आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही.
मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का? जर चुंबकीय उत्तरेला माणसाचं डोकं असेल तर काय फरक पडतो (पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)? माणसाच्या शरीरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा काय परीणाम होतो? माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो, पण चुंबकीय गुणधर्मांबद्दल काय? त्यातपण dimagnetic, paramagnetic किंवा ferromagnetic या कुठल्या प्रकारात माणसाच्या शरीराची गणना होते? रक्त प्रवाहित असण्यामुळे काही फरक पडतो का, कारण मृतदेहाचं डोकं दक्षिणेकडे केलं जातं!
प्रतिक्रिया
26 Aug 2008 - 2:34 pm | विदुषक
फारच चान्गला विषय आणला आहेस चर्चे साठी
माणसाच्या चुंबकीय गुणधर्मांबद्दल माहीती नाही ..जाण्कार मन्डळी देतिलच ...
पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे
पण ... पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर आणी -दक्षीण कही लाख वर्षानी बदलतात ..म्हनजे उलटे होतात ...
ही एक सायकल आहे ....
पृथ्वीवरून महाकाय डायनासोरस अचानक नाहिसे होण्या मागे हे पण एक कारण आसावे असे मानले जाते ...
ह्या विषया वर अजून माहीती वाचण्यासाठी उत्सूक ...
मजेदार विदुषक
26 Aug 2008 - 2:36 pm | आनंदयात्री
>>आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात
आपल्या पृथ्विवरच्या पोझिशनला धरुन असे सांगितले जात असावे का ?
जगातल्या सगळ्या भुभागातले cattle असेच वागतात का ?
26 Aug 2008 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर आणी -दक्षीण कही लाख वर्षानी बदलतात ..म्हनजे उलटे होतात ... ही एक सायकल आहे ....
हो, हे मलाही माहित आहे. पण या चक्राचा कालावधी मला माहित नव्हता. (अवांतर: सूर्याचे ध्रुव २२ वर्षांनी बदलतात)
>> पृथ्वीवरून महाकाय डायनासोरस अचानक नाहिसे होण्या मागे हे पण एक कारण आसावे असे मानले जाते ...
इतर कारणांमधे एक अशनी पृथ्वीला धडकणे हे पण मानतात.
मलाही अजून वाचायचंय म्हणून इथे धागा टाकला.
अदिती
26 Aug 2008 - 2:52 pm | अवलिया
आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली.
वाचन चांगले आहे
बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही.
बरे झाले मराठीत सांगितले. मुळ लेख काही वाचायला नको
मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात.
उत्तरेला डोके करु नये असे सांगतात
मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे करुन डोके उत्तरेकडे करुन उचलतात
जाळतांना पुर्व पश्चिम ठेवुन जाळतात (निदान आमच्या गावात तरी)
वास्तुशास्त्रा नुसार घरातील मुख्य कर्त्याने नैऋत्य दिशेच्या खोलीत दक्षिणेकडे डोके करुन झोपावे, झोपेतले व्यवहार करावे
ज्याला अध्यात्मात प्रगति करायची आहे त्याने पुर्वेकडे डोके करावे
ज्याला संपत्ति मिळवायची आहे पण लग्न झालेले नाही त्याने पश्चिमेला डोके करावे
उत्तरेला डोके केल्यास शांत झोप लागत नाही असे जाणकार सांगतात
बाकी ते विज्ञान आपल्याला काय ठावुक नाय...
(उभ्याउभ्या झोपणारा) नाना
26 Aug 2008 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तरेला डोके करु नये असे सांगतात
मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे करुन डोके उत्तरेकडे करुन उचलतात ....
जे काय असेल ते! मला झोप आली की मी जागा मिळेल तिथे आणि वेळ मिळेल तेव्हा झोपते. आणि मला या विषयात फार गतीही नाही ... आमच्या शाळेत या गोष्टी शिकवल्या नाहीत. पण नाना, माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत इथे! त्या प्रश्नांच्या संदर्भात माझं अज्ञान काही फार महत्त्वाचं नाही! :-)
अवांतर: बरे झाले मराठीत सांगितले. मुळ लेख काही वाचायला नको
"इंग्रजी येत नाही" असं म्हणाला असतास तर आम्ही (चारचौघात) हसलो नसतो कोणी!
(तोंड झाकून हसणारी) १_६ विक्षिप्त अदिती
26 Aug 2008 - 3:04 pm | प्रियाली
नाना, म्हणतात तसे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असे दोन्ही प्रवाद मी ऐकले आहेत.
वास्तुशास्त्राप्रमाणे डोके द. ला करून झोपावे असे म्हटल्याचे आढळले आहे. तर, गणपतीच्या गोष्टीत बहुधा मेलेला हत्ती दक्षिणेकडे डोके करून झोपला होता आणि शंकराने त्याचे डोके कापून आपल्या मुलाला चिकटवले म्हणून द. कडे डोके ठेवून झोपू नये असे ही सांगताना कोणालातरी ऐकले आहे. ;)
26 Aug 2008 - 3:12 pm | सहज
तुमच्या भयकथेत कुठल्या दिशेला डोके ठेवलेला "वाचतो" ते सांगावे आजपासुन फक्त त्याच दिशेला डोके करुन झोपू.
:-)
26 Aug 2008 - 3:11 pm | सुनील
वास्तुशास्त्रा नुसार घरातील मुख्य कर्त्याने नैऋत्य दिशेच्या खोलीत दक्षिणेकडे डोके करुन झोपावे,
ठीक.
झोपेतले व्यवहार करावे
म्हणजे काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 3:14 pm | अवलिया
लोळणे
स्वप्न पहाणे
पांघरुण अंगावर घेणे
पांघरुण अंगावरुन काढुन टाकणे.... इत्यादी
अहो झोपुन पहा ना एकदा ... बघा काय काय करता येते ते :)
26 Aug 2008 - 3:15 pm | आनंदयात्री
भारी उत्तर नाना !!
26 Aug 2008 - 3:23 pm | सुनील
लोळणे
स्वप्न पहाणे
पांघरुण अंगावर घेणे
पांघरुण अंगावरुन काढुन टाकणे.... इत्यादी
हाथ तेरी की!!!
तुमचीही धाव कुंपणापर्यंतच....????
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 3:29 pm | अवलिया
तुम्हाला अपेक्षित कामे आम्ही झोपण्यापुर्वीच करतो.
जसे झोपण्यापुर्वी दात घासणे, अंथरुण नीट अंथरणे, गरज असल्यास शौचास जावुन येणे किंवा लघुशंका उरकणे, तसेच दरवाजा नीट बंद केलेला आहे किंवा नाहि याची खात्री करणे, दिवे विझवणे इत्यादी.
ही कामे झोपल्यावर करता येत नाहीत असा आमचा अनुभव आहे.
बाकी तुम्ही काय म्हणत होता तुम्हाला काय जमत नाही म्हणुन? की मला भास झाला?
26 Aug 2008 - 3:35 pm | सुनील
दात घासणे, शौचास जावुन येणे किंवा लघुशंका उरकणे, दरवाजा नीट बंद केलेला आहे किंवा नाहि याची खात्री करणे ही कामे "झोपेतले व्यवहार" या सदराखाली येतात याची कल्पना नव्हती!
असो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 3:41 pm | अवलिया
परत तुम्ही गडबड करत आहात
नीट वाचा
अहो असा गोंधळ कराल तर झोपेतले व्यवहार निट नाही जमणार तुम्हाला
26 Aug 2008 - 3:24 pm | टारझन
झोपेतले व्यवहार करावे
अरे बापरे ... जै जै प्रभुदेवा प्रसन्न :)
बाकी आपण झोपतो वायव्ये कडे डोके करुन पण ऊठतो कुठेही (म्हणजे माझ्याच बेड वर .. पण नैऋत्य किंवा अग्नेय दिशेला डोकं असतं )
पुन्हा एकदा जै जै प्रभुदेवा प्रसन्न
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
26 Aug 2008 - 3:18 pm | सुनील
उत्तर कॅलिफोर्नियात एक "विक्षिप्त जागा" आहे, तिथे म्हणे गुरुत्वाकर्षणच नाही. तेथे धड उभे राहता येत नाही (हे केवळ ऐकीव नाही कारण मी हा अनुभव स्वतः घेतला आहे).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 3:19 pm | आनंदयात्री
ते पण सांगा ना राव !
26 Aug 2008 - 3:22 pm | अवलिया
झोपेत असल्याने आता आठवत नसेल जर जावु द्या
26 Aug 2008 - 3:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तर कॅलिफोर्नियात एक "विक्षिप्त जागा" आहे, तिथे म्हणे गुरुत्वाकर्षणच नाही. तेथे धड उभे राहता येत नाही (हे केवळ ऐकीव नाही कारण मी हा अनुभव स्वतः घेतला आहे).
अशी बातमी दैनिक संध्यानंदमधे आली होती (याच पेप्रात स्वर्गाचा "फोटो" छापला होता, म्हणून विचारलं) का?
बाकी धड उभं न रहाता येण्यासाठी इतर बरीच (चांगली) कारणं आहेत!
26 Aug 2008 - 3:23 pm | अवलिया
तुम्ही संध्यानंद वाचता? अरे वा !
26 Aug 2008 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रोज नाही, पण कोणी दुसय्रानी विकत घेतला आणि वाचायला मागितल्यावर दिला तर! (फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून)
26 Aug 2008 - 3:53 pm | अवलिया
तुम्ही स्वतःच्या पैशाने कोणता पेपर वाचता?
26 Aug 2008 - 4:15 pm | टारझन
अफ्रिकेत आल्या पासून मला एकच पेपर माहीत आहे .. पण तो कोरा असतो ... आणि अंमळ हलका असतो .. आणि अंमळ स्पंजी असतो .. आणि अंमळ ... ... जाउ देत ... तो पेपर मला हॉटेल फुकट देतं ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
26 Aug 2008 - 4:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> तुम्ही स्वतःच्या पैशाने कोणता पेपर वाचता?
एकही नाही! पेपरचा एक उपयोग आपल्याला आधीच कळला आहे! त्यामुळे मी माहितीजालवरील पेपरच वाचते!
26 Aug 2008 - 4:37 pm | अवलिया
माहितीजालवरील पेपरच कि माहितीजालवरीलच पेपर ?
कारण मग मिसळपाव हे पेपर नाही असे मला वाटते
26 Aug 2008 - 4:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> माहितीजालवरील पेपरच कि माहितीजालवरीलच पेपर ?
धन्यवाद ... हसताना च जरा सरकलाच! :-)
26 Aug 2008 - 4:42 pm | धमाल मुलगा
पेपर वाचताना कसा वाचावा?
पुर्व-पश्चिम की दक्षिणोत्तर?
वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय?
चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय?
-(विज्ञानात ढ) ध मा ल.
26 Aug 2008 - 4:49 pm | अवलिया
पेपर वाचताना कसा वाचावा?
उलटा
लोकांना रशियन किंवा स्पेनिश वाचतायत असे वाटते
जरा आदराने बोलतात
पुर्व-पश्चिम की दक्षिणोत्तर?
अधोउर्ध्व
वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय?
पेपर वाचतांना आजुबाजुला किती नजर टाकली जाते त्यावर अवलंबुन
चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय?
खिसा हलका होवु शकतो
26 Aug 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> वाचताना बुब्बुळांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो काय?
नैऋत्येच्या खोलीत दक्षिणेला डोकं करून (अर्थात झोपून) वाचू नकोस! :-)
>> चुंबक चिकित्सेने चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो म्हणतात, त्याचा ह्या चुंबकीय क्षेत्राचा संबंध आहे काय?
वाटत नाही. पृथ्वीचं चुंब़कीय क्षेत्र आहे ~ ०.३ गाऊस! आणि त्या चुंबकांचं १ गाऊस तरी असेल (निव्वळ अंदाज), काय टिकणार ते त्या चुंबकांसमोर!
26 Aug 2008 - 5:45 pm | धमाल मुलगा
ओ नाना, पण काय वाचतोय ते कसं कळणार?
>>अधोउर्ध्व
संस्कृतचे क्लास शोधायला जावं म्हणतो. काय बोलताय काय कळंना.
>>पेपर वाचतांना आजुबाजुला किती नजर टाकली जाते त्यावर अवलंबुन
_/\_
धन्यवाद सायंटीश्ट तै!
कळलं फक्त इतकंच की परिणामांचा संबंध नाही. बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!!
26 Aug 2008 - 5:51 pm | आनंदयात्री
>> बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!!
असेच म्हणतो.
-
(सहमत) आंद्या चाउस
26 Aug 2008 - 5:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ नाना, पण काय वाचतोय ते कसं कळणार?
कळण्यासाठी पेपर कशाला वाचता, त्याचं गाईड वाचा!
कळलं फक्त इतकंच की परिणामांचा संबंध नाही. बाकी गाऊस का माऊस वगैरे डोक्याच्या पाऽऽऽर १०००० फुटावरुन बुंऽऽग!!!
म्हणजे कमीतकमी तिप्पट असेल पृथ्वीच्या चुंब़कीय क्षेत्रापेक्षा, एवढं तर समजलं (म्हणा कॉपीबद्दूरांना काय कळणार, डोंबल) (ह.घे)
26 Aug 2008 - 6:05 pm | टारझन
यमे सगळ्यांना हलकं घ्यायला सांगतियेस ... सगळे मिळून तुला एकदा 'जड' देतील आं ... मग दिशाभूल होते .. सगळी चुंबकं सगळ्या साइडनं आपलं क्षेत्र दाखवती ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
26 Aug 2008 - 7:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी जिमची पावती नेहेमी जवळ बाळगते ते काय उगाच नै, हवं तर धम्या आणि आंद्याला विचार!
27 Aug 2008 - 9:48 am | विजुभाऊ
मी गाऊस च्या ऐवजी गाउन असे वाचले
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
26 Aug 2008 - 10:35 pm | एक
मी तिथे अनेकदा जावून आलो आहे..(इतक्या जणांना घेवून गेलो आहे की आता कंटाळा आला.)
त्याला मिस्टरी पॉईंट म्हणतात. त्याच्या अनेक थिअरीज सांगितल्या जातात..विचीत्र गुरूत्वाकर्षण ही त्यातली एक थिअरी आहे..
-स्वःताला एखादी गोष्ट माहित नसेल तर लगेच ती "संध्यानंद" च्या क्वालिटीची समजायची हा कसला एटिट्यूड ?
26 Aug 2008 - 10:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> -स्वःताला एखादी गोष्ट माहित नसेल तर लगेच ती "संध्यानंद" च्या क्वालिटीची समजायची हा कसला एटिट्यूड ?
संध्यानंदची कॉमेडी व्हॅल्यू मान्य करण्याचा!
26 Aug 2008 - 10:05 pm | वैद्य (not verified)
http://www.mysteryspot.com/
प्रचंड फ्रॉड आहे. पाच डॉलर वाया जातात.
आमच्याकडे बाहेरून येणारे सर्व नातेवाईक / मित्र तिथे जायचा हट्ट धरतात, म्हणून मी अनेकदा तिथे गेलेलो आहे.
-- वैद्य
27 Aug 2008 - 2:10 am | भाग्यश्री
काय फ्रॉड आहे हो नक्की? नाही मीही जाऊन आले, खूप मजा आली! पण काहीतरी विचित्र वाटलं.. स्पिरिट लेव्हलची हातचलाखी करतात का वगैरे वाटलं.. पण उतारावरून चेंडू वर जातो घरंगळत! :O किंवा सरळ घरात आपण कंप्लीट तिरके उभे राहतो हे विचित्र गुरूत्वाकर्षणानेच होणार ना? कदाचित तो इफेक्ट एन्हान्स करायला त्यांनी घरांची विचित्र बांधणी केली असावी..
पण नक्की काय आहे हे खरंच समजून घ्यायचंय मला.. काय फ्रॉड आहे?
बाकी एकच्या मताशी सहमत.. माहीत नसलेल्या गोष्टींना संध्यानंदच्या बातम्यांशी जोडायची कल्पना नाही पटली. असो..!
27 Aug 2008 - 2:14 am | वैद्य (not verified)
डोंगराचा उतार एका दिशेला असताना, घराचा उतार दुसर्या दिशेने ठेवून प्रेक्षकांची "फ्रेम ऑफ रेफरन्स" बदलली आहे, एवढेच.
पण सांगताना गुरुत्वाकर्षणाचे विवर वगैरे काहीबाही ठोकून देतात.
आणि हो, उतारावरून चेंडू घरंगळत वर जातो वगैरे ऑप्टिकल इल्युजन्स आहेत, हे माझ्या सहा वर्षाच्या मुलालाही कळले.
-- वैद्य
27 Aug 2008 - 2:23 am | भाग्यश्री
अरे वा! हुषार आहे की तुमचा सहा वर्षांचा मुलगा.. आम्हाला नाही कळलं बॉ..!
बाकी,स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद..
27 Aug 2008 - 2:37 am | वैद्य (not verified)
सॉरी भाग्यश्री, मला तुमच्या हुषारीविषयी कुठलीही टिप्पणी करायची नव्हती.
संपादक महोदय/या, माझा प्रतिसाद कृपया काढून टाकावा, ही विनंती.
-- वैद्य
27 Aug 2008 - 10:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी कधी अमेरीकेत गेले नाही त्यामुळे या जागा बघण्याची वेळ आली नाही. पण माझ्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकांवर माझा ठाम विश्वास असल्यामुळे काहीतरी भ्रम "मिर्माण" केलेला असणार याची खात्री होती आणि आहे. शिवाय इंटरनेटवर थोडं भ्रमण केल्यावर "" ही लिंक सापडलीच. म्हणूनच मी "संध्यानंद"चा उल्लेख केला. त्यामुळे "संध्यानंद"च्या वाचक, चाहते इत्यादिंच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे.
संपादक मंडळी, तुम्ही कात्री चालवू शकता.
(पुस्तकी) अदिती
27 Aug 2008 - 10:08 am | आनंदयात्री
>>त्यामुळे "संध्यानंद"च्या वाचक, चाहते इत्यादिंच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे.
=))
27 Aug 2008 - 2:34 am | चतुरंग
दृश्य गोष्टीतली सापेक्षता आणि ऑप्टिकल इल्यूजन ह्या तत्त्वांचा चतुराईने वापर करुन बांधलेली घरे अशा प्रकारचे 'मिस्टरी स्पॉट्स' बनवू शकतात!
गुरुत्वाकर्षण, चुंबकीय क्षेत्र वगैरे बनवाबनवी आहे पण एक मनोरंजक ठिकाण इतपत अपेक्षा ठेवून मजा लुटण्यासाठी एकदा भेट द्यायला हरकत नाही असे माझे मत!
हा घ्या दुवा.
सांता क्रूझ च्या ह्या स्पॉटवर मी काही फोटोही काढलेले आहेत, नंतर शोधून टाकेन.
चतुरंग
27 Aug 2008 - 4:14 am | टग्या (not verified)
पाहिलेली आहे. त्याचीच डिट्टो कॉपी ओहायोत क्लीव्हलंडजवळही पाहिलेली आहे.
मला वाटते मुद्दाम तिरकी जमीन ठेवून केलेला हा काहीतरी भ्रम असावा. (माझ्या वाटण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. केवळ प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा काहीतरी प्रकार असावा असा आपला एक अंदाज.)
26 Aug 2008 - 3:20 pm | धमाल मुलगा
माझ्या आजीने सांगितलेलं कारणः
आपल्या रक्तात लोह असते, दक्षिणोत्तर झोपल्याने रक्तप्रवाह त्या त्या ध्रुवाकडे ओढला जाऊ शकतो, त्यामुळे काही त्रास होण्याचा संभव असतो.
आता ह्यात तथ्य कितपत हे मला ठाऊक नाही, पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
बाकी, असं काही होऊन त्रास होणे वगैरे हे खरे की खोटे हे एखादे डॉक्टरच सांगु शकतील.
-(विज्ञानातही 'ढढ्ढोबा', कॉप्या करुन पास) ध मा ल.
26 Aug 2008 - 5:44 pm | शितल
>>>>आपल्या रक्तात लोह असते, दक्षिणोत्तर झोपल्याने रक्तप्रवाह त्या त्या ध्रुवाकडे ओढला जाऊ शकतो, त्यामुळे काही त्रास होण्याचा संभव असतो.
हो मा़झे वडिल ही हेच कारण सांगतात.
26 Aug 2008 - 3:26 pm | लिखाळ
>>(पृथ्वीच्या बाबतीत चुंबकीय उत्तर, भौगोलिक दक्षिणेला आहे)<<
सर्वप्रथम, माझ्या माहिती प्रमाणे चुंबकीय उत्तर आणि भौगोलिक उत्तर एकाच दिशेने आहेत. फक्त त्यात थोडे अंतर आहे. म्हणजे पृत्वीचा भौगोलिक आस आणि चुंबकीय आस थोडे एकमेकांत कोन करुन आहेत.
चुंबकीय क्षेत्र साधारण अडीच लाख वर्षांनी उलटे होते असे शास्त्रज्ञ म्हणतात. (आजवर ते अनेकदा उलटे झाले आहे.) त्याच्या खुणा थराच्या खडकांत असलेल्या लोहयुक्त खनिजांवर्न स्पष्ट होतात. म्हणजे अशी खनिजे जेव्हा स्थिर होत असतात तेव्हा तत्कालिन चुंबक क्षेत्राशी जुळवुन घेतात. या उलट-पालटीचा आणि पृथ्वीवरील उत्पातांचा संबंध लावायचा सुद्धा शास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात.
पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट. (चुभूदेघे.)
प्राण्यांची चरताना उभे रहायची दिशा हा रंजक प्रकार आहे. अजून वाचले पाहिजे :)
आपण कसे झोपावे याचा चुंबक क्षेत्राशी संबंध आहे हे मी तरी लहान असल्यापासून ऐकले आहे.
(ही चर्चा वास्तूशास्त्र थोतांड आहे की नाही या एकाच आयामावर केंद्रीत होवू नये असे वाटते.)
--लिखाळ.
26 Aug 2008 - 3:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> सर्वप्रथम, माझ्या माहिती प्रमाणे चुंबकीय उत्तर आणि भौगोलिक उत्तर एकाच दिशेने आहेत. फक्त त्यात थोडे अंतर आहे. म्हणजे पृत्वीचा भौगोलिक
>> आस आणि चुंबकीय आस थोडे एकमेकांत कोन करुन आहेत.
मग मी दिलेली माहिती ७८००० वर्षांपूर्वीची आहे असं समजू या! ;-) मी अलिकडेच एक चुंबकीय कंपास पाहिलं, ते (भौगोलिक) उत्तरेकडे (चुंबकीय) उत्तर दाखवत होतं, म्हणून मी फसले असणार. धन्यवाद मला जरा माहितीजाल-शोधन करायला लावल्याबद्दल!
तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.)
>> पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की
>> उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट.
चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम कसं करत असेल असा प्रश्न पडलाय. कारण चक्रीवादळाचा मुख्य कंटेंट पाणी / बाष्प, हवा असतो. माझ्या मते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जे कोरिऑलिस बल (coriolis force) तयार होते त्यामुळे असावं. व्यापारी वाय्रांच्या दिशा तर याच बलामुळे दोन्ही गोलार्धात एकमेकांच्या विरुद्ध असतात (उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट).
>> (ही चर्चा वास्तूशास्त्र थोतांड आहे की नाही या एकाच आयामावर केंद्रीत होवू नये असे वाटते.)
१००% सहमत!
26 Aug 2008 - 3:52 pm | लिखाळ
>>तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.)<<
बदलत असावा. वीकिवर बरीच माहिती आहे.
>>मी अलिकडेच एक चुंबकीय कंपास पाहिलं, ते (भौगोलिक) उत्तरेकडे (चुंबकीय) उत्तर दाखवत होतं, म्हणून मी फसले असणार<<
अनेकदा कंपासची खालची तबकडी स्थिर असते आणि सुई फिरणारी असते. अश्या वेळी चुंकसुई जेव्हा उत्तर दिशा दाखवते तेव्हा हातातले दिशादर्शक त्याप्रमाणे फिरवून घ्यायचे असते. आणि उत्तरेला उत्तर मिळवायची असते. (म्हणजे उत्तर बरोबर येते :)). आपण पाहिलेला कंपास तसाच असेल आणि आपली फसगत झाली असेल. (की-चेन वगैरे प्रकारात असणार्या कंपास मध्ये, सुई आणि देशा लिहिलेली तबकडे एकत्र चिकटवलेली असते.)
>>माझ्या मते ते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जे कोरिऑलिस बल (coriolis force) तयार होते त्यामुळे असावं. <<
बरोबर आहे. माझी चूक झाली बहुधा. माझ्या डोळ्यांसमोर फक्त पुस्तकातली आकृती होती..तपशीलात घोटाळा झाला.
-- लिखाळ.
26 Aug 2008 - 3:59 pm | विदुषक
तो कोन पण बदलतो का? (भौगोलिक आसाचा कोन ७२००० वर्षांच्या चक्रामधे २२.५-२५ अंश एवढा बदलतो, सध्या २३.५ अंश आहे.)
जालावरील महीती नुसार
१. भौगोलिक आस आणी चुम्बकिय आस ह्यात सध्या साधारण ११.९ अन्शाचा कोन आहे
http://en.wikipedia.org/wiki/Image:Geomagnetisme.svg
२. चुम्बकिय ध्रूव आपले स्थान सतत बदलत असतो .. साधारणतः ११कीमी ...
३. पृथ्वी चे चूम्बकीय बल कमी होत आहे
मजेदार विदुषक
27 Aug 2008 - 10:07 am | विजुभाऊ
पृथीचे चुंबक क्षेत्र हे चक्रीवादळांच्या दिशेवर सुद्धा परिणाम करत असते असे वाचलेले आठवते. उत्तर गोलार्धात चक्रीवादळे घडाळ्याच्या दिशेने (की
>> उलट?) असतात तर दक्षीण गोलार्धात त्या उलट
हे एक मिथ आहे. लोक टॉयलेट /कमोड मध्ये गोल फिरणार्या पाण्याच्या दिशेबद्दल ही असेच समजतात. पण ते केवळ समज आहेत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
26 Aug 2008 - 4:50 pm | ऋषिकेश
चला चालत्या बस मधे झोपायला नको.. बस कधी दक्षिणोत्तर होईल सांगता येत नाहि ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
26 Aug 2008 - 5:03 pm | स्नेहश्री
माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो.
लहानपणी ते खर वाटयचा .
8}
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
26 Aug 2008 - 5:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> माझा दादा सांगयचा की दक्षिणेकडे पाय करुन झोपल तर यम येतो.
खरोखर आला का, का तुम्ही पायाला "नाईट गॉगल" लावून, पायाखाली उशी ठेऊन त्याला चकवलंत?
>> लहानपणी ते खर वाटयचा .
म्हणजे आता तुम्ही मोठ्या झालात का? (ह.घ्या)
26 Aug 2008 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या शरीराचेही चुंबकिय क्षेत्र असते(म्हणे). त्या चुंबकिय क्षेत्राचा उत्तर धृव आपल्या डोक्याकडे आणि दक्षिण धृव पायाकडे असतो (म्हणे).
आता चुंबकिय नियमांनुसार असमान धृवात आकर्षण आणि समान धृवात अपाकर्षण होते (प्रुव्ह्ड).
त्यामुळे आपण दक्षिणेकडे पाय करून झोपल्यावर दोन समान धृव एकाच ठीकाणी आल्यामुले त्यात अपाकर्षण होऊन रक्ताभिसरणास विरोध होतो. परिणाम स्वरूप आरोग्य नीट राहात नाही. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
मृतदेहास दक्षिणेकडे पाय करून ठेवतात त्यामुळे प्रेत सडण्याची क्रिया मंदावते (दूरचे नातेवाईक यायचे असतात). मृतदेहास उत्तरेकडे पाय करून ठेवल्यास प्रेत लवकर सडू लागते. (म्हणे)
दक्षिणेकडे पाय करू नये की डोके करू नये असा अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे पूर्व-पश्चिम झोपवे असा सोयिस्कर नियम ते बनवितात (असे मला वाटते).
पुजा सांगणार्या गुरूजींनी 'दक्षिणे'कडे डोळे ठेवू नयेत.
26 Aug 2008 - 5:41 pm | धमाल मुलगा
=))
काका, म्हणजे तुम्ही त्यांच्या पोटावरच मारताय की...
असं नका हो करु, हवं तर पाठीवर मारा पण पोटावर नको :)
26 Aug 2008 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर
अरे! म्हणजे मनोभावे पूजा सांगावी. दक्षिणेचा अंदाज घेत थोडक्यात आटपू नये, हो! बाकी काही नाही.
26 Aug 2008 - 5:42 pm | मनिष
मी हे असेच ऐकलेले आठवते, पण मुतदेह सडणे वगैरे माहित नव्हते!
:=))
27 Aug 2008 - 10:30 am | प्रशांत
प्रशांत
उत्तेरेकडे तोंड करुण अभ्यास केल्यास चांगला होतो..........?
खरे कि खोटे..........
26 Aug 2008 - 7:00 pm | १.५ शहाणा
आपल डोके अर्धवट कोठेही केले तरी चालेल.......
26 Aug 2008 - 7:27 pm | अवलिया
उरलेल्या अर्ध्या भागाचे काय करायचे भौ?
26 Aug 2008 - 7:02 pm | खादाड_बोका
चुंबकीय क्षेत्र...काय डोमले ठेवले त्याच्यात ?
डिस्कव्हरी चॅनेलवर प्रुव्ह केले आहे की ह्याचा माणसाच्या शरीरावर काही परीणाम होत नाही.
त्यामुळे चुंबक चिकीत्सा हे एक थोतांड ठरते.
त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो.(हं. घ्या.) ;) ;)
चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....
26 Aug 2008 - 7:07 pm | अवलिया
त्यापेक्षा हे प्रुव्ह झाले आहे की चुंबन चिकीत्सेने माणुस ज्यास्त ताजातवाना व खुश राहातो
कुणी केले? कधी केले? कसे केले?
तुमचा सहभाग किती? कसा?
पुर्वतयारी काय करावी लागली? लागते?
जेवण किती वेळ आधी केले तर चालते?
ताजा झाला म्हणजे नक्की काय झाले?
नीट उस्तवार करुन सांगा हो अज्ञ लोकांना.
अर्धवट सांगितल कि कळत नाही मग चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार?
26 Aug 2008 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ... चुकीचे प्रयोग झाल्यास कोण जबाबदार?
हरकत नाही, इग नोबल पुरस्कार मिळेल. ;-)
26 Aug 2008 - 7:04 pm | सुनील
मूळ चर्चाविषय प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा असा असताना, चर्चा झोपण्याबद्दल का होते आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 7:08 pm | अवलिया
प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन
(एवढे मनावर नका घेवु हो)
27 Aug 2008 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> प्राणी उभे राहुन आराम करतात तर माणसे झोपुन म्हणुन
अनेक प्रकारचे प्राणीपण झोपून आराम करतात. मूळ लेखात पण हरणांच्या झोपण्याचा उल्लेख आहे!
नाना तुम्ही माझ्या कमेंट्स मनावर नाही घेत आहात.
अदिती
27 Aug 2008 - 11:05 am | अवलिया
मी आरामा बद्दल लिहिले होते झोपे बद्दल नाही
आराम आणि झोप यात फरक आहे व तो तुम्हाला मान्य असावा :)
26 Aug 2008 - 7:08 pm | विजुभाऊ
माणूस इलेक्ट्रीकली न्यूट्रल असतो,
हे काही विशिष्ठ परिस्थीतच शक्य असते. मानवी शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात.
साधारणत: कोरड्या हवामानात मानवी शरीरावर ११ ते १८ के व्ही एवढे स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात. त्वचेच्या प्रकारानुसार काहींच्या शरीरावर ते जास्तही असतात.
या चार्जेस मुळेच कॉम्प्युटर प्रोसेसर वगैरे नाजूक सेन्सेटीव्ह चिप्स उडु( जळु) शकतात,
अवांतरः आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
26 Aug 2008 - 7:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण एकूण मिळून न्यूट्रलच असणार, नाहीतर काय काय मजेशीर गोष्टी होतील याचा विचार करा (आणि विजुभौ, एक काव्य/कथा/पोथी लिहाच).
(न्यूट्रल) अदिती
26 Aug 2008 - 7:13 pm | अवलिया
आता ४४० व्होल्ट की लडकी वगैरे हे वेगळेच प्रकरण आहे
४४० व्होल्ट की लडकी इलेक्ट्रीकली कशी असते?
४४० व्होल्ट की लडकी काही विशिष्ठ परिस्थीतच काय करु शकते?
४४० व्होल्ट की लडकीच्या शरीरावर स्टॅटीक इलेक्ट्रीसीटी चार्जेस असतात का?
४४० व्होल्ट की लडकी कोरड्या हवामानात काय करते?
४४० व्होल्ट की लडकी च्या चार्जेस मुळेच कोणते नाजूक सेन्सेटीव्ह भाग उडु( जळु) शकतात?
26 Aug 2008 - 7:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच! ;-)
27 Aug 2008 - 10:02 am | विजुभाऊ
४४० व्होल्ट की लडकी
माझ्या मते हे अनुभवाण्याची गोष्ट आहे, सांगण्याची नाही. पण विजुभौ खुलासा देतीलच!
दोन ध्रुवां मधे असणार्या पोटेंशीयल डिफ्रन्स ची परीणीती असते
बाकी दोन ध्रुवांमधे असणार्या विभवांतराला वोल्टेज म्हणतात.
हे त्या दोहोत असणार्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात आणि आकर्षणाच्या समप्रमाणात असते.
अवांतर : अधुन मधुन इलेक्ट्रीक डिस्चार्ज झाल्यास विद्युत घट पुन्हा चार्ज करुन घेता येतात.
विद्युत घटांच्या बाबतीत डिस्चार्ज आणी रीचार्ज या अत्यावश्यक गोष्टी आहेत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
26 Aug 2008 - 7:58 pm | खादाड_बोका
नाना,
मी तर चुंबन चिकीत्सेचा पंखा आहो.
तुम्ही जेव्हाही कराल, तेव्हा चांगल, तोंड धुवाल, म्हणजे समोरचा बेशुध्द होणार नाही. :D
चुंबन चिकीत्सा जिंदाबाद....
26 Aug 2008 - 8:02 pm | अवलिया
परत तेच नीट सांगा ना राव
तोंड बाहेरुन धुवायचे की आतुन?
तुम्ही अर्धीच माहिती देता अन मग मी फसलो म्हणजे ?
तुम्ही याल का नंतर फसलेली सेटलेमेंट करुन समजुन द्यायला कि जावु दे यावेळेस नाहि जमले पुढिल वेळेस नक्की जमेल म्हणुन?
काय राव ? समजुन घ्या माहित नाहि म्हणुन विचारतो.
26 Aug 2008 - 8:11 pm | खादाड_बोका
जाऊ द्या...लिहीण्यापेक्षा प्रात्यंक्षीक करुन दाखवायला तयार आहो मी.
फक्त एक सुंदर ललना लागेल त्याकरीता.
तुमची आवड मात्र वेगळी असु शकते... ;) ;)
चुंबन चिकीत्सा जिंदाबाद........
26 Aug 2008 - 9:27 pm | बहुगुणी
ही ती कॅलिफोर्निया मधील जागा, फोटो पाहण्यासारखे आहेत. पण मला स्वत:ला या जागी (थोडासा तोल जाण्यापलिकडे) फार काही विचित्र अनैसर्गिक जाणवलं नाही, मुळात वास्तू बांधतांनाच चलाखी करून तिरकी बांधली असावी असं वाटलं, पुन्हा गेलो की जास्त लक्ष देऊन पाहीन. ह्या ठिकाणी तिकिटे आणि इतर वस्तू (कार स्टिकर्स, टी शर्टस वगैरे) भरपूर महाग आहेत, तेंव्हा कमाई चांगलीच होत असणार!
27 Aug 2008 - 12:52 am | अभिज्ञ
आदिती वा इथले कोणीहि तज्ञ,
माझ्या माहितीप्रमाणे पुण्याजवळ कानिफनाथाचे एक गुहा कम मंदिर आहे.त्या मंदिरात/गुहेत सरपटतच प्रवेश करावा लागतो.
त्या मंदिरात/गुहेत गेल्यावर जर चुंबक टांगला तर तो दक्षिणोत्तर दिशेत स्थिर न राहता दुस-याच कोनात स्थिर राहतो.
(फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो,
ह्यावर काहि शास्त्रीय कारणीमिमांसा आहे का?
अभिज्ञ.
27 Aug 2008 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> (फक्त ऐकीव माहिती) बुलढाण्याजवळिल "लोणार" सरोवराच्या आसपास पण असाच प्रकार अनुभवायास येतो,
मी हे बघितलेलं आहे. पण ते एका मंदिरात होतं, बहुतेक मारुतीचं आहे.
या सगळ्यांचं कारण एकच, प्रचंड चुंबकिय क्षेत्र! तो लोणारचा जो मारुती (मूर्ती) आहे, तोच एक मोठा चुंबक आहे. तुम्ही सांगितलेल्या कानिफनाथाच्या मंदिरातपण कुठेतरी असाच प्रचंड चुंबक असणार. त्यामुळेच टांगलेला चुंबक दुसय्राच कोनात स्थिर रहाणार.
लोणारच्या तळ्याचा/खड्ड्याचा उगम प्रचंड अशनी पडल्यामुळे झाला. तेव्हा अतिशय जास्त दाब, तापमान अशा स्थितीमुळे अतिशय बलशाली चुंबक तयार होऊ शकतात; लोणारच्या मारूतीची मूर्ती अशाच दगडातून काढली असणार, त्यामुळे त्याच्या प्रचंड, नैसर्गिक चुंबकीय बलाचं स्पष्टीकरण देता येतं.
अवांतर: माझ्या शेवटच्या वर्षाच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोग परीक्षेत एक्सटर्नल परीक्षक खिशात चुंबक घेऊन फिरत होते. माझा प्रयोग चुंबकीय क्षेत्रांबद्दलच होता. ते शेजारी उभे राहिल्यावर उत्तरं विचित्र यायला लागली. मी त्यांना जरा थोडं लांब उभं रहाण्याची विनंती केली. आणि मग हे माझ्या लक्षात आलं. त्याबद्दल मला त्यांनी मला तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण दिले.
अदिती