गाभा:
मागच्या आठवड्यात बायोस्कोप हा चित्रपट प्रदर्शित झाला. एकाहून एक सरस कवी आणि दिग्दर्शकांनी मिळून केलेल्या या चित्रपटाबद्दल फार उत्सुकता आहे. ४ कवितांपासून कथानक तयार करून चित्रपट बनवणे हि संकल्पना देखील छान वाटली
पण बजरंगी भाईजान या चित्रपटासोबत हा का प्रदर्शित केला गेला कोणास ठाऊक! आठवड्याभरात काही कुठे बातमीच दिसली नाही बायोस्कोपबद्दल...
आपल्यापैकी कोणी हा चित्रपट पहिला का? पहिला असेल तर कसा आहे सांगावे. ४ कथा असल्याने एखादी खूप छान आणि एखादी यथा तथा असे होऊ शकेल त्यामुळे त्यावर इथे चर्चा झाली तर आवडेल. कारण मराठी चित्रपट जरी देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावत असला तरी भारताच्या दक्षिणेमध्ये त्याचा शिरकाव व्हायला बराच काळ लागेल असे वाटतंय! तोपर्यंत आम्ही अशा चर्चान्मधुनच तो पाहण्याचे समाधान घेतो! :)
प्रतिक्रिया
24 Jul 2015 - 10:19 pm | रोहन अजय संसारे
रविवारी च पहिला
खूप चं छान आहे. एक वेगळा विषय मनून पाहायला आवडला. ४ कथा खूप च मनाला लागल्या. तुमी पण पहा आवडेल तुमाला.
25 Jul 2015 - 8:14 pm | चौथा कोनाडा
व्वा , सुरेख प्रतिसाद!
अ) एक वेगळा विषय मनून पाहायला आवडला >>
तुम्हाला वेगळा "प्रयोग" म्हणायचे आहे का ? कारण जवळ जवळ सर्वच सिनेमात वेगवेगळे विषय असतात !
ब) ४ कथा खूप च मनाला लागल्या. >>
तुम्हाला कथा मनाला "भावल्या" असे म्हणायचे आहे का ? कारण सिनेमाची कथावस्तु रद्दी असेल तर तिकिटाचे व पॉपकॉर्नचे पैसे वाया गेल्या या गोष्टी मनाला लागुन राहतात !