बंडु:- यजमान म्हणजे काय रे?
गणु:- ज्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात ...तो!
बंडु:- अस्सं! मग ग्राहक मंजे?
गणु:- तेच!
बंडु:- हो का? मग दुकानदार म्हणजे काय?
गणु:- जो विकतो तो!
बंडु:- हम्म्म! आणि धर्मपुरोहित मंजे?
गणु:- जो विक्रयास बसतो तो!
बंडु:- कशाच्या?
गणु:- ............
बंडु:- सांग ना कशाच्या?
गणु:- धर्माच्या
बंडु:- अरे बाप रे! धर्महि विकतात? काय रेट असतो रे?
गणु:- दर विक्रीस १ मन ..या दरानि!
बंडु:- अच्छा! मग किती होतात ? विक्रय? मनाचे? एका पुरोहिताचे?
गणु:- विकत जाण्याची शक्ति असेपर्यंत .. कितीही!
बंडु:- हम्म्म! म्हणुन म्हणतात होय ,धर्माचं स्थान - मन...!
गणु:- होय! मनच! मेंदु नव्हे...!
बंडु:- मग दुकानदाराला काय म्हणायचं आपण? ....... आजपासून?
प्रतिक्रिया
29 Jul 2015 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी
क्या बात है. एकदम मार्मिक भाष्य.
30 Jul 2015 - 4:11 pm | दिव्यश्री
+++११
मार्मिक शतशब्दि :)
29 Jul 2015 - 10:28 pm | प्रचेतस
अगदी मार्मिक.
बाकी यातले गणुचे नाव काळजाला भिडले.
५० व्या भागाची वाट पाहात आहोत.
30 Jul 2015 - 8:38 am | नाखु
काळजाला भिडण्याची वारंवारीता वाढली आहे हे नम्र निरिक्षण !!!
मूळ अवांतर : कथा मार्मीक पण मेंदू तर "दु"कानात असतो तेव्हा समस्त मनुश्यगण "दु"कानदार असावा असा कयास आहे.बॅट्याच्या ताशीव आणि सूडपंताच्या सोलीव प्रतीक्रियेच्या प्रतीक्षेत.
होयबा यजमान नाखु.
29 Jul 2015 - 10:30 pm | जडभरत
छानंय बुवा!
29 Jul 2015 - 10:32 pm | माम्लेदारचा पन्खा
ह्या सगळ्याला सुगीचे दिवस आलेत !! मोठमोठे विंजिनेर पण पौरोहित्य करतात म्हणे हल्ली......
29 Jul 2015 - 10:33 pm | एस
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे!
29 Jul 2015 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह़ा ह्ह़ा ह्ह़ा!: बरोब्बर हेरलत!
29 Jul 2015 - 10:34 pm | स्रुजा
नेमके भाष्य ..
29 Jul 2015 - 11:01 pm | पैसा
भारी!
30 Jul 2015 - 5:17 am | कंजूस
नाही समजलं.
जाऊ दे.
30 Jul 2015 - 8:14 am | श्रीकृष्ण सामंत
जो दोन्ही कान दाराला लावून बसलेला असतो तो दुकानदार.
30 Jul 2015 - 1:24 pm | टवाळ कार्टा
दोन्ही कान एकाच दाराला एकाचवेळी कसे लावणार???
30 Jul 2015 - 1:42 pm | अत्रुप्त आत्मा
दोन्ही दारे दोन्ही कानाच्या जवळ आणुन ठेवणार..
क्रिप्या...पुढील बाकि हित'गुजा साठी ख.व.त भेटणेचे करावे! धण्यवाद!!!
30 Jul 2015 - 9:22 am | पगला गजोधर
धार्मिक कार्यची भीती (पिंडाला कावळा न शिवणे, साडेसाती, पत्रिकेतील मंगळ, नागबळी … टू इन्फिनिटी )
ही मार्केटिंग कॅम्पेन …
30 Jul 2015 - 4:32 pm | सस्नेह
बुवा, यू टू..!!
अखिलमिपा-शतशब्दजिल्बीपाडूमहासंघाचा ....
30 Jul 2015 - 4:44 pm | विशाल कुलकर्णी
जियो ...
31 Jul 2015 - 10:19 am | विवेकपटाईत
वाचता वाचता वाण्याच्या दुकानात भटजी बुआ काऊन्टर वर बसलेले दिसले.
31 Jul 2015 - 10:54 am | अत्रुप्त आत्मा
शेवटचा प्रश्न कळला ,तर भटजिच्या जागेवर (ब)असलेला वाणिहि दिसू शकेल . ;-) ;-) ;-)
31 Jul 2015 - 11:33 am | खटपट्या
आवडली कथा !
5 Aug 2015 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा
आमच्या कथेला आम्मीच वर आनितो..कारन,यात +१चे (मत)दान पडलेले नाही.
5 Aug 2015 - 12:38 pm | अजया
+१
5 Aug 2015 - 11:32 pm | रेवती
+१
5 Aug 2015 - 11:37 pm | माम्लेदारचा पन्खा
आपल्या व्यवसायाचं वास्तव मांडायचं धैर्य दाखवल्याबद्दल गुर्जींचे हाबिनंदण !
ही परिस्थिती बदलायला हवी....
5 Aug 2015 - 11:40 pm | प्यारे१
-१ (मुळात ही स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे का?)
बाकी धर्म विकला जात नाही.
दुकानदाराला आपण काय विकतोय हे माहीत नाही ?
6 Aug 2015 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
तरी काही सु जाण ग्राहक लेबर किती बसेल? वग्रे विचारतातच! :P
6 Aug 2015 - 1:54 am | प्यारे१
चुकीचा समज आहे. विकणारा चुकीच्या नावाखाली विकत असला तरी घेणाराला नेमकं काय घ्यायचं आहे ते माहीत असलं की झालं. अर्थात हे रुपक आपलं असल्यानं ग्राहक दुकानदार या रुपात आहे.
दगड फ़ोडणं पासून सुन्दर मूर्ती बनवण्याच्या विचारशैलीत फरक पडल्यास जास्त उपयुक्तता येईल. डॉक्टर त्यांच्या पॅथी मध्ये विश्वास ठेवत नसला तरी त्यानं दिलेलं औषध काम करतंच की.पण विश्वास ठेवून औषध दिल्यास कदाचित स्वत: कडून आणखी काही इनपुट देऊन मात्रा अधिक गतीनं काम करण्याची शक्यता आहे.
आपले याबाबत असलेले दिव्य विचार ठाऊक असल्यानं इथेच थांबतो.
6 Aug 2015 - 5:36 am | अत्रुप्त आत्मा
खिक्क!
6 Aug 2015 - 7:56 am | शिव कन्या
+१
6 Aug 2015 - 8:19 am | कैलासवासी सोन्याबापु
+१
6 Aug 2015 - 9:39 am | पगला गजोधर
ये बात नोट कि जाय की शशक २९ तारीख को
अदालत के सामने पेश हुई थी,
एक्झीबीट A
ताजी रात ए हिंद २९ जुलाई की शशक अगर आपको कुबूल है तो, मेरे मुवाक्कील पगला जी की
'बेच दे' का भी शुमार यहां होना चाहिये, ये मेरी आपसे दर्खवांस्त है.
6 Aug 2015 - 9:40 am | सदस्यनाम
+१
6 Aug 2015 - 9:42 am | शब्दबम्बाळ
कथा चांगली असली तरीही १ ऑगस्ट पूर्वी प्रकाशित आहे. नियम सर्वांनाच सारखे असावेत! :)
"स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही."
6 Aug 2015 - 9:45 am | सदस्यनाम
अतीउत्साहात त्यानी दोन तास आधी टाकलीय हो. असु द्या.
रात्रीच नंबर लावून ठेवला असेल त्यांनी. ;)
6 Aug 2015 - 9:49 am | पगला गजोधर
दोन तास अँडवून पहा … तरीही ऑगस्ट येत नाही
6 Aug 2015 - 9:53 am | सदस्यनाम
मीपण अतीउत्साहात एक दोन दिवस विसरतो रे.
झाले वय आता.
6 Aug 2015 - 10:05 am | पगला गजोधर
माताग्रामेच द्वादशानी मूल्यम (आईच्या गावात अन बाराच्या भावात )
6 Aug 2015 - 10:43 am | जडभरत
+१
6 Aug 2015 - 11:00 am | विवेक्पूजा
+१
6 Aug 2015 - 11:56 am | प्रसाद गोडबोले
कथा आवडली !
पुरोहित लोकं सुधारणेच्या नावाखाली धर्माचं स्थान - मन...! सारखे जड जड डायलॉग मारुन धर्माचे दुकान मांडुन स्वतःची तुंबडी भरतात हे कबुल करायला मनाचा फार मोठ्ठेपणा हवा !
प्रांजळपणास +१
6 Aug 2015 - 12:39 pm | अत्रुप्त आत्मा
ख्याक्क! :-D
स्वार्थ'क आत्मरंजनास +++१११ :P
6 Aug 2015 - 4:25 pm | पाटील हो
+१
6 Aug 2015 - 8:23 pm | नूतन सावंत
+१
7 Aug 2015 - 2:58 pm | माम्लेदारचा पन्खा
आता नवीन लिहा बरं लवकर...