मुंबई-पुणे-मुंबई-२

वाचन प्रेमी's picture
वाचन प्रेमी in भटकंती
3 Jul 2015 - 4:38 pm

मुंबई-पुणे-मुंबई-१

पहिल्या लेखाच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

पराठे डबल साईझ चे होते पण किमंत मात्र खूप कमी होती( ज्यांना पराठा मोठा वाटला त्या वाचकांसाठी ).

रात्रीचे जेवण बाहेर करायचं ठरलं अस मेहुणीच्या घरी कळवलं.तो पर्यंत मी आणि श्रीकांत त्याच्या मित्रांना जाऊन भेटलो,त्याचा भाऊ पण नुकताच पुण्यात स्थलांतरित झालेला त्याला हि भेटलो.

श्रीकांत च्या भावाला भेटल्यावर एक गोष्ट कळाली की आजकाल च्या वाढत्या महागाईत पुण्यात विध्यार्थ्यानी राहाण हे किती कठीण होत चालले आहे.
गम्मत म्हणजे त्यात खोली मालकांच्या वेगवेगळ्या मर्यादा अक्षरशा आम्ही त्याच्या भावाला भेटायला जातोय आणि लगेच परत जाणार आहोत हे सुद्धा त्यांना सांगून जावं लागलं.

कुणी थांबलेलं जमणार नाही. एवढेच जण राहू शकता आणि जर अजून एक जण आला तर भाडेवाढ होणार.

मनातल्या मनात विचार केला वाचलो माझ कॉलेज घरा जवळच होत.

९ वाजायला आले बायकोचा २ वेळा फोन येउन गेला 'आहात कुठे?'.

म्हटलं 'येतो थोड्या वेळात'!

रात्रीच जेवण हि आवरलं शनिवार असल्याने बिचारे प्राणी मित्रांना पनीर बिर्याणी वरच भागवाव लागलं.

तेवढ्यात मंदार चा फोन आला, मंदारच ऑफिस नुकतच पुण्यात शिफ्ट झालेल.

तो ११च्या आसपास डेक्कन ला आला आणि श्रीकांत ने त्याला पिकअप केल.

आणि ladies च्या प्लान मध्ये change झाला.

सारिका आणि विषया आमच्या बरोबर मेहुनिकडे निघाले.

सकाळी ७ ला कार येणार होती.
ठरल्या नुसार ७ चे ७.१५ झाले निघताना.

श्रीकांत आणि मंदार ला cummins कॉलेज जवळ पिक केले.
निघायच्या घाईत न्ह्यारी तर कुणी केलीच नव्हती.

सिंहगडावरच जाऊन काहीतरी खाण्याच ठरलं.

माझ्या मते काही वाचलेल किंवा ऐकलेलं त्यापेक्षा पाहिलेलं आपल्याला जास्त लक्षात राहत.

पुढील प्रवास फोटो च्या माध्यमातून तुम्हाला पण अनुभवू देण्याचा प्रयत्न करतो.

कार मधून click केलेला देखावा.

view from car

हा निसर्गरम्य देखावा पाहून सगळे भारावून गेलेलो.
ajun ek

सिंहगडावर पोहोचे पर्यंत सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागलेल.

झुणका भाकर,कांदा भजी आणि वांग्याचं भरितवर सगळ्यांनी ताव मारला.

पोट भरला सगळे जण bike पार्किंग च्या इथे गेलो.येणारा जो तो तिथे फोटो काढत होता.

हे पाहून शाळेतल्या मधल्या सुट्टीची आठवण झलि.

1

आणि हे बघून तर तोंडाला पाणीच सुटल.

2

bike पार्किंग मधून सिंहगडाचे छायाचित्र.
1

1

सगळे खाण्याचे पदार्थ पाहून कंट्रोल नाही झाल.
पोटभरून झुणका भाकर खालेल्ली तरी पण.

स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बसलेल्या ह्या काकांना बघून थोड मन उदास झालं.
शेवटी प्रत्येकाच्या नशिबाचा भाग.
1

सिंहगडचा नकाशा.

1

कॅमेरा हातात असल्य्वार अश्या दृश्याचे छायाचित्र घेताना खूपच छान वतत.

1

तानाजीं मालुसरेंच्या समाधी जवळ हे काका असतात.
कोणतीही दक्षिणा न घेता निस्वार्थ ऐतिहासिक वारसा सांभाळत आहेत.त्यांना मानाचा मुजरा.
1

ह्या चिमुकल्या चा पोवाडा म्हणताना आवाज ऐकून आम्ही शहारलो.
वाटल शिवरायांच्या युगातच आलो आहोत आम्ही.
1

सिंहगडावर सैर चालूच होती.
"गड आला पण सिंह गेला".
"आधी लग्न कोंढाण्याच मग रायबाच" हे कानावर ऐकू येत होत.
एवढ्या मोठ्या कड्यावर मावळे कसे चढले असतील याच आश्चर्य वाटत होत आम्हांला.
या सगळ्या संभाषणंनंतर सगळ्यांची मस्ती सुरु झाली.

गडावरून खाली उतरताना एक व्यक्ती दिसलेला बघितलं.
सगळ्यांनी विचारलं काय करता तुम्ही?
A३ आकाराच्या पेपर वर गणपती आर्ट काढतो म्हणाले.
जास्तीत जास्त ६नावे एका पेपर वर.
आमच्या समोर ५mintues मध्ये त्यांनी रिकाम्या कागदावर कलाकृती काढली आणि आम्ही भारवून गेलो.

1

पूर्ण झाल्यावरच चित्र.
1

हे चित्र घेतल्यावर सगळे जण खुश झालेलं.
खाली आल्यावर प्रत्येकाला वाटल आपल्या कुटुंबासाठी पण एक बनवून घ्यायला हव होत.

अखेर आमची स्वारी निघाली लवासा साठी.

वाटेत जेवण केल दुपारचे ३ वाजलेले. मांसाहारवाल्यांनी कोंबडी वर ताव मारला.

पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला असलेली मोठी होर्डिग्ज लक्ष वेधून घेतात. लवासाकडे, लवासा- काही अंतरावरच!
काही मूठभर श्रीमंतांना खूप पैसे कमवून झाले, की चैनचंगळीसाठी एक ठिकाण विकसित करण्याकरता लवासाने केलेली निसर्गाची कत्तल,पर्यावरणाचा -हास, लोकांच्या फसवणुकी, कायद्याची वासलात. हे सारे पाहून थक्क आणि व्यथित व्हायला होते. तथाकथित भांडवली भरभराटीचा, चंगळवादाचा रस्ता विनाशातूनच आणि विनाशाकडेच जातो, हे अधोरेखित करणारी ही लवासा लेकसिटी!

तिकडे पोहोचल्यावर जास्त अस स्पेशल काही वाटलं नाही.

पवई तलावाची आठवण आली ( कदाचित ऑफिस मधून रोज जाताना बघतो म्हणून )

बघावे ते bunglows रिकामे आणि सगळे फोटो शूटला लागले.

पूर्ण लवासा मध्ये हे बंगलेच आवडले. मुंबईत उंच इमारती बघण्याची सवय झालेली आहे ना.

1

७ वाजले परतीची वेळ झालेली.
गाडींत बसल्या बसल्या विषया ने rock पेपर scissor चा खेळ शिकवला.
पहिल्यांदाच खेळत असल्याने मंदार आणि माझी तारांबळ झाली.

सगळे पोट धरून मनसोक्त हसले.

मुंबईला पण जायचं होत परत.

स्वारगेट ला पोहोचून सगळ्यांनी ST पकडली. परतीचा प्रवास झोपेतच गेला.

मित्रांमुळे जास्तच मजा आली.
थोडक्यात दंगा केला !

प्रतिक्रिया

फोटोंतून छान सहल घडवलीत.

वाचन प्रेमी's picture

3 Jul 2015 - 4:58 pm | वाचन प्रेमी

कालच लेखन वाचून सगल्यांची तारांबळ झालेली.
विचार केला फोटो मधूनच फिरवूयात सगळ्यांना.

सदस्यनाम's picture

3 Jul 2015 - 5:01 pm | सदस्यनाम

वॉव.
पुणेकरांचा परखडपणा, सिंहगडाची एतिहासिक स्वारी, पोवाड्याचे प्रेम, इतिहासाचा उमाळा, आवळे चिंचा, लवासातले आवडलेले बंगले अन न आवडलेली पर्यावरणाची कत्तल, गणपतीतले नाव अन तुमच्यासारखेच यो मित्रांचा कल्ला एवढे सगळे अनुभवले म्हणजे भारीच पिकनिक झाली हां.
कौतुक वाटते असे घाऊकमध्ये सगळेच करणार्‍यांचे.

कोणतीही दक्षिणा न घेता निस्वार्थ ऐतिहासिक वारसा सांभाळत आहेत.

गैरसमज आहे हा. कौतुकाने ऐकायला उभं राह्यलो असताना, पोवाडा झाल्यावर स्वखुशीने काहीतरी द्या असं प्रत्येकाला सांगत होते हे!!

बॅटमॅन's picture

3 Jul 2015 - 6:21 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!!

बॅटमॅन's picture

3 Jul 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!

आणि वर पोवाडा तर कसला म्हणे उदेभान राठोड १२ फूट उंच इ.इ. जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा राव. लोकांना येडे समजू राहिले.

बर्‍यापैकी मोठे आहात तुम्ही मंडळी.

असंका's picture

3 Jul 2015 - 5:33 pm | असंका

म्हणजे संख्येनी का?

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 5:37 pm | टवाळ कार्टा

खिक्क

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ म्हणजे संख्येनी का?>> :-D डोक्यातून डोक्यात हाणलि गोळी! :-D

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ म्हणजे संख्येनी का?>> :-D डोक्यातून डोक्यात हाणलि गोळी! :-D

आदूबाळ's picture

3 Jul 2015 - 8:57 pm | आदूबाळ

=))

मृत्युन्जय's picture

4 Jul 2015 - 1:03 pm | मृत्युन्जय

ठो!!!

बॅटमॅन's picture

3 Jul 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

नाखु's picture

8 Jul 2015 - 10:20 am | नाखु

शॉट असाही !!!!

विवेकपटाईत's picture

3 Jul 2015 - 5:53 pm | विवेकपटाईत

छान सुंदर वर्णन

प्यारे१'s picture

3 Jul 2015 - 6:25 pm | प्यारे१

एकंदर फ़ोटो छान आहेत.
लवासा चे बंगले अजून हस्तांतरित झालेले नाहीयेत.
बाकी वरील फोटोंमधे बंगले नाही तर पोर्टोफिनो नावाचे फ्लॅट अपार्टमेंट्स आहेत.
अवांतर: 2000 सालापर्यंत त्या भागात एस टी जाण्याचा देखील रस्ता नव्हता एवढंच सांगू इच्छितो! भाग विकास करण्याची सरकारची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही एवढं मात्र खरं आहे. जमिनींचे व्यवहार वगैरे वेगळाच विषय आहे. दिवंगत श्रा मो यांच्याबरोबर काही चर्चा झाली होती.

बादवे, लवासात फोटो नाय काढून दिलंनीत काय? आता येवढे टाकलेत तर तिथले पण टाकायचे होतेत!!

शेवटी गडावर जाऊन दंगा मस्ती करणार्‍यांपैकीच तुम्ही सुद्धा तर. ओके.

माझीही शॅम्पेन's picture

3 Jul 2015 - 9:33 pm | माझीही शॅम्पेन

एक सांगतो इतक्या प्रमाणात आणि इतके पर्सनल फोटो शक्यतो टाकु नका (शक्य झाल्यास फोटो कमी करण्यासाठी संपादक मंडळाची मदत घ्या)

बाकी वर्णन आणि निसर्गाचे फोटो झकास !

पु ले शु

संदीप डांगे's picture

3 Jul 2015 - 9:51 pm | संदीप डांगे

ते सगळं ठिकेय पण आधी ते पर्सनल फोटो काढा इथून. एकतर व्यक्तिगत जालीय सुरक्षेच्या दृष्टीने ते अजिबात योग्य नाही. फोटोतल्या प्रत्येकाची ओळख धोक्यात येऊ शकते.

दुसरे म्हणजे हे फेसबूक नाही. तुमचे चेहरे बघून आम्हाला काही भन्नाट वेगळं पाहिल्याचा अनुभव येत नाहिये. अनोळखी लोकांचे काहीबाही करतांनाचे फोटो फेसबूकवर बघितले की मी ते लगेच ब्लॉक करतो. डोक्यात जातं असलं वागणं. सो आय अ‍ॅम वेरी सॉरी.

प्रवासवर्णने यात येणारे फोटो त्याठिकाणी विशेष महत्त्व राखून असलेल्या जागांचे, शिल्पांचे, कोरीव कामाचे, हस्तकलेचे, घटनांचे, वस्तूंचे, लोकांचेही असले तरच योग्य असतात. जसे तुम्ही काढलेले खाण्याच्या जागेचे फोटो, पोवाडा म्हणणार्‍या लोकांचे फोटो उत्तम आहेत. पण व्यक्तिगत फोटो चुकीचे वाटतात. त्याने तुमच्या प्रवासवर्णनात बट्टा लागतो. कारण वाचणारे आपण स्वतः तिथे असल्याचे फील करत असतात. लेखकाने स्वतःचे फोटो टाकले तर त्या मनोरंजनाला/कल्पनारंजनाला योग्य ती मजा येत नाही.

मिसळपावचा दर्जा राखा राव. तुम्ही छान लिहिता. पुढील लेखनास शुभेच्छा!

मधुरा देशपांडे's picture

3 Jul 2015 - 9:58 pm | मधुरा देशपांडे

सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2015 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

+++१११
कितितरी वेळा मनात इच्छा होते , की इथे मिसळपाव ह्या नावाखालीच कंसात "हे फेसबुक नाही,क्षमस्व!" असे टाकले जावे . ते ह्याच मुळे.

सानिकास्वप्निल's picture

4 Jul 2015 - 2:13 am | सानिकास्वप्निल

अगदी असेच वाटले.
बाकी लिहित रहा, पुलेशु.

यसवायजी's picture

3 Jul 2015 - 11:17 pm | यसवायजी

अजून एक भाग फक्त फोटोंचा येऊद्या.

बॅटमॅन's picture

6 Jul 2015 - 12:58 pm | बॅटमॅन

पण फटू ठिकाणांचे असावेत, खाली लोगां के फटू नै होना हमरेकू....

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2015 - 1:13 pm | टवाळ कार्टा

अनलेस.... ;)

यसवायजी's picture

8 Jul 2015 - 9:29 am | यसवायजी

ख्याक्क्क.
आजची स्वाक्षरी- Great minds think alike. :D

बॅटमॅन's picture

8 Jul 2015 - 3:15 pm | बॅटमॅन

ख्याक्क्क्क्क =)) =)) =))

रवीराज's picture

8 Jul 2015 - 11:18 pm | रवीराज

वाचन प्रेमी ....लेखन प्रेमी पण व्हा.