गाभा:
मिसळपाव हे अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी मराठमोळं संकेतस्थळ आहे, तेव्हा शिर्षक देवनागरीत नसलेल्या लेखनाची वेळीच प्रत काढून ठेवावी कारण असे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे.
मिसळपाव पंचायत
मिसळपाव नाव विचित्र आहे. हे नाव का दिले असावे बरे?
प्रतिक्रिया
17 Sep 2007 - 1:05 pm | सहज
तात्याची आवडती डिश?? तात्याच देऊ शकेल उत्तर.
17 Sep 2007 - 1:11 pm | दिवाळी अंक
I also thought that its recipe site an registered..
17 Sep 2007 - 1:17 pm | विसोबा खेचर
>I also thought that its recipe site an registered..
शक्य तिथे मराठीत लिहायचा प्रयत्न केल्यास पंचायत समितीस ते अधिक कौतुकास्पद वाटेल असे वाटते! :)
असो, बाकी चालू द्या! नांव वाचून हे केवळ पाककृतींचे संकेतस्थळ आहे किंवा कसे हा प्रश्न कुणालाही पडू शकतो.. :)
तात्या.
17 Sep 2007 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्यांनी उत्तर दिल्यामुळे !
प्रकाटाआ
17 Sep 2007 - 1:30 pm | विसोबा खेचर
मुखपृष्ठावर कधी तरी याबाबत खूलासा करावे लागेल असे वाटते. !
अहो बिरुटेशेठ,
मुखपृष्ठावर,
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठी प्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
असं सपष्ट म्हटलेलंच आहे की! :)
अवांतर ;) तरी वाटलंच अजून कशी गडबड नाही म्हणून :))
हा हा हा! :)
तात्या.
17 Sep 2007 - 1:20 pm | चिपलूनचा बाल्या
तात्यांनू,
टिकाकार म्हंजे वेलनकर का हो?
17 Sep 2007 - 8:25 pm | आर्य चाणक्य
मलापण असच वाटतय
17 Sep 2007 - 1:20 pm | सहज
तात्या आता खायचे नाव निघते म्हणून विचारतो की इथे पाकक्रुती साठी वेगळा विभाग / लिंक द्या राव. कधी कधी डायरेक्ट तिथेच जाऊन बसतो.
17 Sep 2007 - 1:40 pm | प्रकाश घाटपांडे
एकदा मला बायकोने जेवताना एक कटलेट सदृश पदार्थ वाढला. मी तो गरम गरम पदार्थ खाल्ला. चांगला वाटल्याने त्याला 'चांगला' झालाय असेही म्हटले. मग खाउन झाल्यावर तिने त्याचे रहस्य सांगितले. आदल्या दिवशी मी न आवडलेल्या भाज्या टाकून दिल्या होत्या. त्याची पुनर्पाकक्रिया करुन त्या या पदार्थात ढकलल्या होत्या. मी त्याला नांव दिले 'ढकलेट'. प्रत्यक्ष पाककृती मला अजुन कळली नाही.
पण पोलिसांना रस्त्यावरच्या हॉटेलात/ धाब्यावर याच प्रकारचा मेनु मिळतो हे मला एका सहकार्यानेच सांगितले होते. मी मात्र पैसे देउन घेत असल्यामुळे मला इतर गिर्हाईकांसारखाच मिळे.
प्रकाश घाटपांडे
18 Mar 2008 - 12:21 pm | धम्मकलाडू
या ढकलेटावरून दोन निष्कर्ष ढकलता येतात:
१. घाटपांडेकाकांच्या सौभाग्यवतींनी रस्त्यावरच्या हॉटेलवाल्यासारख्या, धाबेवाल्यासारख्या सारखी पौष्टिक वागणूक दिली.
२. घाटपांडेकाका घरात मात्र एखाद्या पोलिसासारखे वागतात.
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
17 Sep 2007 - 1:54 pm | टिकाकार
'ढकलेट' आनि या सब्जेक्ट चा काय समन्ध य त्यावर क्रुप्या प्रकाश टकाल का ?
टिकाकार
17 Sep 2007 - 2:04 pm | टिकाकार
खर तर पावाचा काय सम्बन्ध ?
टिकाकार
17 Sep 2007 - 2:08 pm | दिवाळी अंक
बर मराठि लिहिन्.sorry.
17 Sep 2007 - 2:09 pm | टिकाकार
मी २ .
टिकाकार
17 Sep 2007 - 2:16 pm | प्रकाश घाटपांडे
हा समंध 'लावण्या'वर अवलंबून आहे. तिखाकार.
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 2:19 pm | टिकाकार
लावण्या म्हन्जे बाय्या नाचत्यात ते कार भाऊ ?
टिकाकार
17 Sep 2007 - 2:27 pm | प्रकाश घाटपांडे
क्रियापद. ' जे केल्याने मानूस बडबड बडबड करतो ते' म्हणजे आपली कोण बरे भाऊ?
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 2:33 pm | टिकाकार
काय केल्याने मानूस बडबड बडबड करतो ?
:)
टिकाकार
17 Mar 2008 - 10:22 am | सृष्टीलावण्या
लावण्या म्हन्जे बाय्या नाचत्यात ते कार भाऊ ?
आता सृष्टी-लावण्या ह्यातील लावण्या काढून टाकावे लागणार असे दिसतेय एकूण...
विचार करतेय नुसतेच सृष्टी लिहावे. लावण्या ने गैरसमजच वाढायचे फक्त.
*<|:-)}
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
20 Sep 2007 - 5:24 pm | टीकाकार-१
अजुनही हा प्रश्न आहेच.
20 Sep 2007 - 5:32 pm | लिखाळ
मिसळपाव हे नाव छान आहे. ते पाहून हे संकेतस्थळ पाककृतींचे आहे वाटणे हा केवळ दृष्टिकोनाचा फरक आहे.
मला तर मिसळपाव खाताना मित्रांसोबत ज्या इतर गप्पा, उखाळ्या-पाखाळ्या चालतात त्या इथे चालवण्याचे स्थळ असे वाटले बुवा ! असो !
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
17 Mar 2008 - 5:23 pm | मनस्वी
या नावात काय विचित्रता दिसत आहे तुम्हाला टिकाकारपंत.
मनस्वी
17 Mar 2008 - 5:37 pm | धमाल मुलगा
मिसळ हा पदार्थ, कोण्या एका जिन्नसाने पुर्ण होऊ शकत नाही. त्यात निरनिराळे वेगवेगळे...अगदी एकमेका॑शी पुर्णतः विरोधी असलेले घटक जसे की भाजी, उसळ, फरसाण, जहाल तर्री इ.इ. मिसळल्याशिवाय खरी मजा येत नाही. मिसळीशी खाण्याकरता वापरला जाणारा पाव हा तर वरील सर्व जिन्नसा॑हून पुर्ण वेगळा आणि तरीही खुमारी देणारा....
मिसळपाव.कॉम मध्ये अशीच सर्व प्रकारची अभिव्यक्ती असलेली निरनिराळी म॑डळी आहेत. आणि ती "गुण्यागोवि॑दाने ना॑दत आहेत." ह्या निरनिराळ्या स्वभाव वैशिष्ट्या॑ची नामी मिसळ + पाव सगळेच आवडीने चापत आहेत.
मिसळपाव हे मला वरील वर्णनाचे रुपक वाटते.
स॑त तात्याबा॑नी ह्यावर आपले मोलाचे विचार मा॑डावेत अशी मी त्या॑ना विन॑ती करतो.
आपला,
मिसळीतला खम॑ग शे॑गदाणा, ध मा ल.
17 Mar 2008 - 6:01 pm | विसोबा खेचर
मिसळपाव हे मला वरील वर्णनाचे रुपक वाटते.
वा वा!
धमाल्या,
स॑त तात्याबा॑नी ह्यावर आपले मोलाचे विचार मा॑डावेत अशी मी त्या॑ना विन॑ती करतो.
अरे बाबा तुझ्या प्रतिसादात मिसळपावाचं तू इतकं सुंदर आणि समर्पक वर्णन केलं आहेस की संत तात्याबांना आता वेगळं काही लिहायची जरुरीच उरलेली नाही! :)
आपला,
संत तात्याबा महाराज.
17 Mar 2008 - 7:55 pm | इनोबा म्हणे
धम्या लढ रे!
धमाल करता करता, कधी कधी कमाल करतोस हा!
मिसळपाव.कॉम मध्ये अशीच सर्व प्रकारची अभिव्यक्ती असलेली निरनिराळी म॑डळी आहेत. आणि ती "गुण्यागोवि॑दाने ना॑दत आहेत."
हेच तर बघवत नाही ना,काही लोकांना! च्यायला पाच पाच मिनीटाला कुत्र्यासारखी तंगडी वर करतात.
(घरभेद्यांना वैतागलेला)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
17 Mar 2008 - 9:13 pm | छोटा डॉन
"मिसळपाव.कॉम मध्ये अशीच सर्व प्रकारची अभिव्यक्ती असलेली निरनिराळी म॑डळी आहेत. आणि ती "गुण्यागोवि॑दाने ना॑दत आहेत."
हेच तर बघवत नाही ना,काही लोकांना! च्यायला पाच पाच मिनीटाला कुत्र्यासारखी तंगडी वर करतात."
अगदी खरं बोललास बॉस [ येवढे इंग्रजी चालेल ना ?] . च्यायला आपण इथे एवढा मस्त हल्लागुल्ला करतो ते काही लोकांना बघवत नाही . उगाच आपले काहितरी खूस्पट काढतात. आपण पण च्यायला त्यांना पुरुन उरु....
काहिपण म्हणा राव, पण "मिपा" सुरु झाल्यापासून लिहायला जरा मजा यायला लागली आहे. कारण इथे मिळणारे मस्त , अभ्यासपूर्ण , व्यासंगी व अभिनंदन करता करता काहि चूक झाली तर कान धरणारे प्रतिसाद ...
नाहितर आधि आपलं "तुम्ही सुसंस्कॄत, आम्ही पण सुसंस्कॄत ... तुम्ही सभ्य , आम्हीपण सभ्य .... तुम्ही गोड, आम्हीपण गोड " अशा पछडीतले वातावरण होतं राव [ कुठे ते सांगायची गरज नाही.] असो. त्या गोष्टीला "जय महाराष्ट्र" ठोकुन आला खुप दिवस झाले.
आम्ही त्यांना विसरलो आता त्यांनीपण आम्हाला गपगूमान विसराव अशी अपेक्षा आहे .....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना सारखे सारखे दुसर्याला टोमणे मारणे आणि शिव्या देणे आता थांबवावे ही सर्व सदस्यांना विनंती.
इथे कुणी बाहेरचा गडबड करणार असेल तर त्यांना संपादक,सरपंच योग्य ते उत्तर देतील ह्याची खात्री बाळगावी. ती जबाबदारी सभासदांनी आपल्या अंगावर घेऊ नये. जनरल डायर त्या बाबतीत समर्थ आहे.सभासदांनी कोणत्याही वादात पडणे कृपया टाळावे आणि त्यांनी इथे असलेले खेळीमेळीचे वातावरण असेच वृद्धिंगत होत राहील ह्याकडे लक्ष द्यावे..... संपादक
17 Mar 2008 - 5:42 pm | मनस्वी
काहीच्या काही अवांतर
मनस्वी
17 Mar 2008 - 8:02 pm | चतुरंग
मराठी जगात | संकेत स्थळात |
बरीच ती नावे | चर्चियेली ||
'नमोगती' असे | 'मायबोली' वसे |
'उपक्रम' चाले | कितियेक ||
वाटले वाचावे | विचार टंकावे |
झणिच ते यावे | महाजाली ||
'मि.पा.' उघडावे | वाचतचि जावे |
रंजन हे व्हावे | जगताचे ||
मराठी ही खरी | अभिव्यक्ती बरी |
नसे संपादन | उगाच ते ||
असे 'सरपंच' | तरी नसे काच |
'जनरल' जाच | नसे तोही ||
'मिसळ' चापावी | तर्री भुरकावी |
मनसोक्त खावी | 'पावा' संगे ||
येथे सवंगडी | घालती लंगडी |
नाही कुलंगडी | फुकाचीच ||
नाही खोटी स्तुती | प्रतिक्रिया येती |
चूक करता ती | फटकळ ||
येता 'मिपा' वरी | जणु वाटे घरी |
आपली मंडळी | सारी येथे ||
असे ते 'मिपा' चे | गुणगान साचे |
मिथ्या नाही वाचे | 'चतुरंगे' ||
चतुरंग
17 Mar 2008 - 8:08 pm | इनोबा म्हणे
चतुरंगराव मस्त चौकार मारला बरं का!
टिकाकार आता तरी सुधरा... का "कुत्र्याचं शेपूट" बनूनच राह्यचंय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
17 Mar 2008 - 8:56 pm | गोट्या (not verified)
जबराच !!!!!!!!!!!!!
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
17 Mar 2008 - 9:57 pm | आजानुकर्ण
'मि.पा.' उघडावे | वाचतचि जावे |
मनरंजन व्हावे | जगताचे ||
इथे दुसर्या ओळीत थोडा घोळ आहे. ६-६-७-४ असे झाले आहे.बाकी ओवी मस्त.
(छिद्रान्वेषी) आजानुकर्ण
17 Mar 2008 - 10:01 pm | चतुरंग
आता छिद्र बुजवले आहे!
चतुरंग
17 Mar 2008 - 10:09 pm | केशवसुमार
चतुरंगशेठ,
एकदम ज ह ब ह र्या हाणलात..
चालू द्या
केशवसुमार
17 Mar 2008 - 11:10 pm | ब्रिटिश टिंग्या
येता 'मिपा' वरी | जणु वाटे घरी |
आपली मंडळी | सारी येथे ||
व्वा!! क्या खुब कही!
18 Mar 2008 - 8:58 am | विसोबा खेचर
असे ते 'मिपा' चे | गुणगान साचे |
मिथ्या नाही वाचे | 'चतुरंगे' ||
वा रंगराव, आपण तर कमाल केलीत! लै भारी ओव्या रचल्या आहेत..
आपला,
(भारावलेला) तात्या.
18 Mar 2008 - 9:40 am | मनस्वी
मस्त झाले आहे चतुरंग.
मनस्वी
18 Mar 2008 - 11:08 am | धमाल मुलगा
क्या बात है शेठ!
मान गये उस्ताद.
आम्ही जळजळीत भाषा वापरतो, तर तुम्ही ओव्या !
ह्याला म्हणतात डोक॑.
जियो उस्ताद.
18 Mar 2008 - 9:12 am | चतुरंग
चतुरंग