विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.
आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.
बर्याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.
मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.
नारळाच्या झाडावर चढलेले हे उत्सवमुर्ती. ह्याच फोटोत डाव्या बाजूला साळुंखी पक्षी वार करण्यासाठी आलेली दिसते.
१)
नंतर धामण झाडाच्या झावळ्यांच्या खोपच्यात लपली तेंव्हा तिला शोधण्याची एकेकाची धडपड आणि चेहर्यावरचे हावभाव पहा.
२) हा दयाळ त्या नारळाच्या झाडाखालच्या तारेवर.
हा राड्याच्या प्लान संध्याकाळी चालू होता. बराच वेळ ती धामण बाहेर येण्याची मी टेरेस वरून वाट पहात होते. पण ती काही येत नव्हती. मग मला एका कामानिमित्ताने बाहेर जावे लागले त्यामुळे हे नाट्य कधी संपुष्टात आले ते कळले नाही. पुढच्यावेळी पूर्ण टिपण्याचा प्रयत्न करेन.
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा
@६) मी खाली पहाते तू वर पहा>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा!
फोटूंना दिलेली शीर्षके वाचून तात्काळ फेसबुकवरील क्रांतिताईच्या अश्या पोस्ट्स'ची आठवण आली.
21 Jul 2015 - 3:38 pm | स्पा
अगदी अगदी
16 Jul 2015 - 11:35 am | एस
वा! हा संघर्ष निसर्गातील टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) स्पर्धेत अटळ आहे. तो कॅमेर्यात टिपून मिपाकरांच्या भेटीला आणल्याबद्दल धन्यवाद जागुताई!
16 Jul 2015 - 11:42 am | अजया
हा प्रसंग माझ्याही नित्य पाहाण्यातला.पण तो मला इतका शांततेने घेता येत नाही!फोटो तर दूरच!
16 Jul 2015 - 11:49 am | देश
मस्त आहेत छायाचित्रे. आज घरी गेल्यावर पिल्लांना दाखवीन
देश
16 Jul 2015 - 1:02 pm | पैसा
मस्तय! कावळ्याने त्या धामणीला नक्कीच शोधून हुसकले असणार!
16 Jul 2015 - 6:53 pm | उगा काहितरीच
छान आलेत फोटो. अन् वर्णनही सुंदर !
16 Jul 2015 - 7:46 pm | प्रचेतस
जबराट फोटो आलेत.
16 Jul 2015 - 7:58 pm | बॅटमॅन
अरे क्या बात है, मस्तच फटू एकदम!
आमच्याकडे माकड विरुद्ध कावळे असा सामना कैक वेळेस पाहिलेला आहे पण क्यामेराबद्ध करावयाचे कै सुचले नै.
16 Jul 2015 - 8:12 pm | स्रुजा
वाह ! नेहमीप्रमाणेच अतिशय कल्पक ..
16 Jul 2015 - 9:22 pm | मनीषा
:) सॉलीड आहे राडा
17 Jul 2015 - 12:20 pm | क्रेझी
फोटो रिपोर्टिंग मस्तच! पुढच्या वेळेस शक्य असल्यास व्हिडीओ करून इथे शेअर करा :)
17 Jul 2015 - 12:29 pm | नाखु
घराचे आवारात धूळ-धामीण रहिवासास आहे आमचा तीला आणि तीचा आम्हाला काहीही उपद्रव नाही तेव्हा दोघांची काही तक्रार नाही.
मुलांना मात्र आवाज केल्याशिवाय(पायाने) आणि लाईट लावल्याखेरीज जावू नका मागच्या बागेत असे सांगून ठेवले आहे>
फोटो आळ्शी नाखु
17 Jul 2015 - 3:18 pm | जागु
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल आभार. पुढच्यावेळी शुटिंग करायचा प्रयत्न करते.
17 Jul 2015 - 7:20 pm | होबासराव
.
17 Jul 2015 - 7:49 pm | इशा१२३
सुरेख फोटो ...छान टिपलेत अगदि
17 Jul 2015 - 8:40 pm | सविता००१
मस्त फोटो आणि नावं पण छान,
आधी गंडले मी. पाकृ सोडून तू कलादालनात?
पण छानच गं
तू खूप मस्त ठिकाणी रहातेस. काय हिरवाई आहे
17 Jul 2015 - 11:56 pm | अविनाश पांढरकर
मस्त राडा घातलाय.
18 Jul 2015 - 12:07 am | डॉ सुहास म्हात्रे
जीवनमरणाच्या आकांताचा राडा छान टिपलाय !
21 Jul 2015 - 3:12 pm | तुडतुडी
मग काय झालं त्या सापाच ?
22 Jul 2015 - 6:17 pm | कविता१९७८
मस्तच जागु..
23 Jul 2015 - 5:04 am | निनाद मुक्काम प...
मस्त थरार टीपल्या गेला आहे.
पूर्वी डिस्कवरी वर असा थरार पाहायचो तेव्हा सुरवातीला भक्षकाची हार व भक्ष्याचा जीव वाचणे म्हणजे जिंकणे असा काहीसा बालिश विचार असायचा आता असा थरार मी तटस्थतेने
पाहतो , निसर्गाच्या चक्रात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.
आणि जगण्यासाठी धडपड प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
23 Jul 2015 - 6:26 am | जडभरत
खूपच गोग्गोड राडा आहे. धन्यवाद तै. छोटीला दाखवायला मस्त आहेत.
23 Jul 2015 - 8:32 am | जुइ
जगण्यासाठीची धडपड उत्तमरीत्या कॅमेर्यात पकडली आहे.