मला पडलेला प्रश्न...!!

shawshanky's picture
shawshanky in काथ्याकूट
8 Sep 2015 - 10:37 pm
गाभा: 

मला पडलेला प्रश्न
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुठुंबीयांना
मदतिला धावून जाणारे मराठी कलाकार 'मकरंद
अनासपुरे'आणी 'नाना पाटेकर' यांना मनापासून
धन्यवाद.
पण बाकीचे कुठे गेले?
★सत्यमेव जयतेच्या माध्यमातुम करोडो रुपये कमवणारे
"क्रांतिकारी"
★३०० कोटींचा गल्ला जमवणारे "बीइंग ह्यूमन"
★चियर्स गर्ल्स नाचवणारे "बादशाह"
★लोकांना करोड़पती बनवणारे "शहंशाह"
★चित्रपटांचे प्रमोशन करणारे "कॉमेडी किंग"
★तु ही रे च्या नावावर 'टाइमपास' करणारे
"दुनियादारी वाले"
या सगळ्यांना महाराष्ट्रानेच मोठं केलं ना?
मग आता जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला यांची गरज
आहे तर पुढे येऊन मक्या आणि नाना प्रमाणे मदतीला
का धावून येत नाहीत.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 10:41 pm | प्यारे१

या कामासाठी मी माझे ५००१ रुपये जाहीर करतो. बाकीचे गेले चुलीत.

उगा काहितरीच's picture

9 Sep 2015 - 1:29 am | उगा काहितरीच

चला , मी पण माझ्या स्वतःच्या पहिल्या इवल्याश्या पगारातील ५०१ रूपये जाहीर करतो. कुठे कसे पोचते करायचे ते कळवावे.

माहिती काढता येईल असं वाटतंय.
प्रश्न पडलेल्यांना चौकशी करायच्या कामाला लावू. तोवर फंड जमा झाला तर पाहता येईल. बाक़ीचे काय करतात यापेक्षा मला काय करता येतंय हे पाहणं जास्त श्रेयस्कर. नेहमी दुसऱ्याच्या घरात जन्मणारा शिवाजी आपल्याकडं नाही जन्मला तरी कोणीतरी मावळा जन्मायला काय हरकत आहे?

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 5:02 pm | कपिलमुनी

माझाही खारीचा वाटा कुठे पोचवायचा सांगा

मी-सौरभ's picture

9 Sep 2015 - 5:36 pm | मी-सौरभ

कुठे मदत पोचवायची ते सांगा..

करण्यास. नाक्की काय करायचे आणी कसे हे ठरले की देतो माझा वाटा...

थॉर माणूस's picture

9 Sep 2015 - 4:52 pm | थॉर माणूस

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जनमंच च्या सहाय्याने हे वाटप केले होते असं वाचलंय. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकेल.

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 6:50 pm | प्यारे१

आभार थॉर माणूस.

प्यारे१'s picture

15 Sep 2015 - 10:02 pm | प्यारे१

१० सप्टेंबरलाच खालील मेल जनमंच च्या janmanch.nagpur@yahoo.com या मेल वर केला होता.

Greetings!

This is क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष from Pune. I want to help some amount for farmers.

Please forward the All necessary account details so that I can deposit money ONLINE.

Acct Name:
Acct No.
NEFT/RTGS No.

etc.

Thanking you and wishing you all the best for your noble work.

Regards,

आजपर्यंत उत्तर आलेलं नाही. कुणाला शक्य असल्यास कळवणे. :(

खाली नाना पाटेकर यांच्या संस्थेबाबत काही अधिकृत माहिती मिळायला हवी. फेसबुक वर विश्वास ठेवणं अवघड आहे.

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 5:04 pm | कपिलमुनी

बादवे , हे व्हॉटस् अप फॉरवर्ड की फेसबुक ?

व्हत्सप्प वर वाचलेलं आहे हे.

बाकी कोणी फंड जमा करत असेल तर मी यथाशक्ती देइन काहीतरी..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Sep 2015 - 5:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शॅन्क्या,अरे नाना व मकरंदाने मदत केली म्हणून ईतरांनी त्याचे अनुकरण केलेच पाहिजे असे आहे का?लोक
मदत करीत आहेत हे स्वागतार्ह आहेच पण ईतरांचे वेगळे काही प्लान्स असू शकतील्?खुद्द नानानेच मुलाखतीत ही जी काही मदत आहे ती तात्पुरती आहे..असे तो स्वतः म्हणाला आहे.हे प्रश्न सोडवायचे तर पैसा हवाच पण मुख्य म्हणजे पायाभूत सुविधा,मुबलक पाणी,वीज..ह्या गोष्टींची गरज आहे असे ह्यांचे मत.आपले घोडे नेमके येथेच अडते आहे म्हणजे मोठ्या शहरांवर सगळे लक्ष केंद्रीत करायचे व गावे,खेडी ह्याकडे दुर्लक्ष करायचे.

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 7:40 pm | प्यारे१

ए मायडे, लै च्याव च्याव करु नकोस. तुला एक टीलाच अक्कल आहे काय? प्रश्न विचारुन प्रश्न सुटत नसतात. उत्तरं काही माहिती असतील तर सांग. तात्पुरती तर तात्पुरती मदत.

तुझ्यासारखं 'ह्यांचं' मध्ये घालून घेत नाही आम्ही. काही जमत असलं तर कळव. नाहीतर कुरसुंदीला जा.

संजय पाटिल's picture

9 Sep 2015 - 8:02 pm | संजय पाटिल

तुझ्यासारखं 'ह्यांचं' मध्ये घालून घेत नाही आम्ही. >>>
ठ्ठो.......

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 8:21 pm | प्यारे१

ओह्ह्ह्ह्ह! एकदम अर्थ च बदलतोय राव.

आय माय स्वारी माय. युंकी हमे तो ऐसा कहना नही था

पीके's picture

9 Sep 2015 - 8:50 pm | पीके

आय माय स्वारी माय.>>>>
पैले क्यु झक मारी?

ए प्यारे, तुझा प्रॉब्लेम कै है? ह्याच्या एइवजि कुणाचं म्द्ये घालुन घ्य्व तेनी?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Sep 2015 - 9:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाकीचे गेले चुलीत.

हे असे नाना पाटेकर स्टाईल मध्ये म्हंटले की मग दुसरे काय प्रश्न विचारतात येथे लक्ष कशाला?

माईसाहेब, बाकी लोक मदत का करत नाहीत याच्याशी घेणंदेणं नाही अशा अर्थानं ते वाक्य आहे हे 'खरंच' समजलं नाही का तुला?
आणि प्रश्नांचं म्हणाल तर प्रश्न विचारुन प्रश्न सुटतात किंवा कसं ते एकदा तुझ्या 'ह्यां'ना विचारुन ये.

@ पीके, लौ यु रे!

पीके's picture

10 Sep 2015 - 7:24 am | पीके

लौ यु टू,,.

shawshanky's picture

15 Sep 2015 - 9:56 pm | shawshanky

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी सुरु केलेल्या कार्याला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याकडून आता व्यापक स्वरुप देण्यात येत आहे. जनतेकडून येणारी मदत स्वीकारण्यासाठी आणि त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्यासाठी 'नाम फांऊण्डेशन' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जाऊन नाना पाटेकर यांनी मंगळवारी 'नाम' या संस्थेची नोंदणी केली. लागलीच या संस्थेला एस.बी.आय. बँकेचा एक अकाऊंट नंबरही देण्यात आला.
करंट अकाऊण्ट नंबर
35226127148
IFC Code No.
SBIN 0006319
Swift Code No.
SBININBB238

ज्या व्यक्तींना दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल त्यांना आता नाम फाउंडेशनच्या अकाऊंट नंबरमधे पैसे जमा करता येतील. त्यासाठी आय.एम.एफ.सी. कोडही देण्यात आला आहे. त्याचबरोबर परदेशातील नागरिकांनाही या अकाऊंट नंबरवर पैसे जमा करता येणार आहेत. त्यासाठीचा स्विफ्ट कोडही देण्यात आला आहे.

Source-: Faceबूक

बहुगुणी's picture

15 Sep 2015 - 10:34 pm | बहुगुणी

मटा च्या या वृत्तानुसार अभिनेता अक्षय कुमारने बीड मधील दुष्काळग्रस्तांसाठी ९० लाख देऊ केले आहेत.

shawshanky's picture

15 Sep 2015 - 11:13 pm | shawshanky

होय खर आहे !!