[शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य"

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in स्पर्धा
3 Aug 2015 - 6:35 pm

साल १९७०. पाक्षिक कार्यालय.

“तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले.

त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला.

“पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!”

त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली.

“माझे ऐका. ही कथा वाचकांना नक्की आवडेल!” अनुबंध रडत म्हणाला.

“मी दहा वेळा तुला येऊ दिले. दुसऱ्या कुणी तुला तिसऱ्या वेळाच हाकलून लावले असते. निघा आता!”

भोळ्या अनुबंधने लेखनविचार सोडला. कायमचा!

एका वर्षानंतर चणे खातांना कागदावर त्याने प्रथम पुरस्कार विजेती कथा वाचली -

त्याचीच कथा, संकल्पना! पात्र, स्थळ बदल! लेखक माधव. चणे घशाखाली जाईनात!

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

3 Aug 2015 - 7:11 pm | खटपट्या

आवडली !!

उगा काहितरीच's picture

3 Aug 2015 - 7:34 pm | उगा काहितरीच

वा आवडली ! बिच्चारा अनुबंध :'( मिपा नव्हते ना त्या काळात ;-)

प्रसाद गोडबोले's picture

3 Aug 2015 - 7:35 pm | प्रसाद गोडबोले

+१

सौंदाळा's picture

3 Aug 2015 - 8:32 pm | सौंदाळा

+१

चिगो's picture

3 Aug 2015 - 9:30 pm | चिगो

आवडली..

नाव आडनाव's picture

3 Aug 2015 - 10:06 pm | नाव आडनाव

+१

मधुरा देशपांडे's picture

3 Aug 2015 - 10:20 pm | मधुरा देशपांडे

+१

पिलीयन रायडर's picture

3 Aug 2015 - 10:31 pm | पिलीयन रायडर

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2015 - 10:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

एक एकटा एकटाच's picture

4 Aug 2015 - 12:34 am | एक एकटा एकटाच

छान आहे

जडभरत's picture

4 Aug 2015 - 8:00 am | जडभरत

+१

नाखु's picture

4 Aug 2015 - 8:47 am | नाखु

चणे आवडले

फुटाण्या नाखु

पगला गजोधर's picture

4 Aug 2015 - 9:08 am | पगला गजोधर

वास्तव....

देशपांडे विनायक's picture

4 Aug 2015 - 9:53 am | देशपांडे विनायक

+१

मोहन's picture

4 Aug 2015 - 9:54 am | मोहन

+१

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2015 - 9:58 am | अत्रुप्त आत्मा

चांगल जमलय रंजन!

अविनाश पांढरकर's picture

4 Aug 2015 - 11:17 am | अविनाश पांढरकर

+१

अजया's picture

4 Aug 2015 - 11:21 am | अजया

+१

तुषार काळभोर's picture

4 Aug 2015 - 11:33 am | तुषार काळभोर

+१

हेच!
फोटोग्राफी स्पर्धेवेळी मी सुचवले होते, की स्पर्धेसाठी फोटो देताना ते संमंला व्यनि करावेत आणि संमं ने ते निनावी स्पर्धेच्या धाग्यात प्रकाशित करावेत. म्हणजे मते देताना 'बायस्ड' मतदान होणार नाही. (माझा मित्र, अमुकचं लिखाण चांगलं असतं, इ). नक्की कोणी ते आठवत नाही, पण कडाडून वगैरे विरोध केला होता.

पगला गजोधर's picture

4 Aug 2015 - 12:10 pm | पगला गजोधर

म्हणजे मते देताना 'बायस्ड' मतदान होणार नाही.

तुमच्या भावनांशी सहमत. पण उघडपणे नावानिशी कथा प्रसिद्ध होऊन मतदान झालेले कधीही चांगले.
त्यामुळे उघडपणे कंपूबाजी झालेली लक्षात येते (निनावी नावामुळे फक्त ती पद्यामागाची कंपूबाजी होईल, शेवटी संपादक हा सुद्धा हाडामासाचा माणूसच, त्यालाही भावना असतातच की, उदाहरणार्थ (कल्पना करा) की मी एखाद्या संपादक किंवा कंपूच्या आदरणीय राष्ट्रीय नेत्याविरोधात मत प्रदर्शित केलं, आणि निनावी कथास्पर्धेत कथा दिली, तर शक्यता आहे की बंद दारामागे स्कोर सेटल केले जातील का ? आणि वर साळसूदपणे वेगळा आव आणला जाईल का ? अशे प्रश्न उभे राहतील , 'पूर्वग्रह ठेवला जात नाही' हे तर सगळेच बोलतात, पण कृतीत आणणे जर्रा कठीणच असते … )
अर्थात ही थियरी आहे. मिपावर मात्र तसे होणार नाही असा मला विश्वास आहेच.

पगला गजोधर's picture

4 Aug 2015 - 12:16 pm | पगला गजोधर

इथे मला पार्टीसिपेटीव लोकशाहीबद्दल बोलायाचे आहे, वरील उलेखालेले काल्पनिक उदाहरण म्हणून सादर केलेलं माझं वैयक्तिक मत आहे.

अमृत's picture

4 Aug 2015 - 12:24 pm | अमृत

स्पर्धेचे फोटो, कथा, शशक संपादकांना पाथनून त्या निनावी प्रकाशित करण्यात याव्या, तरच खरी गुणवत्ता कळेल.

अवांतर - ही कथापण तर संपादकांवरच केंद्रीत आहे :-) कृपया हलकेच घ्यावे.

पगला गजोधर's picture

4 Aug 2015 - 12:29 pm | पगला गजोधर

स्पर्धेचे फोटो, कथा, शशक संपादकांना पाथनून त्या निनावी प्रकाशित करण्यात याव्या, तरच खरी गुणवत्ता कळेल.

तरीपण कंपूबाज व्यनितून कुजबुज करून आपापसात "आपल्यातले कोण" हे जरूर कळवण्याची शक्यता .....
;)

पैलवान आमचा प्रतिसाद ढापला का काय? ;)
आदूबाळ यांच्या शतशब्दकथा च्या धाग्यावर अगदी हाच प्रतिसाद रात्री दिलाय.

तुषार काळभोर's picture

5 Aug 2015 - 10:19 am | तुषार काळभोर

पन तुमचा 'तो' प्रतिसाद वाचूनच मला माझ्या 'त्या' सुचनेची व तिला केलेल्या विरोधाची आठवण झाली.

आगाऊ म्हादया......'s picture

4 Aug 2015 - 12:12 pm | आगाऊ म्हादया......

संपादक माधव अनुबंधला म्हणाले, मला तर माधव हे नाव आणि अनुबंध हे आडनाव वाटलेलं.

द-बाहुबली's picture

4 Aug 2015 - 7:50 pm | द-बाहुबली

मलाही हेच वाटले होते :) बाकी कथेला माझ्या कडून +१

निमिष सोनार's picture

5 Aug 2015 - 10:43 am | निमिष सोनार

"संपादक माधव, अनुबंधला म्हणाले" असे हवे होते.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

अमृत's picture

4 Aug 2015 - 12:25 pm | अमृत

+१

सिध्दार्थ's picture

4 Aug 2015 - 12:53 pm | सिध्दार्थ

+१

रातराणी's picture

4 Aug 2015 - 1:34 pm | रातराणी

+१

प्रियाजी's picture

4 Aug 2015 - 3:14 pm | प्रियाजी

+१

अन्या दातार's picture

4 Aug 2015 - 4:49 pm | अन्या दातार

आवडली

मितान's picture

4 Aug 2015 - 6:25 pm | मितान

छान !

रेवती's picture

4 Aug 2015 - 6:37 pm | रेवती

+१.

इशा१२३'s picture

4 Aug 2015 - 6:46 pm | इशा१२३

+१

विवेकपटाईत's picture

4 Aug 2015 - 7:35 pm | विवेकपटाईत

+१ मस्त आवडली

प्यारे१'s picture

4 Aug 2015 - 7:37 pm | प्यारे१

+१११

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Aug 2015 - 7:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

छान कथा

मुक्त विहारि's picture

5 Aug 2015 - 7:00 am | मुक्त विहारि

+१

मी-सौरभ's picture

5 Aug 2015 - 10:23 am | मी-सौरभ

चान चान

असा मी असामी's picture

5 Aug 2015 - 10:31 am | असा मी असामी

+१

रातराणी's picture

5 Aug 2015 - 1:24 pm | रातराणी

+१

नितिन५८८'s picture

5 Aug 2015 - 1:27 pm | नितिन५८८

+१

पाटील हो's picture

5 Aug 2015 - 1:47 pm | पाटील हो

+१

शिव कन्या's picture

6 Aug 2015 - 7:48 am | शिव कन्या

+१ सुंदर

तुमचा अभिषेक's picture

6 Aug 2015 - 2:31 pm | तुमचा अभिषेक

अवांतर - न फाडता हे नमूद केले नसते तरी चालले असते, शिर्षकावरून आलेला अंदाज तिथे पक्का होतो

कहर's picture

6 Aug 2015 - 5:35 pm | कहर

"चणे घशात जाईना " या वाक्याने कथेचा पंच कमी झाला. "लेखक…. माधव " एवढा शेवट अजून प्रभावी झाला असता. तरी +१

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2015 - 8:34 pm | श्रीगुरुजी

+१

आवडली.

नूतन सावंत's picture

6 Aug 2015 - 9:44 pm | नूतन सावंत

+१