'बिग बॉस' आणि तुमचं मत !

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in काथ्याकूट
22 Aug 2008 - 2:06 am
गाभा: 

ही बातमी वाचलीत ?

'बिग बॉस' ह्या रिऍलिटी शोच्या दुसर्‍या भागात आपल्याला सहभागी होण्यासाठी बोलावूनही जातीच्या आधारावर आपल्याला वगळण्यात आले आहे / डावलण्यात आले आहे अशी तक्रार खा. आठवले ह्यांनी केली आहे ?

मिपावरची संवेदनशील चर्चा वाचून उत्सुकता वाटली की इथल्या माझ्या मित्र / मैत्रिणींना ह्या बातमीबद्दल काय वाटतं पहावं.

जर जातीच्या आधारावर रिझर्व्हेशन, बढतीमधे प्रेफरन्स इ. गोष्टींचा लाभ उठवणं वावगं नसेल तर जातीच्याच आधारावर डावलले गेल्यास तक्रार करणे योग्य आहे का ?
(इथे क्षणभर असे गृहित धरले आहे की त्या चॅनेलने खरच 'जात' हा निकष वापरून आठवलेंन वगळले आहे !)

तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

22 Aug 2008 - 2:19 am | मुक्तसुनीत

त्याचा एक एपिसोड गेल्या वर्षी पाहिला होता. भीषण कंटाळवाणा , उथळ लोकांनी , केवळ गॉसिपिंग करता केलेला प्रकार. ना त्यात कला , ना त्यात मनोरंजन. फालतू अतएव अव्हॉईड मारणेबल ! =))

विसोबा खेचर's picture

22 Aug 2008 - 6:53 am | विसोबा खेचर

तुम्हाला काय वाटते ?

आधी बोलावून नंतर डावललं ही चूकच आहे!

तात्या.

पण शो वाले असे डावलणार नाहीत,हा एकतर आठवलेचा किंवा टीव्ही वाल्याचा पब्लिसिटी स्टंट असावा.

मराठी_माणूस's picture

22 Aug 2008 - 1:45 pm | मराठी_माणूस

थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि. उलटे ह्यानि , मला असल्या कार्यक्रमाला यायला फालतु वेळ नाहि हे सांगायला पाहिजे होते. लोकानि त्याना ह्या कारणासठि निवडुन दिले का समाजाचे प्रश्न सोडवयला ?

पक्या's picture

22 Aug 2008 - 1:48 pm | पक्या

रिऐलिटी शो वाले टीआरपी वाढवण्यासाठी अनेक ड्रामा करतात जे पडद्यावर बघताना दर्शकांना खरेच वाटतात. ड्रामा म्हणजे सर्व काही आधी ठरलेले असते..कोणी काय बोलायचे, जज्ज ने कधी भांडायचे , कधी जोक्स करायचे...याचे पूर्ण स्क्रिप्ट तयार असते.

पण तरीही जातीच्या आधारावर डावलणे हे चूकच.
आणि त्यातही आधी बोलावून नंतर फक्त जातीच्या आधारावर डावलणे ही चूकच!

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 2:12 pm | भडकमकर मास्तर

थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि.
कोणी काय बोलायचे, जज्ज ने कधी भांडायचे , कधी जोक्स करायचे...याचे पूर्ण स्क्रिप्ट तयार असते.

सहमत...
पण जातीच्या आधारावर डावलायचे असते तर आधी विचारले कशाला असते ?
काहीतरी वेगळे कारण असणार...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विदुषक's picture

22 Aug 2008 - 2:51 pm | विदुषक

आपण दिलेल्या कराच्या पैश्यातुन ह्या चोर लोकाना (खासदार) भत्ते मिलतात आणी हे ३ महीने त्या 'बिग बॉस' च्या घरात जाउन १ कोटी रुपये कमवणार
ह्या लोकनाच मारायला पहीजे
मजेदार विदुषक

भास्कर केन्डे's picture

22 Aug 2008 - 8:18 pm | भास्कर केन्डे

आणि या तीन महिन्यात जनतेची सेवा करा म्हणावे. आंबेडकरांचा वारसा सांगणर्‍यांना या भामट्यांना तीन महिने त्यांच्या सारखे सेवाभावाने जगून दाखवा म्हणावे!

आपला,
() भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2008 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

अमीरखानचा भाऊ फैझलखानलाही डावलले आहे अशी बातमी आहे. त्याला अमीरखानच्या सांगण्यावरून डावलले असा त्याचा आरोप आहे. तो कोर्टात जाणार आहे.
मला आशा आहे 'राखी सावंत' पुन्हा येईल.

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 3:14 pm | भडकमकर मास्तर

पण या वेळी एक से एक लोक जमवले आहेत, हे बाकी खरे....
...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

राधा's picture

22 Aug 2008 - 8:04 pm | राधा

सगले पब्लिसीटी स्टंट्.................नको तिथे ओरडल की लोकांचा लक्ष जाणारच .............

थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि. उलटे ह्यानि , मला असल्या कार्यक्रमाला यायला फालतु वेळ नाहि हे सांगायला पाहिजे होते. लोकानि त्याना ह्या कारणासठि निवडुन दिले का समाजाचे प्रश्न सोडवयला

हेच माझाही मत आहे..........

बाबा चमत्कार's picture

22 Aug 2008 - 8:23 pm | बाबा चमत्कार

अहो ही सगळी वेळ घालवण्या चि साधने आहेत. काहि तरी म्हने एकत्र रहा आनि आप्ण त्याना बघा....कुनाला वेळ आहे दुस्र्यान्च्या नकलि जीवनात डोके घालायला?

देवदत्त's picture

22 Aug 2008 - 9:54 pm | देवदत्त

ही ही ही ...
म्हणजे एखाद्या खासदाराला किंवा लोकांच्या नेत्याला अशा कार्यक्रमात बोलावले म्हणजे त्याला जिंकवावेच लागेल. अन्यथा शेवटच्या २ पर्यंत तो पोहोचला आणि हरला तरी तेच म्हणणार 'मला डावलले गेले'.

=)) =)) =)) =)) =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात