अमरनाथ यात्रा - माहिती हवी आहे

गिरकी's picture
गिरकी in भटकंती
11 Jun 2015 - 10:44 am

माझ्या आई आणि बाबांच्या (वय ६० आणि ६५) मनात खूप वर्षे अमरनाथ यात्रा करायचे चालू होते. त्यांनी चार धाम यात्रा ३ वर्षांपूर्वी व्यवस्थित पार पाडली. पण अमरनाथला होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांमुळे आम्ही कायम नकारघंटाच वाजवायचो. शिवाय ते जाऊन आल्याच्या पुढच्याच वर्षी केदारनाथ दुर्घटना झाली. त्यामुळे अमरनाथचा विषयच काढायचा नाही असे बजावले होते. पण त्यांना जायची अतिशय इच्छा असल्याने त्यांनी परस्पर या सीझनची टूर बूक करून टाकली आहे. त्यासोबत वैष्णोदेवी, कत्रा, काश्मीर सुद्धा आहे. आता त्यांना कटकट करण्यापेक्षा त्यांची ट्रीप आरामदायी कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आले. मुख्य म्हणजे ते दोघे सोडून बाकीच्यांनी (माझ्यासकट) हाय खाल्ली आहे. तर त्यांच्यासाठी आम्हाला पॉझिटीव वाटेल अशी माहिती हवी आहे. पण निगेटीव्ह असेल तरी सांगा बरं का.

मध्यंतरी आम्हीच (मी आणि नवरा) हिमालयन ट्रेकला गेलो होतो. तेव्हा हे लोक एकदम चिल होते. त्यांना आमचे काय होईल / होत असेल याचे जराही टेन्शन नव्हते. तर असा शांतपणा आता आम्हाला आणणे गरजेचे आहे. त्यासाठी मायबाप मिपाकर मदत करतील या आशेने आले आहे. :)

तर इथल्या कुणी किंवा त्यांच्या जवळच्या नात्यात अमरनाथ यात्रा केली आहे का?
त्यांचे खाणे, प्रवास, राहणे ई ती टूर कंपनी करणार आहे. आपल्या कडून साधारण काय तयारी करून जावे?
हाय अल्टीट्युड सिकनेसची शक्यता कितपत असेल?
त्यांच्यासोबत माझी मावशी व काका पण आहेत (वय ७० आणि ७५). त्यांनी सुद्धा चार धाम केले आहे. हे सगळे लोक आत्तातरी हिंडून फिरून ठणठणीत आहेत. पण अमरनाथ प्रकरण खरेच झेपेल का ?
चालण्याचा त्रास कितपत जाणवेल?
आणि नगद पैसे किती बाळगावे?
फोनला रेंज कितपत असेल?
नसेल तर इतर काही संपर्काचे साधन मिळेल का?
शिवाय साधारण किती दिवस आउट ऑफ कव्हरेज असतील असे मानून चालावे?

याव्यतिरिक्त काही सांगण्यासारखे अनुभव असतील तर नक्की सांगा.

------------------
धागा संपादित केला आहे

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

11 Jun 2015 - 12:42 pm | कपिलमुनी

म्हणजे ??

मी नीट नवीन ओळीला नवा प्रश्न लिहिला नव्हता. ते संपादक मंडळाने नीट नेटके केलेले दिसते.

नितीन पाठक's picture

11 Jun 2015 - 2:52 pm | नितीन पाठक

नमस्कार .....

आपले आई, वडील, मावशी आणि काका यांना बीपी, शुगर आणि महत्वाचे म्हणजे " दमा " या गोष्टी चा त्रास नसेल तर जायला काही हरकत नाही. यात्रा पायी करणार आहे का हेलिकॉप्टर ने करणार आहे हे स्पष्ट करावे. जर पायी यात्रा असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या गोष्टी (आजारबाबत) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अमरनाथ येथे वर पायी चढतांना थोडे जरी चाललो की आपला श्वास फुलतो (आपण धापा टाकत श्वास घेतो). दम्याचा त्रास असणा-या व्यक्तींना त्रास होतोच. दुसरे म्हणजे बालाताल मार्गे किंवा पहलगाम यात्रा सुरू करतांना जर घोडे किंवा पालखी केली तर काहीच त्रास होणार नाही. चार्जेस आधीच ठरवून घ्यावे. तेथील माणसे प्रामाणिक आहेत आणि भाविकांची व्यवस्थित काळजी घेतात.
उत्तम प्रतिचे, पायाला त्रास न होणारे स्पोर्टस शूज आवश्यक आहे. ते आताच घेउन दररोज पायात घालून पायी फिरण्याचा सराव करावा. ऐनवेळी शूज पायाला त्रास देतात.
वर जातांना जिभेवर पूर्णपणे ताबा ठेवावा (म्हणजे खाणे आणि बोलणे सुध्दा) यात्रा चांगली होईल. वर मोफत लंगर चालू असतात. तेथे तुम्ही मागाल ते म्हणजे पंजाबी डिशेस ते उडपी डिशेस, दिल्ली चाट, भजे, वडे इ. इ. इ. (यादी खूप मोठी होईल) पूर्णपणे मोफत मिळतात. सर्व प्रकारची मिठाई उपलब्ध असते. अगदी मुगाचा शिरा (साजूक तूपातला, काजू, बदाम घातलेला) मिळतो. एकदम मोफत आणि पाहिजे तेवढा ....
काळजी करू नका. यात्रा कंपनी काळजी घेईलच.
बीएसएनएल शिवाय कोणतीही मोबाईल सेवा मिळत नाही त्यामुळे जातांना बीएसएनएल चे पोस्ट्पेड कार्ड घ्यावे. कोणी कितीही सांगितले तरी कापराचा वापर टाळावा. (पूजेत वापरतो तो कापूर) .
वर जातांना कमीत कमी सामान बरोबर न्यावे. रेनकोट, छ्त्री, स्वेटर आवश्यक. नेहमीची औषधे आवश्यक.

गिरकी's picture

11 Jun 2015 - 2:58 pm | गिरकी

हेलिकॉप्टरची आठवण करून दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे !! ती यात्रा कंपनी छोटी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हेलिकॉप्टर नसेल बहुधा. हेलिकॉप्टर तिथे जाऊन बूक करता येऊ शकते काय? आधी करायचे असेल तर कसे करता येईल? त्यांना पायीच जायची इच्छा आहे. पण एक अनुभव म्हणून हेलिकॉप्टर बूक करून देऊ शकेन. वन वे सुद्धा चालेल. शोधा शोध करते आता.

गिरकी's picture

11 Jun 2015 - 3:13 pm | गिरकी

हेलिकॉप्टरची आठवण करून दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे !! ती यात्रा कंपनी छोटी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हेलिकॉप्टर नसेल बहुधा. हेलिकॉप्टर तिथे जाऊन बूक करता येऊ शकते काय? आधी करायचे असेल तर कसे करता येईल? त्यांना पायीच जायची इच्छा आहे. पण एक अनुभव म्हणून हेलिकॉप्टर बूक करून देऊ शकेन. वन वे सुद्धा चालेल. शोधा शोध करते आता.