आज प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या विश्व मराठी साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरील भाषणाचा गोषवारा वाचता आला. भाषण मुळातून संपूर्ण वाचायला आवडेल म्हणजे संदर्भ अधिक लागू शकतो.
तरी देखील त्यातिल एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाल्यास उत्तम होईल असे वाटते. प्रा.मोरे म्हणतात:
.....‘हा पुरोगामी आणि तो प्रतिगामी’, ‘हा डावा आणि तो उजवा’ असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित करण्यात आली आहे. ती कोणी प्रचलित केली? अर्थात ‘पुरोगाम्यां’नी! हे ठरवण्याची त्यांची कसोटी कोणती? त्याचे आíथक विचार कोणते आहेत- समाजवादी का भांडवलवादी? धार्मिक विचार कसे आहेत? तो बुद्धिवादी आहे का परंपरावादी? सेक्युलर आहे का धर्मवादी? लोकशाहीवादी आहे का नाही?- अशा कोणत्या कसोटय़ांच्या आधारे ते ठरविले जाते काय? नाही! नाही!! तर ते ठरविले जाते ते एकाच महाकसोटीच्या आधारे -ती कसोटी म्हणजे ‘तो िहदुत्ववादी आहे की नाही?’ बरे, ‘िहदुत्ववादी’ म्हणजे काय? त्याचीही कसोटी तेच ठरविणार! ‘िहदू’ या शब्दाचा अभिमान धरणारा, एवढेच नव्हे, तर ‘िहदू’ शब्दाचा निंदाव्यंजक वा निषेधार्ह या अर्थाने नव्हे तर चांगल्या वा त्याची ओळख पटेल या अर्थाने उपयोग करणारा प्रत्येक जण त्यांच्या मते िहदुत्ववादी! त्यामुळे ‘िहदू’ शब्दाचा वापर करून आपण प्रतिगामी वा जातीयवादी तर ठरणार नाही ना, या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता वावरत आहे. त्यामुळे िहदूंच्या जेवढे अधिक विरोधी बोलू तेवढे आपण अधिक पुरोगामी ठरू, असे समीकरण व पुरोगामित्वाची व्याख्या तयार झाली आहे. हा एक प्रकारचा पुरोगामी दहशतवाद असून त्याने मराठी वैचारिकतेला घट्ट विळखा घातला आहे. जर कोणी खरेखुरे पुरोगामी या संमेलनाचे अध्यक्ष होण्यास तयार नसतील तर ते या पुरोगामी दहशतवादामुळेच होय....
यात "पुरोगामी दहशतवाद" हा शब्द प्रयोग नवीन आहे का अजून कोणी आधी केला होता हे माहीत नाही. पण आम्ही केवळ ते शहाणे आणि त्यामुळे आमच्या समोर (हिंदू शब्द्दातला) "ह" पण म्हणण्याची कुणाची हिंमत होता कामा नये हा वैचारीक दहशतवाद. त्यात जर कोणी कुठल्याही संदर्भात सावरकर, संघ, यांच्या बाजूने बोलले / असले तर संपलेच. लगेच नथुरामचे भूत तयार करून गिल्ट बाय असोसिएशनने आत्तापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांना त्यात अडकवायचे. हा उद्योग. नशीब सुधीर फडके आणि मंगेशकर कुटूंब त्यातून सुटले. अथवा त्यांच्या खमकेपणामुळे (आणि कलेच्या शक्तीमुळे) कुणाची त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत झाली नाही.
आज महाराष्ट्रात पुरोगामी दहशतवाद आहे का? यात शारीरीक हिंसा नसेल पण वैचारीक हिंसेने समाजमनात भय तयार करायचे आणि जास्तीत जास्त फूट पाडायची. त्यातून एक बाजू बचावात्मक बाजूस जाते आणि मग आक्रमक होते. त्यातून अजून अस्थिरता निर्माण होते जी या पुरोगामी-डाव्यांना हवी असते, असे म्हणावे लागते...
मग यावर उपाय काय असू शकतो? समाजसुधारणा नको असे कोणीच बोलणार नाही. पण मग ती कशी करावी? टिळक-आगरकरांच्या काळातील भुमिका आता टिळकही घेणार नाहीत कारण "घर आता आपल्या ताब्यात असल्याने, स्वच्छ करण्याची जबाबदारी" तेच घेतील हे त्यांच्या एकूण कार्याकडे बघताना वाटते. मात्र त्यांनी मोरे यांनी म्हणल्याप्रमाणे, गेल्या ५०-६० वर्षात जे चांगले परीवर्तन झाले आहे ते देखील जनतेसमोर आणून अधिक परीवर्तनासाठी प्रोत्साहन दिले असते असे देखील वाटते. सावरकर तर मोरे यांनी म्हणल्याप्रमाणे, या संदर्भात दाभोलकरांपेक्षा परखड आणि स्पष्ट होते. थोडक्यात, जसे कर्मठ आणि खर्या अर्थाने सनातनी वृत्ती जाणे गरजेचे आहे तसेच अतिरेकी आणि वैचारीक दहशतवादी असलेले पुरोगामींना पण स्वत:मधे बदल घडवणे गरजेचे आहे असे वाटत नाही का?
मिपाकरांना काय वाटते?
प्रतिक्रिया
7 Sep 2015 - 7:58 pm | जेपी
मोरे सरांचे अभ्यासपुर्ण लेखन वाचले आहे का ? किंवा अंदमान मधील पुर्ण भाषण वाचले/आयकले आहे का ?नायतर ठराविक कंटेट पकडुन चर्चा करणे व्यर्थ आहे.
7 Sep 2015 - 8:02 pm | विकास
धागा प्रस्तावात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, संपुर्ण भाषण वाचायला आवडेल. जर त्याचा दुवा असल्यास कृपया येथे कळवा. युट्यूब पण शोधले पण मिळाले नाही.
7 Sep 2015 - 8:10 pm | जेपी
माझ्याकडे दुवा नाही पण जेवढे ऐकले आहे त्यातुन त्यांनी यावर बरेच भाष्य केले आहे हे कळते.
7 Sep 2015 - 8:05 pm | एस
पुरोगामी आणि त्यातही खास करून महाराष्ट्रातील पुरोगामी (हा शब्दही बिन-पुरोगाम्यांचाच. 'हिंदू' या संज्ञेप्रमाणेच.) वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्या फार मोठ्या व सर्वसमावेशक अशा विचारधारेवर प्रा. शेषराव मोर्यांनी टीका केलेली नसून पुरोगामी ह्या संज्ञेच्या आड दडून स्वतःचे 'व्हेस्टेड इंटरेस्ट्स' पुढे दामटणार्यांना लगावलेली ती चपराक आहे. तस्मात्, ज्याप्रमाणे 'हिंदुत्त्ववादी' ह्या लेबलाचे सरसकटीकरण पटणारे नाही, तद्वतच 'पुरोगामी' ह्या विशेषणाचाही शिवीसारखा वापर होणे हेही निषेधार्हच आहे.
7 Sep 2015 - 11:50 pm | अंतरा आनंद
+१
7 Sep 2015 - 8:21 pm | फुलथ्रॉटल जिनियस
पुरोगामी दहशतवाद समाजासाठी चांगलाच असावा ,त्याशिवाय धार्मिक रुढी परंपरेच्या,अंधश्रद्धेच्या गटारात लोळणारे किडे सुधारणार कसे?
सतीची प्रथा हिंदू सोडायला तयार न्हवते, आलमगीर औरंगजेब याने आदेश देऊन हि रानटी पद्धत बंद पाडली.तरीही काही जनांना या प्रथेचा अभिमान वाटत होता, पुढे लॉर्ड बेंटिंक ने कायदा करुन ही प्रथा बंद पाडली.
भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर काही उच्च जातीयांनी स्वतःसाठी वेगळे डबे असावेत अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली ,यावर ब्रिटिशांनी त्यांना सुनावले,की रेल्वेप्रवास करायचा असेल तर गपगुमान करा, नाहीतर बैलगाडीतून फुटा..तुमचे सोवळे ओवळे घरात ठेवायचे.
धर्माची झापडे लावलेल्यांना , व त्याद्वारे समाजाला नाडनार्यांना दहशतवाद दाखवला तर बिघडले कुठे? मी तर् म्हणतो या सबह्युमन मध्ययुगीन बांडगुळांना दहशतीखालीच ठेवायला हवे, त्याशिवाय ते सुधरणार नाहीत.
8 Sep 2015 - 9:50 am | भुमन्यु
तुम्ही फक्त गरळ ओकण्याचेच काम करता का?
औरंगजेबाचे कौतुक करतांना त्यांचे बाकिचे पराक्रम सहज विसरता. असो ज्याची त्याची बुद्धी.
9 Sep 2015 - 12:37 am | विनोद१८
तुला जर इतके असह्य होत असेल तर जात का नाहीस शेजारच्या पापिस्थानात आणि तू कोणत्या समाजसुधारक कुळातला रे ?? तुझ्यासारख्या 'मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'च्या अनुयायाने इथली इतकी चिंता तरी का वहावी ?? तू कोणत्या हेतुने अशा प्रतिक्रीया देतोस ??
अरे आमची काळजी सोड, आमच्याकडे तर समाजसुधारक आहेत, विचारवंत आहेत झालेच तर गेलाबाजार पुरोगामीसुद्धा आहेत मोठी परंपरा आहे आमची काळजी घ्यायला. पण आपले काय, आपल्याकडे काय आहे ?? सगळेच वैराण वाळवंट, अगदी आनंदी आनंद. जरा स्वताच्या पायाखाली बघ काय जळतेय ते, धमक असेल तर तिकडे 'धर्मसुधारणा करा' अशा प्रतिक्रीया दे, तिकडेच त्याची इथल्यापेक्षा अधिक गऱज आहे.
हे तुझे विधान तू ज्या 'हिरव्या मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'चा अंगिकार केला आहेस त्यालाच अगदी चपखलपणे लागू पडते, तू इथे जागा चुकलायस. अरे 'गिरे तो भी टांग उप्पर' किंवा 'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणतात ते हेच. एकंदरीत तुझ्यात सुधारणा होणे मोठे कठीण दिसते हेच खरे.
7 Sep 2015 - 11:12 pm | बोका-ए-आझम
समाजाला नाडणा-यांना दहशतवाद दाखवला तर बिघडलं कुठे >>> असं वाटणा-यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच. मुळात त्यांना बुद्धी आहे हाच वादाचा मुद्दा आहे. दहशतवाद हा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. पुरोगामी असो किंवा प्रतिगामी. जर एखादी गोष्ट समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर तो दुप्पट जोराने त्याचा विरोध करणारच. मग त्याची बाजू बरोबर असो किंवा नसो. आणि या संघर्षात जो जास्त बलाढ्य असेल तोच जिंकणार. इथे बांडगुळांना वगैरे ठोकण्याची भाषा करणा-यांनी कलबुर्गींच्या हत्येचे असलेल्या धाग्यावर हिंदू दहशतवादी वगैरे फुलथ्राॅटल प्रतिक्रिया दिली होती. लगेच तीन दिवसांत ते दहशतवाद हवाच वगैरे म्हणायला लागले.ही अशी वैचारिक पलटी मारणा-यांना जिनियस म्हणतात काय हल्ली?
7 Sep 2015 - 11:36 pm | संजय पाटिल
अहो, वैचारीक परीवर्तन झाले असेल त्यांचे...
7 Sep 2015 - 11:37 pm | संजय पाटिल
अहो, वैचारीक परीवर्तन झाले असेल त्यांचे...
7 Sep 2015 - 11:18 pm | होबासराव
ह्यांच खर नाव सींथेटिक जीनियस
synthetic:- not of natural origin; prepared or made artificially / Not genuine or natura
7 Sep 2015 - 11:31 pm | जानु
आपणास असे वाटत असेल की मागील प्रकाराची फेड झाली पाहिजे तर मग चक्र सुरुच राहणार कधी काळी यांचा दहशतवादही अश्याच कारणाने आणि विषयावरुन सुरु झाला असेल, आणि पुढे त्याने त्याचे टोकाचे रुप दाखविले असेल. पण आज त्यावर त्यांना दहशतीत ठेवायचे आणि मग समाधान झाले की बघु. याने काय साध्य होणार?
दुसरा प्रश्न असा की जर आपण लोकशाही मानत असु तर आजही अश्या घटना घडलेल्या दिसतात त्यावर आहे त्या आणि उपलब्ध कायदे वापरुन कठोरात कठोर शिक्षा करणे शक्य असुन देखील ते होतांना दिसत नाही. ते करणे आवश्यक आहे. सतीप्रथेच्या निर्मुलनात सुरुवात करणारा यासाठी जर आपण औरंगजेबाकडे पाहत तर मग मला वाटते ती एक मोठी चुक आहे. औरंगजेब हा काही निधर्मी वा सहिष्णु म्हणुन मानला जावा असे काही पुरावे नाहीत. तरी फक्त एका गटाला लाभ द्यायचा नाही म्हणुन परका डोक्यावर बसवावा अशी विचारसरणी घातकच आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका आपण पानिपतात खाल्लाच आहे.
(आठवीत असतांना गावात लग्नात उच्च वर्णियांच्या पंगतीनंतर जेवण करायचे हे समजल्यानंतर त्या गावातील एकाही पंगतीत न जेवलेला)
8 Sep 2015 - 12:03 am | एस
शेवटच्या कंसातील निर्धाराचे कौतुक.
8 Sep 2015 - 12:06 am | पीके
हेच म्हणतो...
8 Sep 2015 - 1:46 am | विकास
सहमत
8 Sep 2015 - 12:07 am | बोका-ए-आझम
+१
8 Sep 2015 - 10:36 am | याॅर्कर
म्हणजे दोन कठीण दगड एकमेकांवर आदळले तर त्या दगडांच्या होणार्या नुकसानीस ते दोनही दगड जबाबदार असतात.
आणि प्रत्येक गोष्टी,घटनेमागे एक कारण हे असतेच असते.
8 Sep 2015 - 6:14 pm | खटासि खट
सकाळच्याला एकल्याने बाहेर फिरायला जाऊ नका, अनोळखी व्यक्तींनी बेल वाजवल्यास दरवाजा उघडू नका.
मोरेंना हा संदेश पोहोचवा गड्यानु
8 Sep 2015 - 6:45 pm | विकास
समर्थ रामदासांचे एक वचन आहे:
भगवा दहशतवाद, हिंदूत्ववादी म्हणल्यावर गुंड, अंधश्रद्धा, परधर्म व्देष्टा, जातीयवादी इत्यादी इत्यादी अर्थ लावत सगळ्यांना एकाच पंगतीत बसवताना तथाकथीत पुरोगाम्यांना अथवा इतरांना देखील काही वाटले नाही/वाटत नाही. किंबहूना जे खरेच पुरोगामी आहेत अशांनी देखील या विरोधात कधी मत मांडल्याचे आठवत नाही...
म्हणूनच शेषराव मोरे यांनी त्यांना जेंव्हा असेच लेबल लावले जात आहे हे समजल्यावर संयमाने पण परखड उत्तर दिले तेंव्हा तो चिमटा बरोबर बसला. अर्थात यातून असले पुरोगामी काही शिकतील असे वाटत नाही, फक्त मोरे यांच्या (आणि त्यांच्या विद्वत्तेच्या) विरोधात वाटेल ते बोलण्याचे धाडस होणार नाही... पण आज त्यांच्यासाठी असा एक शब्दप्रयोग प्रचलात आणला गेला याचा मात्र तमाम स्वयंघोषित पुरोगाम्यांना त्रास झाला आहे.
8 Sep 2015 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेषराव मोरेंचे भाषण ऐकले आणि वाचले तेव्हापासून अनेक आमच्या प्राध्यापकांच्या वाट्सपगृपवर मी शेषराव मोरेंचे भाषण आवडले असे म्हणालो तेव्हा अनेक मित्रांच्य भुवया उंचावल्या. प्रा.डॉ. तुम्ही कर्मठ होत चालला आहात असेही म्हणाले. मी म्हणालो, माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे पण, ते चुक काय बोलले ते मला सांगा. एकीकडे परंपरावादी जसे टोकाचे बोलत असतात तसे काही पुरोगामी अतिशय उथळ आणि टोकाचे बोलत असतात, समाजाचे त्याने नुकसानच होणार आहे. वर उल्लेख केला तसा हिंदुंच्या काही गोष्टींना विरोध केल्याशिवाय तो पुरोगामीच नाही का ? आणि अलिकडे शिव्या देण्याची एक फॅशनच आली आहे. काही ढोंगी लोकांनी तर पुरोगाम्यांचं व्यासपीठ बळकावलं आहे, आणि तेथून ते समाजात दरी पसरविण्याचे काम करत आहेत. शेषराव मोरे जे बोलले ते अजिबात चुक बोलले नाहीत, ही गोष्ट मात्र खरी आहे.
-दिलीप बिरुटे
8 Sep 2015 - 7:09 pm | विकास
पूर्ण सहमत सर.
शेषराव मोरे यांचे वक्तव्य हे खर्या (म्हणजे) मनाने पुरोगामी असलेल्या व्यक्तीला संयमीतच वाटेल. मला खात्री आहे, त्यांचे म्हणणे सरसकट सर्व पुरोगाम्यांच्या बाबतीत नव्हते. त्यांनी पुरोगामी हा शब्द शिवी केलेला नाही आणि तसेच चुकीच्या हिंदूत्ववादाची भलावण केलेली नाही.
मला वाटते त्या भाषणात म्हणूनच ते समजून सांगताना ते म्हणाले की सावरकरांनी त्यावेळेस केलेली हिंदू शब्दाची व्याख्या तशीच ठेवून त्यातील हिंदू हा शब्द बदलून भारतीय करावा आणि पुढे वैचारीक दृष्ट्या भारतीय कोण याची व्याख्या करणे देखील गरजेचे आहे असे म्हणतात... यात मेख अशी आहे की बहुतांशी (पुरोगामी अथवा सनातनी पण) हिंदूत्ववादी हे मोरे यांनी उर्धृत केलेल्त्या व्याख्येतील, "धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे" या विचाराशी सहमत होण्याची शक्यता आहे. पण अनेकदा अनेक पुरोगामी म्हणवणार्या व्यक्तींना "राष्ट्र" ही संकल्पनाच मान्य नसते. त्यांचे पुरोगामित्व हे केवळ निधर्मी असण्याशी आणि बहुतांशी वेळेस हिंदू धर्मालाच नावे ठेवण्यापुरते मर्यादीत असते. त्यांचे काय करावे. असेच निधर्मी पुरोगामी मग नक्षलवाद्यांचे समर्थन करायला लागतात, याकूब-अफझल वरून (त्यांचे गुन्हे काय आहेत) हे मान्य असून देखील गळे काढायला लागतात. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पेशल पहाटे २ वाजता पण ऐकून घेतले तरी तेच न्यायालय कसे चुकीचे आहे ह्याची जाहीर बौध्दीके देतात...
एकीकडे (हिंदू) धर्म आणि धार्मिकांना शत्रू ठरवायचे आणि दुसरीकडे घटनेनुसार केलेल्या न्यायनिवाड्यापासून ते राष्ट्राच्या सीमा पण अमान्य करणे, ही सगळी पुरोगामी दहशतवादाची लक्षणे आहेत.
8 Sep 2015 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाशी सहमत आहे. आवडला प्रतिसाद.
शेषराव मोर्यांनी ढोंगी पुरोगाम्यांना या भाषणाबद्दल बोलायची संधीच दिली नाही, म्हणुन हे भाषण वेगळेच ठरले यात काही वाद नाही.
-दिलीप बिरुटे
8 Sep 2015 - 9:47 pm | बोका-ए-आझम
विकास आणि सर दोघांचेही प्रतिसाद मस्त!
8 Sep 2015 - 10:05 pm | जानु
आजवर भारतातील राजकारण आणि त्यावर असलेला एकाच विचारसरणीचा प्रभाव नवीन सरकार पुसण्याचा प्रयत्न करणार हे नक्की, यामधुन वर्चस्व असणारे आणि वर्चस्व निर्माण करु पाहणारे यांच्यातील हा संघर्ष अटळ आहे. नमो नी त्याची सुरुवात केलेली आहे. या तर सुरुवातीच्या झटापटी आहेत, एकमेकांचा अंदाज पाहणार्या पैलवानांप्रमाणे, उजव्या विचारांकडुन अजुन बरेच काही घडविण्याचा आणि वैचारिक बदल करण्याचा प्रयन्त होणार. घोडामैदान जवळ आहे.....
8 Sep 2015 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी
गेल्या दोन दशकांत आपल्या राज्यात बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा आवाज अत्यंत क्षीण झालेला होता. एकीकडे सरंजामी प्रवृत्ती असणारे कट्टरवादी अन दुसरीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवत व सकाळ संध्याकाळ शाहू, फुले, आंबेडकर ही नावे घेत सत्तेसाठी जातिचे अत्यंत हीन राजकारण करणारे राजकारणी. हेच राजकारणी इतर पक्षांचा उल्लेख करताना जातियवादी हे विशेषण जोडतात तेव्हा तो खूप मोठा विनोद होतो.
कदाचित नरहर कुरुंदकरांनंतर कुणी प्रथमच बेधडकपणे या दांभिकतेवर कोरडे ओढले आहेत.
यासाठी मोरे सरांचे मनःपूर्वक आभार.