मोबाईल मोबाईल......

बाबा योगिराज's picture
बाबा योगिराज in तंत्रजगत
28 Jul 2015 - 5:45 pm

मित्रान्नो,
मोबाईल घ्यायचा ठरवतोय,
बजेट २० ते २५ हजार.
दोन फोन आवड्ले होते.
१) असुस झेनफोन २
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php )
किमत :- २३ हजार.

परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला.

२) वन प्लस टू
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php )
किमत :- २५ हजार (अंदाजे)

परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला.

दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते.
आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला.

(व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.)

सांगा काय करू ते.......

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 5:47 pm | बाबा योगिराज

तुमच्या खिषाचा आकार किती आहे ते सांगा की राव....

मिक्रोमाक्ष एवोक तरी kara

मोटो जी३ कसा आहे, किंवा त्या रेंज मध्ये कुठले चांगले पर्याय आहेत ?

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 9:15 pm | बाबा योगिराज

जरा वाचन चालु आहे. थोडा वेळ लगेल. सध्या तरी मोटो जी३ च चांगला वाटतोय. उद्या दुपार पर्यंत सांगतो.

हे चारीही फोन एक-मेकास जबरदस्त टक्कर देत आहेत. किंमतीत सुद्धा विशेष काही फरक नाही.
लेनोवो आणि शाओमी सर्वात पुढे आहेत. फरक फक्त ईतकाच आहे की शाओमी मध्ये तुम्हि साठवन्याची जागा वाढ्वू शकत नाही.
या चारीही फोनची तुलना येथे करता येयील

बहिरुपी's picture

12 Aug 2015 - 8:31 pm | बहिरुपी

आय फोन ५ सी कसा आहे? घ्यावा का? नको तर का नको? कुणाचा काही वाइट अनुभव आहे का?

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 9:04 pm | बाबा योगिराज

बिनधास्त घ्या........... विक्री-पश्चात् सेवा एक नंबर आहे.

मित्रहो's picture

13 Aug 2015 - 12:20 am | मित्रहो

आठ हजाराखालील फोनमधे विक्री पश्चात सेवा वगेरे मोठा विनोद आहे हो. वर्ष दीड वर्षात फोन खराब होत नाही. त्यानंतर झालाच तर आजूबाजूचाच कोणी तरी बघावा लागतो. मला धरुन कित्येकांनी शाओमी आणि वन प्लस वन घेतले. काही समस्या नाही.

बाबा योगिराज's picture

13 Aug 2015 - 12:48 pm | बाबा योगिराज

मझ्या जवळच्या मित्रा कडे आहे. सॉफ्टवेर मध्ये भरपूर प्रोब्लेम्स आहेत. २.५ महीने जुना असलेला फोन विकायला गेला तर फ़क्त ५०००/- रु किंमत मिळाली. त्याचा बघुनच वन प्लस वन न घेन्याच ठरवल.
मी हे नाही म्हणत की, नविन आलेल्या सगळ्याच फोन कंपनीज ख़राब आहेत किंवा आपल्याला लुटायलाच आलेल्या आहेत. माझ फ़क्त इतकच म्हनन आहे की त्याना नोकिया, सैमसंग सारखा विश्वास कमवायला अजुन तरी भरपूर वेळ लागेल, आणि तो का लागेल त्याची कारण सांगतोय.
शेवटी निवड तुमची स्वतःचीच आहे........

स्वप्क००७'s picture

13 Aug 2015 - 6:27 pm | स्वप्क००७

माझ्या मते शिओमि चान्गला आहे आनि सद्ध्या ओफ्फेर पन चालु आहे
सगाल्यत महत्वाच म्हनजे त्याचि ओस सोपि आहे, सायनोजेन पेक्शा तरि खुप सोपि
आनि फोने हर्द्वरे क्वलीती पन छान आहे. सर्विस सेन्तेर तुमच्या जवल्पास आहे का हे बघुन घ्या.

आशु जोग's picture

13 Oct 2015 - 10:59 pm | आशु जोग

जीपीएस GPS कोणत्या फोनमधे असते. जिथे मोबाईलची रेंजही मिळत नाही तिथे को-ऑर्डिनेट्स मिळाले तरी खूप झाले. (पूर्वी ट्रेकींगवाले लोक वापरत अशी डिव्हायसेस.)

मिनेश's picture

14 Oct 2015 - 10:15 am | मिनेश

huawei ऑनर ६ घ्या .

आपण मोबाईल चा वापर मुख्यतः कशासाठी करता ? २०-२५ हजार चे बजेट पूर्ण वापरायचेच आहे का ?

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी

पुन्हा तोच प्रश्न. १५००० पर्यंत बजेट आहे. व्हिडिओ फारसे बघत नाही. गेम्स अजिबात खेळत नाही. इंटरनेट भरपूर वापरतो. बॅटरी लाईफ भरपूर हवे. कॅमेरा देखील बर्‍यापैकी हवा. कोणता फोन घेऊ?

बाबा योगिराज's picture

6 Apr 2016 - 4:23 pm | बाबा योगिराज

श्रीगुरुजी, सध्या दोन भ्रमणध्वणी संच सापडलेत. थोड्या वेळाने अजून काही सापडलं तर विस्तृत माहिती देईन.

बाबा योगीराज.

असा मी असामी's picture

6 Apr 2016 - 4:55 pm | असा मी असामी

मी स्व:ता lenovo k3 note वापरत आहे ६ महिन्यापासुन.मस्त चालला आहे.

बाबा योगिराज's picture

6 Apr 2016 - 5:17 pm | बाबा योगिराज

मी पण k3 note वापरतोय. छानच आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2016 - 8:17 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! याचा रिव्ह्यू बघितला. गोरिला ग्लास नाही व प्लॅस्टिकची बॉडी, यामुळे पडला तर काही खरं नाही. ५ मिनिटानंतर हा गरम व्हायला सुरूवात होते असंही वाचलं.

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Apr 2016 - 8:14 pm | श्री गावसेना प्रमुख

मास्तर मोटो टर्बो घेवा, फास्ट चार्जिंग होते http://m.gsmarena.com/motorola_moto_g_turbo_edition। वॉटर, डस्ट रेजिस्टन्स आहे हा।

राजकुमार१२३४५६'s picture

6 Apr 2016 - 8:31 pm | राजकुमार१२३४५६

श्रीगुरुजी मी तुम्हाला Moto X Play घ्या असे म्हणेन.
तुमच्या प्रमुख गरजा तीन आहेत १) कैमेरा २) इंटरनेट सर्फिंग आणि 3) बैतरी
बजेट १५००० च्या आसपास आहे.

Moto X Play मध्ये
१) कैमेरा - २१ मेगा पिक्सल
२) इंटरनेट सर्फिंग - साठी डिस्प्ले ५.५ इंच , फुल HD , ४०३ ppi
3) बैतरी - ३६३० mah , पटकन चार्ज होणारी

बाकी ३२ जीबी मेमरी अजून वाढवू पण शकता. रैम २ जीबी आहे. ४जी डबल सीम आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2016 - 8:47 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! मोटो एक्स व गुगल नेक्सस हे पण काही पर्याय आहेत. आयफोन ५ हा पण एकाने सुचविला आहे.

बाबा योगिराज's picture

7 Apr 2016 - 4:25 pm | बाबा योगिराज

मी सुद्धा मोटो प्ले सुचवणार होतो.
विचार करू शकता.

भाते's picture

6 Apr 2016 - 4:18 pm | भाते

संपादक मंडळाने हा धागा कायम स्वरूपी उजव्या बाजुला 'दखल' मध्ये साठवून ठेवावा. म्हणजे दर तीन चार महिन्यांनी नविन मोबाईल साठी नविन धागा येणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2016 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१३८०० रुपये मोबाईल चांगला आहे. ब्याटरी ब्याकप चांगला. फोटोवर मी तितका खुश नाही. १३ मेगा पिक्सल असला तरी फोटो खास वाटत नाहीत पीपीआय कमी आहे. बाकी वापरायला झकास आहे.

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 4:49 pm | उगा काहितरीच

गुरूजी, मोटो एक्स साठी +१ माझ्याकडूनही. मस्त आहे फोन.

श्रीगुरुजी's picture

31 May 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी

५ हजार ते ७ हजार या किंमतकक्षेतला चांगला फोन कोणता?

सुधीर जी's picture

4 Jun 2016 - 5:35 pm | सुधीर जी

COOLPAD NOTE

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी

नुकताच मोटो-जी ४जी प्लस हा फोन घेतला. १३४९९ ला मिळाला. अत्यंत उत्कृष्ट कॅमेरा आहे. ४जी मुळे इंटरनेट अतिशय वेगात चालते. बरीच नवीन फीचर्स आहेत. हळूहळू शिकत आहे. व्यवस्थित सुरू आहे. सध्यातरी आवडला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Apr 2017 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही. नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?

बाबा योगिराज's picture

22 Apr 2017 - 2:24 pm | बाबा योगिराज

सॅमसंग जीटी एस ७५६२ चे स्पेसिफिकेशन बघितले. मझ्या मते ओएस अपडेट करावी लागेल, आणि सोफ्ट्वेअर अपडेट केल्यावर मोबईल धिमा होण्याची शंका आहे. हे माझ मत झाल. ह्या वर कुणी सोफ्ट्वेअर जानकार व्यक्तिचे मत तपासावे लागेल.

दुसरा प्रश्न, मोठी दोरी असलेले मोबाईल पाऊच मिळतात बाजारात. एकदा तपासुन बघा.

बाबा योगिराज.

>>नवीन फोन ला गळ्यात घालायची दोरी येत नाही काय करावे?>>

यावर कायमचा प्रश्न सोडवला आहे. गळ्यात घालायची अशी माझी गरज नाही पण नवे टच स्क्रिन मोबाइल मोठे असतात त्याने फोटो काढताना तो हातातून सटकेल ही भीती, ट्रेनमधून किंवा उंचिवरचे शिल्पांचे फोटो काढताना उपयोगी असे करायचे होते. ( सेल्फि स्टिक नाही वापरू देत काही ठिकाणी) मोबाइलच्या कवरलाचा दोरी लावलीय ती मनगटात अडकवून सोपे झालेय. फोटो टाकतो नंतर.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jul 2017 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे त्यावर युपीआय चालत नाही.उबेर अ‍ॅप नाही. फोनला ४ वर्षे होतील आता. बाकी चांगला चालू आहे.दुकानदार रुट करायला तयार नाही. दगड होईल. नवीन घ्या. बजेट १० ह. काय करावे क्वचित उबेर ची गरज पडते पण नेमक वेळेला अ‍ॅप नसेल तर काय उपयोग? मन द्विधा आहे नवीन फोन घेण्याबाबत. काय करावे बरं?

कंजूस's picture

16 Jul 2017 - 3:32 pm | कंजूस

uber अथवा इतर यासारख्या सर्विस देणाय्रांचे कॅालसेंटरही असणारच. कॅाल करून पाहा. दहाहजार घालवण्यापेक्षा दहावीस रुपये घालवणे स्वस्त पडेल.
( शहरांत जिथे टॅाइलेट्स असतात तिथे जवळच हे सर्वच ट्याक्सीवाले पार्किंग करून गाणी ऐकत असतात. फोन बंद पडला तरी हा मार्ग आहेच.)

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jul 2017 - 4:36 pm | प्रकाश घाटपांडे

पण बँकिंग अ‍ॅप पण त्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन वर चालत नाहीत.माझा मोबाईल बदलायला झाला आहे असे तरुण पिढि सांगते