शिशु वर्ग

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
26 Aug 2008 - 11:29 am
गाभा: 

शिशु वर्गात कशि धमाल असते. नावाला जागायच. तसाच आण्खी एक शिशु वर्ग जन्माला आलाय. ३ते ४ वर्शाचे असावे.शिक्षण शुल्क समिती नाव ह्या बाळाचे. इंजिनियरींग आणि मेडिकल च्या बेसावध पालकांवर अचानक शि आणि शु करणे हा आवड्ता कार्यक्रम.
काशिबाइ नवले ह्या खाजगी मेडीकल विद्यालयाची फी २.२ लाख प्रवेश फी पहिल्या वर्शी.
दुसर्या वर्शि अचानक ह्या समितीने ही फी ४.४ लाख केली. विथ रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट. म्हणजे पहिल्या वर्शाचे पण भरायचे. म्हण्जे एका वर्शि हिशोबात न धरलेले ४.४लाख पालकंना उभे करावे लागणार. एका पालकांना हार्ट अटॅक आला. बरेच्से रक्तदाबाने आजारी आहेत असे कळते.ह्या काशीचे किति नवल करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा.

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

26 Aug 2008 - 11:38 am | गणा मास्तर

हे लोक असेच बाजारु.
मी प्रवेश घेण्याआधी २००१ पर्यंत फक्त ४००० रुपये फी होती, माझ्यावेळी १९२०० झाली आता शेअर बाजाराप्रमाणे बदलते.
फक्त हा बाजार कोसळत नाही.

मराठी_माणूस's picture

26 Aug 2008 - 11:44 am | मराठी_माणूस

इंजिनियरींग आणि मेडिकल व्यतरिक्त सुध्दा चांगलि क्षेत्र आहेत ह्याचे भान लोकांना येत नाहि तोपर्यंत हे असेच चालु रहाणार

सुचेल तसं's picture

26 Aug 2008 - 12:32 pm | सुचेल तसं

तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण तुम्ही जरा विस्तृत लिहिलं असतं तर जास्त आवडलं असत.

असो, ह्या शिक्षणसम्राटांपुढे आपण (सध्या तरी) काहीच करु शकत नाही. मागितलेली फी निमुट भरावी लागणार.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सुनील's picture

26 Aug 2008 - 1:23 pm | सुनील

प्रभुसाहेब,

तुमचे लेख विचारप्रवर्तक असतात हे खरे. पण एक सुचना करू? असे बुलेट पॉइन्ट न लिहिता जरा आपले म्हणणे अधिक विस्तारपूर्वक मांडलेत तर समजणे अधिक सोपे जाईल. कृपया यावर विचार करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली's picture

26 Aug 2008 - 5:06 pm | प्रियाली

लाखोंच्या फी भरून अशा मेडिकल कॉलेजात कोणा बँक कारकूनाची, चपराशाची किंवा शिक्षकाची पोरं जात नाहीत. २.२ लाखाचे ४.४ कसे करायचे हे जितके त्या कॉलेजला माहित असतं तेवढंच तिथे ऍडमिशन घेऊन देणार्‍या पालकांना माहित असतं. मरत ते नाहीत, त्या पालकांच्या फी भरणारे पेशंट, त्यांना टेबलाखालून नाराजीने पैसे देणारे सामान्यजन मरतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2008 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सब घोडे बारा टके असं प्रत्येक वेळी नाही म्हणता येणार! काही अंशी मात्र प्रियालीच्या म्हणण्यात तथ्य आहे.

II राजे II's picture

26 Aug 2008 - 5:11 pm | II राजे II (not verified)

१००% सहमत.

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

एक's picture

26 Aug 2008 - 10:57 pm | एक

की.. १२ वी ला फक्त पीसीबी ग्रूपच घेतला.. त्यात ९८% मिळाले. पण सरकारी कॉलेजची ऍडमिशन ९८.५% ला बंद झाली. अश्यावेळी मुलाने / पालकाने काय करावं?

पालक अश्यावेळी थोडं कर्ज काढून किंवा नातेवाईकांकडून पैसे उसने आणून उभे करतात किंवा प्रॉ. फंड काढतात (त्याला ऐपत दाखवण्याची गरज नसते.). पण मुलाला डॉ. करण्याचा प्रयत्न करतात.. आणि का करू नये? ९८.५% ला ऍड्मिशन बंद झाली हा काही त्याचा दोष नाही. पुढ्चं डॉ. च शिक्षण तो निभावू शकेल हे त्याने सिद्ध केलं आहे.

अश्यावेळी जर कॉलेजने एकदम फि वाढवली तर धक्का बसणारच..

तुमचं वरचं स्टेटमेंट हे खुपच जनरलाईज्ड आणि अपुर्‍या माहिती वरून काढलेलं आहे असं माझं मत. तुम्ही म्हणता तशी लोकं आहेतच जी ६५% वाल्या मुलाला अश्या कॉलेजेस मधे घालतात.. पण सगळीच तशी नाहीत.

-(वर दिलेलं उदा. माझं स्वःताचं आहे फक्त ईंजिनियरींग साईडच. फी मेडिकल पेक्षा नक्कीच कमी असते पण त्यावेळची आमची परिस्थीती बघितली तर इट बॅलन्सेस आउट..)

माझा प्रतिसाद प्रायवेट मेडिकल कॉलेजेस बद्दल आहे. आपल्या ओळखीची प्रायवेट मेडिकल कॉलेजेसला गेलेली अतिसामान्य घरातील मुले असतील तर कृपया कळवा. मग पुन्हा मुद्दे मांडता येतील.

ज्यांनी भारती विद्यापिठात (पुणे) ऍडमिशन घेतली आहे कारण बीमसीसी मधे मिळाली नाही.

माझं इंजिनियरींगच उदाहरण अगदीच गैरलागू नाही.
कुटूंबाची आर्थिक परिस्थीती आणि फी या मधला फरक हा जास्त महत्त्त्वाचा असं माझं मत आहे.

इंजिनियरींगची फी नक्किच कमी आहे पण जर आर्थीक परिस्थीतीही तेव्हढीच खालची असेल तर काय करणार?

उदा. मेडि. ला घालू पाहणार्‍या कुटूंबाची परिस्थिती "क्ष" धरून चालू आणि फी आहे २ लाख. (२ -क्ष) लाख जमवताना त्या कुटूंबाला जी मारामार करावी लागेल तेव्हढीच मारामार (क्ष -१लाख) उत्पन्न असलेल्या कुटूंबाला इंजि. ची १ लाख फी भरताना करावी लागेल.

त्यामूळे "प्रश्न फक्त मेडिकलसाठी आहे" असं म्हणता येणार नाही.

ही माझी मत आहेत. आणि ती मत मी आणि माझ्या मित्रांनी अनुभवलेल्या परिस्थीतीमुळे बनवलेली आहेत.

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 1:17 am | प्रियाली

बरेच मित्र आहेत माझे तसे.

हाच प्रश्न मी मिपावर काही जणांना विचारला आणि मला त्याचे उत्तर नाही मिळाले पण तुमचा तसा अनुभव असू शकतो त्यामुळे तुमचे उत्तर मी खरे मानते.

इंजिनियरींगची फी नक्किच कमी आहे पण जर आर्थीक परिस्थीतीही तेव्हढीच खालची असेल तर काय करणार?

डॉक्टर आणि इंजिनियर होण्यात मूलभूत फरक डॉक्टर्स कमी पगारांमुळे आंदोलने करतात यावरून लक्षात यावा. इंजिनियर झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी करता येते, बदलता येते, डॉक्टर झाल्यावर भरभक्कम पगाराच्या नोकर्‍या त्यामानाने चटकन चालून येत नाहीत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. मुलांना डॉक्टर बनवताना दवाखाने काढण्यासाठी लागणारा खर्चही पालक जमेस धरतात का कोणास ठाऊक? दुसरी गोष्ट अशी की मेडिकलचा खर्च हा केवळ फी पुरता सिमीत नाही. इंजिनिअरींगच्या मानाने त्यांचे इतर खर्चही अनेक असतात. उदा. प्रॅक्टीकल्स, इंस्ट्रुमेंट्स इ.

इंजिनियरींगची फी नक्किच कमी आहे पण जर आर्थीक परिस्थीतीही तेव्हढीच खालची असेल तर काय करणार?

आपली परिस्थिती नसेल तर डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यापेक्षा वेगळ्या शाखाही आहेत हे लोकांना कळायला हवे. प्रायवेट कॉलेजची धोरणे माहित असताना तिथे पाठवायचे आणि मग चिंताग्रस्त व्हायचे याचा दोष जितका कॉलेजचा आहे तितकाच नाकापेक्षा मोती जड करून घेणार्‍या पालकांचा.

जर पूर्ण विचारांती त्यांनी मुलांना प्रायवेट कॉलेजात पाठवले असेल (प्रायवेट कॉलेजची धोरणे लक्षात घेऊन) तर पैसे कुठून आणायचे हा विचारही केलेला असावा. (परंतु तो तसा विचार केलेला नसतो हेच जर सिद्ध होत असेल तर मग चूक फक्त एकाची कशी?)

प्रायवेट कॉलेजेसची धोरणे चुकीची आहेत हे खरेच पण त्याला आपल्या सरकारची मान्यता असल्याने हा सर्व कारभार कायदा मोडून तर केलेला नाही.

त्यामूळे "प्रश्न फक्त मेडिकलसाठी आहे" असं म्हणता येणार नाही.

प्रश्न मेडिकलसाठी नाही पण माझा प्रतिसाद फक्त मेडिकल कॉलेजसाठीच आहे कारण माझं स्पष्ट मत आहे की मेडिकलचे एकूण खर्च, पुढील गुंतवणूक वगैरे इंजिनिअरिंगपेक्षा खूप जास्त आहे. मी अजूनही हेच म्हणेन की अतिसामान्यांची मुले प्रायवेट मेडिकल कॉलेजला जाताना मी पाहिलेली नाहीत आणि ती असतील तरी फारच कमी असतील.

साधी गोष्ट आहे, इथल्या डॉक्टरांच्या संख्येचा आणि इंजिनियर्सच्या संख्येचा शोध घेतला असता इंजिनियर्सची संख्या जास्त भरेल. उत्तर त्यातच मिळावे.

अचानक फी वाढवणं आणि तीही रेट्रोस्पेक्टिव्ह.. हे त्या कॉलेजच धोरण त्यांनी त्यांच्या "प्रॉस्पेक्टस" मधे छापलं होतं का ते माहित नाही.
आणि तसं ते छापलं असेल तर ते वाचून ऍड्मिशन घेणारे "अतिसामान्य" हे मुर्खच म्हटले पाहिजेत.

"डॉक्टर आणि इंजिनियर होण्यात मूलभूत फरक डॉक्टर्स कमी पगारांमुळे आंदोलने करतात यावरून लक्षात यावा. इंजिनियर झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी करता येते, बदलता येते".."

हे ईंजिनियरींगच्या सगळ्या शाखांना लागू नाही. कमीतकमी १९९८ साली पास आऊट झालेल्यांना तर नक्कीच नाही. (याची उदाहरणंही देवू शकेन त्यामुळे हे बेसलेस विधान नाही) आता परिस्थिती बदललेली असल्यास माहित नाही. मेटलर्जी, इलेक्ट्रिकल, सिव्हील केलेल्यांना कदाचित आजकाल पटकन भरपूर पगाराच्या नोकर्‍या लागतही असतील.
बाकी मेडिकलचा खर्च फक्त पाच वर्षांच्या फी पुरताच मर्यादित नसतो या मताशी १००% सहमत.
पोस्ट ग्रॅज्युएशन तर इंजि. आणि मेडि. दोन्हीकडेही लागतं. मेडि. च पोस्ट ग्रॅज्युएशन जास्त खडतर असतं हेही मान्य.

"..जर पूर्ण विचारांती त्यांनी मुलांना प्रायवेट कॉलेजात पाठवले असेल (प्रायवेट कॉलेजची धोरणे लक्षात घेऊन) तर पैसे कुठून आणायचे हा विचारही केलेला असावा. (परंतु तो तसा विचार केलेला नसतो हेच जर सिद्ध होत असेल तर मग चूक फक्त एकाची कशी?)..."

त्यांनी कदाचीत (२.२ * ५ ) + (वरचा खर्च) याची तयारी ठेवली असेल. पण जर फी एकदम वाढवली तर ती रक्कम "(वरचा खर्च)" या कॅटेगरीतून काढावी लागेल. म्हणजे कुठून तरी पैसे उभे करणं आलच. कदाचीत अगदी आत्ता नाही पण पुढच्या काही वर्षात तर बंदोबस्त करावाच लागेल. म्हणजे टेन्शन चुकत नाहीच.

"..आपली परिस्थिती नसेल तर डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यापेक्षा वेगळ्या शाखाही आहेत हे लोकांना कळायला हवे. प्रायवेट कॉलेजची धोरणे माहित असताना तिथे पाठवायचे आणि मग चिंताग्रस्त व्हायचे याचा दोष जितका कॉलेजचा आहे तितकाच नाकापेक्षा मोती जड करून घेणार्‍या पालकांचा...."

हे आयडियल्स बोलायला ठिक आहेत हो. आणि तेही आपण या सगळ्यातून मुक्त झाल्यावर दुसर्‍याला उपदेश देण्यासाठी..
पण ज्या मुलाला ३ मार्क कमी पडले म्हणून मेडीकल सोडून बीएस्सी करावं लागत असेल, त्याला किती फ्रस्ट्रेशन येईल याची कल्पना आहे का? अशी मुलं मग करतात तडजोड आणि जातात आयु. किंवा होमिओपाथी कडे पण ते त्यांच लाईकींग असतच असं नाही.
(मला स्वःताला मेकॅनिकलच्या ऐवजी इलेकक्ट्रॉनिक्स मिळालं (हवं ते कॉलेज नाहीच) तर केव्हढ नैराश्य आलं होतं..)

"...मी अजूनही हेच म्हणेन की अतिसामान्यांची मुले प्रायवेट मेडिकल कॉलेजला जाताना मी पाहिलेली नाहीत आणि ती असतील तरी फारच कमी असतील...."

तुम्ही पाहिली नाहीत ना? मग असं एकदम डायरेक्ट विधान कसं केलत?

"..लाखोंच्या फी भरून अशा मेडिकल कॉलेजात कोणा बँक कारकूनाची, चपराशाची किंवा शिक्षकाची पोरं जात नाहीत. २.२ लाखाचे ४.४ कसे करायचे हे जितके त्या कॉलेजला माहित असतं तेवढंच तिथे ऍडमिशन घेऊन देणार्‍या पालकांना माहित असतं".."

प्रियाली's picture

28 Aug 2008 - 2:51 am | प्रियाली

तुम्ही पाहिली नाहीत ना? मग असं एकदम डायरेक्ट विधान कसं केलत?

मी अतिसामान्यांचे एकही मूल प्रायवेट मेडिकल कॉलेजला जाताना पाहिलेले नाहीत. मी जे पाहिले त्याचेच डायरेक्ट विधान केलेले आहे आणि ते खोटे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर काय बोलावे?

हे आयडियल्स बोलायला ठिक आहेत हो. आणि तेही आपण या सगळ्यातून मुक्त झाल्यावर दुसर्‍याला उपदेश देण्यासाठी..

आपल्याला माझ्याबद्दल काही एक माहिती नसताना आपण जे विधान करत आहात ते वाचून मला पुढे लिहिण्याची गरज वाटत नाही. मुद्दे संपले की माणूस व्यक्तिगत पातळीवर उतरतो असाही माझा अनुभव आहे.

तेव्हा चूक झाली अशी क्षमा मागून मोकळी होते. :)

एक's picture

28 Aug 2008 - 3:06 am | एक

"..हे आयडियल्स बोलायला ठिक आहेत हो. आणि तेही आपण या सगळ्यातून मुक्त झाल्यावर दुसर्‍याला उपदेश देण्यासाठी.. ..."

हे केवळ तुम्हालाच उद्देशून नव्हतं आपल्या सगळ्यांनाच उद्देशून होतं. मीही त्यात आलो. नाहीतरी इथे चर्चा करून त्या पालकांना त्याचा काय उपयोग ?
आणि हा मुद्दा फक्त तुम्हीच मांडला आहे असं नाही. वरती "मराठी-माणूस" यांनी दिलेला प्रतिसाद बघा.
तरिसुद्धा यात तुम्हाला काही वैयक्तिक हल्ला वाटला तर चूक माझ्या शब्द रचनेची असेल.

"... मुद्दे संपले की माणूस व्यक्तिगत पातळीवर उतरतो असाही माझा अनुभव आहे...."
मी व्यक्तिगत पातळीवर उतरलो नाही (तुम्हाला थोडी जरी शंका आली असेल तर आपली माफी). माझा आक्षेप तुम्ही केलेल्या एका डायरेक्ट विधानावर होता आणि अजुनही आहे.

"..आपल्याला माझ्याबद्दल काही एक माहिती नसताना आपण जे विधान करत आहात ते वाचून मला पुढे लिहिण्याची गरज वाटत न"...."
या चर्चेसाठी (किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही चर्चेसाठी) तुमची माहिती असणं हे मला गरजेचं वाटत नाही. मी फक्त तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांना उत्तरं देत होतो.

"मुद्दे नसले की व्यक्तिगत हल्ला झाला असे ओरडणारे पण भेटतात.." अर्थात तुमचा सन्माननीय अपवाद वगळता..

यु कॅन ऑलवेज क्वीट द डिबेट.. वी ऍग्री टू डिसऍग्री.

विनायक प्रभू's picture

26 Aug 2008 - 5:25 pm | विनायक प्रभू

वरिल मंड्ळीची शैक्षणीक ऍस्पीरेशन बद्दल चा आपला गैरसमज आहे. सर्व काही धनिकांची मुले नसतात. नेमक्या ह्याच गोश्टीचा गैर्
फायदा घेतला जातो. silence of lamb now gives rise to the stinking circle which you describe .
विनायक प्रभु

प्रियाली's picture

26 Aug 2008 - 5:38 pm | प्रियाली

जर प्रायवेट कॉलेजात ऍडमिशन घेऊन प्रत्येक वर्षी २.२ लाख भरणारी धनिकांची मुले नसतील तर दरवर्षी २.२ लाख कुठून येतात त्याचे स्पष्टीकरण काय?

कोणीतरी एखादा आपल्या गावची जमिन विकून किंवा पोटाला चिमटा काढून पोराला शिकवत असेल. असा २५-५० त १ असावा. मी तरी कोणा गरीबांची पोरं अशा प्रायवेट कॉलेजात गेल्याचे ऐकलेले नाही. म्हणजे प्रमाण नक्कीच कमी असावे.

सुचेल तसं's picture

28 Aug 2008 - 9:29 am | सुचेल तसं

तुमचा मुद्दा अजिबात पटला नाही.

अगदी गरीब नाही पण मध्यमवर्गातील लोकांची मुलं असतात. बहुसंख्य पालक ही नोकरदार मंडळी असतात. त्यांच्याकडे दोन-चार लाख रुपये तयार नसतात. मध्यमवर्गीय लोक साधारणतः पुढील मार्ग अवलंबतात : - १) शैक्षणिक कर्ज: हे घेताना अशी तरतूद आहे की मुलाने/मुलीने शिक्षण संपल्यावर काही वर्षात ती रक्कम फेडायची असते. त्यामुळे पालकांवर एकदम पैशाचा बोजा पडत नाही. शिक्षण पुर्ण होईपर्यंत फक्त व्याज भरावं लागतं; ज्याचा दरही तुलनेने कमी असतो. २) एफ.डी.: अनेक पालक भावी तरतूद म्हणून एफ.डी. काढतात आणि गरज लागेल तशी ती मोडतात. ३) सोनं: सोन्याचा भाव कायम वधारतच असतो. त्यामुळे आवश्यक तेवढा पैसा बाजुला पडला की हुषार गृहीणी लगेच त्याचं सोनं घेऊन टाकतात आणि गरज लागेल तसं ते गहाण/विकुन टाकतात. ४) गावाकडची जमीन/घर विकणे (असली तर): हा पण एक मार्ग आहे. ५) पोस्टात किंवा इतरत्र केलेली बचत. :

गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा अगदी श्रीमंत असो प्रत्येक आई-बापाला वाटतं की आपल्या मुलांनी/मुलींनी भरपूर शिकावं. काटकसर करुनच बहुसंख्य पालक पैसा साठवतात. प्रभू साहेबांनी वर जे उदाहरण दिलं ते बघता त्या विद्यालयाने अचानक दुप्पट फी करण्याचं कारण काय? रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट म्हणजे तर हद्दच झाली. मग लुटारु आणि ह्या समितीच्या लोकांमधे फरक तरी काय राहिला? मी हे फक्त मेडिकल नाही तर सगळ्या विद्यालयांच्या बाबतीत म्हणत आहे. मुळातच ह्यांची फी खुप जास्त असते त्यात अभ्यासक्रमाच्या मधेच भरमसाठ फी वाढवणे अजिबात समर्थनार्थ नाही.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

विनायक प्रभू's picture

26 Aug 2008 - 7:21 pm | विनायक प्रभू

ह्या विद्यालयात हे प्रमाण सुमारे ६५% आहे.
विनायक प्रभु

प्रियाली's picture

26 Aug 2008 - 7:36 pm | प्रियाली

तर मग कोणत्या जोरावर हा ३५% वर्ग पैसा आणतो?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2008 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शैक्षणिक कर्ज हा एक मार्ग असू शकतो.

प्रियाली's picture

26 Aug 2008 - 8:24 pm | प्रियाली

कोण देतं असं भारंभार कर्ज? कर्ज देणारे कर्ज घेणार्‍यांची ते परतफेड करण्याची ऐपत आहे का याची तपासणी करतात का?

जर अशी कर्ज काढून परतफेड करण्याची ऐपत असेल तर गोष्टच वेगळी. नसेलच तर कोणत्या मार्गांनी असे कर्ज काढले जाते त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

लिखाळ's picture

26 Aug 2008 - 9:18 pm | लिखाळ

खरेतर साधारण नोकरदार, मुलांच्या शिक्षणासाठी चार ते सहा लाख रुपये कर्ज सहज काढतात असे ऐकले / पाहिले आहे. अभियांत्रीकीसाठी बहुधा चार ते सहा लाखात काम होते (ऐकिव माहिती) ..मुलाचे चार वर्षांचे शिक्षण पुर्ण होते. पण जर शिक्षणावर पहिल्या एक दीड वर्षांत लाख सव्वा लाख खर्च आला आणि फि वाढ झाली तर दगडाखाली हात आहेत, काढता येत नाहीत ठेवता येत नाही अशी स्थिती होत असावी.

अवांतर : लोकांच्या लग्नाचा खर्च आणि आपल्याकानापर्यंत पोहोचलेली हुडा-वरदक्षिणेची रक्कम ऐकली की असेच होते ! कुठून येतो हा पैसा कळत नाही. असो !

प्रियाली's picture

26 Aug 2008 - 9:27 pm | प्रियाली

इथे फक्त मेडिकल कॉलेजचाच विचार आहे. अभियांत्रिकीची फी वैद्यकीय शाखेपेक्षा तुलनेने बरीच कमी आहे. मेडिकलचे इतर खर्चही अभियांत्रिकीपेक्षा भारी आहेत. तेव्हा फक्त फी भरली म्हणजे तोडगा सुटला असे नाही.

अवांतर : लोकांच्या लग्नाचा खर्च आणि आपल्याकानापर्यंत पोहोचलेली हुडा-वरदक्षिणेची रक्कम ऐकली की असेच होते ! कुठून येतो हा पैसा कळत नाही. असो !

हो म्हणूनच विचारते की कोण देतं अशी कर्ज? आणि ऐपत नसताना कशी मिळतात? आपली ऐपत नसताना कर्ज काढणारे लोक या प्रकाराला जबाबदार नाहीत का? अशा प्रायवेट कॉलेजांत सीट मिळवणारे खूप हुशार असतील असेही वाटत नाही. तर मग आपली पात्रता आणि ऐपत नसताना नाकापेक्षा मोती जड करून घेणारेही तेवढेच जबाबदार आहेत.... उच्चरक्तदाबासाठी.

वैद्य's picture

27 Aug 2008 - 12:09 am | वैद्य (not verified)

हो म्हणूनच विचारते की कोण देतं अशी कर्ज? आणि ऐपत नसताना कशी मिळतात?

एकदा का अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे आपल्या मुलांची/मुलींची ऍसेट म्हणून गणना केली, तर ह्या ऍसेटच्या भविष्यातील उत्पन्नाला गृहीत धरून कुणीही कर्जे देऊ शकते.

सबप्राईम सारखेच हे कर्ज देखील, सध्याच्या किंमतीवर अवलंबून नसून भविष्यातल्या किंमतीवर निर्भर असते.

-- वैद्य

१.५ शहाणा's picture

26 Aug 2008 - 8:18 pm | १.५ शहाणा

आपल्या बापुच्यां भारतात वर कमाइची सोय सरकारी लोकांना आहे.

वैद्य's picture

27 Aug 2008 - 12:06 am | वैद्य (not verified)

मला वाटते की प्रभू साहेबांचे आब्जेक्शन "विथ रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट" ला आहे.

पण सरकारी लोकांना पगारवाढ मिळते , नव्या आयोगाच्या शिफारसीमुळे, तीही बरेचदा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टच मिळते. त्याला ही विरोध असायला हवा.

-- वैद्य

प्रकाश घाटपांडे's picture

27 Aug 2008 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे


पण सरकारी लोकांना पगारवाढ मिळते , नव्या आयोगाच्या शिफारसीमुळे, तीही बरेचदा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टच मिळते. त्याला ही विरोध असायला हवा.


हा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट हा अंमलबजावणी उशिरा झाल्यामुळे असतो. १/१/२००६ रोजी नवा वेतन आयोग लागु व्हायला हवा पण तो दोन तीन वर्षे उशीरा पर्यंत रेंगाळत होतो. त्यामुळे तो संबंधीत दिनांकापासुन देय ठरतो. दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागु होतो.
(स्वेच्छा?निवृत्त सरकारी नोकर)
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2008 - 8:48 am | भडकमकर मास्तर

१९९३ पासून १९९७ पर्यंत काही वर्षे ५० % फ्री सीट आणि ५० % पेमेंट सीट असा प्रकार प्रायव्हेट मेडिकल कॉलेजात उपलब्ध होता....
पण सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी आणून सरसकट पेमेंट सीट केल्या त्या ....
..... हे का कसे घडले , ते सुप्रीम कोर्टालाच माहीत....
त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या फी ठरवायचे वाट्टेल ते चालले आहे... हा सगळा ( मेडिकल शिक्षणाच्या आट्टाहासाचा) भ्रमाचा भोपळा एक दिवस फुटेल असे वाटते...
....
@ प्रियाली
जो अडीच देऊ शकतो तो चार देऊ शकेल ( तेही रीट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने ) हे लॉजिक काही पटत नाही बुवा...

( प्रायवेट कॉलेजात फ्री सीट मध्ये डॉक्टर झालेला अत्यंत सुदैवी )
भडकमकर मास्तर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

27 Aug 2008 - 1:05 pm | विनायक प्रभू

सर्व प्रतिक्रिया वाचल्या. बरे वाट्ले. गैरसमजाबद्द्ल सुद्धा.
१. मला राग आहे तो १००% वाढीबद्दल. आणि रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट बद्दल. इथे कोण किति गरिब आणि कोण श्रीमंत चा प्रश्नच येत नाही.
२. १०% पर्यंत वाढ समजु शकते. स्मॉल प्रिन्ट क्लॉज चा एवढा गैरवापर योग्य नाही.
३. आपल्या मुलांना डॉक्टर करण्याकरिता सर्व थरांतील पालक कोण्त्या थराला जातात हा एक मोठ्या लेखाचा विशय आहे.
४. बँके एजूकेशनल लोन देते. त्यावर भरपुर सिक्युरिटी घेते.
५. आपल्या भविश्यातील (मुलांच्या) आमदनी वर कसे जुगार खेळावे ह्याचे शास्त्रिय शिक्षण देणारे क्लासेस असतात.
६माझ्या माहिती नुसार हे लोणच्याचे कारखाने जोरात चालु आहेत.
७. राह्ता राहिला कर्ज पर्तीचा प्रश्न. नंतर चे नंतर बघु असा विचार मंड्ळी करतात.
विनायक प्रभु

१.५ शहाणा's picture

27 Aug 2008 - 5:15 pm | १.५ शहाणा

रीट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने =पूर्व लक्षी प्रभावाने वापरल्यास उत्तम

वाचक's picture

28 Aug 2008 - 2:29 am | वाचक

वरती काही आक्षेप घेण्यात आले आहेत कि ज्यांची ऐपत नाही त्यानी दुसर्‍या क्षेत्राकडे वळावे. (तो वेगळाच मुद्दा आहे)

मुद्दा ऐपत असणार्‍यांचा किंवा ऐपत नसणार्‍यांचा नाही. मुद्दा आहे तो 'आधी घोषित केलेली (च) फी भरण्याची ऐपत (या ना त्या प्रकारे - कर्ज वगैरे) असलेल्यांचा'
काही कुटुंबाना 'त्यांच्या अंदाजपत्रकाप्रमाणे' आधी घोषित केलेली फी (मोठ्या मुष्किलीने का होईना) परवडत असेल - असे असताना एकदम दुप्पट फी साठी चे पैसे आणायचे कुठून ? आणि एकदा पहिले वर्ष पदरात पडल्यावर 'परवडत नाही' म्हणून सोडूनही देता येणार नाही. - अशांनी काय करायचे हाच मोठा प्रश्न आहे

विनायक प्रभू's picture

28 Aug 2008 - 11:12 am | विनायक प्रभू

अगदी बरोबर. मला हेच म्हणाय्च होते. वाद भलतीकडे गेला. असो.
विनायक प्रभु