कोकोनट नानकटाई

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
29 Jul 2015 - 9:37 pm

.

साहित्यः

२५० ग्राम मैदा
२०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप
१७५ ग्राम साखर
५० ग्राम रवा
५० ग्राम बेसन
५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट
दीड टीस्पून वेलचीपूड
२ टेस्पून पिस्तापूड

.

पाकृ:

ओव्हन २०० डीग्री सेल्शियसवर प्री-हीट करायला ठेवा.
मिक्सिंग बाऊलमध्ये साखर व तुप एकत्र करुन फेटून घ्या.
त्यात बेसन, रवा व डेसीकेटेड कोकोनट घालून लो स्पीडवर फेटून घ्या.
आता त्यात थोडा-थोडा करुन, चाळलेला मैदा घालून मिक्स करुन घ्या.
वेलचीपूड व पिस्तापूड घालून एकत्र मिक्स करा.

.

बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या.
तयार मिश्रणाचे छोटे, पेढ्याएवढे गोळे घेऊन, वळून हलके चपटे करा.
बेकिंग ट्रेवर सर्व गोळे रचून ठेवा.
त्यावर मधो-मध पिस्त्याचे काप किंवा पुड लावून घ्या.
ओव्हनमध्ये २०० डीग्री सेल्शियसवर १० ते १२ मिनिटे बेक करुन घ्या.

.

बेक झाल्यावर १० मिनिटांनी ट्रेमधून कुलिंग रॅकवर काढून ठेवा.
नानकटाई पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
मस्तं पावसाळी वातावरणात गरमा-गरम चहासोबत ह्याचा आस्वाद घ्या :)

.

नोटः

खोबर्‍याचा स्वाद अजून येण्यासाठी ह्यात कोकोनट एसेन्सचा वापर ही करता येऊ शकतो.
२०० ग्राम तुपाऐवजी तुम्ही कोकोनट बटरचा वापर ही करु शकता.
खोबरे नको असल्यास ते वगळून वरील साहित्यात ही नानकटाई बनवता येते.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 9:56 pm | पद्मावति

आहा.....
काय दिसताहेत नानकटाया......तोंडात टाकताक्षणी विरघळतील अशा.
सनिका, एक विचारायचं आहे, मैद्या ऐवजी सेल्फ राइज़िंग फ्लोर आत्ता घरी आहे ती वापरली तर चालेल का की मैदाच पाहिजे?

सानिकास्वप्निल's picture

29 Jul 2015 - 10:03 pm | सानिकास्वप्निल

सेल्फ रेझिंग फ्लोरमध्ये बेकिंग पावडर असते त्यामुळे मैद्याऐवजी वापरायचे असल्यास ४-५ वेळा चाळून घ्या.
धन्यवाद :)

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 10:06 pm | पद्मावति

चालेल, तसंच करते.

जडभरत's picture

29 Jul 2015 - 9:57 pm | जडभरत

मी पैला.
खाऊन पाहिल्या. छानंयत!!!

आदूबाळ's picture

29 Jul 2015 - 10:18 pm | आदूबाळ

ये बात! जबरदस्त आहे. करून बघतो.

फेटून घेण्याला काही लो-टेक आयड्या आहे का?
१/ हाताने भरपूर वेळ मळणे
२/ पाणी घालून घुसळणे आणि रोवळी/गाळणं वापरून पाणी काढून टाकणे

यापैकी कोणती क्रिया फेटून घेण्याच्या जवळ जाईल?

सानिकास्वप्निल's picture

29 Jul 2015 - 10:30 pm | सानिकास्वप्निल

फेटून घेणे म्हणजे बीटरने बीट करुन घेणे. बीटर नसेल तर वायर व्हिस्क / बलून विस्क वापरु शकता किंवा लाकडी चमचा किंवा खाण्याचा काटा (फोर्क) ह्याचा वापर करता येईल.
अंडे कसे फेटतो तसे मिश्रण फेटावे.

स्पंदना's picture

30 Jul 2015 - 6:14 am | स्पंदना

मिश्रण सरळ परातीत घ्या, अन हाताने आडवे फटकारे मारत फेटा.
मस्त फेटल जात अस हे नानकटाईच. आम्ही पूर्वी असच फेटायचो नानकटाई मिश्रण.
फेटत फेटत त्यात सगळे इंग्रेडीयंटस मिसळले अन पिठ मिसळल की हाताला फक्त तुपकट्पणा सोडून काहीही रहात नाही. बघा करुन.
आडवे फटकारे म्हणजे तळहात पुरा परातीला आडवा टेकवुन तसाच या कडेपासून त्या कडेपर्यंत वेगात फिअरवायचा.

अजया's picture

29 Jul 2015 - 10:21 pm | अजया

करुन बघण्यात येईल रविवारी! बाकी छान छानला नवे शब्द सुचवा या ताईंसाठी!

मस्त!! बाकी माझा सैंपाकाचा ओटा मला इतका स्वच्छ ठेवता येईल तो सुदिन!! ;)

त्यांच्याकडे मिपासाठी वेगळा ओटा असेल ;)

सानिकास्वप्निल's picture

29 Jul 2015 - 10:33 pm | सानिकास्वप्निल

काहीही =))

बाकी सूडचा प्रतिसाद आला तसे लगेच पुन्हा फोटो बघितले काय आहे ना तो कधी शालजोडीतून हाणेल सांगता येत नाही ;)

धन्यवाद.

जुइ's picture

30 Jul 2015 - 12:47 am | जुइ

करून बघायचा मोह होतो आहे.

मधुरा देशपांडे's picture

30 Jul 2015 - 12:54 am | मधुरा देशपांडे

अप्रतिम. कोकोनट फ्लेवरचे बेक केलेले सगळेच प्रकार आवडतात. त्यामुळे नक्की करणार.

वाह! क्या बात! शब्द संपल्याने काय बोलणार?
पाकृ, फोटू, नानकटाया, स्वच्छ ओटा असे सगळे आवडले.

स्पंदना's picture

30 Jul 2015 - 6:14 am | स्पंदना

मस्तच.
मी साधी बनवते, पण बेसन असलेली पहिल्यांदा पाहिली.

नूतन सावंत's picture

30 Jul 2015 - 10:29 am | नूतन सावंत

सानिका,अतिशय सुरेख.

दिपक.कुवेत's picture

30 Jul 2015 - 10:51 am | दिपक.कुवेत

नेहमीप्रमाणेच. एक शंका आहे...बेकिंग मधे सगळं प्रमाण व्यवस्थीत असुनहि पदार्थाला विशेषत कुकिज/नानकटईला चिरा का पडतात?

स्मिता.'s picture

30 Jul 2015 - 12:30 pm | स्मिता.

काही बेक केलेले पदार्थ चिरा पडल्यामुळेच खुसखुशीत आणि खमंग लागतात. बेक करातांना फुगून, फुटल्यावरच्या चिरा नसल्यास पदार्थ फसला समजावा!

बाकी नानकटाईचे फोटो खासच. हे पदार्थ खायला मिळत नसल्याने मी (सानिकाच्या) पाकृंच्या धाग्यावर कमेंटी टाकणं टाळते ;)

इशा१२३'s picture

30 Jul 2015 - 11:57 am | इशा१२३

सुरेख दिसताहेत...करतेच

पैसा's picture

30 Jul 2015 - 1:31 pm | पैसा

मस्त प्रकार!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2015 - 1:42 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif

चिगो's picture

30 Jul 2015 - 4:34 pm | चिगो

कसल्या कातिल दिसत आहेत.. व्वा!
आता नानकटाई शोधणे, करणे आले.. द्या आणखी आमच्या वाढत्या वजनाला हातभार..
(शतकिलोस्पर्धक) चिगो.

अप्रतिम... मला आत्ता पाहिजे आहेत ह्या नानकटाई.. पाठवुन दे लगेच.

जबराट दिसतायेत नानकटाई..

त्रिवेणी's picture

4 Aug 2015 - 3:12 pm | त्रिवेणी

मस्त zali नानकाटाई.
पण घरी करायची हिम्मत नाही करणार मी.

मला नानकाटाई फार फार आवडते... अशीच एक नानकाटाईची टोकरी पार्सल करायची व्यवस्था करा ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }

एस's picture

6 Aug 2015 - 9:16 pm | एस

नानकटाई फारशी आवडत नाही. (बेकरीचे पदार्थ). पाककृती मात्र नेहमीप्रमाणेच देखणी आणि नेटकी.

सुहास झेले's picture

6 Aug 2015 - 10:13 pm | सुहास झेले

जबरी :)

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2015 - 11:20 am | स्वाती दिनेश

मस्तच..
ह्यात कोकोनट ऐवजी आले घालून जिंजर नानकटाइ करता येते आणि ती पण सह्ही लागते.
स्वाती