२ कप बारिक चिरलेला पालक, १ कप बारिक चिरलेला कान्दा, १ इन्च किसलेल आल, ४-५ कढिपत्ता, १ छोटा चम्चा लाल तिखट, १/२ चम्चा हळ्द, १ चम्चा धणे पुड, पाव चम्चा गरम मसाला, १ छोटा चम्चा तीळ , १ छोटा चम्चा ओवा, मिठ चविप्रमाणे, १ कप बेसन्,तेल.
६ चम्चे तेल कडकडीत गरम करा.बेसन सोडुन वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि तेलाचे मोहन घालुन १५ मिनिटे झाकुन ठेवा.
त्यात बेसन व थोडे पाणी घालुन सरसरीत भिजवा. कढईत तेल तापवुन खरपूस तळा.
गरमा गरम पालक भजी आल घातलेल्या चहा बरोबर खा.
प्रतिक्रिया
24 Aug 2008 - 12:53 am | प्राजु
दुसरी पाककृती मराठीतून लिहिल्याबद्दल.
आपला आयडी तेवढा मराठीत घ्याल का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Aug 2008 - 9:29 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
ही पाकक्रिया जरा वेगळी दिसते.आम्ही पालकाची अख्खी पानं बेसनात घोळवून तळतो.
पण अशा प्रकारे नक्कीच करून बघेन.
धन्यवाद.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
24 Aug 2008 - 10:44 am | विसोबा खेचर
वा! पालक भजी सह्ही झाली आहेत! :)
एक विनंती - आपले प्रवेश-नावही कृपया देवनागरीत करून घेतलेत तर बरे होईल...
तात्या.