देशभक्ती आणि स्वार्थत्याग

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
19 Jul 2015 - 9:52 am
गाभा: 

नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....

चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 10:01 am | dadadarekar

इथले काय करतील हे सोडा.

तुम्ही भारतात किमान परत तरी याल का ?

मंदार कात्रे's picture

19 Jul 2015 - 10:02 am | मंदार कात्रे

मी भारतातच आहे भाऊ !

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 10:19 am | dadadarekar

गल्फमधून आलात ?

मंदार कात्रे's picture

19 Jul 2015 - 10:56 am | मंदार कात्रे

होय .सध्या भारतात आहे .

उगा काहितरीच's picture

19 Jul 2015 - 11:21 am | उगा काहितरीच

मंदारभाऊ, जिथे सैन्यभरती होत असते तिथे जाऊन बघा १०० जागा असतील तर किमान ७-८००० उमेदवार उभे असतात. यापैकी बरेच जण कित्येक दिवस आधीपासून सराव करत असतात. सो परिस्थिती इतकीही वाईट नाही आहे.

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 11:58 am | संदीप डांगे

वरील विचारांवरून तुम्हाला भारतीय अजून कळले नाहीत असे म्हणून शकतो.

नगरीनिरंजन's picture

19 Jul 2015 - 1:00 pm | नगरीनिरंजन

पाच-दहा हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतील असे अनेक लोक असावेत इतके दैन्य आपल्या देशात अजूनही आहे त्यामुळे सैन्य भरतीला तुटवडा नाही.

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 1:07 pm | संदीप डांगे

असे लोक कुठल्या देशात नस्तात...?

नगरीनिरंजन's picture

19 Jul 2015 - 1:12 pm | नगरीनिरंजन

सगळ्याच देशात असतात म्हणूनच प्रत्येक देशाकडे सैन्य आहे आणि तेच मारले जातात ढिगाने. मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी?
अशी कामं करायला माणसं हवीत म्हणून तर गरिबी हवी असते.

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 1:21 pm | dadadarekar

सहमत.

ते संस्कृतात आअहे की .... अजापुत्रो बलिं दद्यात्....

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 1:29 pm | संदीप डांगे

ओके. तुमच्या विधानांवरून असे समजते की
१. गरीबी असते म्हणून लोक सैन्यात भरती होतात.
२. सगळे श्रीमंत असते तर देशभक्ती नसती.
३. श्रीमंत देशभक्त नसतात आणि देशभक्त गरीब असतात
४. गरीबच देशभक्त असतात म्हणून सैन्यात जातात,
५. सैन्यात जाणारे श्रीमंत नसतात.

एवढ्यातच एका नेत्याचे मुक्ताफळ ऐकले होते की फुकट दारू मिळते म्हणून लोक सैन्यात जातात. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का?

नगरीनिरंजन's picture

19 Jul 2015 - 1:45 pm | नगरीनिरंजन

देशभक्त सगळेच असतात हो. विशेषतः ज्यांना जास्त फायदा आहे ते जास्त देशभक्त असतात. पण देशभक्तांना स्वार्थत्याग कम्पल्सरी नाही. तो करण्याची मजबूरी फक्त गरिबांना असते. तुमच्या विधानांवरुन असं वाटतंय की लोक देशभक्तीसाठी सैन्यात जातात. उद्या सैन्यात पगार किंवा कोणत्याही जास्तीच्या सुखसोयी मिळणार नाहीत अशी घोषणा करा आणि मग बघा किती लोक सैन्यभरतीसाठी देशभक्तीपोटी उभे राहतात ते.
एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात. शिवाय सैन्यात जाऊन भ्रष्टाचार करणारेही काही असतातच.

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, विजापूर असो का दिल्ली त्यांची सैन्यास पगार देण्याची कपॅसिटी बहुतांश कालावधीत अधीक असणार तरीही सैन्य लढत होत. शिवाजी महाराज हयात नव्हते एक युवा छत्रपती क्रुरपणे बळी गेला, दुसरा छत्रपती दूर कुठल्याशा कोपर्‍यात होता त्याच्या पत्नीला साथ देतही सैन्य लढत होत. त्यांनीही पैसे मागीतले असतील इमाने वतने आणि पेशवाई जहागिरीच्या अपेक्षा ठेवल्या असतील पण त्याच अपेक्षा औरंगजेब कितीतरी वेगाने पुर्‍या करू शकला असता पण अत्यंत कठीण परिस्थितीत सैन्य लढत होत, कारण बहुधा त्यांच्यावर जीव लावणाराही तसाच होता. !

बॉस चांगला असेल तर पगार न पुरताही माणसं मन लावून काम करतात (किमान माझा बॉसम्हणून अनुभव या बाबत चांगला आहे) लोक विशीष्ट हेतुसाठी पेटून उठत नाहीत अस नाही त्यांना जागवणारा पोशींदा कसा आहे यावर बरेच काही अवलंबून असावे.

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 8:52 pm | dadadarekar

सौदीत डॉक्टरला पगार जास्त मिळतो म्हणून प्रत्येक डॉक्टर सौदीच्या विंटरव्ह्यूला गेला तर प्रत्येकजण लेक्ट होइइल का ?

सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे जमेल ? गाठली तरी प्रत्येकाला नोकरी मिळेल का ?

माहितगार's picture

20 Jul 2015 - 9:33 am | माहितगार

सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे जमेल ?

आधी दिल्ली असो वा विजापूर दरबारचे मांडलीक महाराष्ट्रात पडीक होतेच आणि नंतर दिल्लीचा बादशहा स्वतःच महाराष्ट्रातच येऊन बसला होताना. छत्रपती शिवाजीपण आर्थीक मोबदला देत असतील पण आदीलशाही असोवा मुघल त्यांच्या राज्याचे कारभाराचे प्रमाण पहाता शिवाजी महाराजांच्या अमला खालील क्षेत्र फारच कमी होते अधिक आर्थीक मोबदला देण्याची कुवत आदीलशाही अथवा मुघलांकडे असेल त्याच्याशी कितीही केले तरी शिवाजी महाराज कितपत मॅचकरू शकत होते माहित नाही. अर्थात हा हवेतला तर्क झाला या बद्दल ऐतिहासीक दस्तएवजातून अगदी माहिती मिळणार नाही असे नसावे पण त्या दिशेने इतिहास संशोधकांनी दस्तएवज अभ्यासले आहेत का नाही याची कल्पना नाही.

काळा पहाड's picture

19 Jul 2015 - 11:50 pm | काळा पहाड

औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार, हुशार आणि शूर लोक असणारच. तेव्हा एखाद्यानं तिकडे जाण्यासाठी अर्ज केला तर त्याला तिकडे लगेच मॅनेजर च्या जागेवर घेतील असं नसणारच. तिथे पण काँपिटिशन असणार. तेव्हा "कारण बहुधा त्यांच्यावर जीव लावणाराही तसाच होता" हे बरंचसं खरं असणार पण पूर्णपणे नसावं. शिवाजी महाराजांनी सुरत आणि बाकी शहरे जी लुटली होती ती खजिना जमा करण्यासाठी कारण सैन्य पोटावर चालतं. महाराजांचे सैनिक हे पूर्ण वेळ सैनिक नव्हते. ते शेतकरी आणि बारा बलुतेदार होते (अर्थात तेव्हाची बहुतेक सैन्ये अपवाद वगळता अशीच होती). पण काही थोडं खडं सैन्य असावंच लागे. त्यांचा पगार देण्यासाठी चौथाई वसूल करावी लागे. बाकीचे सुलतान संपूर्णपणे लुटालूट करणारे हे सुद्धा चित्र फारसं खरं नसावं असं मला वाटतं कारण काही अपवाद वगळता जनतेनं किंवा सैन्यानं सुलतानांविरुद्ध उठाव केलेला दिसत नाही.

dadadarekar's picture

20 Jul 2015 - 7:52 am | dadadarekar

सहमत

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना कधीही अर्धपोटी वगैरे ठेवत नसत. सैन्याची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळेच त्यांना यश मिळाले. त्यांनी पैसे-चारापाणी वगैरे न देता नुस्त्या हिंदवी स्वराज्याच्या गफ्फा मारल्या नाहीत. त्यांना माहीत होते की युद्ध आणि राजकारण ही काय चीज आहे ते. म्हणूनच ते इतक्या बलवान मुघल साम्राज्याशी यशस्वीरीत्या टक्कर
घेऊ शकले.

बाकी संभाजीराजांनंतरच्या कालखंडात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तेव्हाही इतर अनेक फॅक्टर होतेच. रादर राजारामकाळापासूनच सरदार नवीन मुलूख आपल्या नावे करून मागू लागले-तिथे अंमल बसण्याअगोदरच. तेव्हा आर्थिक फॅक्टर हा एकमेव नसला तरी नेहमी बर्‍यापैकी महत्त्वाचा फॅक्टर असतो असे म्हटले तरी चालेल.

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 10:35 am | dadadarekar

साक्षात शिवाजीराजना a काही महिने व त्यांच्या नातवाला काहे दशके सांभाळणारा औरंग्या स्वतःच्या सैनिकांना मात्र उपाशी ठेवत असेल का ?

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा

खिक्क...आपण फ्यॅन झालो बुवा तुम्चे

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 11:28 am | dadadarekar

कुणाचे ? माझे की औरंग्याचे ?

...

औंरंग्याफॅन दादा

नाव आडनाव's picture

21 Jul 2015 - 11:40 am | नाव आडनाव

तुम्चे चा अर्थ काय असतो ?

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा

तुमचे :)

नाव आडनाव's picture

21 Jul 2015 - 12:04 pm | नाव आडनाव

तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न दादांना होता. त्यांना तुम्ही "तुमचे" (म्हणजे दादांचे) फॅन असल्याचं सांगूनही ते परत विचारत आहेत कोणाचे - दादा दरेकरांचे की औरंग्याचे.
रच्याकने औरंगजेबाचा फॅन कोणी असू शकतं हे मी पहिल्यांदाच बघतोय.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 12:26 pm | टवाळ कार्टा

औरंगजेब तर भारताचा शेवटचा अनभिषीक्त सम्राट होता...जगातल्या त्यावेळच्या पहिल्या १० शक्तीशाली सम्राटांत त्याची गणना व्हायची म्हणे...त्याच्यानंतर कोणी केलेय का अस्सा दरारा जगभर? रच्याकने अफजूलखानाचे सुध्धा फ्यान्स आहेतच की...तो औरंगजेबापेक्षा थोड्डासाच कमी पराक्रमी होता

कपिलमुनी's picture

21 Jul 2015 - 3:34 pm | कपिलमुनी

औरंगजेब तर भारताचा शेवटचा अनभिषीक्त सम्राट होता...जगातल्या त्यावेळच्या पहिल्या १० शक्तीशाली सम्राटांत त्याची गणना व्हायची असे असून सुद्धा औरंगजेबाने कोणताही महत्वाचा शोध लावला नाही किंना संशोधन केले नाही.

याचा तीव्र निषेध

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 4:00 pm | टवाळ कार्टा

तर तर

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो ना ! आणि मुख्य म्हणजे त्याच्या पदरी असलेल्या एकाही सरदाराने सुद्धा कोणताही महत्वाचा शोध लावला नाही !! =))

(इतकी महत्वाची गोष्ट आमच्या अगोदरच का ध्यानात आली नाही बरे ?! अतिशय चिंतनीय गोष्ट !)

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:42 pm | टवाळ कार्टा

ऐला मग चटघंकुचीचा शोढ कोणी लाव्ला???

ज्यांनी रघसडुंगीचा शोध लावला त्यांनीच!

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा

ते नंतर होते ना? आणि इथे औरंगजेबांचा शोध चालु आहे ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Jul 2015 - 2:29 pm | पुण्याचे वटवाघूळ

रच्याकने अफजूलखानाचे सुध्धा फ्यान्स आहेतच की...तो औरंगजेबापेक्षा थोड्डासाच कमी पराक्रमी होता

अफझलखान औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी होता. अफझलखान महाराजांवर चालून आला त्याच्यापूर्वी दोन वर्षांआधी त्याने औरंगजेबाला वेढ्यात पकडले होते. औरंगजेब ताब्यात मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अफजलखानाच्या हाताखालील खान महंमदने दिल्लीच्या शाहजहानशी पंगा का घ्या म्हणून अफजलखानाच्या संमतीविना परस्पर औरंगजेबाला सोडून दिले. त्यावर अफझलखान पिसाळला. खान महंमदला ताबडतोब विजापूरला बोलविले गेले.तो दरबारात शिरत असतानाच त्याच्यावर तलवारीचे वार करून त्याचे तुकडे करण्यात आले.

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे.

(राजा शिवछत्रपती दहा-पंधरा वेळेला वाचलेला) पुव

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 5:28 pm | टवाळ कार्टा

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे.

आता याला सुध्धा खात्रीलायक पुरावा म्हणायचे का?

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 5:34 pm | बॅटमॅन

टकाशेट, राजा शिवछत्रपती म्हणजे गीता नव्हे हे जरी खरे असले तरी पूर्ण फेकाफेकीही आजिबात नव्हे. बेसिक फॅक्टशी त्यांनी इमानदारी बह्वंशी ठेवलेली आहे. ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 5:38 pm | टवाळ कार्टा

आता मी साईड बदलायची ठरव्लीय हे बघित्ले नै का
lllluuuulllluuuu

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 2:04 pm | अस्वस्थामा

ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.

याबद्दल पूर्णतः खात्री वाटत नाही, तेव्हा असहमती.
लहानपणी "राजा शिवछत्रपती" आणि "श्रीमान योगी" बर्‍याचदा वाचलेत आणि त्यावेळी त्यांनाच इतिहास म्हणून समजतपण होतो. इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अ‍ॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै.

(बाकी इतिहासाची आवड निर्माण व्हायला हीच पुस्तकं कारणीभूत ठरली हे मात्र तितकंच खरंय.. :) )

बॅटमॅन's picture

23 Jul 2015 - 2:44 pm | बॅटमॅन

स्पेसिफिक उदाहरण देतो, देवगिरीच्या लुटीचे वर्णन हे फेरिस्ता व अन्य मध्ययुगीन इतिहासकारांच्या ग्रंथांतून आहे तसे घेतलेले आहे. ते अतिरंजित आहे असे संशोधकांचे मत असले तरी पूर्ण कपोलकल्पितही नाही. मेन म्हणजे पुरंदर्‍यांनी ते पदरचे घातलेले नाही.

बाकी फक्त फॅक्च्युअल मिष्टेक्स पाहिल्यात तर त्या कमीच भरतील असे वाटते. अर्थात

इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अ‍ॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै.

याच्याशी सहमत आहे हेवेसांनल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

23 Jul 2015 - 2:39 pm | पुण्याचे वटवाघूळ

ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.

आधार मिळेल म्हणजे? तो आधार शक्य तिथे स्वतः पुरंदर्‍यांनी लिहिलेला आहे. उदाहरणार्थ अमुक अमुक या तारखेला लिहिलेल्या पत्राचा हिंदवी तर्जुमा हे शब्द अनेक ठिकाणी पुरंदर्‍यांनी वापरले आहेत.या सगळ्या कागदपत्रांचा त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. त्याविषयी शंका नाहीच. खटकण्यासारखी गोष्ट (कोणाला वाटलीच तर) ही की त्यांची लिहायची स्टाईल ही रिसर्चरची नाही तर शाहिराची आहे. म्हणजे पावनखिंडीतल्या प्रसंगाचे वर्णन करताना--'स्वातंत्रदेवी तुझ्या लेकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेकडो वर्षे वारकरी पंढरपूरला जात आले आहेत.आज धारकर्‍यांनी गगनाला गवसणी घातली. आता तरी प्रसन्न हो' किंवा महाराज आग्र्याहून परतल्यानंतर 'औरंगजेबाचा एका ढाण्या वाघाने जिव्हारी लावणारा चितपट पराभव केला' असे लिहिले आहे. ही वाक्ये रिसर्चरला शोभेशी नक्कीच नाहीत.पण पुरंदर्‍यांनीही स्वतःला शिवशाहिर असेच म्ह्टले आहे. रिसर्चर असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही.तरीही याचा अर्थ पुरंदर्‍यांनी काहीही अभ्यास न करता थापा मारल्या आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाही.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 11:45 am | टवाळ कार्टा

तुम्ही औरंगजेबाचे फ्यान....आम्ही (म्हणजे मीच) तुम्चा फ्यॅन (णाणा-मैंचा फ्यॅन अजुन हैच)...म्हणजेच मी औरंगजेबाचा फ्यॅन :)
आप्ल्याला (म्हणजे परत मीच) चिकाटी आव्डली तुम्ची :)
इतकी चिकाटी जर मला हापिसातल्या कामात उपयोगात आण्ता आली तर माझे आठवड्याचे काम एका दिव्सात संपेल :)

नाहीच की. पण सैनिकांकडून यश मिळणे आणि त्यांना पगार ठीकठाक वेळेवर देणे याची लिंक असतेच असे कोणी सांगितले तुम्हांला? :) औरंग्याला यश नाय मिळाले त्याची कारणे वेगळी आहेत.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2015 - 10:57 am | मृत्युन्जय

उद्या सैन्यात पगार किंवा कोणत्याही जास्तीच्या सुखसोयी मिळणार नाहीत अशी घोषणा करा आणि मग बघा किती लोक सैन्यभरतीसाठी देशभक्तीपोटी उभे राहतात ते.

पगार सगळ्याच नोकरदार लोकांना मिळतो की. त्या पगारासाठी छातीवर गोळी खाण्याची तयारी असणार्‍या लोकांचा असा उपहासात्मक उल्लेख खटकला. सौरभ कालियाला त्या तोकड्या पगाराची फार मोठी रक्कम चुकवावी लागली.

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 11:15 am | नगरीनिरंजन

एक्झॅक्टली. कालिया, उन्नीकृष्णन इत्यादी साध्या घरातल्या मुलांनी जीव गमावला. त्याची भरपाई नुसते सैनिकांचे पवाडे गाऊन होईल काय?
देश, आपली संपत्ती, भूभाग वगैरे भ्रामक कल्पनांचा नाश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सोडून या कल्पनांच्या वेडापायी आणखी लोकांचे जीव जावे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत का? प्रत्यक्षात संपत्ती कोणाची, सत्ता कोणाची काही समजण्याची तसदी कोणी घेणार आहे की नाही?
एसीत बसून युद्धखोरांना व सैनिकांना नावे ठेवणारे लोक सैनिकांचे पोकळ कौतुक करुन त्यांच्या जीवावर उठणार्‍या लोकांपेक्षा बरेच म्हणायचे.

अर्धवटराव's picture

20 Jul 2015 - 11:47 am | अर्धवटराव

देश, संपत्ती वगैरे भ्रामक कल्पनांच्या जंजाळातुन लोकांना मुक्त करण्याचे प्रयत्न करणार्‍यांना देखील त्यांचं कार्य अबाधीत चालु रहावं म्हणुन सन्यस्त खड्ग  धारकाची गरज पडते.
युद्धखोरी सैन्याला जन्म देते, सैन्य युद्धखोरी पसरवत नाहि. मानवी गुणावगुणांच्या मर्यादा सैनीकी पेशामधे शोधण्याचं कार्य त्याच सैनीकांच्या भरोशावर निवांत जीवन जगत असताना करता येतं. व्यवहारी जगाचे सर्व भलेबुरे नियम सैन्यालाही लागु होतात पण म्हणुन त्याची उदात्तता कमी होत नाहि.

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:47 pm | नगरीनिरंजन

युद्धखोरी सैन्याला जन्म देते हे मान्य. पण युद्धखोरीला कोण जन्म देतं?
सैनिकांचा उदोउदो करणार्‍या देशभक्तांची उपभोग लालसा.
त्यापायी मग स्वतःच्या जंगलांसाठी व जमिनींसाठी तुट्पुंज्या शस्त्रांसह लढणार्‍या आदिवासींना देशद्रोही ठरवलं जातं आणि त्यांना किड्यामुंग्यांसारखं टिपणार्‍या महाबलाढ्य सैन्याला देशभक्त. अशा समाजाने आपल्या सैन्याला सन्यस्त खड्ग म्हणणे हा विनोद आहे.

बाकी आपण युद्ध केलं नाही तर बाजूचा करेल हा भ्रम प्रत्येकाच्या मनात असेल तर युद्ध अटळच आहे.

विकासाचा समतोल सांभाळु न शकणार्‍या व्यवस्था आणि त्याला जाब विचारणयास असमर्थ नागर समाजाने आपलं पाप लश्कराच्या माथी मारणं हा तर महाभयानक विनोद झाला मग. वड्याचं तेल वांग्यावर काढलेलं बघितलय.. अगदीच... असो.

बाकी आपण युद्ध केलं नाही तर बाजूचा करेल हा भ्रम प्रत्येकाच्या मनात असेल तर युद्ध अटळच आहे.

असल्या भ्रमातुन बाहेर पडुन नि:शस्त्र व्हायची अवदसा आपल्या देशाला कधिही आठवु नये.

नगरीनिरंजन's picture

21 Jul 2015 - 6:05 am | नगरीनिरंजन

समतोल न सांभाळू शकणार्‍या व्यवस्थांबद्दल देशभक्त काय करत आहेत?

अर्धवटराव's picture

21 Jul 2015 - 10:08 am | अर्धवटराव

जंत्री मोठी आहे. पण काय करतात यापेक्शा ते गांधीज् विथ गन्स सारख्या लांछनास्पद खेळाची मजा उपभोगत नाहित हे महत्वाचं.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2015 - 11:51 am | मृत्युन्जय

आधी तुम्ही म्हणत होतात की हे लोक फक्त पगारासाठी काम करतात. आता तुम्ही वेगळा स्टँड घेत आहात.

युद्ध कुणालाही नको आहे. तुम्हाला नाही तसे मलाही नाही आणी सीमेवर लढणार्‍या लोकांना तर नाहिच नाही. पण म्हणुन सैन्याची गरज संपत नाही. ज्या कित्येक देशांकडे स्वतःचे सैन्य नाही त्यांना इतर देशांपासुन धोकादेखील नाही. मी कितीही कबुतरे उडवली तरीही माझा शेजारी जर माझ्यावर शिकारी कुत्रे सोडणार असेल तर मला देखील स्वसंरक्षण करणे भाग आहे आणि कधीतरी त्याच्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सशस्त्र सैनिकांची देखील मला गरज आहेच. ६२ सालपर्यंत कबुतरे उडवण्याने आपला काही फायदा झाला नाही (उलट प्रचंड नुकसान झाले) हे तर जगजाहीर आहेच की.

या ज्या सैनिकांबद्दल आपण बोलतो आहोत ते ऐदी, ऐषारामी, गुलछबु दारुबाज आणि विलासी जीवन जगणारे तरुण नाहित. ते अतिशय कष्टाचे आणि धोक्याचे जीवन जगत आहेत. आणि ते जे काम करत आहेत त्यासाठी त्यांना योग्य मोबदला मिळणे देखील गरजेचे आहेच. ६२ च्या युद्धात गंजलेल्या संगिनी घेउन लढलेले सैनिक केवळ त्या संगिनी पोटात खुपसुन चार लोकांना मारणे एवढेच करु शकले. त्यांना गोळ्या पुरवणे ही देखील आपलीच गरज आहे. एक लक्षात घ्या की आपली गरज म्हणुन त्यांना सीमेवर उभे रहायला लागत आहे.

देश, आपली संपत्ती, भूभाग या संकल्पना भ्रामक आहेत हे देखील विनोदीच विधान झाले. उद्या तुमच्या घरात घुसुन तुमचे घर साफ करणार्‍या दरोडेखोरांबाबत देखील आपण हीच भूमिका घ्याल का? आणि मी लाख हा दृष्टीकोन ठेवीन हो. पण समोरच्याने नाही ठेवला तर मग काय उपयोग? अवघे विश्वची माझे घर हे सगळे ठीक आहे पण मग अमेरिका मला तिच्या भूभागावर सहजी पाय ठेउ देइल काय्? त्यांना सगळे सोपसकार पाहिजेत. सैन्य पदरी न बाळगणार्‍या देशांनादेखील पाहिजेत. मग त्या संकल्पना भ्रामक कश्या ठरतात? अजुन आख्खी दुनिया संतपदाला नाही ना पोचलेली? आणि कधी पोचणारही नाही. मग या संकल्पना भ्रामक ठरत नाहित हो.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2015 - 12:12 pm | पुण्याचे वटवाघूळ

शब्दाशब्दाशी सहमत.

कसे असते की राष्ट्रवाद भ्रामक कसा, देश ही संकल्पना कशी चुकीची असे काही बोलले की आपली लिबरल, उदारमतवादी अशी क्रेडेन्शिअल्स सिध्द करता येतात ना.त्यातलाच हा भाग. यांना लाख म्हणायचे असेल की देश ही कल्पना चुकीची आहे पण शेजारच्या देशातले अतिरेकी इथे मारायला येतात ते इथल्या भारतीयांना आणि हिंदूंनाच. अशा वेळी अशा एसीमधले बसून कळफलक बडविणारे लोक लढायला जात नाहीत.लढायला जातात ते उन्नीकृष्णन सारखे लोक. ते लोक आहेत म्हणून या असल्या फुकट*ट लोकांना कळफलक बडवायला मिळतो. अशा लोकांना दिसतील तिथे चोपायला हवे.

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:50 pm | नगरीनिरंजन

अवश्य चोपा. :-)
विशेषतः सगळ्यांनी मिळून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2015 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

थोडक्यात पण सारासार विवेकावर आणि सत्य वस्तुस्थितीवर आधारलेला प्रतिसाद.

सैन्याविरुद्ध बोलणार्‍या लोकांना सद्या पाकीस्तानने आपल्या सीमेवर चाललेल्या गोळीबारात दोन दिवस रहायला लागले तर (कदाचित) मतबदल होईल. अन्यथा, "जगातले सगळे कसे सत्वशील माणसे बनली पाहिजेत/आहेत." असा विचार सैन्याच्या संरक्षणात सुखाने आपल्या ऑफिसात किंवा घरात बसूनच सुचू शकतो.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2015 - 10:48 am | पुण्याचे वटवाघूळ

मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी?

बिझनेसमनचे माहित नाहिउ पण राजकारण्यांची मुले/नातेवाईक मारली गेली आहेत युद्ध्द्दात.

१. इस्राइलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भाऊ युगांडातील प्लेन हायजॅक ऑपरेशन मध्ये मारला गेला. स्वतः नेतान्याहू सैन्यात होते तेच पुढे पंतप्रधान झाले. यितजॅक रबीन पण सैन्यात होते.ते पुढे पंतप्रधान झाले.

२. मिन्नेसोटा राज्याच्या इराक युद्धाला विरोधी सिनेटर बेकी लॉरी यांचा मुलगा इराक युद्धात मारला गेला. ही गोष्ट २००५ मधील. त्यावेळी मी मिनिअ‍ॅपोलिसवरून डुलुथला जात होतो आणि आय-३५ वरून चुकून मिन्नेसोटा राज्य हायवे-२३ ला लागलो. हा रस्ताही शेवटी डुलुथलाच जात असल्यामुळे यू-टर्न घेऊन परत यायच्या भानगडीत पडलो नाही. त्यावेळी बेकी लॉरी यांच्या केरीक या गावावरून गेलो होतो. ते गाव म्हणजे भारतातील गावातील एक चौक असावा इतके मोठे आहे.तरी तिथे त्या दिवशी अनयुज्यली जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिकही लागला.नंतर कारण कळले.

३. साऊथ डाकोटाचे सिनेटर टिम जॉनसन यांचा मुलगा इराक आणि अफगाणिस्तानातही लढायला होता.त्याच्या सुदैवाने तो मारला गेला नाही आणि अजूनही तो सैन्यात आहे.

४. बुश सरकारमधील कायदामंत्री जॉन अ‍ॅशक्रॉफ्ट यांचा मुलगाही सैन्यात होता आणि तो इराक वॉरमध्ये होता.

मला वाटते की जॉन मॅककेन यांचा मुलगाही सैन्यात आहे आणि तो इराक वॉरमध्ये होता. जॉन मॅककेन हे तर २००८ मध्ये अध्यक्षपदासाठीचे उमेदवार होते.

आणि ही सगळी उध्दारणे अमेरिका-इसराएलमधील श्रीमंत देशातील आहेत. त्यामुळे गरिबी असल्यामुळे लोक सैन्यात जातात आणि मरायला गरीब पुढे असतात आणि श्रीमंत-इन्फ्युएन्शिअल लोक मागे असतात हा हायपोथिसिस ९५% कॉफिडन्स लेव्हलवर रिजेक्ट करता येईल असे वाटते :)

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:16 pm | नगरीनिरंजन

९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-)
असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2015 - 12:23 pm | पुण्याचे वटवाघूळ

९५% कॉन्फिडन्स लेव्हलला नॉर्मल डिस्झ्ट्रीब्युशनच लागते असे थोडीच आहे? स्टुडन्त टी, काय-स्क्वेअर, एफ सगळ्यांना ९५% कॉन्फिडन्स लेव्हल चालते :)

तुमचाच मुद्दा-- गरीबांपुढे पर्याय नसतो म्हणून ते सैन्यात मरायला जातात याविरूध्द श्रीमंत देशातील उदाहरणे दिली आहेत.

(एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स)

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:27 pm | नगरीनिरंजन

माझा मुद्दा: जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही.
तुमचा अर्थः फक्त गरीब लोकच सैन्यात जातात. :-)

मृत्युन्जय's picture

20 Jul 2015 - 12:38 pm | मृत्युन्जय

नाही ननि तुमचा मुद्दा असा नव्हताच. हे तुमचेच वाक्य आहे ना?:


एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात.

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 1:23 pm | नगरीनिरंजन

होय. त्यातला प्रतिष्ठेचा भाग का गाळता?

मृत्युन्जय's picture

21 Jul 2015 - 11:02 am | मृत्युन्जय

अजिबात गाळत नाही आहे. पण तुमचा मुद्दा "जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही." असा नव्हता हे सांगायचे होते,

शिवाय उत्तम सांपत्तिक परिस्थिती आणि करण्यासारखी इतर अनेक प्रतिष्टेची कामे सोडुन सैन्यात गेलेले ढिगाने लोक माहिती आहेत (त्यातला एक शाळेतला जवळचा मित्र जो शाळेत असल्यापासुन सैन्यात जाण्याच्या ध्यासाने पछाडलेला होता आणि त्यात केवळ देशसेवा हाच उद्देश होता) . त्यामुळे केवळ पैसा आणी प्रतिष्ठेसाठी लोक सैन्यात जातात हा मुद्दा संपुर्णतः अमान्य.

lakhu risbud's picture

22 Jul 2015 - 2:00 pm | lakhu risbud

या मुद्द्या च्या अनुषंगाने डॉ खरे, सोन्याबापू आणि रणजीत चितळे यांची मते जाणून घ्यायला आवडेल.

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:29 pm | नगरीनिरंजन

कोणते डिस्ट्रीब्युशन लावले ते सांगू शकाल काय?

(हौशी स्टॅटिस्टिक्स वाचक)

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 12:17 pm | नगरीनिरंजन

९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-)
असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.

जयंत कुलकर्णी's picture

19 Jul 2015 - 5:48 pm | जयंत कुलकर्णी

कुठल्याही माणसाला पोटासाठी कुठलातरी व्यवस्या करणे भागच असते. प्रश्न आहे तो एखादा व्यवसाय स्वीकारल्यावर तुम्ही तो किती निष्ठेने पार पाडताय तो. भारतीय सैनिक अजून तरी तो निष्ठेने पार पाडतो आहे असेच म्हणावे लागेल... अर्थात जर जरुर पडली तर मात्र प्रत्येक तरुण सैन्यात भरती होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही... जर भरती झाले नाहीत तर दुसरे मार्ग सरकारकडे असतातच....

धर्मराजमुटके's picture

19 Jul 2015 - 6:17 pm | धर्मराजमुटके

देशभक्ती आणि स्वार्थत्याग हे शब्द फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसाठी राखीव आहेत. इतर दिवशी त्यांचा उच्च्चार करण्याचे कारणच काय ? युद्ध जिंकायचे असल्यास एसएमएस स्पर्धा घ्यावी किंवा फेसबुकच्या 'वुई लव्ह इंडीया' पेजेसला जास्तीत जास्त लाईक्स द्यावात. देशभक्तीपर मेसेज व्हॉटअपवर फॉरवर्ड करावेत, वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर तज्ञांच्या कंठाळी चर्चा आयोजीत कराव्यात. लैच खाज असेल तर शत्रुराष्ट्राच्या शासनाची संकेतस्थळे हॅक करुन त्यावर आपला राष्ट्रध्वज फडकावावा. प्रत्यक्ष लढाई कशाला करायची ?

dadadarekar's picture

19 Jul 2015 - 8:54 pm | dadadarekar

मला एक मौल्यवान शंका आहे.

सैन्यभरती हा आजचाच इशू नाही. पूर्वीही राजे महाराजे सुल्तान छत्रपती सैन्यभरती करायचे व त्यात सैनिक मरायचे.

अनेक महाराजांचे / सुलतानांच आजचे वारस अतीश्रीमंत , जमीनदार व पतदार आहेत.

पण त्यांच्यासाठी लढलेले व मेलेले जे लोक होते , त्यांचे वारस आज काय्करतात ?

इतिहासात शहीद झालेल्यांचे आजचे वारस यावर एखादा धागा काढून माहिती गोळा होऊ शकेल का ?

संकटे व संपत्ती यांचे विभाजन इतिहासात अतीविषम प्रमाणात झाले आहे का ?

पाटीलअमित's picture

19 Jul 2015 - 10:40 pm | पाटीलअमित

सगलायंची देशभक्ती क्रिकेट match मधेच दिसते आपण तरी काय करणार

विद्यार्थी's picture

19 Jul 2015 - 11:10 pm | विद्यार्थी

संकट काळ हा खरच देशभक्ती जागवणारा काळ असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाची झालेली आर्थिक प्रगती आणि लोकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे भारतीय तरुण भौतिक सुखवादी झाले आहेत असा भास निर्माण झाला असेल कदाचित. पण त्याच्या रक्तात असणारे भारतीयत्व आणि देशाभिमान याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही.

कोणतीही युद्धजन्य परीस्थिनी नसतानाही चांगल्या घरातील सुखवस्तू आयुष्य सोडून सैन्यात भारती होणारे तरुण मी पुण्या मुंबई मध्ये पहिले आहेत. जर का कधी युद्धाची वेळ आलीच तर भारतीय लष्कराला सैनिकांची कमतरता पडेल असे मला वाटत नाही.

संदीप डांगे's picture

20 Jul 2015 - 2:11 am | संदीप डांगे

ज्जे बात. आवडला प्रतिसाद!

काही लोकांना सतत नकारात्मक बघायची सवय झाली आहे. हा त्यांचा स्वतःचा दोष नाही. वृत्तमाध्यमांनी त्या पद्धतीने विचार करायची सवय लावली आहे. ही वृत्तपत्रे अगदी त्या लोकांसारखी आहेत ज्यांना पाण्यावर चालणारा कुत्रा दाखवला तर म्हणतात अरेरे ह्या कुत्र्याला पोहता येत नाही बघा. जगात काही चांगलं घडतच नाही, सतत वाईटच घडत असतं असा कुणाचाही समज होईल अशा पद्धतीने वृत्तपत्रे आपल्याकडे बातम्या देत असतात. त्यामागे खूप गुंतागुंतीचे अर्थ-राजकारण आहे.

ते एक असो.

सुज्ञ माणसाने फार सावध राहिलं पाहिजे. सैनिकांबद्दल बोलण्याआधी थोडी माहिती तरी घ्यावी. लष्करात लोक भाकरीसाठीच जातात, गरिब असतात म्हणून जातात हा सैनिकांचा सरळ सरळ अपमान आहे. सैन्यभरतीसाठी तयार व्हायला सकाळी ४ वाजता उठून व्यायाम व इतर मेहनत करणारे बघितले आहेत. त्यांच्यात जोष असतो, उर्जा असते. काहितरी करून दाखवायची धमक असते. ही मुले म्हटलं तर सहज गुन्हेगारीकडे वळू शकतात आणि कुणाचाच बाप त्यांना मग रोखू शकणार नाही. ते योग्य मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आयुष्याला काही तरी महान अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गरीब म्हणून हिणवणे मला तरी खूप जास्त खटकले आहे.

जगात आपणच फार तीर मारतोय अशी संकल्पना असणार्‍या लोकांनी सैनिकांबद्दल बोलतांना तरी तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा आहे. बाकी भ्रष्टाचार करतच नाही असा कुणी सापडणे भारतात तरी शक्य नाही.

माहितगार's picture

20 Jul 2015 - 9:36 am | माहितगार

+१

पानसिंग तोमर चित्रपटातील दृश्य

डाकु पानसिंग:- मैंने पदक जीता तब मुझे किसी ने नही पुछा. डाकु बना तो ..................

हि प्रतिष्ठा ?????????????????

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्रीचे वंशज आज भाडयाच्या घरात राहतात ( वाचलेली बातमी)

माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी (माजी भारतीय पंतप्रधान) राजकारणात येण्याआधी एक पायलट म्हणून
नोकरी करत होते ? ()
घरत

१. सैन्यात भरती होणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यातील धोके, फायदे, तोटे ह्याचा विचार करूनच उमेदवार सैन्यात भरती होतो. त्यामुळे त्याचे सैन्यात भरती होणे हे काहीतरी भलतेच भव्यदिव्य आहे असा समज करून घ्यायचे कारण नाही. कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात. देशातील प्रत्येक नागरिक सैन्यात भरती झाला तर देशाचे दिवाळे निघेल.

२. एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक हा सैन्यात भरती न होता कितीतरी जास्त देशसेवा करू शकतो. सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. अण्णा ह्जारे सैन्यात कोण होते? एक साधे सैनिक. बाहेर पडल्यावर कितीतरी मोठे समाजसेवक बनले आहेत.

३. सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.

४. आधुनिक काळात युद्ध हे पूर्वीसारखे लढले जाणार नाही. अत्यंत विध्वंसक शस्त्रे शेकडो मैल अंतरावरून डागता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईचे प्रमाण कमी कमी होत जाणार. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.

एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.

संदीप डांगे's picture

20 Jul 2015 - 4:20 am | संदीप डांगे

माझे मत थोडे वेगळे आहे:

(प्रस्तुत प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उत्तर असला तरी वैयक्तिक हुप्प्या या सदस्यास नसून अशी विचारसरणी असलेल्या प्रत्येक वाचकासाठी आहे)

१. सैन्यात भरती होणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यातील धोके, फायदे, तोटे ह्याचा विचार करूनच उमेदवार सैन्यात भरती होतो. त्यामुळे त्याचे सैन्यात भरती होणे हे काहीतरी भलतेच भव्यदिव्य आहे असा समज करून घ्यायचे कारण नाही.
>> मी समजा तुम्हाला म्हटले की प्रचंड वेगाने जिथून गाड्या सुसाट जात असतात अशा स्पॉटवर तुम्ही रोज शांतपणे १२ तास उभे राहा. जीवंत राहिलात तर रोज (*) रुपये व जेवन मिळेल, तर तुम्ही उभे राहाल? पैसे मिळतायत म्हणून तुम्ही हे करायला तयार व्हाल? फक्त पैसे मिळतात म्हणून कुणी सैन्यात जात नाही. तेवढे पैसे मिळवायला जीव धोक्यात न घालता करता येणारी कामही देशात उपलब्ध आहेत. (* : तुम्हाला जो आकडा आकर्षक वाटेल तो)

कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात. देशातील प्रत्येक नागरिक सैन्यात भरती झाला तर देशाचे दिवाळे निघेल.

>> 'कितीही गमजा केल्या तरी' म्हणजे काय? कोण करतंय गमजा?

हे जेवढे काही पैसे लागतात ते सैनिकांचे चोचले पुरवायला दिलेले नसून देशाच्या रक्षणावर खर्च करण्यासाठी असतात. त्यामुळे करदाते पैसे देतात तर उपकार करत नाहीत. सैनिक देशावर उपकार करतो. सीमेवर मस्त टेन्ट लावून कॅम्पफायर करून देशाच्या पैशाची दारू प्यायला जात नसतो. देशाचे रक्षण करतो. देशाचे रक्षण करायची गरजच नसल्यास तसे सांगावे. कुणीही शून्य डीग्रीखाली हातापायाचे बोटे सडतील अशा थंडीत, मरण केव्हाही येईल अशा परिस्थितीत फक्त पोट भरायला मिळतं म्हणुन जात नसतो. इतकं काय कष्टाचं काम नाही आहे असं वाटत असेल तर कुणीही फक्त रोज सकाळी चार वाजता उठून चाळीस किलोमीटर पळायला जावे न चुकता. आणि नंतर ८ तास एकाच जागी न हलता उभे राहावे. ते करायची तयारी नसेल तर किमान प्रहार सिनेमा आणि सोन्याबापु यांची मालिका वाचावी. एवढे रोज किमान दहा वर्षे केले तरी माझ्या मते भव्य दिव्य काम होईल.

आजकाल 'करदात्यांचे पैसे' हा वाक्प्रचार 'उचलली जीभ लावली' टाळ्याला पद्धतीने वापरला जातोय. अभ्यास वाढवा. लष्कराला जेवढी गरज असते तेवढीच भरती होत असते. जे पात्र आहेत तेच निवडले जातात. कठोर परिश्रमाला घाबरून पळून जाणार्‍यांची गय केली जात नाही. सैन्य म्हणजे अन्नछत्र आहे अशी काहीशी तुमची धारणा दिसते. म्हणून प्रत्येक उपाशी, भिकारी, आळशी, गरीब लष्कराच्या दरवाज्यावर रांग लावून उभा असल्याचं चित्र रंगवत आहात.

२. एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक हा सैन्यात भरती न होता कितीतरी जास्त देशसेवा करू शकतो. सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. अण्णा ह्जारे सैन्यात कोण होते? एक साधे सैनिक. बाहेर पडल्यावर कितीतरी मोठे समाजसेवक बनले आहेत.
>> सैन्य खडं पहारा देत असतं म्हणुन वर उल्लेखलेले महान लोक शांतपणे आपली कामं करू शकतात. कुठूनही गोळी येऊन त्या कल्पक डोक्यात घुसण्याची शक्यता असते त्या वातावरणात कितपत देशसेवा होते ते बघणं कुतूहलाचं असेल. अशा महान देशबांधवांचा जीव वाचवणं यापेक्षा मोठी आणि महत्त्वाची देशसेवा काय असते बुवा? आणि कुणी सांगितलं, सैन्यात वरील गुणांना वाव नसतो? कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक मिळाले आहेतच की सैन्यातून. सैन्यपश्चात आयुष्यात त्यांना सैन्यशिस्तीचा आपली कौशल्ये अधिक समर्थपणे वापरतांना फायदाच झाला आहे. भ्रष्टाचारासाठी नाटकी उपोषणं करण्यापेक्षा संकटकाळी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन आजवर लाखो लोकांचे जीव वाचवले आहेतच की सैनिकांनी. (म्हणा 'ही तर त्यांची ड्युटीच आहे'.) त्या पोकळ उपोषणबाजीने काय फरक पडलाय तसा तरी (अनुयायांचे खिसे भरण्याखेरीज)? निदान सैनिकांनी ज्यांचे प्राण वाचवले त्यांना तर थेट फायदा झाला ना?

ज्यांना जे जमतं त्याद्वारे त्यांनी देशसेवा करावी. कुणाला जबरदस्ती केली नाहीये की असशील तू महान संशोधक, ते सोड आणि इथे बंदूक घेऊन उभा राहा रोज १६-१६ तास काहीही दुसरं न करता.

३. सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.
>> वरील वाक्यात 'सैन्यात' हा शब्द काढून कुठल्याही व्यवसायाचे नाव टाका. पुढचं सगळं जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी दिसेल.

४. आधुनिक काळात युद्ध हे पूर्वीसारखे लढले जाणार नाही. अत्यंत विध्वंसक शस्त्रे शेकडो मैल अंतरावरून डागता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईचे प्रमाण कमी कमी होत जाणार. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.
>> ऐकीव माहितीवरलं ठोकीव विधान. युद्धकलेमधे हजारो वर्षांपासून उत्क्रांती होत आली आहे, कुठल्याही काळात कुठलंच युद्ध त्या काळाच्या पूर्वीच्या काळासारखं लढलं जात नसतं. दहशतवादीही प्रत्येकदा वेगवेगळी तंत्र आणि ठिकाणं निवडतात. तळहातावर शीर घेऊन लढणारे लोक नसतील तर जगात प्रत्येकालाच तळहातावर शीर घेऊन जगावे लागेल. आणि मग सैनिक काय असतो ते कळेल. विध्वंसक शस्त्रे ही फक्त काल्पनिक भीती आहे. आजही हजारो छोट्या-मोठ्या चकमकींमधे रोज कित्येक देशांचे जवान आपले बलिदान देत आहेत. कुठे आहेत ती आधुनिक शस्त्रे आणि युद्धतंत्रं?

इथेही म्हणतो अभ्यास वाढवा.

एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.
>> परत एक टाळ्याखाऊ पण पोकळ वाक्य. वर उल्लेखलेले महानुभाव निपजायला देशात शांतता लागते, त्यासाठी सार्वभौमत्व लागतं, ते टीकवण्यासाठी मनगटात जोर लागतो. तो जोर म्हणजे सैन्य.

सैनिकांचं राहू दे एकवेळ बाजूला, तुमच्या लॉजिकनुसार पोलिस, सिक्युरिटी गार्ड, वॉचमन ह्यांची तरी समाजाला काय गरज आहे? नाही का?

कुलुपाची किंमत तिजोरीतल्या संपत्तीपेक्षा अधीक मौल्यवान नसते. पण जोपर्यंत कुलूप असतं तोवरच त्या संपत्तीला अर्थ असतो.

आपलं सैन्य उच्चप्रतीचं मनोधैर्य आणि अढळ संयम बाळगून देशातल्या लोकांना हवे ते उच्छाद करू देतं म्हणून असली मुक्ताफळं उधळण्याचं आपल्याला सुचतं. स्वत:चं सैन्य नसणारे देश जगात आहेत पण त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कुठल्यातरी राष्ट्रांनी घेतलेली आहेच. हे असं का असावं आणि याचे परिणाम काय असतात हे आपल्या ठावूक असेलच अशी अपेक्षा आहे.

सैनिकाचं आयुष्य हे रोमँटीसीझमसारखं रंगवलं जातं असा आक्षेप असेल तर सैन्यविहिन सुरक्षित देश हा ही रोमँटीसीझमच आहे.

(जाता जाता: जगातलं प्रत्येक प्रोफेशन कसं वाईट्टच आहे हे मी सहज पटवून देऊ शकतो म्हणून ते समूळ वाईट्टच आहे असे नसतं.)

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 6:07 am | नगरीनिरंजन

सरकारच्या उत्पन्नापैकी १०-१५% भाग सैन्यदलावर खर्च होतो; पण गंमत म्हणजे हेच सैनिक सिव्हिलियन लोकांना हीन लेखतात किंवा अपमानास्पद उल्लेख करतात ते चालतं. बापूसाहेबांच्या लेखमालेतल्या पहिल्याच लेखातही मला हेच खटकलं होतं. त्या अमिताभ बच्चनच्या मेजरसाब का कायते नाव असलेल्या चित्रपटात तो इतक्या वेळा "ब्लडी सिव्हिलियन्स" म्हणतो की उठून एक थोतरीत द्यावीशी वाटते.
मुळात सैनिक लोक उपकार वगैरे करताहेत ही भाषा एका मर्यादेपर्यंत (सैन्याचे मनोबल का काय ते टिकवायला) ठीक आहे पण सध्या जरा अतिरेकच होत चालला आहे. सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे आणि नंतर मस्त नाश्ता खाणे हे बहुसंख्य सामान्य माणसांना इच्छा असूनही करता येत नाही; त्यांच्या नशिबी रोजच्या कामाची चिंताच असते; त्यामुळे त्याला आत्यंतिक कष्ट वगैरे म्हणू नये.
मुळात देशासाठी म्हणजे कोणासाठी याची चर्चा व्हायला पाहिजे एकदा. देशाच्या सकल उत्पन्नापैकी २५% उत्पन्नाची मालकी फक्त १०० लोकांकडे आहे. तितकेच किंवा त्याहूनही जास्त धन गुप्तपणे मूठभर राजकारण्यांच्या मालकीचे असेल. मग नक्की कोणाच्या संपत्तीचे संरक्षण होते आहे?
बाकी प्रसंगी हे सैनिक लोक किती उपद्रवी ठरु शकतात हे नगरला लष्करी तळ असल्याने अनेकदा पाहिलेले आहे आणि कायकाय भ्रष्टाचार चालतो त्याच्या सुरस कथाही ऐकलेल्या आहेत.
त्यामुळे अतिग्लोरिफिकेशन झाले की त्रास होतो.

बॅटमॅन's picture

20 Jul 2015 - 11:23 pm | बॅटमॅन

मिल्ट्री ही पवित्र गाय झालेली आहे. मिलिटरीबद्दल काहीही बोलले तर बोलणारे देशद्रोही ठरतात. इतक्या गफ्फा मारणारे हे मिल्ट्रीम्यान लोक्स सबॉर्डिनेट लोकांना कसा त्रास देतात- विशेषतः सीआरपीएफ डिव्हिजन मध्ये- याबद्दल एक भयाण लेख आला होता. त्या वेळेपासून तर असे शब्दप्रयोग अतिशयच डोक्यात जाऊ लागले आहेत. कोणी कुणावर उपकार करत नाहीये इथे.

नाखु's picture

21 Jul 2015 - 9:03 am | नाखु

तू सुद्धा ! एखाद्या प्रसंगावरून सगळ्या सैन्यदलाचे एकाच तागडीत मूल्यमापन का केलेस कळू शकेल काय ? अंतर्गत राजकारण वगैरे जाऊ दे पण किमान ती नोकरी (जीचे परीणाम स्व्च्छ आणि स्पष्ट दिसत असूनही स्वेच्छेने आणि मेहनतीने (कठोर परीश्रमाने) मिळवलेली असते !!

तू तारतम्य्प्रतीवादी असल्याने लिहिले आहे आधिक उणे क्षमा पण सैनिकांची गरज+मदत अंतर्गत बाबींसाठीही घ्यावी लागणे हे बेफिकीर्/ढिसाळ्/कर्तव्यापासून पळणारे/आत्मकेंन्द्री मुर्दाड समाजामूळेच आहे, आणि तू मी सर्व मिपाकरही आलोच.(ज्या प्रगत देशांचा उल्लेख वर आला आहे तिथे किमान नाही तर कमाल सावधानता/सतर्कता/कायदा पालन केले जाते आणि ऊठ सूट सैनिकांना पाचारण करावे लागत नाही)

गेल्या २०-२५ वर्षांमधील अतिरेकी/नक्शलवादी कारवायांमध्ये मरण पावलेल्यां सैनिकांची संख्या+कारणे निलाखस खोटी आहेत का असे हिरीरीने प्रतीवाद करणार्यांसाठी लघु प्रश्न !

सैन्यात असल्यामुळे अख्ख्या समाजाला झोडण्याचा मॉरल हक्क आपल्याला मिळाला आहे अशा थाटात जे बरळतात त्यांच्यासाठी तसे मुख्यतः म्हटलेले आहे. आणि वैसेभी, दोघांना गरज असते. बिगरलढाऊ लोकांना आपली संपत्ती वगैरे रक्षण करायला म्हणून फुलटाईम लढाऊ लोकांची गरज असते, पण हे लढाऊ लोक हवेतून पैदा होणार नसल्यामुळे पैसे वगैरे देऊन, काही सोयीसवलती देऊन त्यांना तयार करावे लागते. शिवाय सैनिक हेही समाजाचाच भाग आहेत, ते कै आभाळातून पडलेले नाहीत. त्यांनाही त्यांची शेतीवाडी आहे, घरचे आहेत. फक्त इतरांवर उपकार म्हणून ते लढत नसतात. पर्यायाने स्वतःसाठीही ते लढतात असे म्हणायला नक्कीच स्कोप आहे.

अवलंबित्व दोन्ही बाजूंनी असताना फक्त एकाच बाजूच्या अवलंबित्वाचा किती गजर करायचा त्याला काही लिमिट आहे की नाही? हे 'ब्लडी सिव्हिलियन्स' वगैरे शब्दप्रयोग त्यामुळेच डोक्यात जातात. मिलिटरीबद्दल सिव्हिलियन्सना जनरली किती आदर आणि कौतुक असते ते पाहता आपणच भरलेल्या टॅक्समधून ज्यांना सोयीसुविधा मिळतात त्यांनी असा माज करावा हे मला अपमानास्पद वाटते. तुम्हांला वाटत नसेल तर न वाटो.

हुप्प्या's picture

20 Jul 2015 - 7:36 am | हुप्प्या

( हा प्रतिसाद संदीप डांगे ह्या व्यक्तीकरता नसून गुडघ्यात मेंदू असणार्‍या तमाम सैन्यभक्तांना उद्देशून आहे!)

>> मी समजा तुम्हाला म्हटले की प्रचंड वेगाने जिथून गाड्या सुसाट जात असतात अशा स्पॉटवर तुम्ही रोज शांतपणे १२ तास उभे राहा. जीवंत राहिलात तर रोज (*) रुपये व जेवन मिळेल, तर तुम्ही उभे राहाल? पैसे मिळतायत म्हणून तुम्ही हे करायला तयार व्हाल? फक्त पैसे मिळतात म्हणून कुणी सैन्यात जात नाही. तेवढे पैसे मिळवायला जीव धोक्यात न घालता करता येणारी कामही देशात उपलब्ध आहेत. (* : तुम्हाला जो आकडा आकर्षक वाटेल तो)
<<
असल्या बिनडोक उदाहरणाबाबतचे उत्तर आहे की, ह्या निर्बुद्ध कामाचा समाजाला उपयोग काय आहे, ह्याकरता कोण आणि का पैसे देतो आहे असे उचित प्रश्न मी विचारीन. माझे शिक्षण, माझी कुवत, माझ्यापुढे उपलब्ध असणारे पर्याय ह्यांचा विचार करुन मगच मी निर्णय घेईन.

>> 'कितीही गमजा केल्या तरी' म्हणजे काय? कोण करतंय गमजा?

गमजा म्हणजे बढाया, घमेंडखोरी वगैरे. साधारण सैन्याचे उदात्तीकरण करणारे त्यांची भव्यदिव्य शस्त्रे, अस्त्रे, विमाने, रणगाडे ह्यांचे उदात्तीकरण करतात. आणि त्यामागे खर्चल्या जाणार्‍या प्रत्येक पैशाकरता करदाते जबाबदार आहे हे विसरले जाते. बापाच्या जिवावर एखादा लालभडक फ्रेरारी गाडी उडवतो आणि त्याचे सगळे कौतुक करतात त्याची आठवण होते.

>>
हे जेवढे काही पैसे लागतात ते सैनिकांचे चोचले पुरवायला दिलेले नसून देशाच्या रक्षणावर खर्च करण्यासाठी असतात. त्यामुळे करदाते पैसे देतात तर उपकार करत नाहीत. सैनिक देशावर उपकार करतो. सीमेवर मस्त टेन्ट लावून कॅम्पफायर .....
<<

मूर्ख विधान. करदाते म्हणजे लोक. लोक म्हणजे देशाचे मालक. सैनिक हे ह्या लोकांचे नोकर आहेत.ह्या नोकरांवर किती खर्च करायचा हे लोकांचे प्रतिनिधी म्हणजे लोकच ठरवतात. देशाचे रक्षण म्हणजे लोकांचे रक्षण. हे सैनिकांचे कर्तव्य आहे. एखादा बंगल्याचा मालक घराच्या सुरक्षिततेकरता रखवालदार ठेवतो तेव्हा त्याचा पगार वगैरे तोच देतो. संरक्षण दल हे ह्या बंगल्याच्या रखवालदारासारखे आहे. बंगला आहे म्हणून रखवालदार आहे. उलटे नाही.

अनेक देश असे आहेत ज्यांत सैन्यदल नाही. अशा देशांचे काहीही अडलेले नाही. सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही.

>> ऐकीव माहितीवरलं ठोकीव विधान. युद्धकलेमधे हजारो वर्षांपासून उत्क्रांती होत आली आहे, कुठल्याही काळात कुठलंच युद्ध त्या काळाच्या पूर्वीच्या काळासारखं लढलं जात नसतं. दहशतवादीही प्रत्येकदा वेगवेगळी तंत्र आणि ठिकाणं
<<
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ह्यातला प्रकार. आपण अभ्यास नक्कीच वाढवा. आधुनिक काळातील युद्धांकडे जरा बघा. अमेरिकेने इराक, अफगाणिस्तानवर हल्ले केले तेव्हा सर्वात जास्त आणि दीर्घकाळ चालणारा प्रकार म्हणजे ड्रोन हल्ले हा होता. आणि आता त्या प्रकाराचा सहभाग वाढत जाणार हे उघड आहे. आपल्यासारखे शहामृगी पद्धतीने वाळूत तोंड खुपसलेले लोक काहीही म्हणोत, आता हे नवे तंत्र वाढत जाणार आहे.

अगदी दुसर्‍या महायुद्धापासून युद्ध लढणे ह्यात सैनिकाच्या शौर्याचा भाग कमी कमी होत चाललेला आहे. बर्‍याच वेळा युद्ध जिंकणे हे वरच्या अधिकार्‍यांच्या कुवतीवर अवलंबून असते. लढणारे सैनिक हे सामान्य प्यादी असतात. आपण ह्याविषयीचा अभ्यास वाढवावा ही कळकळीची विनंती.

सैन्य हे नेसेसरी इव्हिल म्हणजे भारतासारख्या देशाकरता आवश्यक बोजा आहे. आवश्यक ते संरक्षण कमीत कमी खर्चात करता आले तर ते देशाच्याच हिताचे आहे. आज १००० कोटी खर्च होत असतील आणि उद्या तो खर्च ८०० कोटी इतका खाली आला तर देशाचाच फायदा आहे.

तमाम सैन्यातील लोक हे तळहातावर शीर घेऊन सीमेवर लढत असतात असे बिनडोक, उथळ, बालिश विचार आपण बाळगून असाल तर धन्य आहात. सीमेवर नेमलेले सैनिक हे एकंदरीत सैन्यबळाच्या तुलनेत कितीतरी कमी असतात. नाविक दल, हवाई दल हे लोक कायमस्वरूपी धोक्याच्या छायेत नसतात. गेल्या ६८ वर्षात देश किती वेळ युद्धात होता? ५ वर्षे? कमीच असतील.

अशी युद्धसदृश परिस्थिती फार कमी विभागात असल्यामुळे बढती वगैरे गोष्टीमागे राजकारण, वशिलेबाजी, हुजरेगिरी हे प्रमाण सैन्यात जास्त आहे. बाकी क्षेत्रात जिथे खरोखर काही करुन दाखवायचे असते तिथे ह्या गोष्टी तुलनेने कमी असतात.
स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, लॅरी पेज, धीरूभाई अंबानी ह्यांचे समाजाकरता योगदान आणि फील्ड मार्शल माणेकशॉ, पॅटन, करिअप्पा ह्यांचे योगदान ह्यात मलातरी पहिला गट जास्त उजवा वाटतो. आणि भारतात तसा कुणीतरी निघावा असे आवर्जून वाटते. माणेकशॉ नसला तरी काही अडणार नाही.

dadadarekar's picture

20 Jul 2015 - 7:50 am | dadadarekar

सहमत

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2015 - 12:10 am | डॉ सुहास म्हात्रे

सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही.

पाकिस्तान आर्मी किंवा आय एस आय पैकी कोणू मिपा वाचत असले तर त्या संघटना हे वाक्य सुवर्णाक्षरात लिहून त्यांच्या मुख्यालयावर लावतील.

बाकी चालू द्या. स्वखर्चाने पोपकोर्ण आणि पेय घेऊन मोक्याची खुर्ची पकडून बसलो आहे. =))

वैद्यकीय व्यावसायिक पण असेच पैसे घेऊन "सेवा" देत असतात. जरा त्यांच्यावरपण ४ शिंतोडे उडवून बघा काय होते ते.

चलत मुसाफिर's picture

20 Jul 2015 - 7:47 am | चलत मुसाफिर

हुप्प्या आणि संदीप डांगे यांचे प्रतिसाद आपापल्या जागी योग्यच आहेत. परंतु सत्य हे कुठेतरी दोहोंच्या मध्ये असावे.

1. सेना ही देशाची एक अपरिहार्य गरज आहे. उदात्तीकरण करा अथवा करू नका, पण खड्या सैन्याशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी अनुपलब्ध आहे. केवळ हवाई व क्षेपणास्त्र हल्ले चढवून युद्ध जिंकणे हे अमेरिकेव्यतिरिक्त कुणालाही शक्य नाही.

2. सेनेचे उदात्तीकरण हे सैनिक नव्हे तर सैनिकेतर नागरिकच जास्त करतात. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सैनिकाचे मनोबल राखणे, जे सैनिक नाहीत (वा होऊ इच्छित नाहीत) त्यांना देशभक्तीदर्शनाचा अवसर उपलब्ध करणे, देशभक्तीपर वातावरण तयार होऊन सरकारचे कार्य सुलभ होणे असे अनेक मुद्दे त्यात येतात.

3. सेना ही शांतिकालात आपली योग्यता दाखवू शकत नाही. मात्र युद्धाला सदैव तत्पर असणे हे अत्यंत अवघड कार्य आहे. शारीरिक व्यायाम हा एकच भाग सामान्य समाजाला दिसतो व समजतो. त्यापलीकडे होणारा सखोल व निरंतर युद्धाभ्यास हा दिसत नाही आणि दिसणे योग्यही नाही. युद्ध हे अतिशय नृशंस आणि रक्तपिपासू असते. तिथे भारतीय सैनिक प्राणाची पर्वा न करता (आणि राजकारण, सरकारी भ्रष्टाचार, जातिभेद, भाषाभेद याचा फालतू विचार न करत बसता) स्वतःला लक्ष्यप्राप्तीकरिता झोकून देत असतो हे अनेकदा दिसून आलेले आहे.

4. सेना ही समाजाचाच भाग असल्यामुळे समाजाचे सर्व गुणदोष सैनिकांत परावर्तित होणे क्रमप्राप्त आहे (उदा. आजही भूदलात जातिविशिष्ट तुकड्या आहेत). पण सेनेमध्ये केवळ हूकूम देऊन काम होत नाही. अधिकारी हा सैनिकाइतकाच, किंबहुना सैनिकाहून अधिक कुशल, तत्पर आणि कर्तव्यपरायण असावा लागतो. राजकीय नेत्यांची मर्जी राखून वर चढणे सैन्यात शक्य नसते. विशेषतः 1962च्या शोकांतिकेनंतर धडा घेऊन राजकीय वर्गाने सेनेला राजकीय हस्तक्षेपापासून बरेचसे मुक्त ठेवले आहे. शिवाय, शत्रूला लाच देऊन युद्ध जिंकता येत नाही हे सैनिकाला माहिती असते. फलस्वरूप, सेनेत भ्रष्टाचार फार कमी आहे.

माहितगार's picture

20 Jul 2015 - 9:56 am | माहितगार

बहुतांश सहमत, सैन्यदलांच्या कौतुकामागे उदात्तीकरणापेक्षा आभार आणि सैनिकाचे मनोबल राखणे या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. अनेक युद्ध सैन्याच्या मनोधैर्यावर जिंकली जातात. आणि सुयोग्य नेतृत्वाच्या अभावी मनोधैर्य खचल तर युद्ध हारली सुद्धा जातात.

कुणाच्याही चांगल्या कार्याचे कौतुक करून जीवलावून जी लॉयल्टी मिळवता येते, मनांचे खच्चीकरणकरून ती लॉयल्टी मिळवता येत नाही. मग तुमच्यासाठी कामकरणारा कुठल्याही क्षेत्रातला असू द्यात.

अर्धवटराव's picture

20 Jul 2015 - 9:38 am | अर्धवटराव

थर्डक्लास प्रतिसाद.

कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात.

सैन्य सीमेवर खडं आहे म्हणुन लोकांना आपले पोट भरण्यासाठी उद्योग करायची निवांतता लाभते.. आणि कर भरण्याची देखील.

एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक,...

परत तेच कल्पकता, औद्योगीक स्कील्स दाखवायला मूळात जीवंत आणि स्वतंत्र असणं आवश्यक असतं.

सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.

सैन्यदलाची उपयुक्तता आणि काठीण्य त्यामुळे यत्किंचीतही कमी होत नाहि.

तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.

दररोज आतंकवाद्यांशी हातघाईचा मुकाबला करायला लागणार्‍या सैन्याबद्द्ल त्याच देशातले लोक असे दळभद्री विचार बाळगतात. वाचुन अत्यंत हर्ष झाला.

एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.

इतर रेषा मोठ्या दाखवण्याच्या नादात आपण कुठली रेषा छोटी करतोय याचं काहि तारतम्य?? असो.

सुबोध खरे's picture

20 Jul 2015 - 10:01 am | सुबोध खरे

पाच-दहा हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतील
"प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक" सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच.
वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.
तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.
सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे आणि नंतर मस्त नाश्ता खाणे हे बहुसंख्य सामान्य माणसांना इच्छा असूनही करता येत नाही; त्यांच्या नशिबी रोजच्या कामाची चिंताच असते; त्यामुळे त्याला आत्यंतिक कष्ट वगैरे म्हणू नये.
अनेक देश असे आहेत ज्यांत सैन्यदल नाही. अशा देशांचे काहीही अडलेले नाही. सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही.
अगदी दुसर्‍या महायुद्धापासून युद्ध लढणे ह्यात सैनिकाच्या शौर्याचा भाग कमी कमी होत चाललेला आहे.
बढती वगैरे गोष्टीमागे राजकारण, वशिलेबाजी, हुजरेगिरी हे प्रमाण सैन्यात जास्त आहे.
वाचून करमणूक झाली.
अजून येऊ द्या

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 10:43 am | नगरीनिरंजन

डॉक्टरसाहेबांची करमणूक होणार हे माहितच होते. आर्मीवाले सिव्हिलियन्सना नावे ठेवतात किंवा (शस्त्रे घेण्यात उपयोगी पडेल असे) भरपूर परकीय चलन मिळवून देणार्‍या आयटी कर्मचारी व एनाराय लोकांना लोक नावे ठेवतात तेव्हा आमचीही अशीच करमणूक होते. :-)

सुबोध खरे's picture

20 Jul 2015 - 12:02 pm | सुबोध खरे

" भरपूर परकीय चलन मिळवून देणार्‍या आयटी कर्मचारी व एनाराय लोकांना "
बाकी आम्हीच हुशार हे पाहूनही करमणूक झाली. पहिल्या पाचातहि नाही.
http://www.business-standard.com/article/finance/india-s-forex-earnings-...
With over $17 bn earnings, tourism has emerged as India's fourth biggest foreign exchange earner after exports of petroleum at $60.8 bn, gems and jewellery ($43.3 bn) and transport equipments ($18.3 bn), the chamber said.
http://www.ibnlive.com/news/india/med-tourism-tipped-to-be-indias-top-fo...

नगरीनिरंजन's picture

21 Jul 2015 - 6:11 am | नगरीनिरंजन

एक्झॅक्टली. पहिल्या पाचात नाहीत म्हणजे हे काही कामाचे नाहीत ही वृत्ती दाखवलीत लगेच हे पाहून परत करमणूक झाली. :-)
असो. हे भरकटत चाललंय आणि नक्की देश म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असलेल्या दिसत असल्याने उगाच उत्तरे-प्रत्युत्तरे करण्यात राम नाही.

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 9:26 am | सुबोध खरे

माझे इतर प्रतिसाद पाहिलेत तर आपल्या लक्षात यायला हरकत नाही कि मी कुणालाही "कामाचे नाहीत" असे म्हणालो नाही. परंतु "आयटी वाले किंवा एन आर आय" "आम्हीच" परकीय चलन मिळवून देतो त्यामुळेच शस्त्रास्त्रे विकत घेता येतात हि टिमकी वाजवली. त्यावर वस्तुस्थिती(प्रत्यक्ष परकीय चलन कोण मिळवतो आणि कोण श्रेय उपटतो) म्हणून हि विदा दिली. डोळे उघडा आणि वस्तुस्थितीचा अंदाज घ्या. आणखी काय लिहिणे.
राहिली गोष्ट लष्कराच्या उदात्तीकरणाची -- त्या उदात्ती कारणाचा लष्कराला किंवा त्यातील माणसाना पाच पैशाचा फायदा होत नाही.त्याचा फायदा फक्त त्याचा बाजार करणाऱ्या राजकारण्यांना होतो.
कोरडा आदर काहीही उपयोगाचा नसतो हे निवृत्त झाल्यावर समजते. वैयक्तिक उदाहरणे भरपूर आहेत. एकच देतो. ज्या सोसायटीत मी लहानाचा मोठा झालो तेथे दवाखाना विकत घेण्यासाठी चाळीस महिन्याचा ग्रोस पगाराएवढी रक्कम मी भरली तेंव्हा सोसायटीने एक रुपया हि सवलत दिली नाही( त्याबद्दल तक्रारहि नाही). परंतु सोसायटीच्या लोकांना उपचारात सवलत किती हा प्रश्न मात्र प्रत्येकाने आवर्जून विचारला. तशीच स्थिती वरिष्ठ नागरिकांची आहे.
मी लष्करात असताना आमच्या भरलेल्या करावर तुमची चैन चालली आहे हे ऐकवणाऱ्या डॉक्टर मित्राला मी भरत असलेल्या आयकराचा आकडा सांगितला. हा आकडा तो तिप्पट उत्पन्न असताना सुद्धा भरत असलेल्या आयकरापेक्षा जास्त होता.या नंतर हा विषय परत त्याने काढला नाही. लष्करात मिळत असलेल्या प्रत्येक पैशाच्या ३० % आयकर भरत असताना सुद्धा लोकांचे असे विचार पाहून फक्त खंत वाटली. वातानुकुलीत कार्यालयात बसून विचार प्रसवत असणार्या विचारवंतांबद्दल काय लिहावे?

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 9:49 am | dadadarekar

३० % रक्कम हे त्या स्लॅबमफ्हील सिविलयन्सही भरतात.

आर्मीच्या क्यान्टीन , दुकानात दर्जेदार वस्तू आम्हा ब्लडी सिवियन्सना तुमच्या दरात मिळतात का ?

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 10:22 am | सुबोध खरे

हितेस राव
कॅन्टीन मध्ये वस्तू स्वस्त मिळतात याच्या पेक्षा मोठा गैरसमज दुसरा नसेल. माझी शेवटची मोठी वस्तू कॅन्टीनमधून घेतली ती १९९२ मध्ये गोदरेजचा फ्रीज ज्यावर मला ४०० रुपये कमी पडले. यानंतर घेतलेले तीन टीव्ही, दोनही मोटारी ( मारुती आणि इंडिका) मोटार सायकल आणि स्कूटर या मी बाहेरूनच घेतल्या आहेत. याचे कारण बाहेर या वस्तू कॅन्टीनपेक्षा स्वस्त मिळतात.मी २००६ ला निवृत्त झालो त्यानंतर मी कॅन्टीनचे कार्ड काढलेले ही नाही. कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळत असत त्या १९९१ पूर्वी.आपली अर्थ व्यवस्था मुक्त झाल्यापासून बाहेर स्पर्धेमुळे गोष्टी जास्त स्वस्त झाल्या आहेत.
एक उदाहरण मला इंडिका (पेट्रोल) विकत घ्यायची होती तिची किंमत २००८ साली ३ लाख ५५ हजार होती.कॅन्टीनमध्ये तिची किमत ३,३५,०००/- होती. त्यासाठी मला खडकीला जाऊन पूर्ण पैश्याचा डिमांड ड्राफ्ट द्यायचा होता. यानंतर त्याची ऑर्डर तट मोटार कडे जाणार मग ते ती ऑर्डर माझ्या जवळच्या( फोर्च्युन मोटर्स कडे पाठवणार) आणि मग मला ती मिळणार.फोर्च्युन मोटर्सच्या व्यव्स्थापकाने मला सरळ सांगितले डॉक्टर कशाला वेळ आणि मेहनत फुकट घालवताय मी तुम्हाला ती ३,३०,०००/- ला देतो. शेवटी माझ्या भावाने ( त्याने त्याच्या कडून एक सुमो आणि दोन सफारी घेतल्या आहेत) वाटाघाटी करून मला ३,१९,०००/- ला ती मिळाली.
फक्त स्वस्त मिळते ती म्हणजे दारू. पण एक सैनिक महिन्याला किती दारू पितो जास्तीत जास्त एक हजार रुपयाची( जी बाहेर २५०० रुपयाला मिळते) म्हणजे त्याचे पैसे किती वाचतात रुपये १५००/- एवढी दारू जर तो दर महिन्याला पिऊ लागला तर तो दारूच्या आहारी मात्र जाईल एवढे नक्की.
आर्मीच्या क्यान्टीन दुकानात दर्जेदार वस्तू हा अजून एक गैरसमज-- गुणवत्ता चाचणीत नापास( quality control) झालेल्या गोष्टी सर्रास कॅन्टीनमध्ये खपवल्या जातात. उदा. तेथे मिळणारे एरोप्लेन ब्रांडचे लोणचे यात देठे कोयी इ. गोष्टी सर्रास आढळतात. अशा गोष्टी मला माझ्या मित्रांकडून प्रत्यक्ष कळलेल्या आहेत. कारण याचे कंत्राट संरक्षण मंत्रालयातील बाबू लोक देतात.जर लष्कराच्या बर्फात घालण्याच्या बुटात आणि रेनकोट मध्ये भ्रष्टाचार होतो तर हे तर काय कुरणच आहे. (सी एस डी हे सिव्हिलियन "खाते" आहे) कोलगेट सारख्या कंपन्या सुद्धा नापास गोष्टी त्यात सरमिसळ करून देत असत हे मला त्या कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीनेच सांगितले.
तेंव्हा आपले गैर समज दूर करून घ्या. सैनिकांना मिळणाऱ्या बहुसंख्य सवलती कागदोपत्री असतात.पाचव्या वेतन आयोगात लष्कराने या सोयीच्या ऐवजी रोख पैसे द्या आम्ही आमच्या वस्तू बाजारातून विकत आणू हे सांगितले होते पण ते बाबू लोकांच्या "पचनशक्तीला" हानिकारक होते. अर्थातच ते मंजूर कसे व्हावे? पण लोकांना दिसतात कि सैनिकाचे आयुष्य किती आरामाचे असते.
असो. येथे लोकांच्या पुढे रडगाणे गाउन काय होणार आहे?
भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे. ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास

जयंत कुलकर्णी's picture

21 Jul 2015 - 10:37 am | जयंत कुलकर्णी

मला वाटते पूर्वी व्हॅट भारावा लागत नसे. आता व्हॅट भरावाच लागतो त्यामुळे किंमतीत फारसा फरक राहिलेला नाही. उरला प्रश्न दारुचा.... गोव्यात कॅन्टीनपेक्षा दारु स्वस्त आहे....... लोकांचे बरेच गैरसमज आहेत.... लष्करात आराम करुन देत नाहीत. हल्ली प्रत्येक रेजिमेंटला सियाचिन व बॉर्डरवर काम करावेच लागते.... असो ////भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे. ह्याचा त्यास उपयोग नाही /// हे मात्र खरे...

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 11:06 am | dadadarekar

कधीतरी कुठल्यातरी उत्पादनात खडे निघणे हे सर्वांच्याच बाबतीत होते.

गाडीही स्वस्तात मिळाली की.

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 11:28 am | सुबोध खरे

तुम्ही नीट वाचत नाही का? जरा चष्मा काढा.
थेट डीलर कडून मला गाडी कॅन्टीनपेक्षा १६ हजार रुपये स्वस्त मिळाली.

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 11:59 am | dadadarekar

क्यान्टिनातही गाडी स्वस्तातच होती ना ?

औरंग्याचाचा लढाइल न जाणार्‍या जनत्कडुन जिझिआ घ्यायचा व तो सैन्यावर खर्च व्हायचा.

ब्लडी सिविलियनना जास्त दरात वस्तू देऊन सैन्याला कमी दरात वस्तू देणे हाही जिझियाचाच आधुनिक प्रकार !

...

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 12:18 pm | सुबोध खरे

हितेस राव,
तुम्हाला नीट वाचताच येत नाही का? टाटाचा डीलर सुद्धा कॅन्टीन पेक्षा स्वस्त गाडी देत होता. ३,३०,००० ला (कुणालाही) जी कॅन्टीन पेक्षा ५ ००० रुपये स्वस्त आहे.
का हो
एवढे वैषम्य वाटते आहे तर
तुम्ही आर्मीत का भरती होत नाही? डॉक्टरला वयाच्या ४५ पर्यंत शोर्ट सर्व्हिस कमिशन मिळते.जाती धर्म आणि आरक्षण विरहीत समाज कसा आहे तेही पाहायला मिळेल आणि त्यानंतर आयुष्यभर कॅन्टीन आणि दारू ची सोय आहे? बोला येताय का?
शेपूट घालू नका.

डॉक्टर झोपलेल्याला जागे करता येत नाही. मुळातच हितेशरावाना कसली तरी जाम धुंदी आहे. कसला तरी प्रचंड राग आहे. एकतर स्वताजाला पैसे मिळत नाहीयेत किंवा आपले धड होत नाहीये मग प्रत्येक ठिकाणी राग राग करा. किंवा आपण खूप खूप कष्ट करून चांगले यशस्वी झाले आहेत आणि त्या कष्टाचा एकप्रकारचा राग बाकीच्यांवर काढतायत असे वाटते. असो हे जरा वैयक्तिक पातळीवर टिप्पणी झाली पण त्यांचे प्रतिसाद हे फक्त मुद्दामहून एकाच बाजू धरून काहीही झाले तरी तिरसट वा उद्दाम उत्तर देणारे असतात त्यावर वाटले

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 2:55 pm | dadadarekar

बाजारात दर ३.५५ होता ..... म्हणजॅ ब्लडी सिविलयनचा दर.
क्यान्टीनातला दर ... ३.३५ ... म्हणजॅ सैनिकाचा दर.

तुमच्या पाहुण्याने अनेक गाड्या त्याच डीलरकडुन घेतल्या asàlyaane डीलरने खास तुम्हासाठी अजुन कमी करुन ३.१९ ला दिली.
..
हे सगळे तुम्हीच लिहिले आहे ना ?

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 2:58 pm | dadadarekar

बाजारात दर ३.५५ होता ..... म्हणजॅ ब्लडी सिविलयनचा दर.
क्यान्टीनातला दर ... ३.३५ ... म्हणजॅ सैनिकाचा दर.

तुमच्या पाहुण्याने अनेक गाड्या त्याच डीलरकडुन घेतल्या asàlyaane डीलरने खास तुम्हासाठी अजुन कमी करुन ३.१९ ला दिली.
..
हे सगळे तुम्हीच लिहिले आहे ना ?

सुबोध खरे's picture

22 Jul 2015 - 12:43 pm | सुबोध खरे

हितेस मिया
आपण नीट वाचत नाही हे सिद्ध करून दिलेच आहे. एम आर पी ३,४५,०००/- आहे( एम आर पी ला काहीच अर्थ नसतो) आणी डीलर लुन्ग्यासुन्ग्यालाही कॅन्तीन्पेक्षा स्वस्तात गाड्या विकतो हि वस्तुस्थिती आपल्या डोक्यात शिरत नाही काय?.
नीट लिहितहि नाही हेही सत्य आहे.
वाटेल ते लिहिण्यात काय हशील आहे? मुसलमानांची दाढी धरणे सोडा निदान खरे तरी लिहा. अभ्यास वाढवा.


औरंग्याचाचा लढाइल न जाणार्‍या जनत्कडुन जिझिआ घ्यायचा व तो सैन्यावर खर्च व्हायचा.

ब्लडी सिविलियनना जास्त दरात वस्तू देऊन सैन्याला कमी दरात वस्तू देणे हाही जिझियाचाच आधुनिक प्रकार !


https://en.wikipedia.org/wiki/Jizya
In India, Islamic rulers imposed jizya on non-Muslims starting with the 11th century.[142] The discriminatory taxation practice included jizyah and kharaj taxes. These terms were sometimes used interchangeably to mean poll tax and collective tribute, or just called kharaj-o-jizyah.[143]
Jizya expanded with Delhi Sultanate and continued during most of the Mughal Empire rule. The tax rates varied, but typically was set at 50% of produce plus a fixed amount per person payable every month. The highest rates ranged from 33% to 80% of all annual farm produce on land inside the Islamic empire
Alā’ al-Dīn Khaljī, a Sultan of the Khilji dynasty who ruled over most of North, West and parts of Eastern India, from 1296 to 1316 AD, legalized the enslavement of the jizya and kharaj defaulters. His officials seized and sold these slaves in growing Sultanate cities where there was a great demand of slave labour.[144] The Muslim court historian Ziauddin Barani recorded that Kazi Mughisuddin of Bayanah advised Alā’ al-Dīn that Islam requires imposition of jizya on Hindus, to show contempt and to humiliate the Hindus, and imposing jizya is a religious duty of the Sultan.[145]
In late 14th century, mentions the memoir of Tughlaq dynasty's Sultan Firoz Shah Tughlaq, his predecessor taxed all Hindus but had exempted all Hindu Brahmins from jizya; Firoz Shah extended it over all Hindus.[146][147] He also announced that any Hindus who converted to Islam would become exempt from taxes and jizya as well as receive gifts from him.[146][148] On those who chose to remain Hindus, he raised jizya tax rate.[146]
Hindus who paid Jizya in Muslim-ruled parts of India were not free to practice their religion openly, and those who did were persecuted and killed. Sultan Firoz Shah Tughlaq, for example, wrote[147][not specific enough to verify]
The Hindus and idol-worshipers had agreed to pay the money for toleration (zar-i zimmiya) and had consented to the poll tax (jizya), in return for which they and their families enjoyed security. These people now erected new idol temples in the city and environs in opposition to the Law of the Prophet which declares that such temples are not to be tolerated. Under Divine guidance I destroyed these edifices, and I killed those leaders of infidelity who seduced others into error, and the lower orders I subjected to stripes and chastisement, until this abuse was entirely abolished. – Autobiography of Sultan Firoz Shah Tughlaq, Futuhat-i Firoz Shahi[147]
The Hindus hated and evaded jizya.[149][not specific enough to verify] During the early 14th century reign of Muhammad bin Tughlaq, expensive invasions across India and his order to attack China by sending a portion of his army over the Himalayas, emptied the precious metal in Sultanate's treasury.[150][151] He ordered minting of coins from base metals with face value of precious metals. This economic experiment failed because Hindus in his Sultanate minted counterfeit coins from base metal in their homes, which they then used for paying jizya.[150][152]
Jizya was temporarily abolished by the third Mughal emperor Akbar, in late 16th century. However, Aurangzeb, the sixth emperor, re-introduced and levied jizya on non-Muslims in 17th century.[153] Aurangzeb ordered that the collected jizya from non-Muslims be distributed as annual income to Muslim clerics and other Islamic causes.[154] Certain historians believe that the tax was intended to encourage conversion of non-Muslims to Islam.[155]
खरं तर तुम्ही पाकिस्तानात का जात नाही? पाकिस्तान( LAND OF PURE). तुमच्या सारखे शुद्ध लोक तिथे शोभून दिसतील.

dadadarekar's picture

22 Jul 2015 - 1:00 pm | dadadarekar

खुदा सर्वत्र आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:43 pm | टवाळ कार्टा

अल्बत...आप्ल्या म.न.पा. तीच गोष्ट रस्तोरस्ती जाणवून देत अस्ते ;)
यहा भी खुदा है....वहा भी खुदा है...ऐसी जगह बताव जहा नही है खुदा....खोद देंगे =))

मृत्युन्जय's picture

22 Jul 2015 - 1:59 pm | मृत्युन्जय

खिक्क

बॅटमॅन's picture

20 Jul 2015 - 11:25 pm | बॅटमॅन

शेवटी प्रत्यक्षानुभवी लोक्सकडून ऐकलेलेच खरे. बाकीच्या नुस्त्या छप्पन्न इंची गफ्फा. धन्यवाद डॉक.

प्रदीप's picture

21 Jul 2015 - 4:37 am | प्रदीप

गंगाधर मुटेंच्या नेहमीच्या आर्ग्युमेंट्ची आठवण झाली!

-- तेरा इंची छाती आणि मुठीपेक्षाकी लहान असलेला मेंदूकुमार, प्रदीप

बॅटमॅन's picture

21 Jul 2015 - 12:47 pm | बॅटमॅन

त्याचं असं आहे की प्रत्यक्षानुभवी लोकांनी इथे बॅलन्स्ड मुद्दे मांडल्यामुळे त्यांना दुजोरा दिला, बाकी काही नाही. एवढ्यावरून मुटे आठवले असतील तर एक नमस्कार घ्यावा.

नाखु's picture

20 Jul 2015 - 10:23 am | नाखु

फक्त बेबी सिनेमातील अक्षयकुमार डॅनी बरोबर मंत्र्याच्या पी ए ला भेटण्याचा आणि समजावण्याचा प्रसंगासाठी तरी एकदा हा सिनेमा पहा आणि इथे प्रतीसाद टंका.

मुकाट नाखु

काळा पहाड's picture

20 Jul 2015 - 10:36 am | काळा पहाड

तो प्रसंग भारीच आहे. पण त्याला टिपिकल पॉप्युलरिस्ट भारतीय टच आहे.
हाच प्रसंग दुसर्‍या देशात (उदाहरणार्थः witty ब्रिटन मध्ये घडला असता, तर कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं गेलं असतं, काही कल्पना?)

नाखु's picture

20 Jul 2015 - 10:57 am | नाखु

मला चित्रपटाचं उद्दातीकरण वगैरे कारायचं नाही पण जमेस धरण्याच्या वृत्ती वर यापेक्षा "परखड आणि सडेतोड" उत्तर दुसरे काही असेल असे वाटत नाही (परिणाम कारक सुद्धा!!)

शेवटी सैन्यात आहेत तीही माणसेच आहेत कुटुंब असलेली त्यांची संभावना करण्याचा आपल्याला किती अधिकार आहे हे एकदा तपासून पाहिले म्हणजे झाले!

नगरीनिरंजन's picture

20 Jul 2015 - 11:06 am | नगरीनिरंजन

एकदा एखाद्याला देव बनवलं आणि त्याच्याबद्दल बोलायचा इतरांना काही अधिकार नाही असं म्हटलं की सगळं कसं सोप्पं होतं.
बाकीचे सगळे स्वार्थी जीवजंतू आणि सैन्यात सगळी देवमाणसं. चालु द्या.

नाखु's picture

20 Jul 2015 - 11:21 am | नाखु

भले-बुरे त्यांच्या मध्येही असतील्च.

तरीही परीणाम माहीत असूनही स्वैच्छेने केली जाणारी एकमेव नोकरी म्हणजे सैन्यदल.

अगदी अंतर्गत दंगलींसाठीही आणि "ताज" सारख्या हल्ल्यांसाठीही सैन्याचीच आठवण होते.

आणि हो हे त्यांच्या साठी जागेवर बसून कळफलक बडविण्यासाठी थेट १.४५ ते १.५० ही पाचच मिनिटे बास आहेत.

पुचाट नाखुस

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jul 2015 - 12:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

"लोग कहते है जंग बुरी चीज है, अब आप ही बताइये सर ये बात एक सिपाही से बेहतर कौन समझेगा साहब जी"

-सुबेदार मेजर प्रीतमसिंह (लक्ष्य)

धर्मराजमुटके's picture

20 Jul 2015 - 12:54 pm | धर्मराजमुटके

चर्चा भरकटली आहे.
"न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?" हा लेखातील मुख्य प्रश्न आहे. त्यावर उत्तरे न देता इथे सैन्यप्रेमी आणि सैनिकांना (जास्त) भाव न देऊ इच्छिणारे असे दोन तट पडले आहेत. मुख्य प्रश्नाचे उत्तर बाजूलाच राहिले.
माझे उत्तर असे आहे की आपत्काळात अशी सैन्यभरती करुन जास्त काही साध्य होत नाही. सैनिकांना युद्धजन्य परिस्थीतीशी लढण्यासाठी, तशी त्यांची मानसिकता घडण्यासाठी बराच काळ मेहनत घ्यावी लागते, सराव करावा लागतो. ऐनवेळेस भरती केलेले रिक्रुटस युद्धात जास्त नुकसान करु शकतात.
देशात प्रत्येक धडधाकट तरुण / तरुणीसाठी सैनिकी शि़क्षण कमीतकमी दोन वर्षांसाठी सक्तीचे असावे. (नोकरी सक्तीची असावी असे म्हणत नाही.) त्यामुळे तरुण आज आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होतील. अगोदर या लेखावर दिलेला हा प्रतिसाद उपरोधीक होता.

सुबोध खरे's picture

20 Jul 2015 - 12:58 pm | सुबोध खरे

मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक गोष्टी मला करता येत नाहीत आणि समजतही नाहीत. परंतु आयुष्याची महत्त्वाची २३ वर्षे लश्करात काढल्यानंतर काही गोष्टी समजल्या त्या अशा.
१) भारतात लोकसंख्या वाढीचा दर अफाट असल्याने कोणत्याही नोकरी साठी भरपूर लोक उपलब्ध असतात. याचा अर्थ सगळे भिकारीच असतात असे नव्हे. उत्तम शिक्षण आणी पैसा असलेले असंख्य लोक माझ्या २३ वर्षाच्या काळात मी स्वतः पाहिलेले आहेत. एक पराकोटीचे उदार्हर्ण म्हणून आमचे हाड वैद्य शास्त्राचे(ORTHOPEDICS) प्राध्यापक कर्नल चार हे म्हैसूर च्या महाराजांचे नातलग होते. स्वतःची प्रचंड मालमत्ता असूनही स्वखर्चाने इंग्लंड मध्ये एफ आर सी एस करून लष्करात भरती झालेले होते. एक रुपया नाममात्र वेतन घेऊन ते काम करत असत.( कुणालाही राष्ट्रासाठी फुकट काम करायची पद्धत नाही).
२) लष्करातील लोक सुद्धा तुम्ही आम्ही असतो तितकेच देशभक्त असतात. अठराव्या वर्षी तरुण उत्साहाने सळसळत असतात त्यांना सन्मार्गाला लावायचे कि कुमार्गाला हे त्यांच्यावर होणारे संस्कार ठरवतात. मग त्यांचा उत्तम सैनिक बनवायचा कि उग्र दहशतवादी ते संस्कार ठरवतात.
३) हे देशभक्तीचे संस्कार लष्कराच्या मुशीत मुद्दाम घडवले जातात. त्यामुळे ते लखलखीत होतात. सोन्याला झळाळी यावी तशी. याचा अर्थ असा नव्हे कि झळाळत नाही( पक्षी: सिव्हीलीयन्स) ते सोने नव्हे. परंतु हे प्रशिक्षण लोकांना मोठ्या प्रमाणावर आत्मबलिदान करण्यास प्रवृत्त करते.( हीच परिस्थिती दहशतवाद्यांची आहे.
४) अमेरिकेची उदाहरणे देऊन उपयोगी नाहीत याचे कारण त्यांच्या स्वतःच्या भूमीवर कधीही युद्ध झालेले नाही. एकदाच काय ते विमान त्यांच्या अभेद्य किल्ल्याला भेदून आत गेले त्याची अवस्था संशयग्रस्त( PARANOID) झाली आहे. ( बी बी सी चे विश्लेषण) बाकी सर्व युद्धे त्यांनी दुसर्यांच्या भूमीवर केली आहेत.एवढा प्रचंड शस्त्रास्त्रे आणी अण्वस्त्रे यांचा डोलारा रशिया आपल्यावर हल्ला करेल या संशयग्रस्त( PARANOID) वृत्तीतूनच उभा केलेला आहे.
५)सैन्य नसते तर भारत पंजाब पासून दक्षिणेत आंध्र पर्यंत आणी पूर्वेस पश्चिम बंगाल पर्यतच राहील यात कोणतीही शंका नाही. तामिळनाडू, काश्मीर आणी पूर्वोत्तर राज्ये फुटीरता वाद्यांच्या कारवायांना बळी पडून कधीच सोडून गेली असती. (या जर तर ला मुळातच काहीच अर्थ नाही)
६ ) जो माणूस सचोटीने आपले काम करतो तो तितकाच देशभक्त असतो. मग तो झाडूवाला असो कि उच्च दर्ज्याचा शास्त्रज्ञ.
७) भ्रष्टाचार हा सर्व क्षेत्रात आहे तसा लष्करातही आहेच. परंतु अ - लष्करात प्रमाण बरेच कमी आहे ब--तुम्ही भ्रष्ट नसलात तर लष्करात तुम्हाला त्रास होत नाही. इतर क्षेत्रात (उदा पोलीस आयकर) येथे तुम्ही भ्रष्टाचारी नसाल तर तुम्हाला दे माय धरणी ठाय करून सोडले जाते.
८) लष्करातील नोकरी खडतर आहे यात वादच नाही. माझ्या मुलीने तिसरीत जाई पर्यंत ६ शाळा बदलल्या होत्या. एका ठिकाणी स्थिर राहू शकण्याचे फायदे काय आहेत ते इतराना सांगून समजणे कठीण आहेत. इतर बदलीच्या नोकर्यात तुमही राजीनामा देऊन बाहेर पडू शकता.लष्करात तसे नाही.
९) तुमच्या कडे नोकरी मिळवण्य़ाजोगे कौशल्य(EMPLOYABLE SKILL) असेल तर तुम्ही बाहेर पडू शकता. तोफखाना दलाचा अधिकारयाच्या तोफा चालवण्याच्या कौशल्याची बाहेरच्या जगात कवडीची किंमत नाही. हे कौशल्य मिळवण्यासाठी त्याने खर्ची घातलेला तारुण्यातील काळ हा नंतर कवडीमोलाचा ठरतो. बाहेर पडल्यावर पंचेचाळीशी पन्नाशीला आपल्याला कुत्रं विचारात नाही हि जाणीव भयानक आहे.या वयात नवीन शिकण्याची उमेद राहत नाही आणी तरुण लोकांबरोबर स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे नैराश्यात गेलेले असंख्य लष्करी अधिकारी मी पाहिलेले आहेत.
लिहिण्यासारखे भरपूर आहे पण ज्यांना समजावून घ्यायचे नसेल त्यांना सांगून उपयोग नाही आणी ज्यांना समजते त्यांना समजावण्याची गरज नाही.
बाकी चालू द्या.

खटपट्या's picture

20 Jul 2015 - 1:38 pm | खटपट्या

१००% सहमत..

सैन्यदलाशीवाय बाकीच्या क्षेत्रात काम करणारे जे नोकरदार आहेत त्यांनी जरी आपले काम इमानेइतबारे केले तरीही ती एक देशसेवाच ठरेल. सरकारी भ्रष्ट कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचार न करता आपल्याला नेमून दीलेले काम वेळेत पूर्ण केले तरी ती एक देशसेवाच ठरेल. बाकी उद्योजक आहेत ते एक प्रकारे बेरोजगारी कमी करुन देशसेवाच करत असतात.

सद्या देशसेवा करण्यासाठी बंदूकच हातात घेतली पाहीजे असे काही नाही. आपला आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेउन रोगराईला प्रतिबंध केला तरी मोठी देशसेवा ठरेल.

बाबा पाटील's picture

22 Jul 2015 - 1:13 pm | बाबा पाटील

अती शहाण्यांना काहीही समजावुन उपयोग नाही.

सैन्याच्या उपयुक्ततेत्बाबत प्रश्न या चर्चेत उपस्थित करण्यात आले आहेत. कदाचित बर्‍याच मोठ्या काळात कुठलेच मोठे युद्ध झाले नसल्याने असे प्रश्न उपस्थित केले गेले असावेत.

सदर प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी अधून मधून घडत राहणार्‍या मोठमोठ्या नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळेस सैन्याचे योगदान लक्षात घेतले तर असा प्रश्न उपस्थित करावासा वाटणार नाही.

२००४ सालच्या त्सुनामीनंतर आपल्या देशातल्या मदत कार्याखेरीज इतर अनेक देशांना भारतीय हवाईदल व नौदलाने मदत पोचवली होती. अमेरिकेच्या मदत प्रस्तावाला भारताने नकार देऊन ती मदत इतर देशांकडे वळविण्यास सुचवले होते.

लिओ's picture

20 Jul 2015 - 11:55 pm | लिओ


3. सेना ही शांतिकालात आपली योग्यता दाखवू शकत नाही

आत्ता अलिकडे national disaster response force तयार करण्यात आले आहे. national disaster response force ने काम सुध्दा छान केले आहे. म्हणुन मागील पूर , भूकंप या काळात भारतीय सेनेच्या योगदानाचा विसर पडता कामा नये. राष्ट्रीय आपत्तीत भारतीय सेनेचे काम ( युध्द सोडुन ) यावर चर्चा करा

२.

"न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?"

युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक सेनेला भरपुर, तत्पर विनामोबदला सहाय्य केले आहे. खासकरुन ७१ , ६५ युध्दात राजस्थान पंजाब गुजरात या युद्ध छायेतील राज्यानी. सामान्य नागरिक सेनेला इतके पण अलिप्त मानत नाहित त्यामुळे काळजी नसावी..

हेमन्त वाघे's picture

21 Jul 2015 - 6:13 am | हेमन्त वाघे

मंदार कात्रे, आणीन इतर ,

देहरादून ला ऎक गरीब भिकारड्या लोकांची डून स्कूल म्हणून शाळा आहे हे माहित असेल.
राजीव गांधी तिकडे होते - बहुदा नादारीवर शिकले असावेत.

लोक होते बरे तिकडे -

https://en.wikipedia.org/wiki/List_of_The_Doon_School_अलुम्नी

सशस्त्र दलात या शाळेचे १३ जन उच्च पदावर गेले होते

गरीब शाळेतील गरीब मुले ?????

नगरीनिरंजन's picture

21 Jul 2015 - 7:04 am | नगरीनिरंजन

मुळात माझ्या मूळ प्रतिसादातून सैनिकांच्याबद्दल काहीतरी अपमानकारक लिहीलंय असा अर्थ काढून त्यावर भरकटणारे प्रतिसाद देणार्‍या स्वयंघोषित देशभक्तांचे आभार.
स्वतःचा जीव देणार्‍या सैनिकाला व्यवस्थेत काहीही बदल न करता निव्वळ तोंडी उदो-उदो केल्याने आपण सन्मानित करतो असे वाटत असलेल्यांनी पुन्हा नीट विचार करण्याची गरज आहे.
सैन्यदलात जाणारे कोवळे तरुण ज्यासाठी जीव देतात ते नक्की तेवढं चांगलं आहे का याचा विचार हे स्वयंघोषित देशभक्त करताना दिसत नाहीत. उलट ठराविक स्टिरिओटाईप करुन "म्हणजे जय जवान, जय किसान" म्हणायचं आणि इतरांना तुच्छ लेखायचं एवढंच हे करु शकतात.
प्रत्यक्षात समाजात देशाच्या संपत्तीचा फायदा उचलणारे भलतेच आणि तिच्यासाठी त्याग करणारे भलतेच असं चित्र आहे. हा लाभ उचलणार्‍यांना देशभक्तीचा नुसता ज्वर आणि त्यापायी काहीही करायला तयार होणारे कार्यकर्ते हवेच असतात.
आपल्या देशात वंचितांचीच पिळवणूक चालली असताना तिकडे डोळेझाक करुन काल्पनिक शत्रूचा बीमोड करण्याची गर्व गीते गाण्यात किंवा अमुकपासून तमुकपर्यंत प्रदेश आपलाच आहे अशा गफ्फा हाणणार्‍यांना मी तरी देशभक्त म्हणणार नाही.
सैनिक हा एक सामान्य माणूस असतो आणि प्रत्येक सामान्य माणूस सैनिक असतो. त्याला देव बनवून नंतर बळीचा बकरा बनवू नये. तिकडे या पोकळ देशभक्तीच्या जयघोषामुळे आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे बॉर्डरवर अनेक सामान्य माणसे तळहातावर जीव घेऊन उभी आहेत आणि इकडे स्वतःची तुटपुंजी संपत्ती वाचवण्यासाठी बरीच सामान्य माणसे रोज संघर्ष करत आहेत. बाहेरच्या शत्रूबरोबर कधीकधी चकमक होत असली तरी देशांतर्गत युद्ध चालूच आहे.
देशात समाजवाद होता तेव्हाही यांचं शोषण झालं आणि आता भांडवलवाद आल्यावरही ते चालूच आहे. देशभक्तीच्या बाळबोध कल्पना थोड्या बदलण्याची वेळ आली आहे.

देशभक्ती, स्वार्थत्याग असे मोठेमोठे शब्द बाजूला ठेवूयात, पण केवळ नोकरीचा भाग म्हणून तरी सैनिकांनी त्यांच्याबद्दल जराही जाणीव नसलेल्या लोकांसाठी आपल्या जीवाची बाजी का लावावी आणि लावावी का, हे दोन प्रश्न मला सद्ध्या हा धागा वाचून पुन्हा एकदा पडले आहेत!

बाकी चालूद्यात.

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 9:53 am | dadadarekar

.

यशोधरा's picture

21 Jul 2015 - 9:58 am | यशोधरा

तुमचे प्रतिसाद सेरियसली घ्यायचे नाहीत असं पैतैनं सांगितलंय तेव्हा, दुर्लक्ष. एंजॉय.

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 9:55 am | सुबोध खरे

यशोधरा ताई,
सैनिकाना एका विशिष्ट मनोवृत्ती ने तयार केले जाते कि वेळ आला तर देशासाठी प्राणही देणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याचे उदात्तीकरण करणे थोड्या प्रमाणात आवश्यक आहे नाहीतर लष्करातील माणूस म्हणेल कि मीच कशाला मरायचे? त्याला हे सांगून उपयोग होत नाही कि तुला पगार मिळतो म्हणून तू काम करणे आवश्यक आहे. कारण तो कोणत्याही सरकारी कामासाठी जातो तेंव्हा तेथील लोक काय काम करतात आणि किती वरकड पैसे मिळवतात ते त्याला स्पष्ट दिसते.त्याचे कोणतेही काम सरकारी माणसे (लष्करात आहे म्हणून) पैसे न घेता करत नाहीत हि वस्तुस्थिती आहे.
तेंव्हा ते लोक काम न करत पैसे मिळवतात तर मीच का काम करायचे हा प्रश्न त्याच्या मनाला सतत बोचत राहतो. त्यामुळे हि घोषणाबाजी काही प्रमाणात आवश्यक आहे. लष्करात "ओव्हर टाईम" मिळत नाही. दिल्लीत बसणाऱ्या चपराश्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा सैनिकाला १०% जास्त पगार मिळतो. त्यामुळेच लष्करी अधिकार्यांना तुम्ही साधे( ब्लडी) "सिव्हिलियन्स " नाही हे सतत सांगत राहावे लागते. यातून येणारे नैराश्य बाजूला ठेवण्यासाठी हा शब्दांचा महाल उभा करावा लागतो. सैनिकांना जास्त विचार करू नये म्हणून दारूही दिली जाते. कारण आपण काय आणि का करतो आहोत? हा प्रश्न माझ्यासारख्या मनोविकार शास्त्रात काम केलेल्या सुशिक्षित डॉक्टरला जर पडू शकतो तर सामान्य १०-१२वी पास सैनिकाला पडेल यात वादच नाही.

डॉक, माझे अजिबात विचारवंती मत नाहीये. हिमालयातून फिरताना भारतीय सैन्याचा आधार म्हणजे काय हे मी व माझ्यासारख्या अनेक ट्रेकर्सनी खूपदा अनुभवलेले असते. कोणी काहीही म्हणो, मला सैन्याबद्दल, सैनिकांबद्दल आदरच आहे.
माझे चुलत आजोबाही एअरफोर्समध्ये होते. तेव्हा अगदी जवळून नसले तरी बर्‍यापैकी जवळून सैनिकी पेशा पाहिला आहे. ते प्रत्येकाचे काम नव्हेच.

असो.

सुबोध खरे's picture

21 Jul 2015 - 10:27 am | सुबोध खरे

अहो ताई
तो तुम्हाला नव्हता प्रतिसाद. तुम्ही कळकळीने लिहिलेले आहे ते समजून येते.
हा प्रतिसाद "इतर" लोकांसाठी होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 10:54 am | कैलासवासी सोन्याबापु

माझ्यामते निरंजन ह्यांना हे सुचवायचे होते की नोबेल प्रोफेशन म्हणुन आपण सैनिकाचा देव करतो पण जाणारा जीवानिशी जातो असेच काहीसे,

निरंजन, तुम्ही मला अकादमी वर सुद्धा विचारले होते फौजी सिविलियन्स चा ब्लडी सिविलियन्स असा उल्लेख का करतात? उगाच तुमच्या भावना दुखवतील अश्या भीतीने मी गुळमुळीत उत्तर दिलेहोते ते आज स्पष्ट बोलतो, बटालियन च्या आत आम्ही कायदे तसुभर ही न वाकवता काम करतो, १३ पंजाब ला मी attach असताना मी हेलमेट नाही म्हणुन स्वतः सी ओ असलेल्या कर्नल ला पायी घरी जाताना पाहिले आहे देवा, सिविलियन्स मधे तुम्ही किंवा आपले समस्त मिपाकर भाऊ बहिणी नियम पाळत ही असतील पण बाकी जनतेचे काय?? आम्हाला ते असहय होते, नळस्टॉप ला गर्लफ्रेंड मागे बसली आहे म्हणून उगाच acclerator पिळणारे वीर दिसतात, एक जेरी कैन भरून रॉकेल १७००० फुटावर नेताना फाटलेला विशिष्ठ अवयव आठवतो, तेव्हा अगदी सहज तोंडातून निघत "bloody indiscipliNed civilians" अगदी अगदी सहज

मराठी_माणूस's picture

21 Jul 2015 - 11:11 am | मराठी_माणूस

ही कोणती शिस्त, ज्यातून महीला पोलिस ही सुटली नाही.
http://www.dnaindia.com/india/report-nashik-18-army-officers-arrested-fo...

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 11:44 am | कैलासवासी सोन्याबापु

गैरसमज झालेला दिसतो आहे देवा, मी आर्मी वाले कुठेच विंडीकेट केले नाही , मुद्दा सिंपल आहे जितके बेशिस्त वर्तन सिविल लाइफ ला आढळते तितके फोर्सेज मधे नसते, ह्याचा अर्थ फोर्सेज ला मी क्लीनचिट देतोय असा तुम्ही घेत असाल तर माझा निरुपाय आहे, तुम्ही नाशकात केलेला राडा आमच्यावर भिरकावलात, मी नांदेड जिल्ह्यातली केस भिरकावतो, महार रेजिमेंट ला कार्यरत असलेला अन एक अत्यंत शुर डेकोरटेड सूबेदार मेजर, त्याच्या आई ला त्या वृद्धे ला जमिनीच्या वादात नागडी करून चटके दिले अन डोक्यात धोंडा घालून ठार केले गावातल्या मोठ्या प्रस्थाने, आता तुमच्या सारखा विचार मी करायचा म्हणले तर मी काय करावे? तुम्हाला ती लिंक सप्रेम भेट देऊन समस्त सिविलियन्स ना दूषण द्यावे?? ह्या सगळ्यांने तुम्हाला किंवा मला काय उपयोग होणार आहे, मी माझा मुद्दा परत एकदा अधोरेखीत करतो सिविलियन्स मधे जितके बेशिस्त वर्तन सापड़ते तितके फोर्सेज मधे नसते, ह्याचा अर्थ फोर्सेज देव अन सिविल्स मुर्ख असा कृपया घेऊ नका, घ्यायचाच असल्यास आमचा निरुपाय आहे,

बाकी एकदा डॉक चे प्रतिसाद नीट वाचा इतकी विनंती मात्र मी करू धजतो

जय हिंद _/\_

मराठी_माणूस's picture

21 Jul 2015 - 12:00 pm | मराठी_माणूस

तुमचा मुद्दा समजला. माझा मुद्द एव्हढाच होता की, शिस्तीचे प्रमाण कमी जास्त आहे म्हणून एखाद्याने दुसर्‍याला
bloody वगैरे म्हणणे योग्य आहे असे होत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 12:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

तसे पाहता कोणीच कोणाला काही बोलु नये पण मग तो यूटोपिया होईल!! हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो? उलटे जर आपणांस वाईट वाटत असले तर आपण १०% उर्वरीत ९०% शहाणे का करू नये?? जर माझ्यापूर्ते बोलायचे झाले तर आर्मी मधे गुन्हे केल्यास त्याच्या कड़क शिक्षा आहेत व् त्या १० १० वर्षे केसेस पेंडिंग न ठेवता २ महिन्यात निकाली निघतात, सुकना लँड ग्रॅब केस मधे ही हेच दिसले होते, म्हणुन बोलतात ते! डॉक्टर म्हणाल्या प्रमाणे त्या मानाचा अन शिव्यांचाही पैश्यात ५ पैसे लाभ होत नसतो तर फ़क्त एक मानसिक गरज म्हणुन त्यांना थोड़े मान दिल्यास लोकांच्या पोटात का शुळ उठतो हेच मला कळेना!

मराठी_माणूस's picture

21 Jul 2015 - 1:52 pm | मराठी_माणूस

हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?

हे स्टॅटीस्टीक्स कुठुन आणले ? बाकी दुसर्‍यांचा मान ठेवण्याची शीस्त पाळली तरच स्वतःला मान ठेवण्याची अपेक्षा ठेउ शकता

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 2:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्टैट्स ढोबळ आहेत, अन दुसऱ्याला मान द्यायची शीस्त आमच्यात नसती तर एखाद्या कर्नल ला एका साध्या ओ आर ने केलेल्या सैल्यूट ला तितकेच कड़क प्रत्युत्तर आले नसते, सिविलियन्स ना आम्ही मान देतो का नाही हे आपण ज़रा एकदा नीट कन्फर्म करा.

मराठी_माणूस's picture

21 Jul 2015 - 2:06 pm | मराठी_माणूस

हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?

ह्या वाक्यातुन काय सजेस्ट होते ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 2:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे बोलणे सुद्धा सुधारावे म्हणुन असते, ते किती होते?? सिग्नल ला उगाच हॉन्किंग करू नये , लाइन मोडू नये, ह्या गोष्टी आधी पाळा मग मान मागा, आम्ही पाळतो अन मान मागत नाही, काही लोक प्रेमापोटी देतात, मान काय असतो? वैयक्तिक आयुष्यात डॉक्टर सुबोध खरेंना एकदा ही न भेटता एक वेटरन म्हणुन त्यांच्या मिपावरच्या पोस्ट ला ही ४ वेळा वाचुन समजून मग रिप्लाई दिला जातो अमच्याकडून, शिवाय आपले स्वतंत्र विचार ऐकून आपण किमान सिग्नल अन रांगा तरी पाळत असावेत असे जाणवते, तस्मात् तुम्ही न मागता ही तुम्हाला मान आहेच but brother plz don't root in for unruly folks! That makes them more unruly!! , मागे मी अकादमी लिहिता झालो तेव्हा एका अश्याच सिविलियन भावाची "do i as a citizen of this country deserve such great forces" टाइप ची कमेंट आली होती, त्यावर मी काय उत्तर दिले आहे ते एकदा जाऊन वाचाच बंधु, माझा मुद्दा सरळ आहे स्वतःचे अवमूल्यन करू नये, १० पैकी ८ लोक फौजी बांधवांस मान द्यावा वाटत असेलही तर तो अव्यवहार्य आहे हे त्यांना पटवा आम्हाला नको कारण आम्ही तो मागितला नाहीये तर तो प्रेमापोटी आम्हाला दिलाय, अन हे संगीत मानापमान बोलायला सोपे असते, तो प्रेमापोटी दिलेला मान वास्तव आयुष्यात जगायला काय घासावी लागते हा वेगळाच मुद्दा झाला, तो नुसता मान नसतो, जबाबदारी असते प्रचंड मोठी, कलेक्टिव रिस्पांसिबिलिटी, अन जे जे सिविलियन्स ते जगतात त्याना ही तसलाच मान दिला जातो आर्मी कडून.

मझ्याबाजूने मी इतकेच म्हणेन की प्लीज तुम्ही जे लोक मान देतात त्यांना विचारा का ते! आम्हाला दिला तरी हरकत नाही नाही दिला तरीही नाही

जय हिन्द _/\_

सोन्याबापू, एक नंबर प्रतिसाद.

नाखु's picture

22 Jul 2015 - 2:46 pm | नाखु

सहमतीला आमची अनुमती+सहमती

आनंदी नाखुस

उडन खटोला's picture

21 Jul 2015 - 12:20 pm | उडन खटोला

सन्माननीय सोन्याबापू व डॉक्टर खरे साहेब , अत्यन्त आभार्स...

आपण लष्कराचे खरे महत्त्व आणि देशासाठीचा लष्कराचा त्याग यावर अतिशय मुद्देसूद विवेचन केलेले आहे

धन्यवाद!

द-बाहुबली's picture

21 Jul 2015 - 4:37 pm | द-बाहुबली

अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ?

बरेच तयार होतील पण त्याची कारणे तुम्हाला अपेक्षित आहेत अशीच असतील हा समज नको.

यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

हे ज्याच्या-त्याच्या शारीरीक व मानसिक क्षमतेवर अवलंबुन नाही काय ? मी स्वतः NCC मधे होतो. दुर्दैवान NDA एंट्रंस मात्र संपुर्ण क्लिअर करु शकलो नाही. हे प्रयत्न चालु असताना माझा विचार मला हे जमु शकते तर मी देशाच्या कामी का येउ नये हा होता. देशासाठी म्हणून मला त्यात जायचे आहे हा न्हवता (कारण देशासाठी आपापल्या कुवतीनुसार करण्याच्या गोष्टी अनेक आहेत)

थोडक्यात अशी प्रत्येक व्यक्ती जी स्वतःला अशा परिस्थीतीला तोंड द्यायला सक्षम समजते (लिंग, जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे भेदभाव सोडून) ति इथे देशासाठी उभी रहायला नक्किच तयार होइल. जी व्यक्ती सक्षम समजत नाही त्यातील अनेको वेळ आल्यावर देशासाठी बलिदानाला उभे राहतील व काही मोजके मात्र हे कधीच करु शकणार नाहीत आणी आनंदाची बाब म्हणजे देशाचे संपुर्ण भवीतव्य अशा मोजक्या लोकांवर अवलंबुन असतेच असे अजिबात नाही तेंव्हा कृपया आपण निश्चींत असा...वे.

संदीप डांगे's picture

21 Jul 2015 - 10:22 pm | संदीप डांगे

@ननि,

तुम्ही जो मुद्दा इथे मांडलाय त्याचा आणि धाग्याचा काहीएक संबंध नाहिये. धागाकर्ता विचारतोय की युद्ध झाल्यास तरूण उभे राहतील का? तुम्ही युद्धच कसं वाईट आहे ह्याचं प्रतिपादन करता आहात. तुमच्या मुद्द्यांमधे "युद्ध झाल्यास" हा मूळ मुद्दा सोडून बाकीचेच विवेचन आहे. जे चूक आहे असे अजिबात नाही पण इथे अप्रस्तुत आहे. मूठभरांची संपत्ती, युद्धखोर वृत्ती, शांतता, विश्वबंधुता, इत्यादी एका वेगळ्या चर्चेचे मुद्दे आहेत.

तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही ते अमेरिकेला उद्देशुन लिहिताय असे वाटत आहे. अमेरिका युद्धखोर आहे, तिची संपत्ती पर्यायाने मूठभरांची संपत्ती वाचवण्या-वाढवण्यासाठी ते लष्कराचा वापर करतात. उगाच युद्धे उकरून काढतात, नको तिथे नको त्या प्रसंगी आपल्या तरूण निष्पाप सैनिकांना मरायला पाठवतात.

भारतात असे चित्र नाहीये त्यामुळे तुमचे प्रतिसाद इथे लागू होतच नाहीत.

राहिला प्रश्न आपल्या युद्धतयारीचा. तर पाकिस्तान व तत्सम राष्ट्रे आपल्यावर चाल करुन आली तर तेव्हा आपण स्वतः त्यांना तुमचे हे प्रतिसाद वाचून दाखवणार का?

जेव्हा मानेवर कुणी तलवार ठेवतं तेव्हा त्याला अहिंसेचं बोधामृत पाजून उपयोग नसतो. हे सार्वकालिक सत्य आहे. जेव्हा युद्ध होतं तेव्हा ते तुमची तयारी असो वा नसो लढायलाच लागतं. तुम्ही हिंसावादी आहात का अहिंसावादी याच्याशी वार करणार्‍याला कर्तव्य नसते, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.

एखाद्याने आपल्याविरूद्ध युद्ध पुकारल्यावर मग भरती करून लढायला पाठवून उपयोग नसतो. लष्करात एक वाक्य आहे काहीसं की युद्ध कधीतरी एकदाच होतं पण त्याला तोंड द्यायला वर्षानुवर्षे तयारी करायला लागते. ही निरंतर केली जाणारी तयारीच तुमचं बळ असतं. त्यामुळे गेल्या इतक्या वर्षात युद्ध झालं नाही, करदात्यांचा पैसा वाया गेला, उधळला म्हणू नये. बंदूकीतून झाडलेली पहिली गोळीच नेमावर लागत नसते. त्यासाठी हजारो गोळ्यांचा सराव लागतो. तेव्हा हवी ती गोळी हव्या त्या ठीकाणी लागते.

तसेच आपले सैनिक हे कुणाचा जीव घेण्यासाठी नाहीतर देशबांधवांचे जीव वाचवण्यासाठी सीमेवर आहेत. देश म्हणजे नेमकं काय हे बहुधा तुम्हालाच कळलं नाहीये म्हणून सारखं 'देश म्हणजे नक्की काय, देश म्हणजे नक्की काय' विचारत आहात.

सगळ्या सीमांवरून एकदा सगळी सेना हटवली आहे, शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत, सगळे सैनिक सुट्या घेऊन घरी गेले आहेत अशी कल्पना करा आणि मग काय काय होऊ शकतं याचा कल्पनाविलास करा आणि तुमच्या समर्थ लेखणीतून एक मस्त लेख पाडा, बघू कसं वाटतं ते.

देवानंदचा प्रेमपुजारी बघा, तुमचे प्रतिसाद वाचून तोच आठवला. शेवटी बंदूक उचलण्याची गरज का आहे हे त्याला कळतं, तुम्हालाही कळेल अशी आशा आहे.

असो. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना समजतं त्यांना सांगायची गरज नाही, इत्यादी...

(हुप्प्या यांचा मला असलेला उपप्रतिसाद तर दखल घेण्याच्याही लायकीचा नाही. अर्धवटराव यांनी योग्य शब्दात मोजमाप केले आहे.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2015 - 1:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

http://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/soldier-of-fortune-a...

सिविलियन्स फोर्सेज चा मान का राखतात अन तो काकणभर जास्त का राखला गेला पाहिजे हे सांगणारे एक उत्तम आर्टिकल प्रत्येकाने जरूर जरूर जरूर वाचाच

कन्यारत्न's picture

23 Jul 2015 - 2:22 pm | कन्यारत्न

आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते