारात 'कन्यादान' विधी असायचा का?

कवितानागेश's picture

17 Sep 2015 - 1:02 pm | कवितानागेश

बहुतेक 'वर'दान विधी असावा! ;-)

शुचि's picture

17 Sep 2015 - 7:13 pm | शुचि

=)) हाहाहा

ज्यांना धर्म मानवी बुद्धीने शुद्ध करवून वापरण्याची इच्छा व तयारी असते.. त्यांना तो तसा करवूून - देणं.. हे माझं काम. म्हणून त्याला शब्द "सुधारक"

ओह आय सी!!

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 10:07 pm | प्यारे१

बाकी सगळं जौ दे, उच्छेदन बरोबर कि विच्छेदन ??? ;)

अजाणत्या वयात आपण स्वत:ला उगाचच आस्तिक आणि नास्तिक अशी विशेषणे लावून घेतो.. वय वाढले की कळते की आपण दोन्ही आहोत... सोयिस्करपणे....

वॉल्टर व्हाईट's picture

15 Sep 2015 - 10:26 pm | वॉल्टर व्हाईट

अजून एक मार्मिक अन नेमका प्रतिसाद.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2015 - 7:55 pm | प्रकाश घाटपांडे

+१

यशोधरा's picture

16 Sep 2015 - 4:39 pm | यशोधरा

बर्मग्कायठरलंशेवटी?

बर्मग्कायठरलंशेवटी?

जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते. पण त्याला साजेसा डेटा इकडे मिळाला नाही. तिकडचे माहित नाही :)

यशोधरा's picture

16 Sep 2015 - 6:01 pm | यशोधरा

दुत्त, दुत्त ट्रुमन!!

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 6:24 pm | प्यारे१

बोले तो बाण मारके वर्तुळ बनाने का?

टिवटिव's picture

19 Sep 2015 - 12:02 am | टिवटिव

खिक्क !

कवितानागेश's picture

16 Sep 2015 - 9:13 pm | कवितानागेश

इथे जास्त वेटेज दोन पिढ्यांच्या तुलनेला आहे की तथाकथित धार्मिकतेला आहे?

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2015 - 9:24 pm | प्रभाकर पेठकर

इथे वेटेज, फडफडीत वादावादीला आहे असे जाणवायला लागले आहे.

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2015 - 9:31 pm | राजेश घासकडवी

मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून येणाऱ्या बदलाला आहे. तशीही अॅब्सोल्यूट धार्मिकता मोजणं कठीणच आहे. पण त्यामानाने, रिलेटिव्ह बदल - आपल्या आईवडलांच्यात आणि आपल्यात - याचा अंदाज ज्याला त्याला करणं सोपं पडेल असा अंदाज आहे.

विश्लेषणात कोण कुठे आहे, यापेक्षा किती बदल दिसून येतो आहे यावरच भर असणार आहे.

आता जवळ आलं आहे द्विशतकाच्या तर तुम्हाला मदत करायला हवीच. ;)

तुमच्या बर्‍याच कोलांट्या उड्या आतापर्यंत बघितल्या.
आधी आस्तिक, धार्मिक आणि श्रद्धाळू एकत्र.
नंतर कुणी विचारल्यावर आस्तिक वेगळे, धार्मिक वेगळे.
मग अज्ञेय
नंतर मुलगा नास्तिक असल्याबद्दल डोळे चमकणं, आस्तिक किती येडपट असतात वगैरे आवेश.

मुख्य मुद्दा काय आहे?

कवितानागेश's picture

17 Sep 2015 - 11:51 pm | कवितानागेश

पिढ्यांमधला फरक तपासायचा असेल तर खरोखरच पिढीप्रमाणे ज्या गोष्टी बदलल्या आहेत त्या तपासणे जास्त योग्य ठरेल असे वाटतंय. जसे आईवडील अधिक निरोगी की आपण अधिक खर्चिक कोण, अधिक निवांत आयुष्य कोणाचे, यंत्रांचा जास्त वापर कोण करते?, अधिक जनरल क्नोलेज कुणाचे, परिस्थितीविरुद्ध लढण्याची अधिक ताकद कुणाची? , असे प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम करणारे अनेक विषय आहेत.
तुम्ही वर दिलेल्या 3 प्रकारचे लोक सगळ्याच पिढ्यांमध्ये, सगळ्या काळात सापड़तील. किंवा एकच व्यक्ति आपल्या आयुष्यात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ शकतो.
जर पिढ्यांच्या एकमेकांवरच्या प्रभावाबद्दल माहिती हवी असेल, तर तसाच सर्व्हे घेता येईल, की तुमच्यावर तुमच्या पालकांचा किती प्रभाव आहे? कशा प्रकारचा? सकारात्मक की नकारात्मक? तुम्ही आदन्या धारक आहात की बंडखोर? आशा प्रकारचे प्रश्न ठेवता येतील? तरीही आपल्या धार्मिकतेचा संबंध आपल्या आईवडलांशी कसा काय असू शकतो हे कळले नाही.
शिवाय सामाजिक धार्मिकता कशी असते हे कळले नाही. बाहेर जाऊन जरी रांगा लावल्या किंवा मिरावणूकीत नाचले तरी त्यामागचे कारण वैयक्तिकच असते. गणेशोत्सव आणि नवरात्र आणि दिवाळी म्हणजे काही धार्मिक सण वगैरे नाही, कारण त्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक पण सहभागी होतात. तो देवाच्या निमित्तानि आपणच हौसेनी केला जाणारा उत्सव आहे. तसा तर आता ख्रिसमस पण फारसा धार्मिक वगैरे राहिला नाही. रमजानमध्ये सगळे लोक रात्रीचे खाउगिरी मध्ये सामिल होतात.
कुम्भमेळ्या ची गर्दी वाढली असे म्हटले तरी त्यात वेगळे काही नाही. पूर्वी लोकसंख्याच कमी होती, आता लोकसंख्या 10 पट जाली असेल तर कुम्भमेळ्याची गर्दीही 10 पट वाढेल.
मग नक्की बदल कशात दिसतोय हेही मला कळले नाही.

राजेश घासकडवी's picture

18 Sep 2015 - 1:41 am | राजेश घासकडवी

असे प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम करणारे अनेक विषय आहेत.

त्याविषयीही अभ्यास करायला आवडेल, पण एका वेळी एकच.

जर पिढ्यांच्या एकमेकांवरच्या प्रभावाबद्दल माहिती हवी असेल,

नाही नाही, हा प्रभावाचा अभ्यास नाही. मागची पिढी आणि आजची पिढी यांची तुलना आहे. आईवडील व स्वतः यांची तुलना केली तर 'मुलं या पिढीत अधिक धार्मिक झालेली आहेत का?' या स्वरूपाची उत्तरं देता येतात.

पूर्वी लोकसंख्याच कमी होती, आता लोकसंख्या 10 पट जाली असेल तर कुम्भमेळ्याची गर्दीही 10 पट वाढेल.
मग नक्की बदल कशात दिसतोय हेही मला कळले नाही.

सार्वजनिक धार्मिक अभिव्यक्ती वाढली आहे असं परसेप्शन आहे. ते कदाचित चुकीचंही असेल. त्याचा या सर्व्हेशी संबंध नाही. वैयक्तिक धार्मिकता वाढली की नाही याचा काही प्रमाणात या सर्व्हेतून अंदाज येईल. बदल नाहीच, असं आधीच मानत नाहीये.

बाळ सप्रे's picture

18 Sep 2015 - 9:43 am | बाळ सप्रे

गणेशोत्सव आणि नवरात्र आणि दिवाळी म्हणजे काही धार्मिक सण वगैरे नाही ...

सण साजरे करायला आवडत असतील तर खुलेपणाने आनंदाने करावेत. मग धार्मिक म्हणवून घ्यायला अवघड का वाटावे?? हे धार्मिक सण नव्हेत म्हणण्यासारखी केविलवाणी धडपड का करावी ??

मारवा's picture

18 Sep 2015 - 8:27 pm | मारवा

घासकडवींनी आपला हेतु क्रीस्टल क्लीअर शब्दांत मांडलेला आहे. त्यांना तुम्ही प्रतिसादाच्या पहील्या परीच्छेदात म्हणताय तसा पिढ्यांचा जनरल फरक नाही तपासायचाय. निरोगी खार्चिक आदि निकष वेगळ्या बाबी आहेत पुर्णपणे.
त्यांचा फोकस धार्मिकते संदर्भातील बदल किती प्रमाणात झाले हे जोखण्याचा आहे.
जरी तुम्ही म्हणता तस माणुस एका टोकाकडुन दुसरी कडे जाऊ शकतो तरी सध्या तर तो कुठेतरी एकीकडेच असणार ना ?
किमान एका कुठल्यातरी जागेला अधिक जवळचा असणार की नाही ? मग त्याने तो नंबर द्यावा उदा. इथे काहिंनी २.५ असा नंबर देण पसंत केलं.
दुसरी गोष्ट जर समजा आज ३ देऊन काही वर्षांनी एखादा १ वर आला तर त्याने काही फरक पडत नाही.
सर्व्हे मधुन १०० % अचुक चित्र दाखवण शक्य नाही हे त्यांनी स्वतःच सांगीतलय आणि आपल्याला ही कळत की असा १०० % अचुक निष्कर्ष काढता येत नाही.
मात्र कल ( कल पण फार महत्वाचा आहे न कळला तर ) कल एक ग्राफ तर ढोबळमानाने दाखवता येतो.
शिवाय नुसतीच चर्चा आपण नेहमी करतो विचार करा हि कीती रोचक बाब आहे की आपण एका सॉलीड निष्कर्षाच्या दिशेने किमान पावल तर उचलु शकतो. घासकडवींच्या या प्रयोगशीलतेत आपणही सहभागी होऊ या.
एरवी आपण वैज्ञानिक दृष्टीकोणा चा कीती उदो उदो करतो मग प्रत्यक्ष प्रयोगात सामील व्हा या आव्हानाला इतका उदासीन प्रतिसाद का असावा ?
आणि स्टॅटीस्टीक्स ही सॉलीड गणिती शास्त्र आहे. एक रोचक आठवल म्हणुन सांगतो पॉवर ऑफ हॅबीट या पुस्तकात लेखकाने एक उदाहरण दिलेल आहे. टारगेट या अमेरीकेतील सुपरमार्केट ने ग्राहकांच्या खरेदीचा विदा जमा करुन उत्तम सांख्यिकीय तज्ञ लाऊन इतकी प्रगती केलेली की ते एखाद्या महिलेच्या खरेदी वरुन अचुक अंदाज बांधतात की ती प्रेग्नंट झालेली आहे की नाही. पुढे इतकी हाइट की ते कधी प्रेग्नंट होणार याच्या तारखेचा हि अंदाज ऑलमोस्ट अचुक लावतात व मग त्याप्रमाणे ती कोणत्या संभाव्य वस्तु खरेदी करेल त्याच्या प्रमोशनल डिस्काउंट ऑफर्स आदि पाठवतात. इ. फार डीटेल मध्ये त्यात आहे. तर मुद्दा असा होता की सांख्यिकीय शास्त्राचा वापर करुन इतक्या अचुकतेने अंदाज बांधला जाऊ शकतो इतकी हि शाखा प्रगत झालेली आहे.
आपल्याला ते प्रेग्नंसी जाऊ द्या पण धार्मिकते संदर्भातील कल तरी कळेल ना या सर्व्हेने
म्हणुन पुन्हा एकदा अशी विनंती करतो की
तुम्ही टाकल की नाही मागे प्रतिसाद बघितला नाही पण नसेल तर
सर्वांनी सर्व्हे साठी व्होटींग करुन सर्व्हे ला योगदान द्यावे प्रयोगाचा भाग व्हावे
चर्चा मारामारी चलने दो लेकीन सबसे पहले व्होट दो

भृशुंडी's picture

18 Sep 2015 - 11:35 pm | भृशुंडी

आम्ही २-३ वाले.
----------
मारवाजी- कधी भेटलात तर आमच्याकडून एक बांगडा गिफ्ट. पापलेट हवं तर पापलेट देऊ. असो.
सांख्यिकी, Data analysis वगैरे गोष्टींतून अनेकदा सहज न समजणारी माहीती पटकन समजते. एखादाच ग्राफ, एकच चाचणी निष्कर्ष हा अनेक चर्चादळणांच्या आणि प्रतिसाद हाणामार्‍यांच्या तोडीचा निघतो.
तेव्हा वोट देऊन मग धुमाकूळ घालावा हे योग्य बोललात! ट्रेंड समजणं, मग तो भले कितीही मर्यादित सँपल साईझ घेऊन केला असला तरीही.

मारवा's picture

19 Sep 2015 - 7:36 pm | मारवा

भृशुंडी भाऊ

तुम्ही इतक्या प्रेमाने पापलेट ऑफर केलं त्यातच सर्व आलं.
बाकी तुमच्या पुरणपोळीच्या धक्कयातुन अजुन सावरलेलो नाही.
म्हणुन काय कोण जाणे पापलेट वुइथ घासलेट स्प्रींकल्ड ऑन इट अस काहीतरी नजरेसमोर तरळुन गेल.
भाऊ तुमच प्रेम मिळाल हे काय कमी आहे ? डिशेस वगैरे जाऊ द्या
माया पातळ करु नका फक्त.
ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

भृशुंडी's picture

17 Sep 2015 - 3:24 am | भृशुंडी

आईशप्पत धाग्याचा विषय जरा वेगळा असला तरी प्रतिक्रिया नेहेमीच्याच.
पुरणपोळीत हगून ठेवायची सवय काही जात नाही पब्लिकची- चालू द्या!

प्यारे१'s picture

17 Sep 2015 - 12:16 pm | प्यारे१

कसं लागतं ओ कॉम्बिनेशन???

घासकडवी जो सर्व्हे घेत आहेत तो विशेष आहे.
नेहमीच्या मतेमतांतरे पेक्षा वेगळा आहे.
ते एक ठोस निष्कर्षांच्या दिशेने अतिशय तार्कीक रीतीने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा रीतीने समाजमनाचा कल जोखण्याचा प्रयत्न करणे अतिशय आवश्यक बाब आहे
सॅम्पल सर्व्हे छोटा असला तरी, त्याला मर्यादा असल्या तरी तो पुर्ण अचुक नसला तरी
अचुकतेच्या दिशेने जाणारा एकमात्र प्रयोग आहे.
याशिवाय दुसरा मार्ग तरी काय आहे ?
म्हणुन या वैज्ञानिक गणीतीय रीतीने चालवलेल्या उपक्रमाचा भाग होऊन
आपण आपले मत या सर्व्हे त नोंदवायला हवे असे विनम्र आवाहन मी करतो.
आपली वेगवेगळी मते चर्चा एकीकडे चालु ठेउयात
मात्र प्रत्येकाने आपली व्होटींग करुन सर्व्हेला मदत करावी
त्यात काही अडचण नाही.

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2015 - 12:34 pm | राजेश घासकडवी

सर्व्हे सुरू करून सुमारे एक आठवडा झाला, तेव्हा मी आतापर्यंत आलेल्या मतांचं विश्लेषण करून ते लवकरच सादर करेन.

पेठकर साहेब , तुम्ही म्हणताय

माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले. म्हणजे तिचा प्रवास सश्रद्ध कडून अश्रद्ध अवस्थेकडे होत गेला का? कळायला मार्ग नाही

म्हणजे त्यांच्यासोबात नक्की काय झालं हे माहित नाही . सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास ह्यांमुळे खरच ईश्वरभक्ती होत नाही त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं हे त्यांना समजलं ? कि हे सगळं करताना कर्मांकडे दुर्लक्ष झालं ? कि देवाला ह्याची अपेक्षाच नसते . त्याला दुसर्याच कशाची तरी अपेक्षा असते हे त्यांना कळलं ? काही समजायला मार्ग नाहीये .
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे ह्या केवळ बाह्यखुणा आहेत .खिचडी , रातले , वेफर्स सगळं काही खावूनपिवून उपास धरणारे महाभाग असतात . किवा दिवसभर अगदी निर्जळी उपवास जरी केला तरी केवळ उपाशी राहण्याचा आणि ईश्वरभक्तीचा काय संबंध ? मग कसा प्रत्यय येणार ?
आता सणवार घ्या . किती सणवार हे अध्यात्मिक दृष्टीकोनातून अर्थपूर्ण रीतीने साजरे केले जातात ? केवळ छान खायला मिळतंय , नवीन कपडे घालायला मिळतात , मिरवायला मिळतंय म्हणून हे सणवार . बायका सावाष्ण्यांना बोलवून हळदी कुंकू काय साजरी करतात , वत्पोर्णिमा काय करतात . गौरी काय बसवतात , हर्ताल्कीचे व्रत ,आणि कसली कसली अर्थहीन व्रतं (काही खरोखरची व्रतं सोडून ) कशा कशाला धार्मिकतेचा गंधसुधा नाही . तीच गोष्ट कुळधर्म-कुळाचाराची . हरीहरांना , आदिशक्तीला सोडून काहीतरी काल्पनिक , क्षुद्र देवता (म्हसोबा , खंडोबा , येडोबा ,जनाई , येणाई , बनाई , हि आई ती बाई , हा बाबा आणि तो राजा ) निर्माण करून अर्थहीन कर्मकांड म्हणजेच कुलाचार . काय उपयोग हो ह्या सगळ्याचा ?

एकाला गोड लागणारा 'गुलाबजाम' प्रत्येकाला गोडच लागतो.

exactly . तसंच नामस्मरण , ईश्वरभक्ती श्रद्धेने , मनापासून केली कि त्याचा प्रत्ययहि सगळ्यांना सारखाच येतो . एखाद्याला आयुष्यभर प्रत्यय येत नसेल तर ती केवळ दिखावू भक्ती नाही हे कशावरून ?

देवबाप्पा शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही ...
विधिर्वन्द्यः सोऽपि प्रतिनियतकर्मैकफलदः ।
फलं कर्मायत्तं यदि किं अमरैः किं च विधिना

देवबाप्पा विनाकारण कुणालाही शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही. कर्मांप्रमाणे जे काही वाट्याला यील ते देतो .

@वामनपंडित . जावूद्याहो .योग्य वेळ आली कि नास्तिकतेचा माज बरोबर उतरतो . तोपर्यंत काय उड्या मारून घायच्या असतील त्या घेवू द्या .

ज्याला लोकं देव देव म्हणतात तो तुच आहेस " तत्वमसि " !!

अगदी बरोबर . पण हे पुस्तकी वाक्य नुसतं घोळवून काय उपयोग ? देव आपल्यात नक्की कुठे आणि कसा आहे ह्याचा शोध तर घ्यायलाच हवा ना . आणि तो घेणं ह्यालाच आस्तिकता म्हणतात .

आस्तिक चा खरा अर्थ 'वेदप्रामाण्य मानणारा' असा आहे.

कशावरून ? आता हा नियम कुणी केला ? इश्वर न मानणारा , देवावर विश्वास न ठेवणारा असा साधा सोपा त्याचा अर्थ असून शब्दांचं जंजाळ कशाला ?