ग्रीसचा प्रश्न

अर्धवट's picture
अर्धवट in काथ्याकूट
2 Jul 2015 - 5:04 pm
गाभा: 

दूरीकुर्यु उरोभारं शरचापरिरक्षव: |
अथवा जलदेवीयं हिनस्ति तुरकासुरम्|

पुन्हा एकदा सेक्युलर लोकांची खोटारडी तोंडे बंद झाली आहेत. अमेरिकेची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणारे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारे देशद्रोही सेक्युलर एजंट्स इतकी वर्षे खोटा प्रचार करत होते त्याला शेवटी काल एका आंतरराष्ट्रीय पुन्हा एकदा सडेतोड उत्तर मिळाले.
भारतीय प्राचीन संस्कृती आणि विद्या किती प्रगत होती हे या ग्रीसच्या उदाहरणावरून आपोआपच सिद्ध होते आहे. पुराणात जे काही ज्ञान आहे त्याला हसायचं आणि कुराणाचे मात्र गोडवे गायचे असा यांचा कावा, पण आपल्या पूर्वजांनी जे वेद लिहून ठेवले आहेत ते त्रिकालदर्शी आहेत, हे असे वारंवार सिद्ध झाले की मग मात्र हे सेक्युलर तोंडे लपवत फिरतात.
जर्मनीच्या लुसैल या शहरामध्ये कॉथे युनिवर्सिटीत संस्कृत आणि प्राचीन भारतीय वेद व पुराणांचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या विभागाचे प्रमुख डॉ. कॉव्हे बॉर्ज यांनी चारहजार वर्षे जुन्या प्रक्षिप्तपुराणातील काही श्लोकांचा अभ्यास करून त्याचा आताच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भाने नवीन अर्थ समोर आणला आहे. या श्लोकांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राची फक्त तत्वेच नव्हेत तर त्या तत्वांचा आधुनिक आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम आणि महत्वाच्या घडामोडींवर भाष्यही केले आहे, त्यातील काही महत्वाचे श्लोक उदाहरण म्हणून आपण बघितले तरी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बुद्धीमत्तेची कल्पना येते आणि अभिमानाने आपला ऊर भरून येतो.
उदाहराणार्थ खालील श्लोक (प्रक्षिप्तपुराण, सर्ग २, श्लोक १२ )

“दूरीकुर्यु उरोभारं शरचापरिरक्षव:
अथवा जलदेवीयं हिनस्ति तुरकासुरम्|”

अर्थ - “शरचापाचे रक्षण करू इच्छिणार्यांनी उरावरचा भार दूर करावा. नाहीतर ही जलदेवी तुरकासुराचा नाश करते”
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना माहिती असेलच की युरोपातील देशांची युरोझोन हि संघटना आहे आणि त्याला स्थानिक लोक “युरो” असा शब्दही वापरतात, अर्थशास्त्राच्या निकषानुसार जेव्हा एखादे आर्थिक कर्तव्य खूप तोट्याचे ठरणार असेल तेव्हा अशा वेळी राज्यव्यवस्थेने, हे ओझे वेळीच झुगारून देऊन आणखी तोट्यात न जाण्याचा प्रयत्न करायचा असतो आधुनिक अर्थशास्त्रात यालाच ‘ डोंट थ्रो गुड मनी आफ्टर बैड मनी’ असे म्हणतात, या श्लोकात ‘ चापशर हा शब्द आला आहे, तो वरवर संदर्भहीन वाटतो, किंवा त्याचा युद्धाशी संबंध असल्याचा समाज याआधी दृढ होता, पण डॉ. कॉव्हे यांच्या प्रबंधामुळे एक नवीन अर्थ समोर आला आहे, जर आपण युरो या त्यांच्या चलनाचे चिन्ह नीट निरखून पाहिलेत तर ते ताणलेल्या धनुष्याला लावलेल्या बाणासारखे दिसते, तेव्हा असा धनुष्यबाण किंवा चापशर म्हणजेच युरो हे चलन नष्ट होऊ शकेल असा स्पष्ट इशारा आपल्या पूर्वजांनी चारहजार वर्षापूर्वीच देऊन ठेवला आहे.
आता या संदर्भामुळे पुढचा अर्थ स्पष्ट होतो, जलदेवी म्हणजे अर्थातच जर्मनीच्या नेत्या एं’जला’ मार्केल यांनी कठोर बुमिका घेऊन चापशर म्हणजेच युरो वाचवण्यासाठी प्रयत्न आरंभले आहेत हे आपल्याला आता माहिती झाले आहेच, इतका स्पष्ट पुरावा समोर असतानाही सेक्युलर मूर्ख त्याकडे दुर्लक्ष करून “ पण यामध्ये ग्रीसचा उल्लेख कुठे आहे’ असा प्रश्न विचारणारच. डॉ. कॉव्हे यांच्या शोधप्रबंधामध्ये असल्या लोकांना परस्पर करारा जवाब दिलेला आहे, या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये ‘तुरासूर’ हा शब्द आलेला आहे, हा तुरासूर कोण हे आतापर्यंत ज्ञात नव्हते, हा शब्द इथे एका असुराला वापरलेला नसून संपूर्ण देशाला वापरलेला आहे, आधीचे संदर्भ घेऊन अर्थ लावल्यास हा शब्द ग्रीस या देशासाठी वापरला आहे हे स्पष्ट होते, जीज्ञासुंनी प्राचीन ग्रीस योद्ध्यांच्या युनिफॉर्मचे चित्र शोधून पहावे. म्हणजे याचा उगम स्पष्ट होईल.

प्राचीन संस्कुतीमधले असे उपयोगी शास्त्र आणि प्रगत ज्ञान सरळ फेकून द्यावे आणि पाश्चात्यांचे गुलाम होऊन राहावे, असा सेक्युलरांचा डाव पूर्वीपासूनच आहे, पण पाश्चात्यच आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करून त्यातलं ज्ञान आपल्याला दाखवून देतात तेव्हा मात्र या लोकांची तोंडे बंद होतात ती अशी.
विकल्या गेलेल्या प्रेस्टीट्युड मिडियामध्ये हि माहिती अजिबात येणार नाही म्हणून, हिंदुस्तानचा अभिमान असलेल्या प्रत्येकाने हा लेख शक्य तितका शेअर कराच, कारण आपली उज्ज्वल आणि प्रगत प्राचीन संस्कृती आपणच आता लोकांपर्यंत पोचवायला हवी. खरे भारतीय असाल तर शेअर कराच.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

2 Jul 2015 - 5:31 pm | संदीप डांगे

अरे चाललंय तरी काय...???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2015 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रीसची अर्थव्यवस्था का ढासळली ? भारतीय अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होणार ?
ग्रीसची पुढील वाटचाल कशी असेल ? ग्रीसमधील नवीन सरकार कोणते धोरण ठरवेल ?
आंतरराष्ट्रीय नाणे निधी हे नाव असलं तरी दादागिरी करणारे देश कोणते ?
त्यांचं धोरण काय असेल ? असं काही वाचायला मिळेल असे वाटले आणि हिरमोड झाला. :(

-दिलीप बिरुटे

अर्धवट's picture

3 Jul 2015 - 2:49 pm | अर्धवट

क्षमस्व, एवढं काही अभ्यासपूर्ण सखोल वगैरे लिहायची माझी लायकी नाही.

भाऊसाहेब पाटणकरांच्या शब्दात -

सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कवींचा मान, तेवढी पायरी माझी नव्हे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Jul 2015 - 7:34 pm | पुण्याचे वटवाघूळ

हा लेख पालीतला म्हणायचा की अर्धमागधीतला? कशाचाच कशाशी पत्ता लागत नाहीये म्हणून विचारले.

विजुभाऊ's picture

3 Jul 2015 - 10:28 am | विजुभाऊ

पाली ची चिंता वटवाघुळाने करावी !
नक्की तो दक्षीणेकडून येणारा आही त्याची वेळ जवळ येत चालली आहे.
बघा हा दुसरा संदर्भ.
किं वाल्गुदेन करोति पालायां चिंता
उरो वर्तमानां दक्षिणा: पांतुं जर्मनाय.
तस्माद भवते भग्न्भागोदरी वल्वली वल्वली.

चैतन्य ईन्या's picture

2 Jul 2015 - 8:06 pm | चैतन्य ईन्या

मोदी आला आणि सगळ्या जगभर पडझड झाली. सेक्युलर लोक खुश झाली. अति हुसार तर फारच खूष झाली काहीही करा पण दिवसाला एक तरी मोदीला शिवी द्या. त्याशिवाय चैन पडत नाही. गणपती गेले गावाला चैन पडेना आह्माला ह्या धर्तीवर चालू द्या जरा.

अनुप ढेरे's picture

2 Jul 2015 - 8:16 pm | अनुप ढेरे

मोदी कुठुन आले आता हितं?

चैतन्य ईन्या's picture

2 Jul 2015 - 9:33 pm | चैतन्य ईन्या

:) बास का राव. दिसला नाही म्हणून तर आणला ना मी. घ्या श्या घालून.

पैसा's picture

2 Jul 2015 - 8:14 pm | पैसा

अर्ध्या! तुझ्या पुराणात उसाग्रामाचा उल्लेख न्हवता का?

अर्धवट आणि अर्धवटराव ह्या दोन वेगळ्या आयड्या आहेत ना?

पैसा's picture

3 Jul 2015 - 9:20 am | पैसा

हा गोंधळ सुरुवातीपासून तसाच!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jul 2015 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll

हो हा अर्धवट माझ्या ओळखीचा वाटतो तोच आहे का? :)

मीच रे पुप्या, नुसता अर्धवट

रावबाजीतले आम्ही नव्हे ;)

अस्वस्थामा's picture

2 Jul 2015 - 8:21 pm | अस्वस्थामा

लाल बुडाची काडी हय.. १०० हैत बगा.. ;)

अत्रन्गि पाउस's picture

2 Jul 2015 - 9:08 pm | अत्रन्गि पाउस

म्हणजे मला तुर्कस्तान वाटायचे ...
आबासाहेब स्मिथ मला नेहेमी सांगायचे ...छांदोग्योपनिषद नीट वाच....
त्यांचे ऐकायला पाहिजे होते ...

अत्रन्गि पाउस's picture

2 Jul 2015 - 9:09 pm | अत्रन्गि पाउस

मला तुर्कस्थान वाटायचे ...असे वाचा

विशाखा पाटील's picture

2 Jul 2015 - 9:49 pm | विशाखा पाटील

शीर्षक बघून धागा (उगाच) उघडला.

वॉल्टर व्हाईट's picture

2 Jul 2015 - 10:04 pm | वॉल्टर व्हाईट

असेच वाटले.

नगरीनिरंजन's picture

3 Jul 2015 - 5:17 am | नगरीनिरंजन

लेख लै भारी!
मिपावरच्या विनोदबुद्धीला लागलेले ग्रहण पाहून थोडा खेद वाटला. असो चालायचेच.

देवा, मी केवळ कसा जमलाय याची खरी कल्पना यावी म्हणून खुलासा टाकला नव्हता.
तो असता तर अजुन बरेच लोक मौजमजेत सहभागी झाले असते कदाचित्.

कपिलमुनी's picture

3 Jul 2015 - 3:40 pm | कपिलमुनी

आजकाल मिपावर विनोदी , उपहासात्मक , विडंबन असे लिहले की खाली तळटीप टाकावी लागते.
हे विनोदी आहे . इथे हसा .

विशाल कुलकर्णी's picture

3 Jul 2015 - 4:10 pm | विशाल कुलकर्णी

आजकाल मिपावर विनोदी , उपहासात्मक , विडंबन असे लिहले की खाली तळटीप टाकावी लागते.
हे विनोदी आहे . इथे हसा .

+१

हाच काय तो इंटुक लेख? - रुपया
वा वा मस्त (भक्तांची)खिल्ली उडवणारा लेख- ऐसी अक्षरे रसिक

धर्मबुडव्या अर्धवटानं नाव सार्थ केलं.- पुराणप्रेमी
कैच्या कै लेख- असाच कुणीतरी

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 9:29 am | सतिश गावडे

=))

विकास's picture

3 Jul 2015 - 9:52 am | विकास

या लेखनाचे वर्गिकरण नक्की कशात आहे? - म्हणजे लेख का विडंबन? त्यावर काय लिहायचे याचा विचार करता येईल.

अर्धवट's picture

3 Jul 2015 - 2:44 pm | अर्धवट

अर्थातच विडंबन

फारएन्ड's picture

3 Jul 2015 - 10:02 am | फारएन्ड

लेखाचा रोख समजला, त्यामुळे मजेदार वाटला :). मात्र एक ग्रीस वगळता स्पेसिफिक संदर्भ कळाले नाहीत अजून. त्यातून आणखी धमाल येइल असे वरकरणी वाटत आहे. लेखकाने किंवा ज्यांना समजले आहेत त्यांनी थोडे स्पष्टीकरण दिले तर लक्षात येइल.

'आमच्या पूर्वजांना सगळ माहीत होतंच' अशा प्रकारचे लेखन रोज समोर एतच, तशा पद्धतीचं काही मला लिहायला जमेल का, हे पहायचा प्रयत्न होता.

लेखातली नावे शोधताना थोड़ा विचार केला होता,

खोटी यूनिवर्सिटीचं कॉथे यूनिवर्सिटी केलं
डॉ. कावेबाजचा डॉ कॉव्हे बार्ज झाला.

आणि लसैल हे शहर काही वर्षातच सर्वांना माहिती होणार आहे, ते कुठे आहे आणि कशासाठी माहिती होणार आहे हे इथेच सांगत नाही, ज़रा गुगलून बघा, म्हणजे मजा येईल.

फारएन्ड's picture

3 Jul 2015 - 5:02 pm | फारएन्ड

माहितीबद्दल धन्यवाद. हे तशा पद्धतीचे विडंबन आहे ते लक्षात आले होते लगेच - आणि जमलेही आहे. सुतावरून स्वर्ग टाईपची अनुमाने, गोष्टींच्या केवळ नावावरून साधारण तसेच नाव असलेल्या एखाद्या पौराणिक गोष्टीचा संबंध ठामपणाने डिक्लेअर करणे, सूडो-शास्त्रीय पद्धतीने केलेले अफाट दावे - सगळे चपखल!. हो ते लसैल बघतो आता सर्च करून :)

dadadarekar's picture

3 Jul 2015 - 10:07 am | dadadarekar

पुना ओक स्वर्गात बसून ढसाढसा रडले म्हणे.

विजुभाऊ's picture

3 Jul 2015 - 10:21 am | विजुभाऊ

वावावावा
केवढे छान षंषोधन.
त्या जान्हवी ला हे सांगितले असतेस तर ती म्हणाली असती.
काहिही हां श्री

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Jul 2015 - 10:25 am | पुण्याचे वटवाघूळ

आपल्या पूर्वजांना सर्व शास्त्रीय गोष्टी माहित होत्या हे सर्वांना माहितच अहे.आता त्यात अर्थशास्त्र्राचीही भर पडली म्हणायची. मागे एकदा वाचले होते की कोणत्या तरी पुराणात तैतियान नावाची नौका बुडाल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच पुराणांमध्ये टायटॅनिक बुडणार हे पण आधीच लिहून ठेवले होते.

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2015 - 4:50 pm | बोका-ए-आझम

आॅस्ट्रिया आणि प्रशिया यांच्या जवळपास असलेल्या देशांना बाल्कन देश का म्हणतात? कारण आॅस्ट्रिया हे नाव स्त्रिया आणि प्रशिया हे नाव पुरुषीय यावरून आलेले आहे आणि त्यांच्याजवळ बालकं ही असणारच.

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 11:28 am | टवाळ कार्टा

भारी लेख आहे...खुपच्च आवड्ला...असेच वर्चेवर ल्हित र्हा
"बुमिका" हा शब्द तर काळ्जाला भिड्ला

अर्धवट's picture

3 Jul 2015 - 2:43 pm | अर्धवट

शुद्धलेखनाची चूक झाली, क्षमस्व.

मृत्युन्जय's picture

3 Jul 2015 - 3:23 pm | मृत्युन्जय

जबरा लचके तोडले आहेत सो कॉल्ड संस्कृतीप्रेमींचे.

अवांतरः चला आता मी स्वतःला पुरोगामी म्हणवुन घ्यायला मोकळा ;)

अस्वस्थामा's picture

3 Jul 2015 - 3:46 pm | अस्वस्थामा

=))

Anand More's picture

19 Dec 2015 - 5:55 pm | Anand More

:-)

आदिजोशी's picture

22 Dec 2015 - 6:37 pm | आदिजोशी

भिकार