मागचा लेख-
पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात???
पुन्हा एकदा या वर्षी ११ जुलैला मी आणि ऑफिसमधील काही उत्साही लोक्स पन्हाळगड-विशाळगड एक दिवसीय मोहीमेवर जाणार आहोत. मागच्याच वेळचा साटम सरांचा ग्रुप बोरिवलीहुन १० तारखेला निघेल आणि पुणेकरांना ऑन द वे घेउन पुढे प्रस्थान करेल.
या वेळी सुद्धा एव्हढे अंतर पार करणे जमेल का? सर्व लोक तेव्ह्ढे तयारीचे असतील का? मागचा महीनाभर केलेले जॉगिंग उपयोगी पडेल का? जळवा असतील का?पाउस आणि चिखल कितपत असेल? असे प्रश्न मनात आहेतच. पण ट्रेक करण्याचा उत्साह त्यावर मात करतोय.
कोणाला पाहीजे असल्यास आमची सामानाची यादी खाली देत आहे जी सर्व ट्रेक्सना साधारण उपयोगी पडु शकेल.
या ट्रेक मधे वेळेनुसार कुठली ठिकाणे येतील तेही यादीत नोट केले आहे.
------------------------------------------------------------------------------------
https://drive.google.com/file/d/0B-VTCJ078_Ptb1Jickprb2RWUU0/view?usp=sh...
----------------------------------------------------------------------------------
सध्या एव्हढेच. आल्यावर (आलो तर ....) भेटुच!!! राम राम.
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 6:19 pm | जगप्रवासी
गेल्या वर्षीच्या ट्रेक चा लेख वाचला, या ट्रेक साठी मनापासून शुभेच्छा
8 Jul 2015 - 7:23 pm | पद्मावति
आधीचा ट्रेक विषयीचा लेख वाचला. छान आहे. आवडला.
तुम्हाला आगामी ट्रेक साठी खूप शुभेच्छा.
9 Jul 2015 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद जगप्रवासी आणि पद्मावती!!
9 Jul 2015 - 3:51 pm | आशिष काळे
हो पन्हाळा ते विशालगड हा ट्रेक जबरदस्त होणार
30 Jun 2025 - 12:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
यावर्षीची तारीख ११ जुलै प्रस्थान-१२ जुलै पदभ्रमण-१३ जुलै परतीचा प्रवास