विठ्या भकास नजरेने आभाळाकड पहात बसला होता.
सकाळी आभाळात दिसणारी ढगाची गर्दी, दुपारी जोरदार कुंभारी वार्या सोबत गायब व्हायची.
शेजारी बसलेल्या तात्याकड पहात बोलला,"तात्या,अंऊदा बी काय खर दिसत नाय.संमदी नक्षत्र लागोपाठ कोरडी जाऊ लागल.
जगायच कस माणसान.धुळपेरणी बि वाया गेली.पुना पेरणी करायची वेळ आली बग.काय डोस्क काम करना बग"
कोरड्या भुईवर काडीन रेघा मारत बसलेला तात्या थरथरता हात डोळ्यावर धरत आभाळाकड पाहु लागला.
अभाळात ढगाची गर्दी जमा होती,दुर कुठतरी विज पडल्याचा कडकडाट झाला.
त्याच्या थरथरत्या हातावर आभाळातुन तुटणारी थेंब पडु लागली.
तात्या हरकुन म्हणाला,"आरं पोरा,हे नक्षत्राच देणं हाय त्याच्या मर्जीनच बरसणार."
(समाप्त)
प्रतिक्रिया
15 Aug 2015 - 11:02 pm | टिल्लू
+११