काशिद बिच आणि बिर्ला मंदिर

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
11 Jun 2015 - 3:59 pm

या रविवारी अलिबागच्या फणसाड अभयारण्यात जायचं प्लान केला होता पण तो प्लान काही कारणाने रद्द करावा लागला. म म्हटलं आता निघायचं फिक्स केल आहे तर कुठेतरी फिरून येऊ म्हणून मग काशिद बिच ला जायचं फिक्स केल. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे घरातून बाहेर जाण्यासाठी तसा विरोधच होता पण रविवारी सकाळी वातावरण नीट असल्यामुळे मग ग्रीन सिग्नल मिळाला आणि सकाळी ७ वाजताच बाइकला किक मारून काशिद कडे प्रस्थान केलं. घरून निघताना काहीच खाल्ल नसल्यामुळे मग वडखळ नाक्याला थांबून वडा मिसळ हाणली, आणि त्या दुकानातली चहा इतकी आवडली कि दोन कप चहा घशाखाली कधी उतरली ते कळाल पण नाही.

पोटोबा

एका ठिकाणी छोटया डबक्यात कमळ फुललेली बघितल्यावर सौ नी गाडी थांबवायला लावली. मग थोडासा क्लिकक्लिकाट केला.

कमळ

कमळ १

जस जस अलिबाग जवळ येऊ लागल तस नारळांच्या झाडांची दाटी वाढू लागली आणि सोबत गारवा पण वाढू लागला. रणरणत्या उन्हात त्या थंडगार सावलीत गाडी चालवायला मजा येत होती. अखेर ज्यासाठी इतके दूरवर प्रवास करून आलो होतो त्याच पहिल दर्शन झाल

समुद्र

बिच वर पोहोचल्यावर मात्र थोडी निराशा झाली कारण गिरगाव चौपाटी प्रमाणे तिथे गर्दी झाली होती.

बीच

बीच

बीच

तिथे फिरताना या महाशयांची स्वारी करण्यासाठी लोकांची गर्दी होती

उंट

उंट

आणि ह्या गाड्या एकदम दिमाखात रांगेत आपल्या पाळीची वाट बघत उभ्या होत्या

गाडी

एका दुकानात कपडे बदलण्यासाठी विचारणा केल्यावर कळल कि वीज नसल्यामुळे पाणी नव्हत आणि त्यामुळे समुद्रात खेळून आल्यावर अंघोळीसाठी पाणी नसणार म्हणून पाण्यात न जाता फक्त बीच वर फिरत होतो.

एक चिमुरडा तिथे स्वतःचा किल्ला बांधण्यात मग्न होता

किल्ला

तिथे पर्यटकांसाठी झोपाळे बांधून ठेवले आहेत, कोनीही यावे कुठल्यापण झोपाळ्यावर झोप काढावी कोणीच त्रास द्यायला येत नव्हत. मग भटकून थकल्यावर तिथल्याच एका झोपाळ्यावर अंग टाकून दिले. वरती माडांच्या झावळ्यांची गार सावली, मस्त हवा म काय लगेच ब्रह्मानंदी टाळी लागली ती सौ च्या आवाजाने मोडली. मग तिथून जवळच असलेले बिर्ला मंदिर बघायला निघालो. इथून जवळ असणारे कोरलई किल्ला, रेवदंडा किल्ला बघितलेले असल्यामुळे परत गेलो नाही.

वाटेत एक मंदिर लागल, त्यात राधा कृष्णाची छान मूर्ती पाहून स्वतःच्याही नकळत हात जोडले गेले. मंदिरातल्या घंटेवर कलाकुसर केली होती.

राधा कृष्ण

घंटा

गरुड

बिर्ला मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे, तिथे कॅमेरा, मोबाईल, बैग न्यायला बंदी असल्यामुळे तिथले फोटो काढता आले नाहीत. त्या मंदिरातल्या मुर्त्या अप्रतिम आहेत, बघतच राहाव्यात अशा. गणपती, महालक्ष्मी, शंकर पार्वती आणि माझी आवडती राधाकृष्णाची मूर्ती. मन एकदम प्रसन्न होऊन जात. आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते, एकदम साफ स्वछ अस हे मंदिर आहे. इथली शांतता एकदम हवीहवीशी वाटणारी, मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.

आभाळ भरून यायला लागल होत, म्हणून मग कॅमेरा, मोबाईल, पाकीट तत्सम वस्तू प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवल्या आणि पहिल्या पावसात भिजायला तयार झालो.

काळे ढग

असेच काही फोटो

मोकळ आकाश२

मोकळ आकाश

फिरते राहा,
आपला जगप्रवासी

प्रतिक्रिया

सुनील's picture

11 Jun 2015 - 4:18 pm | सुनील

आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते

अजून बिर्लाच?

विक्रम इस्पातची मालकी गेल्या सहा वर्षांत आदित्य बिर्लांकडून गोयंका आणि गोयंकाकडून जिंदाल अशी हस्तांतरीत झाली तरी गणपती मंदिर अद्याप बिर्ला मंदिरच?

मृत्युन्जय's picture

11 Jun 2015 - 4:23 pm | मृत्युन्जय

धागा छान पण ...........

चहा आवडली???????????????????????????????????????????????????????????

चहा घशाखाली उतरली????????????????????????????????????????????????????

आता हे असे महाराष्ट्राच्या कुठल्या भागात बोलतात म्हणे? कुठेतरी बोलत असणारच हे नक्की कारण मराठी दर शंभर मैलांवर बदलते म्हणे

सतिश गावडे's picture

11 Jun 2015 - 6:24 pm | सतिश गावडे

आम्ही रायगडकर बोलतो. :)

रुपी's picture

12 Jun 2015 - 2:33 am | रुपी

धागा छान आहे. पण मला वाटते असे बोलत असलो तरी लिहिताना मात्र शुद्ध मराठीत लिहिण्याची काळजी लेखकांनी घेतली पाहिजे. साहित्य संपादकांनी फोटो, दुवे अशा तांत्रिक बाबींबरोबरच लेखनात या गोष्टींतही मदत करावी असे मनापासून वाटते.

अगम्य's picture

12 Jun 2015 - 5:55 am | अगम्य

पु ल यांनी मुंबईकरांचे वर्णन करताना "चाय पिली" असा प्रयोग केला आहे.

सिरुसेरि's picture

11 Jun 2015 - 4:32 pm | सिरुसेरि

वेपारी लोक 'मसालानी चाय पिली' असे बोलतात . असे वाचले आहे .

कटवड्याचा फोटो बेक्कार कातिल आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2015 - 8:33 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

चक्क लाळगळेरी अवस्था झालेली आहे.

कंजूस's picture

11 Jun 2015 - 8:20 pm | कंजूस

फणसाडचीच हद्द या काशिद रस्त्याला लागून आहे.फार सकाळीच गेलो तर पक्षी दिसतात.

विशाखा पाटील's picture

11 Jun 2015 - 8:31 pm | विशाखा पाटील

कमळाच्या फुलांनी भरलेलं 'डबकं'? तो कुरूळ गावाचा तलाव आहे.
काशिदला उंट, गाड्या, दुकानं! पूर्वीचं काशिद राहिलं नाही...

जुइ's picture

12 Jun 2015 - 3:21 am | जुइ

तेवढे फोटो मोठे करुन टाका.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jun 2015 - 4:52 am | श्रीरंग_जोशी

फोटोज व वर्णन आवडले.

पहिल्या फोटोत गाडीच्या किल्ल्या रसभंग करत आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

12 Jun 2015 - 9:56 am | विशाल कुलकर्णी

कटवड्याचा फोटो आवडल्या गेलेला आहे. बाकी फोटो मस्तच पण या फोटोतली तर्री पाहून वारल्या गेलेले आहे....
यावेळी पनवेलला घराकडे गेल्यावर चक्कर मारली जाईल :)

मदनबाण's picture

12 Jun 2015 - 10:28 am | मदनबाण

मस्त ! कलाकुसर केलेली घंटा विशेष आवडली... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie
बोला विठ्ठल ! :- नागरिक

शिल्पा नाईक's picture

12 Jun 2015 - 11:29 am | शिल्पा नाईक

छोट डबकं?...
अहो तो बराच मोठा तलाव आहे अन त्यात खुप सारी कमळं नेहमी फुललेली असतात...
ते सिमेंटच कमळ दिसलं नाही का तिथे?

गणेशा's picture

12 Jun 2015 - 1:36 pm | गणेशा

मस्त ... आवडली ट्रीप...

नुकतेच ६ महिन्यांपुर्वी काशीद बिच वर टेंट मध्ये राहिलो होतो .. मस्त एकदम... नेहमीच्या काशीद बिच पेक्षा ५०० -७०० मिटर आनखिन पुढे.. त्यामुळे गर्दी नव्हती.. कोणी नव्हते... रात्रीच्या लाटांचा आवाज.. पहाटेचे शितल वारे.. अहाहा.. निळा समुद्र आण सकाळनंतर तेथे आलेले डॉल्फीन ( नक्की तेच का माहीत नाही काही म्हणातात त्या सारखे दिसणारेच ते मासे आहेत ) क्रिकेट खेळत असल्याने डोल्फिन कॅमेरात घेता आले नाही...

बाकी बिर्ला मंदिर आवडले नव्हते...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jun 2015 - 2:16 am | निनाद मुक्काम प...

वीज नसल्याने पाणी नाही
पर्यटनाच्या सुविधा सुधारण्यास भरपूर वाव आहे
टेंट ची कल्पना भारी आवडली
जलचरांची खादाडी केल्याचा कोणताही पुरावा लेखात न टाकल्या बद्दल सौम्य निषेध

आमच्या तळ्याला डबक म्हणता? :(

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2015 - 2:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

विशेष् करुन <<मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.>> हे वाक्य भयानक आवडले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2015 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.