आयूर्वेदातील साईडईफेक्टस्

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
26 Aug 2015 - 1:39 pm
गाभा: 

मध्यंतरी सूवर्णसूत शेखर जास्ती खाल्ले गेले - ३ ते ४ महीने घेतले गेले. त्या मूळे अंगावर फोड यायला लागले. आता थांबवले पण कोणाला उपाय माहीत आहे त्यावर.

ह्यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना अवतरली (मी डॉ नाही) की आयूर्वेद औषधांचा (वेगवेगळ्या रसांचा) कोण्या संस्थेने रीतसर अभ्यास केला - त्याचे गूण, साईडइफेक्टस्, डोस जास्त झाल्यास उपाय असे वर्गिकरण केले तर ते जास्त मान्यता प्राप्त होतील.

आपले काय मत आहे.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

26 Aug 2015 - 1:41 pm | मराठी_माणूस

मध्यंतरी सूवर्णसूत शेखर जास्ती खाल्ले गेले - ३ ते ४ महीने घेतले गेले

वैद्याच्या सांगण्यावरुन का मनानी?

मृत्युन्जय's picture

26 Aug 2015 - 1:43 pm | मृत्युन्जय

सूत शेखर, काम दूधा वटी वगैरे औषधे स्गळे जण मनानेच घेतात. वैद्याने सांगितले म्हणुन घेणारे कोणी नाही,

रणजित चितळे's picture

26 Aug 2015 - 1:50 pm | रणजित चितळे

मनानेच घेतले. पूर्वी माझ्या लहानपणी गोळ्यांऐवजी एक मोठी गोळी यायची. तीचा सहाणेवर वळसा घ्यायचो. आता गोळ्या येतात त्या मुळे असे झाले

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 2:03 pm | प्यारे१

रणजित चितळे नाव बोर्डावर वाचून लै भारी वाटलंय सगळ्यात पैले.
दुष्मन अस्पताल/मुर्दाघर में कुशल मंगल है ना सरजी?

रणजित चितळे's picture

26 Aug 2015 - 2:19 pm | रणजित चितळे

एकदम ठीक

आचारी's picture

26 Aug 2015 - 2:49 pm | आचारी

सुवर्ण सुतशेखर हे धातु भस्मा (सुवर्ण, पारा, रोप्य इ.) पासुन बनवलेले असल्याने अति प्रमाणात सेवन केल्यास, वैद्याच्या सल्ल्याशिवाय सेवन केल्यास त्यापासुन विषबाधा होउ शकते. आता वैद्याच्या सल्ल्यानेच उपचार घ्या. आणि फोड येणे हा साईड इफेक्ट आहेच आणि याचे उत्तर वैद्याकडेच मिळु शकते. मी एक वर्षापासुन आयुर्वेदिक उपचार घेत आहे.

आचारी's picture

26 Aug 2015 - 3:04 pm | आचारी

साधारणपणे सुवर्ण सुतशेखर हे रोज १ गोळी या प्रमाणात मध आणि आल्याच्या रसासोबत चाट्ण करुन सेवन करण्यास वैद्य सुचवतात. सुवर्ण सुतशेखर अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे उष्णता वाढुन फोड आल्याची शक्यता आहे.

कविता१९७८'s picture

26 Aug 2015 - 3:20 pm | कविता१९७८

कुठली ही औषधे स्वतःच्या मनाने घेणे म्हणजे धोकादायकच आणि त्यात जास्त प्रमाणात घेणे हे त्याहुन धोकादायक . मग साईड ईफेक्ट कसे, प्रमाणापेक्षा जास्त घेतल्याचा परीणाम आहे तो. मी तीन वर्षांपासुन फक्त आयुर्वेदीक उपचार घेते, या तीन वर्षात फक्त शोल्डर मसल स्प्रेन साठी मोजुन २ डोस अ‍ॅलोपेथीचे घेतले होते ते सोडुन बाकी पुर्ण आयुर्वेदीक औषधे घेतली आहेत पण मला आयुर्वेदीक औषधांचा काहीच त्रास झाला नाही कारण डॉक्टरांच्या निगराणी खालीच उपचार सुरु असतात. माझ्या डॉक्टरांच्या मते ही सुवर्ण भस्मे वगैरे बनवताना नीट बनवली गेली नाहीत तर थोडं त्रासदायक ठरु शकतं.

>>ह्यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना अवतरली (मी डॉ नाही) की आयूर्वेद औषधांचा (वेगवेगळ्या रसांचा) कोण्या संस्थेने रीतसर अभ्यास केला - त्याचे गूण, साईडइफेक्टस्, डोस जास्त झाल्यास उपाय असे वर्गिकरण केले तर ते जास्त मान्यता प्राप्त होतील.>>>

हे निरनिराळ्या राष्ट्रीय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून होतच आहे.फक्त 'सूतशेखर रस',त्रिभुवन कीर्ति {रस} वगैरे घटित औषधावर संशोधन करत नाहीत.'अडुळसा',गुळवेल ,जा्ंभळाच्या बिया अशा वेगळ्या एकेकावर संशोधन करतात.त्याचे लेखपण प्रकाशित करतात ते वाचायला मिळतात.

अजून तरी आयु. औषधांचे साईड इफेक्टस दिसले नाहियेत. एखाद्यावेळी खूप पूर्वी त्रास झाल्याचे पुसटसे आठवतेय. सुवर्णसूतशेखर कधी घेतली नाहिये पण सूतशेखर मात्र अनेकदा घेतलिये. माझ्या माहितीतील लिकांना सूतशेखर मात्रा लागू पडते. मला मात्र अजिबात नाही.
माझ्या आईला अशोकारिष्ट घेतल्यावर उष्णतेचा त्रास व्हायचा म्हणून ते पूर्ण बंद केले होते असे आठवते.
अवांतर- तुम्ही बरेच दिवसांनी मिपावर दिसताय.

असे आमचे वैद्य संजय केळकर (रत्नांग्रीवाले) सांगायचे.

सध्या भारतात असाल तर, दादरला खडीवाले वैद्यांना भेटलात तर फार उत्तम.(मला खडीवाले वैद्यांचा चांगला अनुभव आला.)

रत्नांग्रीला असाल तर, वैद्य संजय केळकर, ह्यांचा सल्ला जरूर घ्या.

बादवे,तुम्ही बर्‍याच दिवसांनी "मिपावर" आल्याने परमानंद झाला.

गणेश उमाजी पाजवे's picture

26 Aug 2015 - 7:30 pm | गणेश उमाजी पाजवे

माझ्या आईला गेली २२ वर्षे आम्लपित्त आणि वाताचा खूप त्रास आहे. पथ्याचे जेवण जेऊन तिला कंटाळा आला आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खडीवाले वैद्यांकडे एकदा जायचा विचार आहे. पत्ता मिळाल्यास बरे होईल. धन्यवाद.

अवांतर:- मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईलसांगता येत नाही.

त्यामुळे नक्की पत्ता माहित नाही.

जमल्यास खालील लिंक चेक करा.

त्यात खडीवाले वैद्यांचा पुण्यातील फोन नंबर आहे.त्यांनाच दादरचा पत्ता विचारलात तर उत्तम.

http://yellowpages.webindia123.com/d-t/Maharashtra/Pune/Vaidya-Khadiwale...

(एक वैयक्तिक सल्ला: खडीवाले वैद्य जबरदस्त फटकळ आहेत.तेंव्हा त्यांच्याशी जरा सांभाळूनच बोला.)

अनुप ढेरे's picture

26 Aug 2015 - 8:02 pm | अनुप ढेरे

दादरच्या आसपास माधववाडी का कायशीशी आहे तिथे आहे.

खडीवाले वैद्य जबरदस्त फटकळ आहेत.

हे अंडरस्टेटमेंट ऑफ द ईयर आहे!

माझ्या नात्यातल्या एका परिवाराचे ते फ्यामिली वैद्य आहेत. त्या कुटुंबातल्या बर्‍याच लोकांना हिमोफीलियाचा त्रास होतो. त्यावर खडीवाले वैद्यांची औषधं ते घेतात. त्याच कुटुंबात एक अविवाहित मध्यमवयीन पुरुष आहे. एकदम मस्तमौला, जगाला फाट्यावर मारणार, वगैरे. पण खडीवाले वैद्य आजोबांच्या समोर त्याची थेट शेळी झालेली पाहिली आहे!

हा अनुभव घेतला आहे....

केवळ खडीवाले वैद्यांच्या औषधोपचाराने जुनाट आजार बरा झाला, म्हणून तो बर्‍यापैकी मवाळ पणे, खडीवाले वैद्यांशी बोलत होता. (आज पण त्या जेष्ठ सदस्याने शहाणपणा करायचा प्रयत्न केला, की आम्ही त्याला, खडीवाल्यांची आणि त्याच्या जुगलबंदीची आठवण, त्या जेष्ठ सदस्याला करून देतो.)

मांत्रिक's picture

27 Aug 2015 - 9:50 pm | मांत्रिक

किस्सा सांगा की मुवीजी. संदर्भ वगळून सांगा पाहिजे तर.

मुक्त विहारि's picture

27 Aug 2015 - 9:57 pm | मुक्त विहारि

आंतरजालावर लिहितांना खूप गोष्टींचे भान ठेवावे लागते...

माझीही शॅम्पेन's picture

26 Aug 2015 - 7:02 pm | माझीही शॅम्पेन

प्रत्येक गोष्टीचे मराठी नामांतर करू पाहाण्यरांनी
अगोदर साइड एफेक्ट चे मराठी नाव काय (दुष्परिणाम ?) ते सांगाव ही विनंती

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

साइड इफेक्ट = दुष्परिणाम, दुष्प्रभाव

ओव्हरडोज = अतिरिक्त मात्रा, अतिमात्रा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Aug 2015 - 9:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला बर्‍याचं दिवसांनी मिपावर लिहितं झालेलं बघुन आनंद झाला. :)

रणजित चितळे's picture

27 Aug 2015 - 11:55 am | रणजित चितळे

मी मध्ये लेहला पोस्टेड होतो. तेथे नेमाने संस्थळावर येणे जमले नाही.
डॉ सुहास म्हात्रे ह्यांना मराठी शब्द सुचवल्या बद्दल धन्यवाद.

त्याचे गूण, साईडइफेक्टस्, डोस जास्त झाल्यास उपाय असे वर्गिकरण केले तर ते जास्त मान्यता प्राप्त होतील>>
हे वर्गीकरण झालेलं आहे . पण आपण आपल्याच मनाने काहीतरी करत असतो . ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून एका मुलीने एका दिवसात १० कप ग्रीन टी पिला आणि मग तिला acid flexes झाले . असं वाचलं होतं पेप्रात गेल्याच आठवड्यात

अत्रन्गि पाउस's picture

27 Aug 2015 - 3:38 pm | अत्रन्गि पाउस

आयुर्वेदावर धागा आणि नेहेमीचे यशस्वी अजून गैरहजर ??