७ जून - ऐतिहासिक पुणे कट्टा (पुण्यात सगळेच ऐतिहासिक हो)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in भटकंती
16 Jun 2015 - 4:20 pm

कालचा ठाणे कट्टा व्हायच्या आत ७ जूनच्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचे ठरवले होते...नै जम्ले...असो...हा ७ जूनच्या कट्ट्याचा मेगा-मेगाबायटी वृत्तांत :)

६ जूनचा कट्टा रात्री उशीरापर्यंत झाल्याने ७ ची सकाळ आळसावून उठण्यात गेली...सकाळची सर्व आन्हिके आटपायलाच साधारण ११ वाजले. तिथून मोर्चा सूडच्या घरी नेला...तो रात्री न घाबल्ता झोपला हे ऐकून सर्वांनीच कौतीकाने (की खौचटपणे?) त्याची पाठ थोपटली. :) त्याने दिलेला चहा पितापिताच पनीर शेख आजच्या कट्ट्याचे मानाचे टांगारू होणार असे त्याने स्वत:च जाहीर केले...जागतिक मिपातीहासातला हा पहिलाच कट्टा असावा ज्याला खुद्द उत्सवमुर्तीनीच टांग दिली असेल. =)) असो...पनीर शेखला तुळशीबागेत (धन्या नक्की इथेच ना? मी विसरलो) सोडणासाठी मी सुडच्या बाईकवर आणि पनीर सगाच्या बाईकवर बसून आमची यात्रा सुरु झाली. रस्त्यात बर्याचदा सगाची आणि सुडची चुकामुक होत होती त्यामुळे नक्की कोणाला बरोबर रस्ता माहित आहे याची शंका घेण्यास बराच वाव होता. शेवटी एकदाची पनीरची डिलिव्हरी तुळशीबागेत करून आम्ही पाताळेश्वराकडे कूच केले.
आदल्या दिवशी "दमामि" प्लान ठरल्याप्रमाणे सूडने मला पाताळेश्वराच्या थोड्डेस्से आधी उतरवले आणि तो पुढे गेला...त्यानंतर मी गेलो...आत जाताच सगळ्यात पहिले दृष्टीस पडलेले दृश्य म्हणजे एक अतिभव्य वडाचे (का पिंपळाचे?) झाड आणि त्याच्या पाराभोवाती जमलेली अघळपघळ १०-१२ लोक्स. बाकी परिसरात आणखी एक ग्रूप होता पण तो ग्रूप अगदी व्यवस्थित मोजून मापून शिष्टासारखा वागत होता त्यावरूनच ताडले की पहिला ग्रुप हेच्च मिपाकर (अख्खा परिसर आपल्या पूर्वजांची इष्टेट असल्यासारखे आरामात बागडत होते मिपाकर) :D

मग मी हळूच दबकतच ग्रुप जवळ गेलो (तर काय...न जाणो कुठूनतरी काटे / लाठ्या / लाटणी यांचा हल्ला झाला तर काय?...माझ्याकडे हेम्लेट आणि इंश्युरंस दोन्ही नव्हते) ;) आधी खात्री केली की कोणाच्याही हातात (स्पेशली बैकांच्या हातात) काही नाही :)
मी गपचूप शहा काकांच्या आणि उपास नाव असणार्या (पण उंच आणि खात्यापित्या घरातल्या वाटणार्या) आयडीच्या बाजूला जाउन उभे राहिलो आणि त्यांच्याशी ओळखी करून घेतल्या. बाजूलाच चिनार (मिपाकर आयडी हो नैतर म्हाग्रूंच्या गाण्यातले झाड समजाल) उभा होता...त्याला वाटतो तितका वेंधळा नाहीये तो :D (take this in positive spirit रे) समोरच आगोबा आगाऊ सारखा गोबर्या गालांत हसत उभा होता आणि त्याच्या बाजूला युनिफॉर्म मधले गुर्जी. दोघांनी जो काही साळसूदपणाचा आव आणत अगदी निरागसपणे "कोण हो तुम्ही?" असे विचारले ते पाहून तर सगळ्या लीवुडातले (हॉ म्हणू नका...बॉ म्हणू नका...कॉ म्हणू नका...) या दोघांकडे अभिनयाची शिकवणी लावायला येतील :D
मी "दमामी" असे बोलताच बाजूलाच उभ्या असणार्या इ.एक्का काकांनी लग्गेच्च कान टवकारले आणि स्वत:हून माझी ओळख करून घेतली. तिथेच मिपामालक निलकांतसुध्धा होते. दोघांनी मला आपादमस्तक न्याहाळले...दोघांच्याही नजरेत "हा दमामि???" असा प्रश्न सपष्ट दिस्ला...नजर बघूनच माझे कॅरेक्टर स्कॅन करणे सुरु आहे हे माझ्याही लक्षात आलेले (शेवटी युनिफोर्म असो वा नसो...नजर कधीही आउट ऑफ ड्युटी नसते) ;)
हे सगळे होत असतानाच शहाकाकांनी मिठाईचा बॉक्स उघडला आणि सगळेच त्यावर तुटुन पडले...आणखी कोणी मात्र काहीच्च आणले नव्हते (अभ्याने चटणी आणलेली पण ती फक्त दाखवायला)...शहाकाका बिचारे पुण्यात अजून रुळले नसावेत व्यवस्थित (पुणेकर कोणाला सार्वजनिक जागी भेटत असेल तर भेटायला येणार्याने आधीच खाउन यायचे असते असे ऐकून आहे...खाखोदेआपुजा)
तितक्यात अचानक तिथे अभ्या आला...कट्ट्याला जे येणार होते त्या सगळ्यांना आदल्या दिवशी फ़ोनवून "दमामि"ची सेटिंग लावलेली...नेमका अभ्या आला आणि त्यात घोळ होणार असे वाटू लागताच सगाने अभ्याला कोपच्यात घेऊन खर्चापानी द्यायच्या भाषेत समजावले (ते बघून कोणालाही जेरीने टॉमला कोपच्यात घेतले आहे असे वाटलेले)
तितक्यात वल्लीला मिपामालकांकडून २ अवजड ग्रंथांची भेट मिळाली आणि वलीचा चेहरा जत्रेत लॉलिपॉपं मिळालेल्या लहान मुलासारखा उजळला...फक्त आनंदाने उड्या मारायचे काय ते बाकी ठेवलेले (घरी उड्या मारतो का ते विचारायचे राहिले :D). सूडने (का अभ्या?) मात्र "किती किलोच्या रेट ने मिळाली?" असा खौचट्ट्पणा केलाच =))...या सगळ्यात प्रशांत मात्र (तोच तो डूआयाडी अप्रूव्ह कर्णारा :D) सगा आणि अभ्या ब्रोब्र काहीतरी कानगोष्टी करत होता...जुन्या काळातल्या गोष्टींवर चर्चा सुरु होती अशी आतल्या गोटातली खबर आहे म्हणतात...खाखोदेजा...आपल्याला कै त्याचे (कंपू कंपू म्हणतात ते हेच्च काय?)
मघाशी लिहिल्याप्रमाणे तिथे जो दुसरा ग्रुप होता तो या वेळेपर्यंत शिस्तीने रिंगण करून गवतात बसला होता...त्यांचा कैतरी आपापसात वार्तालाप सुरु होता आणि मिपाकर मात्र त्यांच्या भोवती पळत "मामाचं पत्र हरवलं" ओरडत त्यांची शाळा करायचा इब्लिस प्लान बनवत होते :D

हे सगळे सुरु असतानाच एका बाजूला "शेप्रेट" मिनाहिता कुजबुजत होत्या (रंगांण्णा...वाचताय ना? मिनाहिता = मिपाकर + अनाहिता), अगदी पार फोनवर सुध्धा कुजबुजणे सुरु होते (आधी वाटले पैसा तैंचा फोन असेल...सारख्या विचारात असतात खफ़वर)...सोत्ताच्या डोळ्यांनी बघितले हो...मिपाकरांच्या कट्ट्यात सुध्धा अनाहितांचे शेप्रेट मानाचे पान अस्ते. सगळ्या एकत्र उभ्या राहून "हाच्च का तो? नक्की का? नसेल तर? वाटतोय खरा पण नसू सुध्धा शकतो...बघू तर खरे" असे म्हणून "ए कोण रे तू?" असे घाब्लत घाब्लत विचाल्ले llllllluuuuuullllllluuuuu...मी दमामि असे सांगताच्च तोंड एवढ्ढुस्स झाले सगळ्यांचे...तरी परत परत पडताळणी सुरूच होती...अगदी "दमामि" मधला मि पहिला की दुसरा असे कैच्याकै विचारणे झाले एकदा...मनात शंका आलेलीच की कोणि फितूर मिपाकराने माझा फ़ोटो अनाहितांना whatsapp वर पाठवला की कै...शक्यता नाकारता येत नाही...मिपावर भुंगेसुध्धा आहेत ;)

हे सुरु असतानाच काही इब्लिस मिपाकरांनी अभ्याला टका टका असे चिडवायला सुरु केली...आणि अभ्या चुळबुळत चक्क लाजला (चायला नाव खराब केले माझे)...अनाहितासुध्धा माझी उलटतपासणी सोडून अभ्याला कोपच्यात घ्यायची तयारी करू लागल्या आणि तितक्यात त्या आकाशातल्या बापाला अभ्याची दया आली (पुण्यवान हैस रे)...जो जोरादार पाउस सुरु झाला की सगळ्यांना इतक्यावेळ दुर्लक्षित असणार्या पाताळेश्वराची आठवण झाली आणि सगळे लेण्यात पळाले :)...ते शहाकाका मात्र त्यांच्या शहाकाकूंसकट तिथेच होते...चायला जाम वैतागलो स्वत:वरच त्यांना तिथेच सोडून आलो म्हणून...बेक्कार वाटत होते :(

पाताळेश्वराच्या मंडपात मिपाकरांचे २ तट पडले...शिणीयर आणि जुणियर...मी अर्थातच more happening जुणियर गटाला जाउन मिळालो...इथे अभ्याने आणलेल्या चटणीला इष्टेट समजून त्याच्या वाटणीसाठी वल्ली, सगा, सूड आणि प्रशांत (तोच्च तो डूआयाडी अप्रूव्ह कर्णारा :D) यांच्यात गडबड सुरु होती...त्यांच्यातल्या कोणीतरी एकाने हळूच चटणीचे १ पाकिट शिताफीने लांबवले...हाथसफाईची प्रक्टिस जोर्दार असावी ;)
तितक्यात इ.एक्का काका "ए...चला चला...फ़ोटो फ़ोटो" करत दुडकत आले...मग रीतसर प्रकाशाकडे पाठ करून एकाच्या खांद्यावरून दुसर्याचे डोके आणि तिसर्याचा हात टैपचे फ़ोटो काढून झाले...त्यांचे बघून चिमीसुध्धा "ए मलापन मलापन" करत आली...मग परत त्याच पोज मध्ये तेच फ़ोटो काढून घेतले गेले :) इतक्यावेळात पाउस ओसरला होता त्यामुळे मिपाकर परत बाहेर पसरले...इतक्यात आला आला आला असा गलका झाला...आणि तिकडून वाल्गुदाचार्य खाटूकम्यान उर्फ अनांचा दोडोबा याचे आगमन झाले...चायला त्याच्याकडे बघून कळ्ळण्णार पण नै की त्याच्या डोक्यात कित्ती संस्कृत भरले आहे (पक्का पुणेकर आहे असेही ऐकू आले...म्हणजे कोणत्याही वादविवादात शेवटचे वाक्य आपलेच्च अस्सले पाहिजे...खाखोदेजा)...सगा पाताळेश्वरला झालेल्या आधीच्या कट्ट्यातील कालसर्पाच्या आठवणीने अंमळ भावूक झालेला त्यामुळे तो जास्त बोलत नव्हता भौतेक :D

पाउस थांबलेला असल्याने अजया आणि विशाखा तै यांनी परत मोर्चा आमच्याकडे वळवला...परत एकदा "टका कोण??" चा खेळ रंगला...अभ्याला लाजण्याशिवाय काही करताच येत नव्हते त्यामुळे तो कधी सगाच्या मागे कधी सूडच्या मागे असा लपत बुटाच्या आतल्या पायाच्या अंगठ्याने नसलेली माती उकरायचा क्षीण प्रयत्न करत होता (माझे नाव खराब केले चायला)

इतका वेळ वल्ली मात्र फारच चुळबुळ करत होता...बहुतेक इतका वेळ पाताळेश्वरला उभे असूनही लेण्यात जाता न आल्याने ती चुळबूळ असावी असेच सगळ्यांना वाटत होते (आणि लेण्यांत जाण्यास कोणास इंटरेस्टसुध्धा नव्हता :D )...परंतू थोड्याच वेळात काही सुबक जिवंत लेणीसुंदर्या लेण्यांमध्ये शिरताच वल्लीने सगाकडे "ए चल ना लेण्यात" असा लाडिक घोषा लावला परंतू सगाने विरक्त संन्याशाप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले...आणि थोड्याच वेळात लेणीसुंदर्या लेण्यांतून बाहेर पडल्या...मी पाताळेश्वरला पहिल्यांदीच गेलो असल्या कारणाने आलोच आहे तर आतसुध्धा जाऊन येऊ असा विचार करून वल्लीसोबत लेणीदर्शनासाठी गेलो...सोबत ओककाका आणि आणखी एक बुजुर्ग मिपाकरसुध्धा (त्यांचे नाव विसरलो आता) बरोबर होते. लेण्यांच्या दारातच वल्लीने उत्साहाने एक शिलालेख दाखवला आणि तात्क्षणी वल्लीला सगासारखेच आणखी एक लेण्यात झोपणारे सजीव शिल्प सापडल्याचा साक्षात्कार झाला :D यथावकाश लेण्यांमध्ये फ़ेरफ़टका मारून बोरकरांना बोर करून आम्ही बाहेर आलो तोपर्यंत खादाडीसाठी कुठे जायचे यावर (परत एकदा) काथ्या कुटला जात होता (पुणेकर फारच चोखंदळ हो). मग (आधीच ठरल्याप्रमाणे) राजधानी सगळ्यात बेष्ट असेल असे ठरवले गेले आणि सगळ्यांनी तिथे कूच केले.
तिथेच काही मिपाकरांनी काही अपरिहार्य(?) कारणांमुळे जेवणासाठी थांबता येणार नाही असे जाहीर करून सगळ्यांचा निरोप घेतला. त्यातच मिपामालक सुध्धा होते...त्यांनी जाता जातासुध्धा "हं...दमामि" असी हाक मारून माझे दंड चाचपडून मी नक्की हाडामांसाचा मिपाकर असल्याची खात्री करून घेतली :D...राजधानीकडे जाताना मिपाकर आपापल्या कंपूनुसार घोळक्याने चालत होते...माझा (अजूनपर्यंत) कोणताच कंपू नसल्याने मी सूड आणि खाटूकच्या बरोबर निघालो...त्या दोघांचे काहीतरी भाषाशास्त्र विषयक चर्चा सुरु होती...तो आपला प्रांत नव्हे मुळे मी शांतपणे त्यांच्या मागून जात गेलो...तसा मी नेहमीच शांत असतो :)

आदल्या दिवशीचा कट्टा दणदणीत झाल्याने ७ चा कट्टा फार म्हणजे फारच मिळमिळीत वाटत होता शेवटी मीच कंटाळून "मीच तो (the one and only) टका" असे जाहीर करायचे ठरवले. राजधानीमध्ये पोचताच दू दू आगोबा + सगा + सूड या त्रिकूटाने इ.एक्काकाकांना ते आधी बसलेल्या अनाहितांच्या टेबलावरून उठवून स्वत: बरोबर बसवले त्यामुळे मला जेवायला बसायला फक्त अनाहितांचे टेबलच होते...म्हटले जौदे मी थोडीच घाबरतोय आणि अजया + विशाखा + चिमी + सुरन्गी तैं बरोबर एकाच टेबलवर बसलो...बाजूलाच "अजयांचे हे" शांतपणे बसलेले...पुर्ण जेवणात जर्रा काही हू का चू केले नाही...बहुतेक अनाहिता ग्यांग मुळे दबले असावेत. बाजूच्या टेबलावर दू दू आगोबा + सगा + सूड या त्रिकुटाला आता इ.एक्काकाका सुध्धा सामील झालेले आणि आमच्या टेबलावर काटे + लाटण्या + काठ्या यांचे धडामधूडूम कधी सुरु होते याची वाट बघत होते. lllllluuuuulllllluuuuu. मी नेहमीप्रमाणे शांतच होतो :)...आणि हीच ती वेळ हाच तो क्षण जेव्हा मी जाहीर केले "मीच टका" :) आणि अनाहितांनी लग्गॆच चेहर्यावरून आम्हाला वाटलेलेच पण नंतर "दमामि" कांडामुळे गोंधळल्या अशी रिअ‍ॅक्शन दिली...चायला नंदी पलेस कट्ट्याला गेलो तेव्हा सग्गळ्या मिपाकरांनी मी कित्ती शांत सोज्वळ आहे असे लग्गेच्च ओळखलेले पुणेकर मात्र आंजावरच्या इंप्रेशनवरूनच मते बनवतात भौतेक आणि मला टवाळ म्हणून उग्गीच घोषित केले...पण मग अजया तैंनी "ही कार्टी मिपावर वात्रट आहोत असे दाखवतात हो पण खरोखर चांगली आहेत पोरे" अशी करून पांढरे निशाण दाखवले ;) मग मी शांतताप्रिय असल्याने मी सुध्धा जास्त भाव न खाता शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला...आणि बाजूच्या टेबलावरुन "श्या कैच झाले नाही" अश्या टैपच्या प्रतिक्रीया आल्या lllllluuuuulllllluuuuu. माझ्यासाठीच्या पुस्प्गुच कुठे आहे असे विचारताच तो पैसा तैंनी भाड्याने नेला आहे असे समजले :D पैसातैंनी सुध्धा इतक्या वेळा खफवर सगा आणि चिमणूला सांगितलेले "टका बाजूला असताना फोन करा" (कॉलचे पैसे वाचवून ब्यांकेत एफडी करणार आहेत म्हणे आणि मिळणार्या व्याजाने मंगेशीच्या मागल्या आळीतल्या कोपर्यावरच्या शेंदूर फासलेल्या मारूतीसमोर महिन्यातून एकदा अश्या वर्षाला १२ अगरबत्त्यांची देणगी एकरकमी १२ हफ़्त्यांत देणारैत :D पण त्यांच्याब्रोब्र सुध्धा बोलणे राहून गेले. विशाखातै मिपावरच्या + मिपाबाहेरच्या शेलेब्रीटी असूनसुध्धा भावनै खाल्ला. चिमी तै (माझ्यापेक्षा मानसिक वयाने थोड्डीशीच मोठी आहे म्हणून तै...नैतर काकू म्हटले अस्ते :D) थोडी इथे बघ थोडे तिथे बघ असे करत आमचे बोलणे ऐकत होती (तिचे लग्न झालेले आहे रे मिपावरच्या भुंग्यांन्नो...उग्गीच कट्ट्याचे फोटो बघून प्लान नका बनवू...तोडावर आपटाल :P. आणि तिच्या बाजूला (आणि माझ्या समोरच) सुरन्गी तै होत्या...त्या मात्र आल्याआल्या मला ठ्यांकू म्हणाल्या (तसेच नंतर बोलताना त्यांच्या गाडीतून मला ठाण्यापर्यंत लिफ़्ट देऊ का असेही विचारले)...का असे विचारताच मी अजाणतेपणे त्यांच्या बाजूने कोणा दुसर्या मिपाकाराचे बूच मारले असे समजले...असेल बुवा...मी चांगली कामे करतच असतो...काय काय लक्षात ठेवणार ;) (सुरन्गी तै आपला कंपू बन्वैचा कै?) बोलता बोलता समजले की आदल्या दिवशी सुरन्गी तै संध्याकाळी ७:३० वाजता दुसर्या एका कामासाठी शोरबाजवळ होत्या :) पण कोणी मिपाकर न दिसल्याने त्या निघून गेल्या (आणि एक भन्नाट कट्टा मिसला) मध्येच विशाखातैंनी ६ च्या कट्ट्याला मिपाकरांना अनाहितांसमोर अपेयपान करण्यास कसेतरीच वाटले असते म्हणून ६ च्या कट्ट्याला अनाहितांना निमंत्रण नव्हते असा आरोप केला...त्यावर मी सुध्धा "कट्ट्याच्या ठिकाणी मिपाकरांबरोबरच हॉटेलात दुसर्या कोणाचेही विमान टेक ऑफ नाही होत अशीच ठिकाणे विचारात घेतली गेलेली असा जोरदार प्रतिवाद केला" (रच्याकने एकाही अनाहीतेने ६ च्या कट्ट्याला हजर नसणार याची काहीच कल्पना का दिली नै? आधी समजले असते तर हॉटेल शोधायचा त्रास १०० पट कमी झाला असता की...गिर्जाकाकालासुध्धा यायला जमले अस्ते).
आपले लग्न झालेलो आहे हे मिपावर सग्गळ्यांना माहीत आहे हे कसे चांगले यावर एक बौध्धिक झाले (भुंग्यांचा त्रास कमी असतो असे अनुभवी अनुमान निघाले). इतक्यात चिमीने माझ्याकडे बघून "ए बादशाही मी सांगितलेली ना...सांग ना रे या सूडला" असा आवाज काढला :D मग ध्यानात आले की सुडने बादशाही सुचवणार्या आयडीला पैठणी देण्याचे जाहीर केलेले...पैठणीच लागेल आणी पितांबर लागणार नाही याची कल्पना त्याला कशी होती देव जाणे...जौदे आपल्याला कै ;) (सूडला मिपाचे पैठणीवाले भौजी घोषित करावे कै???) रच्याकने मी चिमीला पाठिंबा द्यावा यासाठी चिमीने मला लाच देऊन फितूर करायचा प्रयत्न केला पण मी (माझी प्राईस तिला न परवडल्यामुळे) बधलो नै...(वरच्या त्रिकूटांनो शिका रे कैतरी की अनाहितांसमोर कशी मान तुकवू नये...unless you get correct price ;) ). तिथून गप्पा मग माझ्या लग्नावर पोचल्या (का पोचवल्या???). रितसर माझे नाव गाव फळ फुल विचारून झाले आणि अपेक्षा विचारल्या..."can drink alcohol" अस्से सांगताच "अय्या काय म्हणतोस", "अग्गॊबाई" असे चित्कार निघाले :D. शोधू हा नक्की शोधू असे आश्वासन तरी देण्यात आलेले आहे आता :)
हे सगळे सुरु असतानाच दुसर्या बाजूच्या टेबलावर दंबूकफ़ेम बाबा पाटील कधी येऊन बस्ले ते समजलेच नै...एक्दम ड्याशिंग हिरोटैप पर्सनॅलिटी आहे...वळख ठिवा पाटील :)
इतक्यात लक्षात आले की अरेच्चा जेवण संपले सगळ्यांचे...१ तासात खादाडी संपली??? चायला आमचे मुंबईचे कट्टे बरे यापेक्षा...
हे होईतो दुपारचे २:३५ झालेले आणि मग लक्षात आले की अर्रेच्चा माझी ३:०० वाजताची शिवनेरी चुकू शकते...मग सूडला त्याचा रथ सज्ज करण्यास पिटाळले...राजधानीमध्ये सगळ्यांकडून वसुली करून बील भरेपर्यंत २:४० झाले तितक्यात सुरन्गी तैंनी दिलेली लिफ़्टची ऑफर आठवली. आधी गोड बोलून मला गाडीत घ्यायचे आणि पोत्यात घालून मधेच सोडायचे अस्सा प्लान असू शकतो असे एकदा वाटून गेले...पण शिवनेरी चुकल्यामुळे हे धाडस करायचे ठरवले \m/. हे समजताच सूडने जो आ वासला तो मी जाईपर्यंत बंद नव्हता झाला :D. आणि त्या वेळेस राजधानीच्या बाहेर एकाच वेळेस साश्रूनयने + काळजीयुक्त चेहरे + बेरकी नजरा + जळफ़ळाट बघायला मिळाले. तिथून चिमीला रस्त्यात सोडून (म्हणजे तिच्या घराच्या रस्त्यावर सोडून) मी आणि सुरन्गी तै रिक्षाने सुरन्गी तैंच्या जावेच्या घरी पोचलो. तिथे पोचल्यावर एक छोट्टासा सरबत कट्टा झाला ज्यात मिसळपाव म्हणजे काय यावर चर्चा झाली (भौतेक अजून एक अनाहिता वाढणार आता)...परत एकदा माझे नाव गाव फळ फुल विचारून झाले आणि वधुसंशोधनाचे अज्जून एक आश्वासन मिळाले. तिथून मात्र जे निघालो ते डायरेक्ट घरापर्यंत...आणि अश्या रितीने एक विकांत सार्थकी लाग्ला :)

नव्याने शिकलेल्या गोष्टी + काही निरीक्षणे

६ तारखेचा कट्टा हा खाजगी कट्टा करायचा बेत सुरु होता...मी आणि चिमण मिळून दीपकला म्हणालो की बाकी कोणीही छुपे कट्टे करत असूंदे पण आपण जाहीर कट्टा करू...आणि आधीच्या कट्टावृत्तांतात बर्याच जणांनी हजेरी न लावता आल्याने हळहळ व्यक्त केलेली...पण या कट्ट्याला पुणेकरांचा चोखंदळपणा पाहून यापुढे कानाला खडा आणि मी तरी पुन्हा पुण्यात जाहीर कट्टा आयोजित करणार नै...it's just not worth to take efforts

६ तारखेचा कट्टा पक्षी + तीर्थ प्रकारातील होता तरीसुध्धा त्याबाबत काही मिपाकरांच्या प्रतिक्रीया या "आयला बैकांबरोबर कसले दारू कट्टे आयोजित कर्ता" टैपच्या होत्या तर काहींचे imagination हे "मिपाकर पडेपर्यंत दारू प्यायले तर?" अथवा "कोणाचे विमान टेक ऑफ करून तमाशा केला तर?" या टैपचे होते. त्यांना इतकेच सांगू इच्छितो की "sensible drinking" नावाचासुध्धा एक प्रकार अस्तो...नसेल माहिती तर माहिती करून घ्यावी.

६ तारखेचा कट्टा पक्षी + तीर्थ प्रकारातील होता तरीसुध्धा त्यासाठी अनाहितांना आमंत्रण होते...अनाहिता येणार म्हणून कट्ट्याचे ठिकाण कटाक्षाने upscale असावे याबाबत मी स्वत: आग्रही होतो...त्या कट्ट्याला अनाहिता आल्या नाहीत याबाबत आक्षेप नाही पण ३ धाग्यांत मिळून जो गोंधळ घातला गेला त्या ३५०+ प्रतिसादांमध्ये एकाही अनाहीतेने लिहू नये की "बहुतेक एकाही अनाहिता ६ च्या कट्ट्याला येणार नै". तसे लिहिले असते तर ६ च्या कट्ट्याचे ठिकाण ठरवायला कैच्याकै कमी वेळ लागला असता. त्यामुळे यापुढे जो पर्यंत अनाहिता "मी येणार" असे पक्के सांगत नाही तो पर्यंत अनाहीतापैकी कोणीही येणार नाही असाच माझा पवित्रा असेल.

कट्ट्याचे ठिकाण ठरवायला पुणेकरांनाच आवाहन केलेले कारण मला पुण्यातले काहीही माहित नाही...मी असाच विचार केलेला की पुण्यातले लोक मिळून सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण ठरवतील...परंतू मला असाच feel आला की शक्यतो पुणेकर स्वत:ला जायला सोयीचे पडेल असेच ठिकाण ठरवतात. शिका कैतरी जरा मुंबैकरांकडून lllluuuuulllluuuuu

कट्ट्याला कोण कोण येणार त्याच्या हजेरीसाठी नवीन धागा??? इतके लाड??? चायला आम्ही मुंबैकर फाट्यावर मारतो इतके नखरे असतील तर...यायचे तर यावे स्वागतच असेल पण नाही आले तर शष्प कै फरक नाही पडत.

प्रतिक्रिया

शेवटच्या वाक्याने झकास वृत्तांताची मजा घालवली. असो. छान कट्टा!

चिमी's picture

16 Jun 2015 - 4:57 pm | चिमी

आणि लाच वगैरे काही देणार नव्हते बर का..
तु प्राईस तशीही सांगितली नव्हती.
प्राईस परवडली नाही म्हणे -- निरर्थक आत्मरंजन .....

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:17 pm | टवाळ कार्टा

मी प्राईस सांगीतलेली...सुरन्गी तै हैत साक्ष द्यायला :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2015 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

नया है वह !

आता वृत्तांत इतका खुसखुशीत लिहीलाय तर शेवटही सुधारेल हळू हळू ! ;) :)

पैसा's picture

16 Jun 2015 - 4:41 pm | पैसा

=)) भेट तू.

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा

काजूसाठी "तु ये तुला फुक्कट देईन" अशी कै ऑफर असेल तर विचार केला जाईल :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jun 2015 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काजु ऐवजी काजुफेणी असा बदल केलात तर २ तासात पण भेटेल तो. =))

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 10:45 am | टवाळ कार्टा

१ थेंब काजूफेणीची चव घेउन बघितली आहे...अज्जीबात आवड्ली नै

पैसा's picture

17 Jun 2015 - 11:00 am | पैसा

तुला फुक्कट देईन. काजू नीरा पासून सगळे.

फटके मागे घेतले आहेत,छान वृ लिहिल्यामुळे!मी लिहिल्यासारखे वाटतंय ६ ला कोणी अनाहिता मिपाकर येतील असं वाटत नाही!चुभुदेघे!
शेवट असा काय केलास पण!

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

नखरे बघून खूप वैतागलेलो एका क्षणी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jun 2015 - 7:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता सत्य सांगायला हरकत नाही. ६ च्या कट्ट्याला नं यायची तीन कारणं, एक म्हणजे दारु दुसरं म्हणजे धाग्यावर लैचं जास्त काथ्याकुट केला त्यामुळे यायची इच्छा मरुन गेली तीन घरी काम चालु आहे. पुढच्या वेळचा कट्टा मी आयोजित करेन. त्यावेळी गोंधळ कसा नाही घालायचा हे शिकविन रे. बादवे एवढा चांगला वृत्तांत लिहिलास पण शेवटच्या वाक्यानी सगळा विरस केला.

यसवायजी's picture

16 Jun 2015 - 7:28 pm | यसवायजी

नव्याने शिकलेल्या गोष्टी + काही निरीक्षणे
याची गरज नव्हती.
एवढा चांगला वृत्तांत लिहिलास पण शेवटच्या वाक्यानी सगळा विरस केला. +१११

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 7:50 pm | टवाळ कार्टा

दारू हे कारण असेल तर मग एकदा येच तीर्थकट्टा कसा अस्तो ते बघायला

चिमी's picture

16 Jun 2015 - 4:44 pm | चिमी

--- त्यांचे बघून चिमीसुध्धा "ए मलापन मलापन" करत आली... ---
काहीही हा टक्या .. ;)

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

खिक्क...पण ते श्री आणि टका यात यमक जुळत नै

मुक्त विहारि's picture

16 Jun 2015 - 4:49 pm | मुक्त विहारि

झक्कास...

छान व्रुत्तांत...

खटपट्या's picture

16 Jun 2015 - 4:54 pm | खटपट्या

वा वा खूप छान व्रुत्तांत !! मस्त टपल्या मारल्या आहेत...
तुझ्याकडून शिकाय पायजे

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:24 pm | टवाळ कार्टा

काहीही हा खटपट्या =))

मदनबाण's picture

16 Jun 2015 - 5:01 pm | मदनबाण

हा.हा.हा... { सध्या इतकेच ;) }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

मृत्युन्जय's picture

16 Jun 2015 - 5:04 pm | मृत्युन्जय

पण या कट्ट्याला पुणेकरांचा चोखंदळपणा पाहून यापुढे कानाला खडा आणि मी तरी पुन्हा पुण्यात जाहीर कट्टा आयोजित करणार नै...it's just not worth to take efforts

हुस्शा... सुटले पुणेकर. किती तो अजागळपणा कट्टा ठरवताना. एक मुवि नसले की मुंबैकरांनी एक कट्टासुद्धा धड ठरवता येत नाही. छ्या.... ;)

कट्ट्याचे ठिकाण ठरवायला पुणेकरांनाच आवाहन केलेले कारण मला पुण्यातले काहीही माहित नाही...

धागा काढुन ठिकाणे ठरवायची नसतात टकाशेठ. फक्त माहिती घ्यायची असते. ठिकाण संयोजकानेच डोके वापरुन ठरवायचे असते. आत्तापावेतो कुठल्यातरी कट्ट्याला असे जाहीर धागे उघडुन ठिकाणे ठरवली गेली होती का? सूचना मागवल्या जातात आणि मग आयोजक योग्य जागा ठरवतात आणी जाहीर करतात. असो.

मी असाच विचार केलेला की पुण्यातले लोक मिळून सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण ठरवतील...

टका तुला कळकळीची विनंती आहे रे. आयुष्यात काहिही कर पण इव्हेंट मॅनेजमेंट नको करु. तुझ्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे.

परंतू मला असाच feel आला की शक्यतो पुणेकर स्वत:ला जायला सोयीचे पडेल असेच ठिकाण ठरवतात.

माझ्या घरापासून १६ किमी लांबचे ठिकाण सगळ्यांना सोईचे म्हणुन सुचवले होते. असो. मी म्हणजे सगळे पुणेकर नाही तरी हा असा फील तुला का आला कुणास ठाउक. तुला कुठे सगळ्या पुणेकरांच्या घराचे पत्ते माहिती आहेत. टेल टेल गोपी टेल.

शिका कैतरी जरा मुंबैकरांकडून lllluuuuulllluuuuu

पुर्वीचे पुणे राहिले नाही पण पुण्यावर अजुन इतके वाईट दिवसही आलेले नाहित रे टका :P

एक मुवि नसले की मुंबैकरांनी एक कट्टासुद्धा धड ठरवता येत नाही. छ्या.... ;)

+१

सुबोध खरे's picture

16 Jun 2015 - 7:06 pm | सुबोध खरे

सूड आणि इतर
रात्री दहा वाजता दोन तासात कट्टा ठरवून दुसर्या दिवशी सकाळी (ते सुद्धा रविवारी) सात वाजता सर्व साक्षींच्या घरी आठ मिपाकर पोहोचले त्यात विमे आणि प्रास भाऊ ३० किमी दूर दादर वरून आले होते.
तेंव्हा पुणेरी लोकांनी मुंबईची बरोबरी करणे सोडून द्यावे हि विनंती. शेवटी मुंबई ती मुंबई.

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 7:12 pm | प्रचेतस

आदल्या रात्री कट्टा करून शिवाय १०:३० वाजता मिपा भटकंती ठरवून दुसर्या दिवशी भल्या पहाटे ५ ला उठून ८० किमी दूर असलेल्या कोरिगडच्या जंगलात दिवसभर भटकायला गेलेले पुण्याचे मिपाकर प्रत्यक्ष पाहिले आहेत त्यामुळे असोच.

सुबोध खरे's picture

16 Jun 2015 - 7:18 pm | सुबोध खरे

आणि यात मूवी नव्हते

मृत्युन्जय's picture

16 Jun 2015 - 7:20 pm | मृत्युन्जय

तेंव्हा पुणेरी लोकांनी मुंबईची बरोबरी करणे सोडून द्यावे हि विनंती

ऑ?? बरोबरी???? मुंबईशी??????????? टकाला सांगितले होते तेच परत सांगतो. पुण्यावर एवढे वाईट दिवस नाही आले अजुन ;)

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 7:24 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

शेवटी मुंबई ती मुंबई.

हेच सांगतायेत हो सगळे!! मुंबई ती मुंबईच, तिला पुण्याची सर कशी येईल. आम्ही दुपारच्या जेवणानंतर हस्तप्रक्षालन करता करता कट्टे ठरवतो आणि संध्याकाळच्या चहाला भेटतो पण, आहात कुठे!!

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:24 pm | टवाळ कार्टा

हुस्शा... सुटले पुणेकर. किती तो अजागळपणा कट्टा ठरवताना. एक मुवि नसले की मुंबैकरांनी एक कट्टासुद्धा धड ठरवता येत नाही. छ्या.... ;)

मुंबैतल्या कट्ट्यांचे काँट्रॅक्ट मुवींना तह्ह्यात दिलेले आहे

धागा काढुन ठिकाणे ठरवायची नसतात टकाशेठ. फक्त माहिती घ्यायची असते. ठिकाण संयोजकानेच डोके वापरुन ठरवायचे असते. आत्तापावेतो कुठल्यातरी कट्ट्याला असे जाहीर धागे उघडुन ठिकाणे ठरवली गेली होती का? सूचना मागवल्या जातात आणि मग आयोजक योग्य जागा ठरवतात आणी जाहीर करतात. असो.

म्हणजे एखादा नॉन-पुणेकर मिपाकर पुण्यात आला असेल आणि त्याला कट्टा करायचा असेल तर ते शक्य नाही??

टका तुला कळकळीची विनंती आहे रे. आयुष्यात काहिही कर पण इव्हेंट मॅनेजमेंट नको करु. तुझ्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे.

एक पुणे सोडले तर बाकी ठिकाणी काहितरी नक्कीच करू शकेन =))

माझ्या घरापासून १६ किमी लांबचे ठिकाण सगळ्यांना सोईचे म्हणुन सुचवले होते. असो. मी म्हणजे सगळे पुणेकर नाही तरी हा असा फील तुला का आला कुणास ठाउक. तुला कुठे सगळ्या पुणेकरांच्या घराचे पत्ते माहिती आहेत. टेल टेल गोपी टेल.

ते तुम्च्यासाठी नव्हते

पुर्वीचे पुणे राहिले नाही पण पुण्यावर अजुन इतके वाईट दिवसही आलेले नाहित रे टका :P

खिक्क...जम्णार पण नै
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ

अजया's picture

16 Jun 2015 - 7:56 pm | अजया

मुंबई पुणे वाद बंद करा.मिपाधर्म खरा.कट्टे होतच राहाणार.होतो एखादेवेळी घोळ.चलता है!

मुक्त विहारि's picture

16 Jun 2015 - 8:02 pm | मुक्त विहारि

वाद मुंबै विरुद्ध पुणे आहे.

मिपाकर शेवटी एकच होतात.

मिपाकर असणे हाच एक धर्म.

यशोधरा's picture

16 Jun 2015 - 8:11 pm | यशोधरा

आणि तो वाद अपुणेकर उकरुन काढतात, ह्यावरुन पुण्याचे महत्व लक्षात यावे! =))

सुबोध खरे's picture

16 Jun 2015 - 8:14 pm | सुबोध खरे

आपले आरवणे ऐकण्यासाठी"च" सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्याचे मत आहे.
ह. घ्या.

पुणेरी कोंबड्याचे मत अपुणेरी लोकांना माहिती असावे, ह्यातच सगळे आले.

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 10:49 am | टवाळ कार्टा

पुणेरी कोंबड्याचे मत अपुणेरी लोकांना माहिती असावे, ह्यातच सगळे आले.

यालाच "पुणेरी कोंबडा" ही अफवा नसून वस्तुस्थिती आहे याचा पुरावा सम्जावा कै?

नै. ह्याला मुंबैकराची (निदान एकाची ) जळजळ समजावी! =))

यशोधरा's picture

16 Jun 2015 - 8:23 pm | यशोधरा

आणि बाय द वे, कोणत्याही प्रकारचे स्कोअर सेटलींग करत नाहीये ह्याची खात्री असू द्या.
हे मात्र हलके घ्याच!

सुबोध खरे's picture

16 Jun 2015 - 8:30 pm | सुबोध खरे

यशोधरा ताई
आम्हाला पण दंग करता येतो कि नाही ते पाहत होतो. राग मानु नये. पुण्याविषयी मला पण अतिशय प्रेम आहे. माझे अक्खे करियर पुण्यातच झाले आहे. हे उगाच चिखलात दगड मारून गम्मत पाहत होतो.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jun 2015 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर

हॅ: हॅ: हॅ: हे म्हणजे लाथ मारून सॉरी म्हणण्यासारखं झाल. शिवाय सॉरी म्हणताना दूसरी लाथ घालायची.

यशोधरा's picture

16 Jun 2015 - 8:44 pm | यशोधरा

पेठकर काका, डॉ. खर्‍यांचे बोलणे माझ्या लक्षात येत नाही असे नाही, पण त्यांची ती सवयच आहे. आधी बोलायचे, मग कांगावा करायचा आणि मग इतरांनाच म्हणायचे की तुम्ही स्कोअर सेटलींग करताय. तेव्हा आपण एकदच योग्य उत्तर द्यायचे, मग दुर्लक्ष करायचे, ही बेस्ट पॉलिसी आहे माझ्यापुरती. :)

डॉ., नो प्रॉब्लेम. तुम्हाला जमतय ते तुम्ही करा, मला जे जमतंय ते मी करतेच आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2015 - 9:47 pm | अत्रुप्त आत्मा

@ हॅ: हॅ: हॅ: हे म्हणजे लाथ मारून सॉरी म्हणण्यासारखं झाल. शिवाय सॉरी म्हणताना दूसरी लाथ घालायची.>>> :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jun 2015 - 10:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्यार्पी मिळवायला सगळ्यांना पुण्याचाचं आधार घ्यावा लागतो. ह्यातचं पुण्याचे महत्त्व आणि माझे सौख्य सामावलेले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2015 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 10:50 am | टवाळ कार्टा

तू पिंचिकर ना? अस्स तळ्यात मळ्यात नै करैचं

पैसा's picture

17 Jun 2015 - 11:01 am | पैसा

सगळे पिंचिं कर तसेच.

खटपट्या's picture

17 Jun 2015 - 11:09 am | खटपट्या

हो, चाय पन दीली नव्हती मेल्यांनी तुम्हाला. आठवतंय ना?

पैसा's picture

17 Jun 2015 - 11:12 am | पैसा

शेवटी एक कोकणीच धावून आला!

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 11:15 am | टवाळ कार्टा

अस्सल कोकणीच आहे तो...कॉफी देउन काजू काढणार =))

यशोधरा's picture

17 Jun 2015 - 12:03 pm | यशोधरा

ए, कोण रे तो कोकणातल्या लोकांना नावे ठेवतोय?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

कोण कोण तो? ;)

टका, यांचे अभिनंदन.

मुवि

खटपट्या's picture

17 Jun 2015 - 12:04 pm | खटपट्या

मेल्यानू, काजू काजू काय करतावाय? पुढच्या खेपेक काजू घेव्न येतंय
तुमची ती काफी का काय ती नुको आमका...आमचो चायचो पानी बरा असां...

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 12:37 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद स्क्रीनशॉट घेऊन जपून ठेवा रे =))

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 12:36 pm | टवाळ कार्टा

मी पनं कोकणीच असा... ;)

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 12:55 pm | मुक्त विहारि

कोकण डोंबोलीचाच एक भाग असा....

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 12:58 pm | टवाळ कार्टा

त्या हिशोबाने अख्खे कोकण जगाच्या मध्यवर्ती भागाभोवती आहे =))

अजून सेंच्युरी झालीच नाही का!

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा

तुम्ही आलात ना...आता नक्की होईल ;)

पैसा's picture

17 Jun 2015 - 1:48 pm | पैसा

मुंबई सह कोकणिस्तान झालाच पैजे.

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 1:51 pm | टवाळ कार्टा

गोवा पण घ्या त्यात (गोवा म्हणजे मूळचे कोकणच हो)

अजया's picture

17 Jun 2015 - 1:53 pm | अजया

१००!

अजया's picture

17 Jun 2015 - 1:55 pm | अजया

टक्याची शंभरी भरली!!

सूड's picture

17 Jun 2015 - 2:39 pm | सूड

मी पनं कोकणीच आसंय

=))

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 2:50 pm | टवाळ कार्टा

मी दोन्ही ऐकलयं

पैसा's picture

17 Jun 2015 - 3:19 pm | पैसा

आसंय्=मालवणी. आसां=कोंकणी.

तेच की, कायतरी एक बोल म्हणाव.

रच्याकने, ते कोकणी लेखमालेचं लक्षात आहे ना? =))

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा

आसंय्=मालवणी. आसां=कोंकणी.

माझ्या गावापासून गोवा बॉर्डर फक्त अर्ध्यातासावर आहे त्यामुळे असेल कदाचीत...पण मी दोन्ही ऐकलेले

पैसा's picture

17 Jun 2015 - 3:56 pm | पैसा

खंयचो रे तू?

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा

बानदा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

राम राम राम राम! :-D
उचला रे उचला आता! :-D

आलोच, ओंकारेश्वर की वैकुंठ स्मशानभूमी? कुठे न्यायचं तेवढं सांगा!! =))

खटपट्या's picture

17 Jun 2015 - 3:46 pm | खटपट्या

अरेरे, लोक टपून बसलेत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

टुम्म्हि काय नेणार? :P तुमचं उठिवल मार्केटयार्ड त्या टवाळानि ! :-D

तो तुमचा समज आहे!! चालू द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन.

त्याखाली पैकाकूंचा प्रतिसाद वाचून काही प्रकाश पडला तर बघा. =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या! :-D

भ्रामकभ्रमवादाचा बळि :- सूडुक मोडकं हडुक! :P lllllllluuuuu :P

आपणांस मुद्दा कळलेला नाही!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा

चालू द्यात तुमचे निरर्थक आत्मरंजन! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

कोकणी - हांवय कोकणीच आसा
आणि
मालवणी -मीही मालवणीच आसय.

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 6:21 pm | टवाळ कार्टा

बांदावासीयांना माहित असेल...मला नै माहीत...मला मालवणी समजते (शाळेत असताना तोडकी मोडकी यायची सुध्धा)

नाखु's picture

16 Jun 2015 - 5:08 pm | नाखु

५० झाल्याशिवाय सत्कार नाही

इथे जुना सत्कार आहे

पन्नाशीच काय धागा शंभरीची शक्यता असलेला "दारू"+"गोळा" वृत्तांताबद्दल अभिनंदन आणी पुलेशु

प्रेक्षक नाखु

विशाखा पाटील's picture

16 Jun 2015 - 5:37 pm | विशाखा पाटील

टका, वृत्तांत चांगला आहे.
तू दुसऱ्याच्या धाग्यांवर प्रतिसाद देण्याच्या नादात स्वत:च्या धाग्यावरच्या, किंबहुना स्वत: लिहिलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करत जाऊ नकोस रे. http://www.misalpav.com/comment/702757#comment-702757

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 5:39 pm | टवाळ कार्टा

ही पहिलीच वेळ होती ना त्यामुळे "नक्की का?" याच्या उत्तरासाठी वाट बघत बसलेलो :(

प्रशांत's picture

16 Jun 2015 - 5:44 pm | प्रशांत

.जुन्या काळातल्या गोष्टींवर चर्चा सुरु होती अशी आतल्या गोटातली खबर आहे म्हणतात...

तेव्हाच आपन दमामि/दमामी अ/नसल्याची खात्री झाली ;-)

सूड's picture

16 Jun 2015 - 5:49 pm | सूड

बलिवर्दनेत्रभंजक*

*श्रेयअव्हेरः भाषाभक्षक वाल्गुदाचार्य

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 10:52 am | टवाळ कार्टा

तेव्हाच आपन दमामि/दमामी अ/नसल्याची खात्री झाली ;-)

ते लक्षात आलेले माझ्या ;)
मिपावर इतकी वर्षे असूनसुध्धा चेहर्यावरचे भाव लपवायला जमत नैत तुम्हाला...कशी कंपूबाजी कर्णार तुम्ही llllllluuuuullllllluuuuuuu

यशोधरा's picture

16 Jun 2015 - 5:48 pm | यशोधरा

वृ अवडला पण वृचा शेवट जरा खटकला. असो. होईल सवय तुम्हांलापण.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2015 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा

@वृ अवडला पण वृचा शेवट जरा खटकला. असो>>> +++१११

@मग मी हळूच दबकतच ग्रुप जवळ गेलो (तर काय...न जाणो कुठूनतरी काटे / लाठ्या / लाटणी यांचा हल्ला झाला तर काय?...माझ्याकडे हेम्लेट आणि इंश्युरंस दोन्ही नव्हते) ;) आधी खात्री केली की कोणाच्याही हातात (स्पेशली बैकांच्या हातात) काही नाही :) >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

@दोघांनी मला आपादमस्तक न्याहाळले...दोघांच्याही नजरेत "हा दमामि???" असा प्रश्न सपष्ट दिस्ला...नजर बघूनच माझे कॅरेक्टर स्कॅन करणे सुरु आहे हे माझ्याही लक्षात आलेले (शेवटी युनिफोर्म असो वा नसो...नजर कधीही आउट ऑफ ड्युटी नसते) ;)>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

@तितक्यात वल्लीला मिपामालकांकडून २ अवजड ग्रंथांची भेट मिळाली आणि वलीचा चेहरा जत्रेत लॉलिपॉपं मिळालेल्या लहान मुलासारखा उजळला.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

कट्ट्याला कोण कोण येणार त्याच्या हजेरीसाठी नवीन धागा??? इतके लाड??? चायला आम्ही मुंबैकर फाट्यावर मारतो इतके नखरे असतील तर...यायचे तर यावे स्वागतच असेल पण नाही आले तर शष्प कै फरक नाही पडत.

>> हे मात्र संपूर्ण अनावश्यक होतं.
=============================
मी मात्र बिज्जी सिझनमुळे..कामाच्या मधे अर्धातास काढून आलेलो असल्याने,ह्या (पुढच्या..) धुमाकूळ कट्ट्याला मिसलो.. :(

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 6:44 pm | प्रचेतस

ओये टक्या, मालकांनी मला पुस्तकं भेट दिली नैत काही. मालक दू दू आहेत.

मी ती अभ्याला आणायला गेलो होतो फावल्या वेळात तेव्हढ्यात विकत घेतली.

यशोधरा's picture

16 Jun 2015 - 6:46 pm | यशोधरा

बरे झाले, खुलासा केलास, =) नैतर निळूभावची काही खैर नव्हती! =))
कोणती पुस्तके विकत घेतली? कुठे?

प्रचेतस's picture

16 Jun 2015 - 6:48 pm | प्रचेतस

महाराष्ट्र सारस्वत. विनायक लक्ष्मण भावे कृत. आणि पुरवणी शं. गो. तुळपुळे यांची.